कवितेवर केलेली कविता

निलम बुचडे's picture
निलम बुचडे in जे न देखे रवी...
2 Nov 2015 - 7:05 pm

*****कविता*****
कविता म्हणजे कवीजीवनाचे पहिले पान
कविता म्हणजे कल्पनांचे सोनेरी रान
कविता म्हणजे मनःचक्षूंचे प्रतिबींब
कविता म्हणजे उगवणारे सूर्यबिंंब
कविता म्हणजे हरवत जाणारी वाट
कविता म्हणजे सुविचारांची पहाट
कविता म्हणजे तृणातील इवले फूल
कविता म्हणजे शब्दांची सोनेरी झूल
कविता म्हणजे प्रतिभेचा मधुर मेवा
कविता म्हणजे कवीचा अनमोल ठेवा...
- निलम बुचडे.

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

2 Nov 2015 - 9:07 pm | चांदणे संदीप

आता कळाल पुलंनी ज्ञानेश्वरांना "व्हाल का हो नवकवी?" अस च्यालेन्ज का दिलं होत!!

कविता म्हणजे कवीचा अनमोल ठेवा...

हा माझा एक थुकरट प्रयत्न...
कविता म्हणजे निबुचा निळापिवळा निंबुडा!

असो, जोक्स अपार्ट...
कविता म्हणजे फक्त ओढूनताणून जुळवलेले यमक आणि खरवडून काढलेल्या उपमा एवढेच नसते. तुमचा प्रयत्न ठीकठाक होता. अजून चांगल लिहू शकता!

पुलेशु!
Sandy

चांदणे संदीप's picture

2 Nov 2015 - 9:12 pm | चांदणे संदीप

http://www.misalpav.com/node/1958

अशा काही लेखांचा अभ्यास करा एवढेच सुचवेन!
Sandy

प्यारे१'s picture

2 Nov 2015 - 9:11 pm | प्यारे१

http://misalpav.com/node/19959

एकदा वाटलं कविता करावी...
सोप्पं तर असतं..
'र' ला 'र' आणी 'ट' ला 'ट',
त्यात काय एवढं...
जमेल की आपल्यालाही
एवढे काय आपण 'हे' आहोत...

थोडे छान, थोडे दुर्बोध,
थोड रुपकात्मक,थोडे तरल,
काही मात्र अगदीच वास्तव
लिहू आपण चार शब्द...

मात्रा देखील जमतीलच की,
वृत्त थोडी अडखळ्तील ही,
कवयत्रिचे देउन नाव,
निभावून ही जाईलच की...

मग वाटले नको असे,
मग वाटले नकोच ते,
मिळेल फटका, होईलही कौतुक,
पण कशाला हवे जोडायला
आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना.....

चांदणे संदीप's picture

2 Nov 2015 - 9:13 pm | चांदणे संदीप

प्यारेभाऊ जब्रा!!
___/\___ घ्या!

अभ्या..'s picture

2 Nov 2015 - 9:16 pm | अभ्या..

मस्त प्यारे.

बर्‍याच इन्स्टंट नवकविंनी हे वाचून पेर्णा घेतली तरी पुरे.

मित्रहो's picture

3 Nov 2015 - 12:08 pm | मित्रहो

एकदम जबरदस्त

आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना.....

हे पटल तरी पोतेऱ्याचा मोह आवरत नाही.

'बोका' झाला, कविता झाली, आता पाककृती?! आणि खरं बोका-१ झालाय फक्त ;-)

मिपावर कोणालाही लेखन करायचं असलं तर उत्तेजन देण्याचा प्रयत्न असतो. पण "कसंही करून एक घाणा पाडाच बुवा" असा त्याचा अर्थ नव्हे!! सर्वानाच रामदासांची उंची गाठणं शक्य नाही कबूल. पण परत तोच मुद्दा - याचा अर्थ काहीही "गोड मानून घ्यावं" अशी अपेक्षा खपून जावी, असाही नाही. पुलेशु.

निलम बुचडे's picture

2 Nov 2015 - 11:43 pm | निलम बुचडे

['बोका' झाला, कविता झाली, आता पाककृती?! आणि खरं बोका-१ झालाय फक्त ;-) ]
नव्या नवलाईचा उत्साह जरा ऊतू जातोय हो... बस, बाकी काही नाही. ः-))
आणखी एक - पाककृतींची आवड नाहीय जास्त ;-)

भाकरी's picture

3 Nov 2015 - 12:28 am | भाकरी

समजू शकतो. लिहू नका असं नाही, पण १००% जमलंय वाटलं तर नाही, ११०% जमलंय वाटलं तरच टाका ;-)

नव्या आहात तर एक टिप देतो - टूलबारवर अवतरण चिन्ह दिसतायत वरती? ती वापरून संदर्भासाठी दिलेला मजकूर दाखवणं जास्त सोईचं होतं आणि व्यवस्थित दिसतं. म्हणजे हे असं;

आणखी एक - पाककृतींची आवड नाहीय जास्त ;-)

हवा तो मजकूर हायलाईट करून अवतरण चिन्हावर क्लिक करा.

निलम बुचडे's picture

2 Nov 2015 - 9:20 pm | निलम बुचडे

धन्यवाद. मी तुमची मनापासून आभारी आहे.
प्रामाणिक प्रतिक्रिया आणि उपयुक्त मार्गदर्शन यांचा खूपच अभाव आहे आजकाल. प्रतिक्रिया तर सहज मिळतात, पण मार्गदर्शन कोणीच करत नाही..
खूप खूप धन्यवाद. अजून चांगले लिहीण्याचा प्रयत्न करेन.

चांदणे संदीप's picture

2 Nov 2015 - 9:31 pm | चांदणे संदीप

काय हो तै??

प्रतिक्रिया तर सहज मिळतात, पण मार्गदर्शन कोणीच करत नाही..

एकदम व्हिलनछाप अगरबत्तीच आमच्या समोर लावली की तुम्ही!

आम्हीही वर आम्हाला झेपेल इतक मार्गदर्शन केलंय की!!
(आम्ही स्वत:ला कधीमधी अहोजाहोपण करतो!)
Sandy

चाणक्य's picture

2 Nov 2015 - 9:40 pm | चाणक्य

अहो म्हणूनच तर तुम्हाला धन्यवाद देउ राह्यल्या ताई.

चांदणे संदीप's picture

2 Nov 2015 - 9:42 pm | चांदणे संदीप

तै प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहिण्याच्या विरोधी असाव्यात. काय कळेना त्याच्यामुळे!

निलम बुचडे's picture

2 Nov 2015 - 10:28 pm | निलम बुचडे

उपप्रतिसादाचं आधी लक्षात आलं नव्हतं ना..
मी नवीन आहे अजून. सांभाळून घ्या प्लीज. ः-)
[ (आम्ही स्वत:ला कधीमधी अहोजाहोपण करतो!) ]
याचा अर्थ नाही कळला हो...

चांदणे संदीप's picture

2 Nov 2015 - 10:53 pm | चांदणे संदीप

आधीच आमच्या लेखनाची पिसं निघायला लागलीत! ;-) त्यात वर तुमचे 'सर!'

स्वत:ला अहोजाहो करायला लागणे हे दुस-याने हाडतुडं करायला लागल्याचे लक्षण आहे, बाकी काही नाही!

(मीही नवीनच आहे, बास करतो आता!)

चांदणे संदीप's picture

2 Nov 2015 - 9:45 pm | चांदणे संदीप

आधीचा प्रतिसाद ढिस बर्का!

निलम बुचडे's picture

2 Nov 2015 - 9:21 pm | निलम बुचडे

खूपच छान...

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2015 - 9:41 pm | परिकथेतील राजकुमार

कसे सुचते हो येवढे छान छान ?

चाणक्य's picture

2 Nov 2015 - 9:43 pm | चाणक्य

हायला. साक्षात परागमन? विश्वास बसेना राव. कुठे होता मालक?

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2015 - 9:44 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या कवितेने खेचून आणले

मांत्रिक's picture

2 Nov 2015 - 9:47 pm | मांत्रिक

नमस्कार घ्या मालक!!!
--/\--

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2015 - 9:48 pm | परिकथेतील राजकुमार

__/\__

मांत्रिक's picture

2 Nov 2015 - 9:49 pm | मांत्रिक

खुद्द परा आले म्हणजे मिपा होणार ढिंच्याक ढिच्याक!!!

भाकरी's picture

2 Nov 2015 - 9:48 pm | भाकरी

निलमताई, तुम्ही चक्क पर्‍याला बोलता केलंत परत!! पर्‍या, आता आल्यासारखा रहा ईथे महीनाभर. आणि त्या धम्यालाही बोलावता आलं माघारपणाला तर बघ ;-)

मांत्रिक's picture

2 Nov 2015 - 9:50 pm | मांत्रिक

धम्यालाही बोलवा मालक!!!

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2015 - 9:51 pm | परिकथेतील राजकुमार

येणार सगळे येणार!
अच्छे दिन आ रहे है!

निलम बुचडे's picture

2 Nov 2015 - 10:38 pm | निलम बुचडे

(अच्छे दिन आ रहे है!)
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, आमच्यासारख्यांच्या
आयुष्यात नक्कीच अच्छे दिन येतील, असं वाटतय.

प्रीत-मोहर's picture

3 Nov 2015 - 7:04 am | प्रीत-मोहर

तथास्तु!!!!

निलम बुचडे's picture

2 Nov 2015 - 10:33 pm | निलम बुचडे

खूप छान.
एवढया चांगल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद.

एकप्रवासी's picture

2 Nov 2015 - 11:00 pm | एकप्रवासी

कवितेची कल्पना आवडली ……….

निलम बुचडे's picture

2 Nov 2015 - 11:26 pm | निलम बुचडे

एकप्रवासीजी धन्यवाद !!!

कविता म्हणजे कवीने स्वता:वरून उतरून टाकलेला घास
कविता म्हणजे उगीचच रसिकतेचा झालेला भास !
कविता म्हणजे गुरांपुढे टाकलेले खोटे गवत
कविता म्हणजे.. इथे नको.. ख व त !!!:)

दमामि's picture

3 Nov 2015 - 4:32 pm | दमामि

वा!:)

अजया's picture

3 Nov 2015 - 10:01 am | अजया

=))