काल दुपारी....

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
31 Oct 2015 - 8:08 pm

काल दुपारी मी जेव्हा झाडाखाली बसलो होतो
एक शेंबड पोर गाढवाच्या शेपटाला डबडं बांधुन खेळत होतं

बिचारं गाढव कान हलवत नुसतचं ऊभं होतं
शेंबड पोर चड्डी वर खेचत डबड्याला काठीनं बडवत होतं

मी गाढवाकड बघत होतो, गाढव खाली बघत होतं
आणि ते शेबडं पोर डबड्याकड बघत होतं

कंटाळुन शेंबड्यानं डबड्यात पाणी वतलं
काठीच्या दोन धपक्यात डबडं एकाकी तुटलं

मग ते शेंबड पोर शेपटालाच बडवत बसलं
गाढव पण हळुहळु पुढे सरकत चाललं

जेव्हा एक फटका गाढवाच्या जिव्हारी बसला
तसा त्याचा एक पाय शेंबड्याच्या कपाळी गेला

शेंबड्याला दोन टाके पडले म्हणे...

काहीच्या काही कवितामुक्त कवितामौजमजा

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

1 Nov 2015 - 1:02 pm | चांदणे संदीप

मस्तच कविता! मस्त हसलो!

अशी कविता बरेच दिवस वाचनात नव्हती आली.
तसे मिपावर अद्धून मद्धून साखरे ऐवजी गूळ घातलेले धागे येतच असतात त्यांनाच गोड मानून हसावे लागते!
Sandy

बाबा योगिराज's picture

1 Nov 2015 - 1:19 pm | बाबा योगिराज

ख्या ख्या ख्या.
सुरवातच मस्त केलित.
हलक फूलक. दुपारी दुकानात बसून हसायला मज्जा आली.
पुलेशु.