ही कसली उस्तुकता?
काल दसरा झाला. आज सर्व पेपरना सुट्टी.लोकसत्ता तेव्हडा चालू, म्हणून मिळाला.
लोकसत्ता अपवादानं हाती येतो. कागद, छपाई दर्जेेदार ,मन भरुन आलं. मनात आलं पेपर लावावा .
किती पेपर लावणार ,किती वाचणार दुसरं मन.
आणि पान नं. ८ अर्थसत्ता वर आलो,तिथं एका बातमीचं हेडिंग, “मूहुर्ताची सोने खरेदी----------
-----------बाबत उस्तुकता , काय?उस्तुकता? हा कोणता शब्द? आम्ही उत्सुकता ,औत्सुक्य वरून उत्सुकता शब्द
ऐकला होता.लोकसत्ता तुम्ही सुघ्दा ?मनात आलं
इथं शब्द छल करायचा अजिबात माझा हेतु नाही.पण अशी चूक मुद्राराक्षसाची होऊ शकत नाही,ही उपसंपादकाची डुलकी
पण नव्हे हे चक्क व्याकरणाचं अज्ञान आहे.
फार पूर्वी ज्यावेळी १रु. किंमत निदान आजची २५०रु. असेल त्यावेळी टाईम्स आॅफ इंडिया त्यांच्या पेपर मधल्या
एका स्पेलिंग मिस्टेकला १रु. देऊ असं जाहिर करायचे,मला नाही वाटत कोणी त्यांच्याकडून पैसे मिळवू शकले असेल.
लोकसत्ता तुमी जर असं चुकलासा तर बराबर कोन लिवनारवो?
प्रतिक्रिया
24 Oct 2015 - 12:13 am | एस
लोकसत्ता काय, सकाळ मध्येपण हल्ली शुद्धलेखनाच्या चुका सररास आढळू लागल्या आहेत.
24 Oct 2015 - 12:40 am | होकाका
"या सगळ्या लेखकांनी आपले मेंदू विकले की काय?" असा प्रश्ण पडावा असले भिक्कार लेखन बिग मिडिया पसरवत असतो. (अ)शुद्धलेखन ही खूपच मामुली गोष्ट झाली.
दिवाकर कुलकर्णी, एस,... माझा +१
24 Oct 2015 - 1:07 am | प्यारे१
कोल्हापुरात राहून लोकसत्ता कसला वाचताय मालक.
पुढारी (उच्चारे-पुड्री) नाय वाचत काय?
24 Oct 2015 - 1:53 am | प्रभाकर पेठकर
मी तर, 'फुडारी' असं शुद्ध स्वरूप ऐकलं आहे.
24 Oct 2015 - 4:08 am | अन्या दातार
कोल्हापुरात पुढारीला पुड्रीच म्हणतात =))
24 Oct 2015 - 2:10 am | म्हसोबा
अहो आजोबा, तुमचा शुद्धलेखनाचा काळ गेला गेला. आता आमचा समाज माध्यमांचा (म्हणजे सोशल मिडीया बरं का) पगडा असलेल्या तरुणांचा काळ आहे. आता तुम्ही सांगा, जर "Ar you there?" हा प्रश्न व्हाटसपवर "u der" असा लिहिणार्या पीढीचा प्रतिनिधी तेथे कामास असेल तर असं काही झाल्यास नवल ते काय?
24 Oct 2015 - 9:38 am | बाबा योगिराज
ख्या ख्या ख्या.
च्या मारी, point to be noted judgesaab.
24 Oct 2015 - 10:04 am | बोका-ए-आझम
आजची पिढी भापोमसंत या तत्वावरच विश्वास ठेवते!
25 Nov 2015 - 6:14 pm | अफ्रिकेचा मुम्बैकर
“Are you there” म्हनायचा आहे काय !!
24 Oct 2015 - 10:16 am | सर्वसाक्षी
कुलकर्णी साहेब,
आपण म टा वाचत नाही का? वाहिन्यांवरील बातम्या ऐकत वा सरकपट्टीवर वाचत नाही का? नाहीतर आपण ही तक्रार केलीच नसतीत.
24 Oct 2015 - 10:17 am | दिवाकर कुलकर्णी
“अदुगर मी सुटीचं काम केलंय म्हून मला बदली सुटी मिळावी “ असा एका शिपायाचा अर्ज
आला असता ,त्याला मी अर्ज नीट लिहून आण म्हणून परत पाठवलं ् त्यानं पुन्हा लिहून आणला, त्यात
त्यानं अदुगरच्या ऐवजी अदोगर लिहून आणलं होतं ,माझ्या ठिकाणी चितळे मास्तर असते तर चिंच्या हे अदोगर नसून
हे अगोदर असतं ,या शब्दात ग अगोदर येतो काय समजलेत,म्हणून लिही १००वेळा अगोदर,अशी शिक्षा फरमावली असती.
परवा नगर पालिकेत घराशेजारचा खांबावरचा लाईट लागत नाही म्हणून सांगायला गेलो होतो.वायरमन तक्रारबुकात
तक्रार नोंदवायला लागला ,सूर्यवंशी शेजारी कुलकर्णी त्याला लिहीताना घाम फुटत होता,नको तुमच्या संगच येतो म्हणाला,
आला आणि ए क मिनिटात कामहि केलं. मी तरी काय करु ,माझं नांव करमरकर नाही हा माझा दोष नाही, आणि त्याला
चितळे मास्तर भेटले नाहीत हा त्याचा दोष नव्हे . कोल्हापूरात निम्मे सूर्यवंशी आहेत व निम्मे कुलकर्णी आहेत हेहि इथं जाताजाता नमूद करू इच्छितो..
जोडाक्षरांची ऐंशीकी तैंशी,कांहीं दिवसापूरी एका बी. आर्च. आर्किटेक्टला रत्नागिरी शब्द लिहीता येत नव्हता,
मी पाहिलंय.
माझ्या स्फुटावरच्या प्रतिक्रिया वाचून उस्तुकता लिहीणार्या महाभागा जा या बुढाचार्यानी तुला माफ केलंय जा.फकत अदोकर चांगलं मराटी
लिवायला मातुर शीक फार तर चितळे मास्तरांची शिकवणी लाव जा.
आजोबाना अजून लिहायला स्फूर्ति दिल्याबद्दल तमाम नातवाना अनेक आशीर्वाद.आता लेखणी खाली ठेवणे नाही.
24 Oct 2015 - 10:29 am | तर्राट जोकर
आता लेखणी खाली ठेवणे नाही.
कुटंय त्यो आजोबा म्हन्न्नारा.... ? तुज्यासंगट आता आमीबी गेलो ना बाराच्या भावात.....?
मायला, ह्या तरन्या पोरांना खाय आक्कल नस्ती.. कुटंबीकायबी बोलतंय..
24 Oct 2015 - 10:34 am | म्हसोबा
किती तो शुद्धलेखनाचा अट्टाहास. जरा शहरी चौसोपी वाडयातून बाहेर पडून आजूबाजूच्या वाडयांवर आणि आदिवासी पाडयांवर फिरा. म्हणजे कळेल तुम्ही कुठे आहात ते.
भाषा हे आपल्या संवादाचे माध्यम आहे. आपण भाषेसाठी नाही. आणि कुठली भाषा प्रमाण मानायची? तुमची आताची पुस्तकी भाषा का? फार दूर नका जाऊ फक्त कोकणात फिरा. मुंबईपासून मालवण कणकवलीपर्यंत. जिल्हा संपायच्या आत भाषा बदलते इथे. नुसते रायगडचे उदाहरण घेतलेत तरी उत्तर रायगडमध्ये आगरी आणि दक्षिण रायगडमध्ये बाणकोटी या बोली भाषा आहेत. लोकांचे दैनंदिन व्यवहार याच भाषांमध्ये होतात.
ते जाऊ दया. आमच्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील भाषेबद्दल काय मत आहे तुमचे. ती शुद्ध आहे का?
24 Oct 2015 - 10:42 am | तर्राट जोकर
ज्ञा-रे,
काकांचा मुद्दा १००% बरोबर आहे. वृत्तपत्रात प्रमाणभाषेची अपेक्षा अजिबात चूक नाही. बोलीभाषेला इथे मध्येच ओढून आणायची गरज नाही. ज्ञानप्रसार, माहितीप्रसार करतांना प्रमाणभाषा योग्य मानली गेली आहे कारण चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व जनतेसाठी किमान एक 'प्रमाण' असावे म्हणून. रत्नागिरी, किंवा जव्हेरगंज लिहितात त्या भाषेत गडचिरोलीमध्ये पत्रकं वाटली, किंवा झाडीबोलीतली पत्रके मुंबईत वाटली तर उपयोग काय? त्यासाठी प्रमाणभाषेचा आग्रह. प्रमाणभाषाही काळानुसार बदलू शकते. पण तिचे सर्वमान्य प्रामाण्य बदलत नाही. तेच तिचे खरे काम असते. ज्ञानोबांची भाषा त्या काळात प्रमाण होती. म्हणून त्यांनी त्या भाषेत लिहिले. गोंड, भिल्ल व कोरकू भाषेत लिहिले नाही.
24 Oct 2015 - 10:47 am | विक्रान्त कुलकर्णी
ओ.. रेडेश्वर.. बोलीभाषा आणि लिखित भाषा यातील फरक कळतो का ? व्याकरणाचे नियम लिखित प्रमाण भाषेला लागू होतात. आता यात बोलिभाषान्चा कुठे संबंध आला ? आता भाषा-व्याकरणामध्ये तरी प्रादेशिकवाद आणू नका.
24 Oct 2015 - 10:53 am | सुबोध खरे
बोलीभाषा आणि लिखित भाषा यातील फरक
आमचे आजोबा बोलता बोलता अस्सल कोकणी भाषेतील शिव्या( आई माई आणी लिंग विषयक) सहज बोलत आणी ते कुणाला जाणवत ही नसे. तीच भाषा त्यांनी पत्रात लिहिली असती तर अश्लील म्हणून त्यांच्या वर खटला भरला गेला असता.
सुज्ञांस सांगणे न लगे.
24 Oct 2015 - 11:09 am | द-बाहुबली
माझे अजोबा, "अजिबात नाही", "झाट ऐकणार नाही" असं बिंधास्त पाहुण्यात बोलायचे त्यावेळी मलाही व समवयस्कांना (त्यांचे आजी आजोबा मधुनच बोलताना) ते कधीच अश्लील वाटत नसे, आम्ही पोरं तिव्र नकारात्मक भवना "शॅ" किंव्हा "शॅट" (कॅच सोडला वगैरे) शब्दात व्यक्त करत असु त्याचे ते कायम र्हायमींग वाटत आले. जसे वय वाढले तशी श्ब्दसंग्रहात भर पडली पण आजोबा जे बोलायचे ते खरोखर "झाट" होते हे आजही मनाला पटत नाही. हेच अगदी "घंटा" या श्ब्दप्रयोगाबद्दल. उगा काहीतरी मंदीर देवळाचा काही संबंध असेल असे वाटायचे पण कालऔघात घंटा म्हणजे काय हे कळालेही अन मुन्नाभाय एम्बीबीएस नंतर अगदी माझ्याच सहज बोलण्यात सामावुन गेलेही :)
24 Oct 2015 - 10:40 am | विक्रान्त कुलकर्णी
काय लोकसत्तेतील क्षुल्लक चुक घेउन बसलायत ?? आमच्या ठाण्यातील प्रत्येक टी.एम.टी. बसवर "ठाणे (पुर्व)" असे लिहिले आहे. ही चुक कंट्रोलरच्या लक्षात आणून दिल्यावर त्याची प्रतिक्रिया काय ? "लोकं बस मध्ये प्रवास करण्यासाठी बसतात. व्याकरणाचे पाठ गिरविण्यासाठी नव्हे." आणि आता तर प्रत्यक्ष नेमाडे गुरुजींनी सन्गितले आहे, की व्याकरणातील र्हस्व-दीर्घ कशाला हवे ? सरळ जसे हवे तसे लिहा.
24 Oct 2015 - 10:47 am | सुबोध खरे
ठाण्यात राजमाता वडेवाल्याच्या कोपर्यावर प्रवेश फक्त च्या ऐवजी प्रवेश फत्क असे लिहिलेले होते. पुढे कित्येक वर्षे आम्ही कसे जायचे ते "प्रवेश फत्क" वरून खाली जा किंवा डावीकडे वळ असे सांगत असू.
24 Oct 2015 - 12:21 pm | दिवाकर कुलकर्णी
आमच्या शेजारी मराठीतले एक प्रथितशय लेखक रहातात,त्यानी शेजारची जागा
एका मेसला भाड्याने दिलेली आहे.पार्किंगचा प्रॉब्लेम होतं होता ,म्हणून त्याने बोर्ड लावला,
वहाणे आत घेऊ नयेत.लेखकमहाशयानी तो बोर्ड बघितला आणि त्याचं पित्त खवळलं आणि त्याला
म्हणाले एकतर बोर्ड दुरुस्त करुन आण नाहीतर काडी देतो माझी सगळी पुस्तकं जाळून टाक
त्या बिचार्याला कांही कळलं नाही,वणवण हिंडला प्रत्येक पेटर त्याला बोर्ड बरोबरच आहे
म्हणायचा,सरतेशेवटी जेव्हां त्याला कुणीतरी कोल्हापूरी दाखवलं तेव्हा त्याला आणि त्याच्या
पेटरलाहि चूक कळली.मेस आता पूर्वी प्रमाणे उत्तम चालू आहे.
24 Oct 2015 - 12:49 pm | दिपोटी
दिवाकर कुलकर्णी,
'प्रथितशय' बरोबर की 'प्रथितयश'?
'रहातात' बरोबर की 'राहतात'?
शुध्दलेखनाबद्दलचा तुमचा आग्रह मलाही मान्य आहे, पण तुमच्या-माझ्याकडून सुध्दा (किंव), नवीन नियमाप्रमाणे, सुद्धा) होतात ... मात्र अर्थात किमान/निदान एखाद्या प्रथितयश वर्तमानपत्रात तरी अशा अक्षम्य चुका होऊ नयेत हे कबूल.
- दिपोटी
24 Oct 2015 - 12:51 pm | दिपोटी
'किंव' ऐवजी अर्थातच 'किंवा' हवे ...
- दिपोटी
26 Oct 2015 - 1:06 am | प्रभाकर पेठकर
शिवाय 'उस्तुकता' नाही, 'उत्सुकता'.
24 Oct 2015 - 12:48 pm | असंका
व्याकरणाचं अज्ञान? म्हणजे व्याकरणाचा एखादा नियम मोडला गेला अशा अर्थी का?
मी पण जरा अज्ञानीच आहे व्याकरणाच्या बाबतीत. जरा अज्ञान दुर करणार का?
त्या लेखात समजा "उत्सुकता" असा शब्द लिहिला असता तर बरोबर असतं का?
जर "हो", तर मग त्याच्याऐवजी "उस्तुकता" लिहिल्याने व्याकरणाचा कुठला नियम मोडला गेला?
जर "नाही", तर मग बरोबर काय असतं?
24 Oct 2015 - 12:53 pm | प्यारे१
मी काय म्हंतो, तुमी कोल्लापुरकर, त्यानी कोल्लापुरकर.
रंकाळ्यावर भेटा संदयाकाळी आणि काय त्ये ठरवून टाका भेळ खात खात. हुन जौंद्या. ;)
24 Oct 2015 - 12:59 pm | असंका
गरीबाचं अज्ञान दूर व्हावं अशी पण काय काय विद्वज्जनांची इच्छा नाय... फाटे फोडू र्हाय्ले... :(
जेनुइन शंकाय हो...तुम्ही उत्तर द्या की म्हैत असेल तर...
24 Oct 2015 - 1:02 pm | तर्राट जोकर
http://www.loksatta.com/arthasatta-news/customers-buy-gold-at-dussehra-f...
"नव्या निवार्याबाबत उस्तुकता."
बातमीत शब्द अजूनही बदलला नाहीये. 'नव्या निवार्यांच्या खरेदीबाबत खरेदीदार उत्सुक आहेत' असा त्या मथळ्याचा अर्थ आहे. यात व्याकरण कुठे चुकले असे वाटत तर नाही. वृत्तपत्राचे मथळे जागेअभावी असेच असतात.
25 Oct 2015 - 6:37 am | अत्रन्गि पाउस
अशुद्ध लेखन स्पेलिंग मिष्टेक पण असू शकते कन्फ्युज्ड अकाऊटंट
साहेब ...
24 Oct 2015 - 12:56 pm | गामा पैलवान
ठाण्याला रेल्वे स्थानकाच्या कल्याण बाजूच्या प्रवासी पुलावरील एका जाहिरातीच्या खाली 'अनु नं' लिहिलं होतं. मी आणि भाऊ ते पाहून खूप हसत असू. अनुक्रमांक लिहा किंवा सरळ नंबर असा इंग्रजी शब्द वापरा की राव. हे अनुनंबर काय आहे!
थोडा अंदाज लावला की काय घडलं असावं. रंगाऱ्याला ज्याने मजकूर लिहून दिला त्याला क्रमांकातला क्र लिहिता येत नव्हता. म्हणून त्याने 'अनु' पर्यंत लिहायला सांगितलं. 'क्रमांक' नंतर सांगतो असं काहीसं झालं असावं. तर तो 'क्रमांक' कधी गवसलाच नाही. म्हणून नंबर लिहायचं ठरवलं असावं. पण अनुनंबर फारंच भयंकर विनोदाचा विषय होईल (बहुतेक ती कोचिंग क्लासची जाहिरात होती !). यावर सुवर्णमध्य म्हणून 'नं' टाकला. आता टाकला तर टाकला पण 'अनु' पुसायचा की. पण तेही नाही. वा रे पठ्ठे!
-गा.पै.
24 Oct 2015 - 3:29 pm | आनंदराव
आरक्षणाचे हे तोटे तर नाहीत ना, असा एक प्रश्न उगीचच मनात येऊन गेला
24 Oct 2015 - 4:01 pm | तर्राट जोकर
काडी उत्तम....
ओपनवाल्यांना अचूक राहण्याचं वरदान प्राप्त असतं का रावसाहेब?
24 Oct 2015 - 4:03 pm | प्यारे१
असा 'प्रश्ण' का बरे पडला आपल्या मनास?
- आदर बीसी प्यारे
24 Oct 2015 - 4:07 pm | तर्राट जोकर
हा क्वेश्चन मला का रावसायबांशी...?
24 Oct 2015 - 4:09 pm | अभ्या..
काडी चांगलीय. जोकराचा प्रश्न आवडला.
परत ही अचूकता ठरवायची कुणी अन कशी हे आलेच.
24 Oct 2015 - 4:35 pm | दिवाकर कुलकर्णी
मा.दिपोटी (संदर्भ आर्यभूषण प्रकाशित शब्दकोश ) प्रथित अर्थ रिनाऊन्ड एव्हडाच शब्द सापडतो,परंतु यश बरोबरआहे,
रहाणेआणि राहणे दोनहि शब्द सापडतात,
मा.क.अ. जोडाक्षर चुकणे हे सदोष व्याकरण कसे नव्हे
मा.त.जो. उत्सुक व उस्तुक यांना जागा तेव्हडीच लागते
आमच्या कडं अनु.नंबर सर्रास लिहीतात व त्याना चुकहि काही वाटत नाही,
असेच मज़ेदार शब्द गोल सर्कल,रोख क्ॉश,लेडिजबायका
दूरदर्शन वर महारविवार (झी वर) एक शब्द असाच झळकतो,आपल्या इच्छेनुरूप तो तोडावा .
अशा चुकामागं आरक्षण एकच कारण असू शकत नाही,
24 Oct 2015 - 4:45 pm | तर्राट जोकर
आरक्षण हे एक कारण आहे असं तुमचं मत आहे तर... ब्वॉरं ब्वॉरं!
24 Oct 2015 - 6:46 pm | असंका
अच्छा! तर जोडाक्षर चुकलंय हीच चुक अपेक्षित आहे ना?
मग तो मुद्राराक्षसाचा विनोद नाही कशावरून आणि उपसंपादकांच्या डुलक्या नाही हेही कशावरून ठरवलंत आपण? कशावरून त्यांची टायपोग्राफिकल चुक राहून गेली नसेल? तेवढ्यावरून त्यांना व्याकरणाबद्दलच अज्ञानी कसं ठरवता येइल?
माझ्या मते त्याला 'एरर ऑफ जक्स्टापोझिशन' का असलं काहीतरी म्हणता येइल. व्याकरणाचा नियम काही त्यांनी तोडलेला नैये त्याबाबतीत.
24 Oct 2015 - 5:38 pm | आनंदराव
काडी वगैरे टाकायची नाही. पण थोडे त्रयस्थ पणाने आजुबाजुला बघितले आणि त्रयस्थपणे विचार जर केला तर आरक्षण हेही एक कारण आहे असे दिसून येईल.
बाकी नि:पक्षपातीपणे आणि खेळीमेळीमधे या गोष्टींची चर्चा व्हावी असे मनापासून वाटते.
24 Oct 2015 - 7:50 pm | पैसा
हा धागा मिपावरील सर्वात जास्त प्रतिक्रिया मिळवणारा धागा होऊ शकतो.
24 Oct 2015 - 10:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमची थोडीशी कामं वाढवु का? :)
25 Oct 2015 - 12:44 am | पैसा
उद्या रैवार आहे कसाही.
24 Oct 2015 - 8:51 pm | हेमंत लाटकर
@ दिवाकर,
जाहिर, हेतु हे शब्द जाहीर, हेतू असे असतील का.
24 Oct 2015 - 9:12 pm | दिवाकर कुलकर्णी
मी माझ्या पहिल्या स्फूटा मध्येच म्हणालो होतो,लोकसत्ता तुम्हीसुध्दा.
यातून मी माझी भूमिका स्पष्ट केली होती व केली आहे.
एखाद्या लंगोटी पेपर कढून असं घडलं असतं,नव्हे कैकदा घडतहि असेल, कोण लक्ष देतो हो ,
पण महाराष्ट्राच्या मुखपत्राकडून असं व्हावं,
मला मान्य आहे कि कांहि अर्थाचा अनर्थ करणारी चूक नव्हे,
पण ती हेडिंग मध्ये आहे,शिवाय टायपिस्ट कडून ती प्रथम होते
व तपासणार्याकडून ती राहून जाते (तपासनीस असतो कां),यांचे
मला नवल वाटते.
शिवाय ही चूकच नव्हे असे वाटले असेल तर मग मात्र तो चिंतनाचा मुद्दा होतो.
उस्तुक असा कोणताहि शब्द मराठीत नाही,इतके भान त्याना हवें नां,
लोकसत्ता या जोडाक्षरातील त चं ट झालं तर ,
आम्ही दर्जेदाराकडून दर्जा चींच अपेक्षा करणार ना,जर्द्याची नाही ना
ए
24 Oct 2015 - 9:22 pm | अभ्या..
दर्जेदार चिंच कसली असते, चिंचेची वेलांटी र्हस्व असते. किंवा दर्जाचीच असे असते किंवा गॅप चुकलेली असते किंवा नाही ना नंतर प्रश्नचिन्ह असते.
बादवे तुमच्यासारख्या चोखंदळ वाचकाकडून अशा चुका अपेक्षित नाहीत. ;)
24 Oct 2015 - 9:52 pm | दिवाकर कुलकर्णी
मा.लाटकर
मी मराठीचा प्राध्यापक नाही,तरीहि उस्तुक शब्द मराठीत नाही हे
मला कळतं व ते बरोबर आहे ,मी कीतीहि अशुध्द लिहीत असलो,समजा आहे,
तरी उस्तुक बरोबर सिद्ध होतं नाही,
चर्चा लोकसत्ताच्या लिखाणाविषयी चालू आहे असं आपलं माझं नम्र मत आहे,
मी कोणी नव्हतो व नाही कि माझ्या शुद्ध लेखनाची चर्चा व्हावी ,असो लाटकर साहेब,आपला हेतु दीर्घ
असेल माझा ह्रस्वच आहे,जाहीर आपले योग्य असू शकते
बघा अजून कांही चूका निघतात का
24 Oct 2015 - 10:14 pm | Sanjay Uwach
ज्या प्रमाणे इंग्रजी मध्ये, स्पेलिंग बरोबर करण्यासाठी काँप्युटर मध्ये सोय आहे ,त्या प्रमाणे मराठी मध्ये अशी शुध्दलेखना साठी कोणती सोय आहे काय ? जेणेकरून या गोष्टी आपण अनुसरल्यास, शुध्दलेखनाच्या सर्व कटकटी संपुष्टात येतिल.
बर्याच लोकांच्या कडे लेख लिहिण्या साठी प्रतिभा व विषय दोन्ही असतात, मात्र शुध्दलेखनाच्या मर्यादेमुळे ते लेखन करण्याचे टाळतात. या मुळे '' तुकारामाची तु पहिली की दुसरी '' ?. ''वाशिकरांची शि पहिली कोणी काढली '' ? या सारखे भेडसावणारे प्रश्न कायमचे मिटतील .
24 Oct 2015 - 10:22 pm | सतिश गावडे
मनोगतावर ही सुविधा आहे बहुतेक.
25 Oct 2015 - 12:27 pm | टीपीके
यावर शंतनू ओक काम करत होते/आहेत, त्यांनी अनेक फोरम्स वर सहकार्याची विनंती पण केली होती, माहीत नाही किती मदत मिळाली त्यांना. पण तरीही त्यांनी काम चालू ठेवले आहे असे दिसते
खरे तर हे काम तितके कठीण नाही, सोशल मिडियाचा कल्पक वापर केला, सगळे एकत्र आलो तर १-२ महिन्यात असे software तयार होऊ शकते
मी भाषा तज्ञ नाही पण मराठीत मला नाही वाटत की १०,००० पेक्षा जास्त रोजच्या वापरातील शब्द असतील आणि महाराष्ट्रात निदान १०,००० तरी मराठी पत्रकार, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक असतील जे शुद्ध मराठी बोलू आणि लिहू शकतात. या सर्वांनी १-२ शब्द जरी तपासले तर हे काम सहज साध्य आहे. आणि आता स्मार्ट फोन मुळे हे काम आणखी सोपे वाटते.
अगदी जरी मिसळपाव, मनोगत, मायबोली यांचा डेटा dump मिळाला तरी त्यातून युनिक शब्द काढून (Perl मधे ४-६ ओळींचा प्रोग्रॅम ) आणि ते रिव्हू करून सहज ३-५ हजार शब्द तयार होऊ शकतात
aspell, hunspell सारखी अनेक softwares आहेत ज्यांना हा शब्द संग्रह दिला की तुम्ही म्हणता तसा स्पेल चेकर तयार होईल
स्विडीश, नॉर्वेजिअन भाषा बोलणारे जेमतेम ५०-६० लाख लोक आहेत पण त्यांच्या भाषेत सगळ्या सोयी आहेत आणि १०-१२ कोटी मराठी बोलणाऱ्या लोकांसाठी मात्र काही सोय नाही. आपले व्यावहारीक मुल्य कमी असल्याने आपण priority लिस्ट मधे नव्हतो पण आता गुगल, Apple सारख्या कंपन्या यात उतरल्या आहेत. आपण स्वतः काही केले नाही तर ते जे काही, जेव्हा, जसे देतील तसे घेऊ
जर येथे कोणी mobile apps वर काम करणारे असेल अणि या विषयावर काम करायचे असेल तर आपण एकत्र येउन काहीतरी करू शकतो
बाय द वे, शुध्दलेखन की शुद्धलेखन?
25 Oct 2015 - 6:32 pm | चतुरंग
हा शब्द योग्य.
कारण तुम्ही उच्चार करुन बघा - शु + द (अर्धाच उच्चार होतो) + ध (पूर्ण) - जसे बोलले जाते तसेच लिहिले जाते आणि उलट.
शु + ध (अर्धा) + द (पूर्ण) याचा खरंतर उच्चारच करता येत नाही! :)
26 Oct 2015 - 6:29 am | श्रीरंग_जोशी
मनोगत.कॉमचे शुद्धीचिकित्सक तुम्ही वापरले आहे का? मी गेली सात-आठ वर्षे नियमीतपणे वापरत आहे.
27 Oct 2015 - 1:43 am | टीपीके
पण ते फक्त मनोगतवरच वापरता येते आणि त्या साठी मनोगतचे सभासदत्व पण लागेल ना? मला जर फोनवर मराठी वापराचे असेल तर? माझ्या कॅमेराचा मेनू का मराठीत नाही?
एकदा का industry standard पद्धतीप्रमाणे का असा शब्दसंग्रह तयार झाला आणि तो reliable आणि live असेल (म्हणजे नेहमी अपडेट होणारा असेल ) तर अनेक कंपन्या वापरू लागतील , नवीन products सहजपणे day १ पासून मराठीत उपलब्ध होतील. शुद्धलेखन भीतीपायी न लिहिणारे लिहिते होतील आणि असे लेख येणार नाहीत :P
करण्यासारखे खूप आहे पण आपल्याकडे अजून अशा कामाचे culture नाही , open source मधे भारतीयांचे contribution म्हणूनच कमी आहे (विदा मागू नये , पण मला वाटते या वाक्याला फारसे आक्षेप असू नयेत )
@नीलकांत : देणार का मिपा चा dump? सगळे लेख १का plain text file मधे टाकले तरी चालेल , comments नसतील तरी चालेल . Just need one SQL query
27 Oct 2015 - 1:55 am | श्रीरंग_जोशी
मनोगतवरच मागे एक चर्चा वाचली होती की शुद्धिचिकित्सक फायरफॉक्स ब्राउझरचा एक्स्टेंशन म्हणून लॉन्च होणार आहे. मी ते ब्राउझर वापरत नसल्याने अधिक चौकशी केली नाही.
मनोगत जालावर २४ तास नि:शुल्क उपलब्ध आहे त्यामुळे मला जेव्हाही गरज पडते मी त्यांचा शुद्धिचिकित्सक वापरतो. सुधारणेस वाव असला तरी दर्जाच्या बाबतीत तक्रार करावे असे फारसे काही आढळले नाही.
24 Oct 2015 - 10:31 pm | दिवाकर कुलकर्णी
मा. अभ्या जी
माझे आय पॉड विराम चिन्हासाठी गंडलेले आहे (आता असे म्हणू नका कि ते मी का वापरावे)असो,
चींच मध्ये अनुस्वार जादा पडला असेल पण ह्रस्व चि तुम्हाला दीर्घ कशी दिसली,(इथे प्रश्न चिन्हआहे)
चीच मुळे तुमची करमणूक झाली असावी, असे असेल तर ,आनंद.
बाय द वे माझा एक बाल मित्र होता अविनाश भालचंद्र जोशी, त्याला आम्ही अभ्या च म्हणायचो,एकिकडं
व्यवसायानं डॉक्टर दुसरीकडं अष्टपैलू नटहि ,दुरदैवानं आज आमच्यात तो नाही,असो
कुठल्याचं द्रुष्टीनं मी चोखंदळ वगैरे नाही, आपल्याला बहुतेक चुकांदळ म्हणायचं असावं
24 Oct 2015 - 10:47 pm | सतिश गावडे
काका, तुम्हाला लोकसत्ताची एका शब्दातील "उत्सुकता" खुपली. इथे तुमचे तुमचे पुर्ण प्रतिसाद शुद्धलेखनाच्या दृष्टीने गंडले आहेत. वरुन लोकांनी ते निदर्शनास आणून देताच मैदानातून पळही काढताय.
मला उगाचच "आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे पाहायचे वाकून" ही म्हण आठवली. :)
24 Oct 2015 - 10:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पहायचे का पाहायचे? =))
24 Oct 2015 - 10:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पॉड का पॅड?
ह्याला मराठी शब्द वापरता येणार नाहित का? ह्याला मराठी प्रतिशब्द सुचवला गेलाचं पाहिजे.
24 Oct 2015 - 10:43 pm | अभ्या..
दिवाकरजी माझ्या प्रतिसादाच्या शेवटी डोळे मिचकावणारी स्मायली आहे. ;) अशी.
चुका वगैरे काढण्याचा हेतू अजिबात नाहीये. गडबडीत, साधनांच्या त्रुटीमुळे, कधी सवयीने किंवा कधी एकाच वेळी खूप कामे केल्याने अशा चुका होऊ शकतात. वृत्तपत्र माध्यमात अशा गोष्टीत अधिक जागरुकता हवी याला मी सहमत आहे.
माझ्यामुळे आपणांस मित्राची आठवण आली. चांगलेय. :) मीही अभ्याच. अभ्याजी वगैरे नाही.
24 Oct 2015 - 10:41 pm | दिवाकर कुलकर्णी
वरील प्रतिक्रियेतील माझे ह्रस्व दीर्घ उल्लेख मीट समजून घ्यावेत.
24 Oct 2015 - 10:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
र्हस्व दिर्घ चा संबधं मीटशी कुठुन आला. आम्ही शाकाहारी आहोत.
24 Oct 2015 - 10:44 pm | दिवाकर कुलकर्णी
पुन्हा घोटाळा मीट नव्हे नीट
24 Oct 2015 - 10:45 pm | अभ्या..
'नीट'नंतरच मीट लागते ;)
24 Oct 2015 - 10:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लिटरल नॉनव्हेज स्टेटमेंट.
24 Oct 2015 - 10:49 pm | सतिश गावडे
इंग्रजी शब्द मराठीत लिहिल्याने ते मराठी होत नाहीत. निदान भाषाशुद्धीच्या धाग्यावर तरी तुम्ही काळजी घ्यायला हवी होती.
24 Oct 2015 - 10:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सूद्द मांसाहारी वीणोदनीरमीतिचा परयत्ण!! ग्या धणाजिराव म्राठि वाकय!
24 Oct 2015 - 11:04 pm | दिवाकर कुलकर्णी
मा.गावडे जी
मी कसा पळ काढला हे समजण्यात मला स्वारस्य आहे,
मी माझे कांहीच झाकून ठेवलेले नाही
व दुसर्याचे जे बघण्यासारखे होते ,(वाकून बघायची गरज नव्हती)ते बघितले म्हणण्या पेक्षा आपसूक दिसले
ते इतराना दाखविले इतंकच ,
24 Oct 2015 - 11:20 pm | सतिश गावडे
यात सार्या प्रश्नांची उत्तरे आहेत. :)
24 Oct 2015 - 11:07 pm | बिपिन कार्यकर्ते
तुमच्या ’औत्सुक्य’ वरून जालावरील http://mr.upakram.org/node/473 हा एपिक धागा आठवला हो! ;)
25 Oct 2015 - 12:05 am | असंका
धान्यवाद्य (मंजे धन्यवाद देण्यास योग्य) प्रतिसाद! सो, धन्यवाद! !! ;)
25 Oct 2015 - 2:34 am | आदूबाळ
त्या धाग्यात इतर माणिकरत्नवैडूर्यांबरोबरच क्रीमरोल = मलईदांडू हा एक अप्रकाशित हिराही आहे.
25 Oct 2015 - 11:02 pm | अभ्या..
मलाही हा हिरा अप्रकाशित आहे असेच वाटले होते पण सोलापूर स्टेषनवरील फूडीज २४ घंटा वाल्याने हा समज खोटा ठरवला.
आता तिथे सॅन्डविचेस ला रेत की चुडैल आणि गुडडे बिस्कीत ला अच्छे दिन भिस्कुट कधी लिहितील ते पाहतो. ;)
26 Oct 2015 - 5:53 am | बाबा योगिराज
आता तिथे सॅन्डविचेस ला रेत की चुडैल आणि गुडडे बिस्कीत ला अच्छे दिन भिस्कुट कधी लिहितील ते पाहतो. ;)
पयले रेत की चुड़ैल झेपलच नै ना. पुना पुना वाचून पायल.
अडानी (का आडानी?) बाबा
29 Oct 2015 - 5:24 pm | बॅटमॅन
अश्लील =)) =)) =))
बाकी मलईदांडू हा शब्द बुवांच्या तावडीतून कसा काय सुटला म्हणतो मी.
29 Oct 2015 - 5:26 pm | अभ्या..
अरर्र त्या सायीचा असा मलईसंबंध आहे होय.
बॅट्या हे भाऊ सोडत नाहीत मलईला.
29 Oct 2015 - 5:42 pm | बॅटमॅन
खी खी खी.
धाकटा भाऊ सायीला अन थोरला दांडू-पांडूला. =)) =)) =))
24 Oct 2015 - 11:48 pm | दिवाकर कुलकर्णी
माझे आय पैड च आहे पण यावर हिंदी कि बोर्ड मुळे मराठी
लिहिताना खूप मर्यादा येतात,पैड ,बैक ,मैप असे लिहावे, लागते,
पूर्ण विरामासाठी खूप घोडदौड करावी लागते,स्वल्प विराम सोपा पडतो,
सध्या इतर विराम चिन्हं उठत नाहीत,असो
आय पैड ला स्व तगड किंवा स्वत असे म्हणावे काय,मिपा जेष्ठानी सुचवावे
25 Oct 2015 - 11:49 am | टीपीके
सेटिंग्ज मधे जाऊन किबोर्ड मराठी करा म्हणजे हा त्रास कमी होईल.
25 Oct 2015 - 12:38 am | दिवाकर कुलकर्णी
माझे स्वगत
मी मिपाकर एक वर्तमानपत्रातील चूक दाखवितो काय,आणि बरेच प्रतिसादक
मलाच टार्गेट करतात काय,आकलनाच्या बाहेर,प्रमाण भाषेतच लिखाण व्हायला
हवं असं सांगण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न कुणालाहि भावू नये ,माझ्याच
लिखाणातून ,त्यात असलेल्या नसलेल्या चुका क़ाढून राहीले,
मी समजा अशुद्ध लिहितो, त्यामुळं मी इतरांच्या अशुध्दतेकडं बोट दाखवू शकत
नाही,हे कोणतं लॉजीक,
स्वताचं मी झाकतो काय,दुसर्या चं बघतो काय,ज़रा कमी हात घाईवर येण्याचा प्रकार
होता,मुद्दे संपून गुद्दयाची भाषा येवू घातली होती,मी तर खंबीर खडा होतो तर म्हणे पळ काढला,
या सर्वा मागे मला डिवचण्याचा डाव असावा काय ,नक्की काय असावं.
25 Oct 2015 - 10:56 pm | सतिश गावडे
काका, तुम्हाला ते वक्त चित्रपटातील राजकुमारचे अजरामर वाक्य आठवत नाही का?
जिनके अपने घर शीशे के हों वोह दुसरोंपर पत्थर नही फेंका करते
तळटीप १: वर्तमानपत्राकडून शुद्धलेखनाची अपेक्षा करणे गैर नाही. मात्र तशी अपेक्षा करताना आपण शुद्धलेखनाच्या ढिगभर चुका करुन नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करणे नक्कीच योग्य नाही.
तळटीप २: माझ्या टंकनात शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात. ;)
25 Oct 2015 - 3:52 am | चतुरंग
अशी जाणवते - आपल्याला जो 'उत्सुकता' हा योग्य शब्द आहे हे माहीत आहे तो शब्द टाईप करणार्याला 'उस्तुकता' असाच लिहिला जातो असे वाटत असले/डोक्यात तसे बसले असले तर मुदलात तो शब्द चुकीचा लिहिला आहे हेच समजले नसणार! तुम्ही त्याला/तिला तो शब्द वाचायला सांगितलात तरी वाचताना तो शब्द 'उत्सुकता' असाच कदाचित वाचला जाऊ शकेल ही एक शक्यता ध्यानात घ्यावीत. :) आता याला मुळात कारण काय तर तो संशोधनाचा विषय होऊ शकतो.
तुमचा मुद्दा पटण्यासारखा आहे की लोकसत्तासारख्या वर्तमानपत्रात अशा ढोबळ चुका असू नयेत आणि त्याही मथळ्यात. परंतु हा एकूण शैक्षणिक परिस्थिती, लोकांची एकूणच अचूक लिखाणाबाबतची उदासीनता, भावना समजल्याशी कारण बाकी कोण बघतोय अशी बेजबाबदार वृत्ती अशा अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात.
('बे'शुद्ध्)रंगा
25 Oct 2015 - 7:30 am | जेपी
दिकु जी लोकसत्ता पत्र पाठवा,शुद्धलेखानातील चुक सांगा.त्यांनी सुधारली तर ठिक नायतर लोकसत्ता घेणे बंद करा.हाकानाका.त्यात धागा काढण्यासारखे काय आहे !
25 Oct 2015 - 7:31 am | हेमंत लाटकर
हा लेख लिहण्यामागचा उद्देश काय?
25 Oct 2015 - 10:16 am | आनंदराव
घ्या
एवढी चर्चा होऊन परत रामाची सीता कोण !
25 Oct 2015 - 11:32 am | दिवाकर कुलकर्णी
भन,ती बी मानल्याली
25 Oct 2015 - 11:43 am | दिवाकर कुलकर्णी
धागा कां काढला
धागा कोण काढतोय राव
पुडीला बांदल्याला दोरा त्यो
त्याला मांजा धरून पार आभाळापातूर न्हेला राव समद्यानी,
हे म्हंजे म्हशी परीस रेडकू म्होट्ट झालं ,न्हवं काय
27 Oct 2015 - 9:52 pm | अभिजीत अवलिया
पेपर मधली भाषा ही प्रमाण भाषाच असली पाहिजे. असेच एक चुकीचे लिखाण पुण्यात सर्वत्र महानगरपालिकेने लिहिलेल्या संदेशात आढळते. "पाणी अडवा, पाणी जिरवा" ह्या ऐवजी "पाणी आडवा, पाणी जिरवा" असे बहुतेक ठिकाणी लिहिलेले आढळते.
29 Oct 2015 - 4:50 pm | हुप्प्या
हस्तांदोलन केल्यानं पुरुष आणि महिलेला 99 कोड्यांची शिक्षा!
आता कोडे ह्या शब्दाचा एक मराठी अर्थ प्रचलित असताना असला मथळा का बरे दिला? इराणसारखा महान देश हस्तांदोलनासारख्या गंभीर गुन्ह्याला कोड्यांची खेळकर शिक्षा देईल का? फटके हा शब्द इतका अवघड, संस्कृतप्रचुर वा अप्रचलित आहे का?
http://abpmajha.abplive.in/world/iranian-poets-face-lashes-for-shaking-h...
29 Oct 2015 - 5:05 pm | तर्राट जोकर
इंग्रजी>हिण्दी>मराठी असा प्रवास घड्याळाच्या सेकंदकाट्यावर, फारसा व्यासंग नसलेल्या, वाचन, शब्दसामर्थ्य नसलेल्या कॉपी-पेस्ट टंकणकांकडून ह्यापेक्षा जास्त अपेक्षा व्यर्थ आहे.
29 Oct 2015 - 7:27 pm | गामा पैलवान
हुप्प्या,
ते ९९ कोरड्यांची शिक्षा असं हवं होतं. र खाऊन टाकलाय मुद्राराक्षसाने.
आ.न.,
-गा.पै.
30 Oct 2015 - 12:52 am | दिवाकर कुलकर्णी
९९ कोड्यांची शिक्षा
वा रे वा मराठी
बहुतेक मराठी शाळा बंद पडल्या आहेत,
काही उरल्या सुरल्या असतील तर त्यानाही कुलपं घालून टाका,
कडक लक्ष्मी सारखं आपणंच आपल्याला कोड्याची शिक्षा घ्यावी अस वाटायला लागलंय