ग़म इक चिठ्ठी जिसमें ख़ुशियों का सन्देश

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
17 Oct 2015 - 6:04 am

79 साल मध्ये एक हिंदी फिल्म आली होती, सरगम.

काहींना ते आठवत असेल, हिट पिक्चर होतं, गाणीही खुप गाजली.
लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत होतं.
गीतकार होते आनंद बक्षी. 'परबत के इस पार' या गाण्यात ते लिहून गेले,

ग़म इक चिठ्ठी जिसमें ख़ुशियों का सन्देश
गीत तभी मन से उठता है जब लगती है ठेंस

ह्या ओळी आनंद बक्षी साहेबांनी का लिहील्या असतील ? हा प्रश्न मला अनेक वर्षे पडला आहे.
बरं,स्टोरीलाईनची गरज म्हणून लिहीलंअसेल म्हणावं तर बक्षी हे सिध्दहस्त कवी होते. त्यांनी हजारो गाणी लिहीली.
अतिशय कल्पक होते.यमकांचे गुलाम नव्हते.एवढचंकाय तर गाण्यांची व्याख्याचं बदलून टाकणारे नवकवी होते.
गाणी लिहीणे हे त्यांच पॅशन होत.

ते कायमच छंद मात्रा युक्त गाण्यातचं विचार करल असावेत असे मानले तरी चालेल.
मग

ग़म इक चिठ्ठी जिसमें ख़ुशियों का सन्देश
गीत तभी मन से उठता है जब लगती है ठेंस

दुसरी ओळ पटण्यासारखी आहे. वेदनेतून एखादी सर्जनशील गोष्ट निर्माण होऊ शकते !

(बीज आतुनी फुटुनी गेले ,वेदनेत या फूल जन्मले
अमरपणाचा अर्थ आकळे मरण झेलूनी घेताना ----पाडगावकर)

पण पहील्या ओळीचं काय?
पुरेपुर विरोधाभास भरला आहे त्यात....

मी माझ्या समाधानासाठी उदाहरणं शोधायला लागलो.

अहील्याबाई होळकर ,नवरा अल्पजीवी निघाला.वैधव्य कोसळलं, पण सासरे पुरोगामी विचारांचे होते, त्यांनी मन वळवून अहील्याबाईंना राज्यकारभार सोपवला व एक कर्तृत्ववान ,प्रजाहितदक्ष काम करणार्या म्हणून त्या प्रसिध्द झाल्या.

दुसरं तसचं, देशाचा प्रधान बाॅंबस्फोटात मारला गेला आणि राजकारण राहु द्या ,साधी भाषा न येणारी गृहीणी , दहा वर्ष राजकारणात जरब बसवून ,जगातील शक्तीशाली महीला ठरली.

उत्तर शोधण्यासाठी आनंदबक्षी यांच्याच संघर्षाकडे बघीतलं तर
सिनेगीतकार होण्यासाठी ते दोन वेळा मुंबईला आहे व अपयशी ठरुन परत गेले ,तिस-या वेळी कर्ज वगैरे होऊन गांजून परत निघाले पण मित्राने आधार दिला,त्यानंतर त्यांनी मोठे यश मिळवलं.

वाचकांना याचं काही वेगळं interpretation सांगता येईल का?
(अपूर्ण)

व्युत्पत्ती

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

17 Oct 2015 - 6:44 am | चांदणे संदीप

चित्रपट पाहिला नसल्याने... गाण नेमक कोणत्या प्रसंगात येत ते माहित नाही. चित्रपट पाहिलेले लोक सांगतीलच! पण मला वाटते, चित्रपटातील गीतलेखन म्हणजे कुण्या एकाच इनपुट नसाव (अपवादही असतील!) कारण, पटकथेची मागणी, दिग्दर्शकाचा विचार, संगीतकाराचे मत, ह्या गोष्टींचा गीतावर नक्कीच प्रभाव पडत असावा!

दुसरे म्हणजे त्या ओळीतून (जिथे तुम्हाला विरोधाभास दिसतो आहे) काही अर्थ काढायचा झाल्यास, गीतकार आनंद बक्षींना तिथे सुख-दु:खाचा चढउतार येतच असतो असे कदाचित सुचवायचे असेल. म्हणजे दु:खाच्या चिठ्ठीमागून नक्कीच सुखाच पार्सल असेल अस काहीतरी!

अजून एक म्हणजे, बरेचसे कवी, गीतकार असं काहीबाही लिहितच असतात. गूढ वगैरे, विरोधाभास वगैरे. जास्त डोक्याला शॉट लावून नै घैचा! (कृ.ह.घ्या.)

धन्यवाद!
Sandy

चिठ्ठीमागून नक्कीच सुखाच पार्सल असेल.वा छान.आवडलं