ऑक्टोबरमासी जो कोणी होरपळतो एव्हरी इअर .....
बैठकीत दोस्तांबरोबर होऊन-देतो तो एक बिअर
बाराची बिअर थंडगार असते,
बाटलीच्या बुचाला उचाकावलं कि आपला हात मस्तसा भिजवते,
चखणा हवा काय म्हणून मिश्कीलपणे विचारते !
बाराची बिअर सोनेरी सुंदरी असते
गळ्याखाली उतरताना, पोळलेल्या शरीराचा, रोम न् रोम थंडावते
जिभेवर माल्टचा स्वाद पसरवते,
लिंबाची फोड हवी होती का? म्हणून खोडीलपणे विचारते!
बाराची बिअर कॅालेजची आठवण असते !
मनाचा एकदम रिट्रोस्कोप करते
पण हातातला ग्लास हातातच ठेवते
............ हळूहळू बाराची बिअर धूसर होते
डोळ्यासमोर फाटलेल्या स्वप्नांआड दिसेनाशी होते
बाराची बिअर निव्वळ एक पळवाट असते !
अपयशाचं कडवटपण सेलिब्रेट करवते
म्हणते फेस लाइफ़, व्ह्याय फिअर ?…
घोटाबरोबर गिळून संकट, आगे बढ, करते चिअर …
प्रतिक्रिया
15 Oct 2015 - 5:32 pm | जव्हेरगंज
चिअर्स,,,
15 Oct 2015 - 5:32 pm | चांदणे संदीप
चिअर!
व्हाय फिअर?? :)
15 Oct 2015 - 5:39 pm | सूड
बाराच्या गोष्टी असतातच इंटरेस्टिंग!! आता एमेच बाराच बघा ना!!
15 Oct 2015 - 5:39 pm | टवाळ कार्टा
जब्रा :)
15 Oct 2015 - 5:51 pm | दमामि
तो दिवस तेराला साज्रा झाला म्हणे!:)
15 Oct 2015 - 8:04 pm | टवाळ कार्टा
???
15 Oct 2015 - 5:51 pm | दमामि
जबराट!
15 Oct 2015 - 5:59 pm | जेपी
चांगलय.
फक्त ते आंग्ल शब्द miss केले.
15 Oct 2015 - 6:07 pm | सोत्रि
ह्म्म
- (धूसर) सोकाजी
15 Oct 2015 - 6:17 pm | कपिलमुनी
चारच्या चहा नंतर ६ चा वडा झाला पण ८ चा वरण भात राहिला आहे. इच्छुकांनी नोंद घ्यावी
15 Oct 2015 - 6:34 pm | खेडूत
चान!
'बाराची'मधे उदाहरणार्थ श्लेषपण साधलाय!
15 Oct 2015 - 7:44 pm | मांत्रिक
मस्तच! चिअर्स पगलाजी!