(माझी) जाssssssssssssssssssड बाईल

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
14 Oct 2015 - 11:32 am

पेर्ना

खास प्रचेतस साठी,

झाली पाठ प्रिय पती ची ठोकून गेला जीव
आता जाई चरावयासी हाटेलात हा जीव

रोज रोजची पुरी भाजी खाऊन झाली जाssssssssssssssssssssssssssssssssssड
जुनाSSssट पोलकं मनगटी अटकी त्याला धरुनी फाड

मस्कापावचे ढीग आणति कितीते वेटर भाऊ
बटरवाली पाव भाजी ?तरी किती मी खाऊ!!!?

श्रिखंडाचा क्षणात फडशा .. शेवयाची अन् खीर
कंबर परी लवचिक इतुकी..शिट्ट्या मारिती पोरं

ना हे अन्न , जणू परब्रम्ह, जरी म्हणा जाsssssssssssssssssssड बाईलं
जीभ चालते म्हणता म्हणता जिरून ते जाईल

चला सख्यांनो मिटती डोळे दिवस आजचा बंद!!!
थकले मी या पुरी-पाठांना मूळव्याधीचा छंद!

झाले आता वंगण भरुनी कविताहि लिहून झाली
ह्यांची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)

आरोग्यदायी पाककृतीधर्म

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

14 Oct 2015 - 11:46 am | टवाळ कार्टा

खि खि खि

प्रचेतस's picture

14 Oct 2015 - 12:40 pm | प्रचेतस

इतकी नै जमली ब्वा.
कदाचित मूळ पीठच थोडं कमी पडलं असेल.

प्रचेतस राव, तुमच्यासाठी खास कशी ही कविता काही कळले नाही ब्वा.
काही रेफरन्स आहे का विषेष? डूआयडी विषयी वगैरे?

प्रचेतस's picture

14 Oct 2015 - 1:08 pm | प्रचेतस

आमची खव बघा त्यासाठी :)

अभ्या..'s picture

14 Oct 2015 - 1:37 pm | अभ्या..

खव उचकणार नाही. तरीपण असो.

छानच ग.
मस्तच ग.
कसे जमते तुला.

हे प्रतिसाद देऊन ठेवतो तूर्तास.

बोका-ए-आझम's picture

14 Oct 2015 - 2:01 pm | बोका-ए-आझम

हे राहिलं.

दमामि's picture

14 Oct 2015 - 2:47 pm | दमामि

बाई, बाई, बाई, धन्स हं!

दमामि's picture

14 Oct 2015 - 12:56 pm | दमामि

मान्य, तितकी जमली नाही .

पहिली ओळ तीनदा वाचून काढली, योग्य त्या ठिकानी विरामचिन्हं टाकलंत तर बरं होईल.

दमामि's picture

14 Oct 2015 - 2:45 pm | दमामि

खुखुखुखिखिखि

टवाळ कार्टा's picture

14 Oct 2015 - 3:29 pm | टवाळ कार्टा

आग्गाग्गा =))

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2015 - 5:41 pm | अत्रुप्त आत्मा

the मामी, काय हे ?

पिठात पाणी उगाच ! :P

काय हो गुर्जी, पाण्यात पीठ म्हणा की!

प्यारे१'s picture

14 Oct 2015 - 6:01 pm | प्यारे१

>>> झाली पाठ प्रिय पती ची ठोकून गेला जीव

रसग्रहण करा कुणीतरी. कै झोप- झेपलं नाही.

दमामि's picture

14 Oct 2015 - 6:16 pm | दमामि

सांगारचा प्रयत्न करतो,
"प्रिय पतीची पाठ ठोकून ठोकून बायलीचा इवलुसा जीव दमून गेलेला आहे आणि ती हादडायला जात आहे

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Oct 2015 - 2:37 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्रिय पतीची पाठ ठोकुनी ,थकुन गेला जीव

दमामि's picture

17 Oct 2015 - 5:56 pm | दमामि

झकास.
पण विडंबनात मूळ रचनेला कमीत कमी धक्का लागावा हा माझा प्रयत्न होता.