श्रावण सर जेंव्हा कोसळत असेल
आठ्वण माझी ति काढत बसली असेल
रात्र भर नक्किच निट झोपली नसेल
आठवणीने ति बिछान्यावर तळमळत असेल
माझ्या आठवणीने ति मनोमन् मोहरली असेल्
केवड्याची नाजुक् तनु रोमंचीत् झाली असेल्
तो निर्दयी श्रावण् वारा आग् भडकावत् असेल्
ह्रुदयाची धडधड तिची वाढली असेल
प्रणय् रात्रीचे मदन् चाळे आठवित् असेल्
प्रेमपत्रे वाचताना अश्रुंची धार लागली असेल
मी ठीक तर आहे ना असे काळजीने
श्रावण मेघास ति विचारत असेल
माझ्या फोटोकडे ति बघत बसली असेल
ह्र्दया जवळ घेवुन चुंबन वर्षाव करीत असेल
कदाचीत मी येईल या वेड्या आशेने
साज श्रुंगार करीत बसली असेल
कसे सांगु सखे, मी निराळ्या दुनियेत आहे
सिमेवर लढता लढ्ता शहिद झालो आहे
नको पाहुस वाट,भेटणे कसे शक्य आहे?
या ताटातुटीने, माझाहि आत्मा तडफडत आहे....
अविनाश........
प्रतिक्रिया
7 Oct 2015 - 8:48 pm | मांत्रिक
सुंदर!!! अप्रतिम लिहिता अकुबुवा!
अगदी काळजाला भिडलं लिहिलेलं!!!
7 Oct 2015 - 11:08 pm | रातराणी
छान कविता.
8 Oct 2015 - 12:47 am | प्यारे१
धक्कादायक. सुखद अपेक्षाभंग.
खूप सुन्दर कविता.
पोचतेय आतपर्यंत.
8 Oct 2015 - 1:00 am | ज्योति अळवणी
ओह... शेवटच कडव भाव बदलून गेल कवितेचा. खरच आवडली.
8 Oct 2015 - 11:14 am | नाखु
समर्पीत कवीता आणि आशय अगदी उच्च..
अकुंचा सुखद (अचंबीत) धक्का !!
धक्केकरी नाखु
8 Oct 2015 - 11:21 am | प्राची अश्विनी
क्या बात !
8 Oct 2015 - 12:36 pm | दमामि
वाह!
8 Oct 2015 - 12:54 pm | तर्राट जोकर
8 Oct 2015 - 6:06 pm | अभ्या..
झोंका हवा का आजभी . हम दिल दे चुके सनम. लै भारी हरीहरन आण्णा.
सावन की रिमझिम मेरा तराना याद दिलाती होगी ना.
.
याद तो आती होगी ना.
याद तो आती होगी ना.
8 Oct 2015 - 9:20 pm | अत्रुप्त आत्मा
शेवटामुळ साधली नीट
9 Oct 2015 - 10:42 am | शिव कन्या
कविता छान आहे. आवडली म्हणण अवघड!
9 Oct 2015 - 4:58 pm | बॅटमॅन
शेवट राख्यो लाज, वरना अवघड होतं आज.