कोडी सोडवा

_मनश्री_'s picture
_मनश्री_ in जनातलं, मनातलं
20 Sep 2015 - 6:28 pm

दोन मित्र जंगलातून जात असतात. वाटेत त्यांना एक मोत्यांची माळ सापडते. ते दोघे माळेतील मोती समान वाटून घेतात
पण १ मोती उरतो . नंतर तिसरा माणूस येतो परत समान वाटप होते १ मोती उरतो , चौथा माणूस येतो ,पाचवा येतो ,सहावा माणूस येतो तरीही प्रत्येक वेळी
१ मोती उरतो शेवटी सातवा माणूस आल्यावर समान वाटप होते आणि एकही मोती उरत नाही
तर आता सांगा माळेत एकूण मोती किती ?

तुमच्याकडे १,२,५,१०,२० व ५० च्या अनेक नोटा आहेत आणि तुम्हाला दुकानदाराला १०० रुपये द्यायचे आहेत
तुम्ही एकूण १० नोटा द्यायच्या आहेत पण १० च्या १० नोटा द्यायच्या नाहीत व एकूण नोटा १० च दिल्या पाहिजेत
कमी किंवा जास्त नाही
तर आता सांगा तुम्ही १०० रुपये कसे देणार ?...

(प्रत्येक मूल्याची नोट वापरली पाहिजे अशी अट नाही )

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

24 Sep 2015 - 8:13 pm | प्यारे१

1 ते 64 या क्रमानं 1-2,2-3 अशी वजनं करत गेलं तर? उदाहरणार्थ. पहिल्या दुसऱ्या मध्ये दुसरा जड़. पहिला बाहेर. दुसऱ्या तिसऱ्या मध्ये सुद्धा दुसरा जड़.... पण यात सगळ्यात जड़ चेंडू सापडेल. शेवटून दुसऱ्याचं काय?

वर कानडाऊ योगेशु यांनी दोन प्रतिसादात मिळून उत्तर दिले आहे.

- दिपोटी

दिवाकर कुलकर्णी's picture

22 Sep 2015 - 8:02 pm | दिवाकर कुलकर्णी

अशा वेली खूप कॉंबिनेशन करावी लागतात, अशा वेली हिंट दिला जातो

दिपोटी's picture

23 Sep 2015 - 4:35 am | दिपोटी

दिवाकर कुलकर्णी,

कोडे थोडे अवघड आहे खरे पण प्रचंड अवघड वा अशक्य निश्चित नाही आहे. काँबिनेशन्स देखील (थोडा विचार केल्यास) समजण्याच्या आवाक्यात रहातील अशी आहेत. तेव्हा प्रयत्न करुन पहा तर खरं ... हिंट्ची गरज नाहीये ...

- दिपोटी

हार्मोनियम च्या कोड्याचे शेवटी काय झाले? चुक बरोबर उत्तर कुठले? घर नंबर १३ हे कसे ठरवले?

दिपोटी's picture

23 Sep 2015 - 9:08 am | दिपोटी

गुणाकार ३६ होतो, म्हणजे तीन मुलांच्या वयांच्या आठ शक्यता आहेत, त्या अशा (पुढे कंसात प्रत्येक शक्यतेची बेरीज दिली आहे) ...
३६, १, १ (३८)
१८, २, १ (२१)
१२, ३, १ (१६)
९, ४, १ (१४)
६, ६, १ (१३)
९, २, २ (१३)
६, ३, २ (११)
४, ३, ३ (१०)

तर आता शेजारच्या घराचा नंबर बघून त्याला वयांची बेरीज कळते व तरी देखील उत्तर देता येत नाही, म्हणजे ती बेरीज एकाहून अधिक शक्यतांसाठी लागू होते. म्हणजेच बेरीज १३ असून वयांच्या आता दोन शक्यता आहेत ... ६, ६, १ व ९, २, २. 'हार्मोनियम चांगली वाजवते' हा क्ल्यू महत्वाचा नसून त्यातील फक्त 'मोठी मुलगी आहे' हे महत्वाचे, जेणेकरुन ६ वर्षे वयांची दोन जुळी मुले नाही हे निश्चित झाले, तेव्हा ९, २, २ ही मुलांची वये व शेजारच्या घराचा नंबर १३ हे उत्तर येते.

- दिपोटी

आत्ता कळलं....छानच सांगितलंत.
धन्यवाद!

राजाभाउ's picture

23 Sep 2015 - 10:53 am | राजाभाउ

अजुन एक
७ प्लास्टिक कॉईन डिस्पेन्सेर आहेत. प्रतेक डिस्पेन्सेर मधून वेगवेगळ्या रंगाची कॉईन्स येतात. प्रतेक कॉईनचे वजन ५ ग्रॅम असले पाहीजे पण एका डिस्पेन्सेर मधील काही तांत्रिक बिघाडामुळे त्यातुन ४ ग्रॅमची कॉईन्स येत आहेत. सर्व कॉईन्सचा आकार सारखा आहे त्यामुळे केवळ बघून कमी वजनाचे कॉईन ओळखता येत नाही.

तुम्ही प्रत्येक डिस्पेन्सेर मधून कितीही कॉईन घेऊ शकता. तुमच्या कडे एक अचूक वजनकाटा आहे, पण तो तुम्ही फक्त एकदाच वापरू शकता. कुठल्या डिस्पेन्सेरमधून कमी वजनाची कॉईन्स येतात हे कसे ओळखाल ?

दिपोटी's picture

23 Sep 2015 - 11:26 am | दिपोटी

पहिल्या डिस्पेन्सरमधून १ नाणे घ्या, दुसर्‍या डिस्पेन्सरमधून २ नाणी घ्या, तिसर्‍या डिस्पेन्सरमधून ३ नाणी घ्या ... असे करत ७व्या डिस्पेन्सरमधून ७ नाणी घ्या. एकूण आता तुमच्याकडे २८ नाणी आली. तांत्रिक बिघाड नसता तर (प्रत्येक नाण्याचे वजन ५ ग्रॅम प्रमाणे) एकूण वजन २८ गुणिले ५ = १४० ग्रॅम्स भरायला हवे. पण कोणत्यातरी एका डिस्पेन्सरमध्ये बिघाड असल्यामुळे एकूण वजन १४० ग्रॅम्सपेक्षा कमी भरेल. १४० ग्रॅम्सपेक्षा जेवढे ग्रॅम्स कमी एकूण वजन भरेल, त्या क्रमांकाच्या डिस्पेन्सरमध्ये बिघाड झाला आहे. (उदाहरणार्थ, १३६ ग्रॅम्स एकूण वजन भरल्यास, १४० ग्रॅम्स पेक्षा ४ ग्रॅम्स वजन कमी भरले, तेव्हा ४ क्रमांकाच्या डिस्पेन्सरमध्ये बिघाड आहे, कारण आपण या डिस्पेन्सरमधून ४ नाणी घेतली होती व बिघाड झालेल्या डिस्पेन्सरमधील नाण्यांचे वजन प्रत्येकी १ ग्रॅम कमी आहे.)

- दिपोटी

दिवाकर कुलकर्णी's picture

23 Sep 2015 - 11:43 am | दिवाकर कुलकर्णी

सर्व डिस्पेसरमधून १ ते ७ या संख्येची एकूण २८ कॉइन्स घ्यावीत जसे १+२+३+४+५+६+७
तत्वत: त्याचे वजन १४० ग्रॉम हवे पण ते १३९,१३८ १३७ १३६ १३५ १३४ १३३ असल्यास
१ते७ क्रमांकाचा डिस्पेंसर ४ग्रॉम ची कॉइन्स बनवितो.

दिवाकर कुलकर्णी's picture

23 Sep 2015 - 11:51 am | दिवाकर कुलकर्णी

आमासनी टायपायला येल लागतोय, तर दिपोटी साब तुमी आदिच जबाब दिवून मोकला जालाचा व्हय.

असंका's picture

23 Sep 2015 - 12:29 pm | असंका

:-))

दिपोटी's picture

23 Sep 2015 - 12:54 pm | दिपोटी

:))

राजाभाउ's picture

23 Sep 2015 - 1:30 pm | राजाभाउ

बरोबर !!!

राजाभाउ's picture

23 Sep 2015 - 1:56 pm | राजाभाउ

अजुन एक

तुम्हाला काही महत्वाचे कागदपत्र तुमच्या मित्राला एका सुटकेस /ट्रंक मधून पाठवायचे आहेत. सुटकेसला नेहमीचे कुलूप (म्हणजे नंबर लॉक नाही) असून त्याची फक्त एकच किल्ली आहे व ती तुच्या कडे आहे. तुम्ही ती किल्ली कधीही कोणालाही देऊ शकत नाही किंवा तुम्ही स्वता: मित्राकडे जाऊन कुलूप उघुडून देऊ शकत नाही (अर्थात तुम्ही जाऊ शकत नाही म्हणूनच तर ती सुटकेस मधून पाठवत आहात). सुटकेस साधी असून त्या मध्ये चोरकप्पा वगैरे असली काहीही ट्रिक नाही.

तर काय करावे लागेल कि ज्या मुळे ती कागदपत्र मित्राला मिळतील

सुट्केस अशीच कुलुप लावुन मित्राला पाठवा. मित्र त्याच्याकडील अजुन एक दुसरे कुलुप लावुन व चावी स्वतःकडे ठेवुन ती सुटकेस परत पाठवेल. आता तुमचे कुलुप काढुन घ्या आणि सुटकेस परत मित्राला पाठवा. मित्र त्याचे कुलुप उघडुन कागदपत्रे मिळवेल.

राजाभाउ's picture

23 Sep 2015 - 2:21 pm | राजाभाउ

बरोबर आहे.

योगी९००'s picture

23 Sep 2015 - 4:55 pm | योगी९००

बरोबर उत्तर...!!

सुट्केस अशीच कुलुप लावुन मित्राला पाठवा
याऐवजी सुटकेस मध्ये पहिल्यांदा महत्वाची कागदपत्रे टाका आणि आणि मग आपले कुलुप लावा...असे हवे होते.

अमेरिकन त्रिशंकू's picture

24 Sep 2015 - 11:33 pm | अमेरिकन त्रिशंकू

मित्राला तुम्हाला एक कुलुप आणि त्याची किल्ली पाठवायला सांगा.
कुलपाची दुसरी किल्ली मित्राकडेच असेल.
तुमच्या बॅगमध्ये कागद्पत्रं घाला. मित्राचे कुलूप बॅगला लावा आणि बॅग पाठवून द्या.

राजाभाउ's picture

23 Sep 2015 - 2:21 pm | राजाभाउ

ब्रोबर आहे

दिवाकर कुलकर्णी's picture

24 Sep 2015 - 9:28 pm | दिवाकर कुलकर्णी

६४ चेंडंू चं कोडं ७१ वजनात मी सोडवू शकतो,६८ वेला वर विचार चालू आ हे नक्की येइल थोडा वेल लागोल

वर कानडाऊ योगेशु यांनी दोन प्रतिसादात मिळून उत्तर दिले आहे.

- दिपोटी

दिवाकर कुलकर्णी's picture

24 Sep 2015 - 9:35 pm | दिवाकर कुलकर्णी

मनरंगजी
व्यनी करतो थोडा वेल द्या,

दिवाकर कुलकर्णी's picture

25 Sep 2015 - 4:31 pm | दिवाकर कुलकर्णी

गणेश उत्सव वर्गणी कोडया चे काय झाल?

दिवाकर कुलकर्णी's picture

27 Sep 2015 - 12:12 pm | दिवाकर कुलकर्णी

६४ चेडूचे उत्तर चूक आहे ,समजा पहिल्यांदा २ चेंडूचे वजन करतानाच सर्वात जड व त्या नंतरचा जड हे कॉंबि. आल्यास,दोन
नंबरचा जड चेडू पहिल्याच खेपेलै बाहेर जाईल जो पुन: मोजणीत कधीच येणार नाही उत्तर समजवावे सविस्तर

दिपोटी's picture

27 Sep 2015 - 3:45 pm | दिपोटी

दिवाकर कुलकर्णी,

http://www.misalpav.com/comment/746272#comment-746272
येथे कानडाऊ योगेशु यांनी दिलेले दोन प्रतिसाद दिले आहेत, ते पहा ... दोन्ही प्रतिसाद मिळून उत्तर तयार होते.

- दिपोटी

सीमा ज. निघोट's picture

29 Sep 2015 - 12:20 am | सीमा ज. निघोट

७७ मनी असतात

सीमा ज. निघोट's picture

29 Sep 2015 - 12:26 am | सीमा ज. निघोट

७७ मनी ७ जनात ११ मनी प्रतेकी वाट्तात

दिवाकर कुलकर्णी's picture

1 Oct 2015 - 10:02 pm | दिवाकर कुलकर्णी

आणखीन् एक नवीन कोडे
एका हेअर कटिंग सलून मध्ये तीन न्हावी आहेत,सात माणसे एकदम केस कापायला आली,
त्यांच्या केसाच्या वाढीवरून त्याना केस कापायला १०,११,१०,१९,११,१०,१८ मिनिटे वेल लागेल,
कोणत्या क्रमाने केस कापल्यास कमीतकमी वेल लागेल?
हे कोडे वाटते तीतके सोपे नाही,

दिवाकर कुलकर्णी's picture

1 Oct 2015 - 10:07 pm | दिवाकर कुलकर्णी

केस कापायचा वेल १० , ११ ,१० ,१९ १२, १० ,१८ असा वाचावा

कानडा's picture

2 Oct 2015 - 6:25 pm | कानडा

क्रम :-
१. १०
२. ११
३. १२
४. १०
५. १९
६. १८
७. १०

दिवाकर कुलकर्णी's picture

2 Oct 2015 - 7:23 pm | दिवाकर कुलकर्णी

बरोबर !

दिवाकर कुलकर्णी's picture

3 Oct 2015 - 2:47 pm | दिवाकर कुलकर्णी

अजून एक नवीन कोडे
खरं तर हे जास्त गणित आहे,थोडे कोडे आहे,
कांही विद्यार्थि एस् टी ने सहलास जात होते,भाड्या साठी त्यानी प्रत्येकाने नऊ नोटा
कंडक्टरला दिल्या ,या नऊ नोटापैकि दोन नोटा,प्रत्येकि दोन रु. च्याहोत्या,त्या सर्व
विद्यार्थांचे एकूण भाडे ८४१ रु. झाले,तर कंडक्टरला मि ळालेल्या भाड्यात १० रू. च्या
किती नोटा होत्या?

मराठी कथालेखक's picture

15 Sep 2016 - 12:36 pm | मराठी कथालेखक

३०१ मोती