दमामि म्हणे किंवा विडंबनकाराची व्यथा किंवा चोराच्या उलट्या बोंबा

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
9 Sep 2015 - 7:22 am

बहिर्वक्र म्हणा हवे तर , विडंबन हा आरसा
देखणे वा कुरुप तुम्ही, फरक नाही फारसा...

पाडती जिलब्या इथे , वर वापरुनी डालडा
रंग नाही स्वाद नाही , जाहला अतिसारसा..

ट्रोलभैरवांचे जथे मुक्त फिरती हिंस्रसे
हरून पडला नवमिपाकर त्यापुढे गपगारसा..

आक्रंदती मिपात आता राम नाही राहिला
जाहले संस्थळ जणू कट्टा पडिक बेकारसा...

सकस लिहिणारे मिपाकर आजला गेले कुठे
"मापं" ओलांडुन जाती भरला इथे बाजारसा...

काहीच्या काही कवितामुक्तक

प्रतिक्रिया

कंजूस's picture

9 Sep 2015 - 8:15 am | कंजूस

अरण्यरुदन नाही हे
गर्दीत मी कसा पडलो एकटा।

हेमंत लाटकर's picture

9 Sep 2015 - 8:36 am | हेमंत लाटकर

दमामी, आपण विडंबकारांचे समर्थक दिसता.

अजया's picture

9 Sep 2015 - 9:01 am | अजया

विडंबन करणे यात काय वाईट आहे? भल्या भल्या लोकांनी केलेली विडंबनं प्रसिद्ध आहेत.झेंडुची फुले काय आहे?
गंमतीने एखाद्या गोष्टीतली विसंगती टिपणे आहे ते!
टुकार विडंबनांना मिपाकर बरोबर जागा दाखवून देतात.विडंबने आली म्हणून संस्थळाचा दर्जा घसरला म्हणून रडणार्यांनी काळजी क्रु नये!!

नाखु's picture

9 Sep 2015 - 9:23 am | नाखु

"खरा मिपाकर विडंबनाने वैतागत (त्रागा) करत नाही, तसाच वाहव्वा केल्याने शेफारूनही जात नाही"

मुवी बाबांची प्रवचने भाग ५ "माझ्यात घुसुनी अजून उरलो मी" प्रकरण ८.कुणाच्या खांद्यावर कुणाची दंबूक या प्रकरणातून साभार.

मुवींनी या अप्रकाशीत+आगामी पुस्तकाचे हस्तलिखित दाखविल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार.

नितवाचक्विडंबक्डुबुक्डुबुक्डरोअ‍ॅव्दुर्लक्ष्यक्संघ

कुणाच्या खांद्यावर कुणाची दंबूक...
हे कधी व कुठे वाचायला मिळेल?

नाखु's picture

9 Sep 2015 - 9:51 am | नाखु

आभार मानले त्यांच्याशी स्वजबाब्दारीवर संपर्क करणे.(चिमणची/आमची शिफारस अजिबात घेऊ नये)

खुलासेदार नाखु

हे म्हंजे म्युच्युअल फंडखालील फुटनोट झाली की हो.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Sep 2015 - 9:42 am | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम! :-D
जोरदार टाळ्या!

उगा काहितरीच's picture

9 Sep 2015 - 10:21 am | उगा काहितरीच

कोणते वृत्त म्हणायचे हे ?

वृत्त नव्हे वृत्ती म्हणायची.:)

पैसा's picture

9 Sep 2015 - 10:41 am | पैसा

विडंबने जास्त झाली म्हणून किंवा जिलब्या येतात म्हणून वैतागण्यात काय अर्थ आहे? यावर उपाय म्हणून आपण एकतर काहीतरी जबरदस्त लिहावे. किंवा मग अधून मधून एखाद्या जिलबी धाग्याचा खरडफळा करावा. यातले काहीच नको असेल तर आपला टंकाळ्याचा अधिकार वापरावा.

माझ्या मते मिपा वाढले आहे, तसे आपणही आपल्या आवडीच्या धाग्यावर प्रतिक्रिया द्यायची सवय लावून घेतली पाहिजे. जे धागे आवडणार नाहीत तिकडे सपशेल दुर्लक्ष करावे. त्याचवेळी जे धागे चांगले वाटतील त्यावर प्रतिक्रिया द्यायचा टंकाळा करू नये. मायबोली.कॉमवरही बेसुमार धागे येत असतात. मात्र तिथे लोक त्यासाठी ओरडत बसत नाहीत तर आपल्याला आवडतील असे धागे सतत वर आणत असतात.

कुणीही किती घेतला जरी ट्रोलरू अवतारसा
सर्जनी तेजापुढे टिकतो न हा अंधारसा
मिपाचा दर्जा कधी ना मित्रहो घटणारसा
उचलुनी धागोत्तमांना चालवू हा वारसा

बबन ताम्बे's picture

9 Sep 2015 - 11:18 am | बबन ताम्बे

बहिर्वक्र म्हणा हवे तर , विडंबन हा आरसा
देखणे वा कुरुप तुम्ही, फरक नाही फारसा...

ह्या ओळी आणि एकंदर काव्य खूप आवडले.
मिपा वाचकांना उत्तमोत्तम विडंबनांची मेजवानी मिळते आहे.
ज्या लेखांवर विडंबने येताहेत त्यांनी "मापं" काढतात असे न समजता त्याचा आस्वाद घ्यावा असे मला वाटते.

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Sep 2015 - 11:22 am | माम्लेदारचा पन्खा

रतीब घालू नये असं प्रामाणिकपणे वाट्तं.....

विशाल कुलकर्णी's picture

9 Sep 2015 - 11:41 am | विशाल कुलकर्णी

सहमत आहे. विडंबनाला ना नाही, पण विडंबन असे हवे की ते वाचताना मुळ कविला सुद्धा आपल्या कवितेचा गौरव झाला असे वाटायला हवे. (किमान मुळ कवि दुखावला जवू नये) ;) (थोडं अतिरेकीच मागणं आहे हे )

बाकी रचना आवडेशच ....

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2015 - 12:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

किमान मुळ कवि दुखावला जवू नये

हे विडंबन/विडंबनकारापेक्षा मूळ लेखकावर जास्त अवलंबून आहे, नाही का ?

मिपासारख्या मुक्त व्यासपिठावरील मूळ लेखकाने आपल्या लेखाचे चांगले विडंबन झाले तर ते खेळीमेळीने घ्यावे हेच समंजसपणाचे आहे. यामुळे मूळ लेखाला प्रसिद्धीच तर मिळतेच पण मूळ लेखकाचा रक्तदाबही ताब्यात राहतो :)

विडंबन वाईट / रुचीहीन झाले तर चोखंदळ मिपावाचकच चपला घेऊन पुढे सरसावतात... मूळ लेखकाला काही तसदी घेण्याची गरज पडत नाही... त्याने फक्त विडंबनकाराची मांडलेली पूजा पाहून मजा घ्यावी. याचाही मूळ लेखकाच्या रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो ;)

विशाल कुलकर्णी's picture

9 Sep 2015 - 12:13 pm | विशाल कुलकर्णी

हे विडंबन/विडंबनकारापेक्षा मूळ लेखकावर जास्त अवलंबून आहे, नाही का ?

नाही. हे सर्वस्वी विडंबनकारावर अवलंबून असते. मिपावर होणारी विडंबने कुणाला दुखावणारी नसतात हे मान्य आहे. पण बर्‍याचदा एखाद्याला दुखवायचे म्हणूनच विडंबन केले जाते. (मिपावर हा प्रकार होत नाही ही बाब अलाहिदा) त्या गोष्टीला माझा विरोध आहे आणि असेल. आणि विडंबन करतानासुद्धा दर्जा पाळणे, टिकवणे गरजेचे असते हे माझे मत आहे.
मी केलेले विधान फक्त मिपावरच्या किंवा कुठल्याही संस्थळावरच्या विडंबनासाठी नसून एक सरसकट अपेक्षा आहे. विडंबन जर खेळीमेळीचे असेल तर ते खेळीमेळीने किंवा समंजसपणानेच घेतले जाते किंवा जावे. पण जर ते केवळ एखाद्याची टर उडवायची म्हणून केले गेलेले असेल तर त्या व्यक्तीने ते का समंजसपणे घ्यावे. अर्थात एखाद्या अतिसुमार लेखन करणार्‍या लेखकुला थांबवण्यासाठी म्हणून त्याच्या लेखनावर टीकात्मक किंवा समीक्षात्मक विडंबन मान्यच असेल. पण केवळ आपली विडंबनाची सुरसुरी पुर्ण करायची म्हणून एखाद्या चांगल्या लेखनाची (मग कविता असो वा गद्य) वाट लावणे हे निव्वळ अक्षम्य आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2015 - 12:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

.

१. आपला आनंद १०% आपल्या करणीवर आणि उरलेला ९०% आपण दुसर्‍याच्या करणीवर किती हुशारीने वागतो यावर अवलंबून असतो.

२. दुसर्‍याच्या करणीवर आपला ताबा असतोच असे नाही (बहुदा नसतोच) पण त्या करणीवर कसे व्यक्त व्हावे हे मात्र आपल्या नक्कीच ताब्यात असते.

३. पाहुण्याच्या चपलेने विंचू मारला जात असला तर आपली चप्पल झिजवून घेणे शहाणपणाचे नाही.

४. मुक्त संस्थळावर आपले लिखाण टाकून त्यानंतर फार हळवेपण दाखवणे व्यवहारी नाही.

मला वाटते माझे वरचे मत यावरून पुरेसे स्पष्ट होत आहे :)

विशाल कुलकर्णी's picture

9 Sep 2015 - 1:30 pm | विशाल कुलकर्णी

आपला आनंद १०% आपल्या करणीवर आणि उरलेला ९०% आपण दुसर्‍याच्या करणीवर किती हुशारीने वागतो यावर अवलंबून असतो.

हे मान्यच आहे हो. मी त्याबद्दल काही आक्षेप घेत नाहीये. मी विडंबनकाराने विडंबन करताना कुठल्या मर्यादेचे भान ठेवायला हवे ते सांगतोय. उद्या कोणीही उठून "काहीही" विडंबन पाडले तर मिपाचे संपादक मंडळ ते मिपावर ठेवील काय ?

*काहीही : हा शब्द आक्षेपार्ह, अश्लाघ्य, गैर या अर्थाने घेणे .

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2015 - 6:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

विनाशुल्क मुक्त संस्थळांवर लेख टाकण्याआधी त्याचे संपादन करणे किंवा अगदी टोकाचे निकष लावून संपादन करणे व्यवहार्य नसते हे वास्तव आहे.

दुसरे महत्वाचे म्हणजे नुसते निषेध करून "चलाख" विडंबकांना काही फरक पडत नाही. किंबहुना "घटं भिंद्यात..." हे त्यांचे ब्रीदवाक्य असल्याने लेखकाने किंवा इतर वाचकांनी पिडित मानसिकतेने (व्हिक्टीम मेंटॅलिटीने) केला चिडका-रडका विरोध त्यांना अजूनच मजा देवून जातो. याउलट न चिडण्याने टारगट विडंबकाच्या शिडातली हवा निघून जाते.

त्यामुळे,
(अ) इतर वाचकांनी : विडंबनाच्या लायकीप्रमाणे दिलेले चपलांचे आहेर / केलेली स्तुती;
(आ) मूळ लेखकाने : विडंबनाच्या लायकीप्रमाणे विडंबनाची मजा घेणे / भावनाविवश न होता प्रतिसाद करणे / पूर्णपणे फाट्यावर मारणे; आणि
(इ) संपादकांनी : टोकाच्या विडंबनाच्या (उदा : व्यक्तीगत / असंसदिय / बिभत्स टीका, इ) बाबतीत केलेली योग्य ती कारवाई;
हेच मूळ लेखकासाठी पुरेसे व्यावहारीक संरक्षण व विडंबनकारासाठी योग्य उत्तर असू शकते.

कोणत्याही मुक्त मंचावर/संस्थळावर, या वास्तवाचे ध्यान ठेवून कोणाही लेखकाने टीकेकडे अथवा विडंबनाकडे एक व्यावहारीक शक्यता असेच बघावे. उगा भावनाशील होऊन सर्वच गोष्टींकडे वैयक्तीक टीका या दृष्टीने पाहू नये. कारण, खुल्या मंचावर विचारप्रदर्शन करणार्‍याने फार संवेदनाशील असणे त्याच्या स्वतःसाठी आणि त्याच्या मतांसाठी मारक असते असे मला वाटते. हेच एक जालदुनियेचे (व सर्वच मुक्त मंचांचे) न टाळता येणारे वास्तव आहे. त्याला आक्रस्ताळेपणे अथवा अतीभावनशीलतेने सामोरे न जाता त्याचा वरीलप्रमाने अक्कलहुशारीने प्रतिकार करण्यातच हुशारी आहे. असे मला वाटते.

अर्थातच, या वास्तवाला कसे सामोरे जावे हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहेच म्हणा. त्यामुळे, या विषयावर, माझे इत्यलम.

विशाल कुलकर्णी's picture

10 Sep 2015 - 11:23 am | विशाल कुलकर्णी

हे सर्व मुळ लेखकासाठी, संपादकांसाठी किंवा वाचकांसाठी झाले. ते कोणीच अमान्य करत नाहीये.
मी अपेक्षा करतोय ती विडंबकांकडून. त्यांनी विडंबन करताना जी काळजी घ्यायला हवीये त्याबद्दल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Sep 2015 - 12:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपण चर्चा करत असलेल्या समीकरणात बिडंबनकार ही आपल्या हाताबाहेर (आउट ऑफ कंट्रोल) असलेली गोष्ट असते. म्हणून, ती तशीच (पूर्ण हाताबाहेर) असणार असे गृहीत धरून आपल्या कृतीचे (जी आपलीच कृती असल्यामुळे आपल्या पूर्ण हातात असते) आडाखे बनवावेत. त्यामूळे विरुद्ध पार्टी (विडंबनकार) सज्जन निघाला तर भले, नाही निघाला तर आपला आडाखा तयार आहेच. आपला रक्तदाब आणि मानसिक स्वास्थ्य ताब्यात राखणे सर्वतोपरी !

हेच आमच्या जालीय सुखाचे रहस्य आहे आणि हे महत्तम वैश्विक गुपीत आम्ही इतरांना खुलेपणाने वाटत फिरतो ;) :)

विशाल कुलकर्णी's picture

10 Sep 2015 - 4:25 pm | विशाल कुलकर्णी

डॉक्टरसाहेब माझा मुद्दा तुम्हाला कळतच नाहीये की.....

आपल्या हातातल्या गोष्टी आपण सगळेजण आपापल्या परीने करतच असतो. त्यासाठी कुणाच्याहठीसल्ल्याची गरज नसते, नसावी. पण आंतरजालावर विशेषतः मोफत संस्थळावर लिहीत असलो तरी सार्वजनिक स्थळी लिहीताना, वावरताना प्रत्येकाने काही संकेत पाळावेत अशी अपेक्षा असते. सक्ती करत नाहीये कुणी इथे, माझ्या तर ते स्वभावातच नाहीये. आणि जरी कुणी सक्ती कुणीच तरी ती इतर चालवून घेतीलच असे थोडेच आहे. तेव्हा मुद्दा तो नाहीच्चे. आपण जालावर कसे वागावे हे प्रत्येकापाशी असते, ज्याचे त्याने ठरवायचे असते. पण आपण समजुतदार, जबाबदार नागरिक आहोत असे तुमच्या प्रतिसादांमधून व्यक्त होतेय. मग तीच अपेक्षा आणि वर्तन सगळ्यांनीच करावे अशी अपेक्षा ठेवली तर बिघडले कुठे? हा माझा शेवटचा प्रतिसाद.

मी फक्त इतरांकडुनही चांगुलपणाची अपेक्षा करतोय. ती सुद्धा करु नये असे तुम्ही म्हणत असाल तर तुमचा सल्ला तुमच्यापाशी राहो. धन्यवाद.

माहितगार's picture

10 Sep 2015 - 4:40 pm | माहितगार

*काहीही : हा शब्द आक्षेपार्ह, अश्लाघ्य, गैर या अर्थाने घेणे .

@ विशाल कुलकर्णी आपला निर्देश कोणत्याही मजकुराच्या आशयाकडे असण्याची शक्यता दिसते. केवळ विडंबनकार तेवढेच आक्षेपार्ह, अश्लाघ्य, गैर लिहू शकतात असे नसावे. कोणत्याही आशयाच्या मागे विचार असतो ( तो तुम्हाला पटो अगर न पटो) माध्यम हे दुय्यम असते. सक्षम अभिव्यक्त्याच्या आशयाच्या अभिव्यक्तीची सर्व माध्यमे सेंसॉर करणे कधीही आणि कुणासही शक्य नसते. एका माध्यमातून दाबलेला विचार दुसर्‍या माध्यमातून प्रकट होतच राहतो. विचारांचा मुकाबला केवळ विचारांनीच होऊ शकतो, व्यक्ती, आशय अथवा माध्यमाच्या मुस्कटदाबीने नव्हेच.

माहितगार's picture

10 Sep 2015 - 4:57 pm | माहितगार

आक्षेपार्ह, अश्लाघ्य, गैर कशास म्हणावे हे बहुतांश वेळा सब्जेक्टीव्ह असते. भारतात केलेले काही लेखन पाकीस्तान मध्ये काही लेखन, काही वेगळे लेखन चीन मध्ये काही वेगळे लेखन काही इतर कोणत्या देशात आक्षेपार्ह, अश्लाघ्य, गैर समजले जाईल. काळ परत्वेसुद्धा फरक पडतो. काही लेखन २०व्या शतकाच्या पुर्वार्धापर्यंत गैर समजले जात असे ते आज कदाचित गैर समजले जाणार नाही. एखाद्या किंवा रँडमली कोणत्याही लेखनावर, टिकाकरण्याचे स्वातंत्र्यावर आक्षेप घेण्यापेक्षा तुम्हाला न पटलेले लेखन 'पटले नाही' हे म्हणणे पुरेसे असावे. एकदा स्वातंत्र्याचा अधिक्षेप केला की त्याच न्यायाने केवळ 'पटले नाही' म्हणावयाच्या स्वातंत्र्याच्या अधिक्षेपाची सुद्धा सुरवात होते हे लक्षात घेणे गरजेचे असावे

दमामि's picture

9 Sep 2015 - 1:15 pm | दमामि

विकु,
विडंबन आणि व्यक्तिगत टिका यात तुम्ही गफलत करत आहात.
तसेच चांगल्या कलाकृतीचे करु नये , सुमार लेखनाचे करावे हे देखिल पटत नाही. मुळात चांगली। की सुमार हे ठरवणार कोण? प्रत्येक लेखक वा कवीला आपली कलाकृती चांगलीच वाटते.
इथे all or none नियम जास्त संयुक्तीक ठरेल. हा लेखनस्वातंत्र्याबद्दल कधी न संपणाऱ्या वादाचेच रूप आहे.

करावं करू नये असं काहीच ठरवता येणार नाही. अती झालं की मजा जाते हे मात्र समजावं सगळ्यांना असं वाटतं.

विशाल कुलकर्णी's picture

9 Sep 2015 - 1:23 pm | विशाल कुलकर्णी

अती झालं की मजा जाते हे मात्र समजावं सगळ्यांना असं वाटतं.

हेच मलाही म्हणायचय. विडंबनाला माझी ना नाहीये. जुन्या मिपावर मी केलेली विडंबनेही सापडतील. फक्त त्याचा अतिरेक होवू नये आणि विडंबनाचा वापर एखाद्याला भक्ष्य बनवण्यासाठी होवू नये असे माझे म्हणणे आहे.
वैयक्तिक टीका आणि विडंबन या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत हे मी सुद्धा जाणतो. माझे म्हणणे इतकेच आहे की वैयक्तीक टीका करण्यासाठी विडंबनाचा आधार घेतल्या जावु नये.

विशाल कुलकर्णी's picture

9 Sep 2015 - 1:20 pm | विशाल कुलकर्णी

तसेच चांगल्या कलाकृतीचे करु नये , सुमार लेखनाचे करावे हे देखिल पटत नाही.
मेी चांगल्या कृतीचे विडंबन करु नये असे म्हणत नाहीये दमामि, तर ते विडंबनदेखील तितक्याच चांगल्या दर्जाचे असावे. असे म्हणतोय.
अर्थात एखाद्या अतिसुमार लेखन करणार्‍या लेखकुला थांबवण्यासाठी म्हणून त्याच्या लेखनावर टीकात्मक किंवा समीक्षात्मक विडंबन मान्यच असेल. पण केवळ आपली विडंबनाची सुरसुरी पुर्ण करायची म्हणून एखाद्या चांगल्या लेखनाची (मग कविता असो वा गद्य) वाट लावणे हे निव्वळ अक्षम्य आहे.

"एखाद्या अतिसुमार लेखन करणार्‍या लेखकुला थांबवण्यासाठी म्हणून त्याच्या लेखनावर टीकात्मक किंवा समीक्षात्मक विडंबन मान्यच असेल. पण केवळ आपली विडंबनाची सुरसुरी पुर्ण करायची म्हणून एखाद्या चांगल्या लेखनाची (मग कविता असो वा गद्य) वाट लावणे हे निव्वळ अक्षम्य आहे. "

यात लेखन सुमार की चांगले हा निकष व्यक्तिसापेक्ष आहे. तसेच विडंबन देखील चांगले की"वाट लावलेले" हे देखील .
त्यामुळे हे वाचकाला ठरवू द्यावे.
पण विडंबने वाढत आहेत म्हणून मिपामध्ये राम उरला नाही असे सरसकटीकरण करणे किंवा चांगल्या(?) लेखनाच्या वाईट(?) विडंबनास अक्षम्य मानणे मला अयोग्य वाटते.
मिपाकर सूद्न्य आहेत. ते चांगल्या साहित्यास मग ती कविता असो, प्रवास वर्णन वा विडंबन उचलून धरतीलच.

विशाल कुलकर्णी's picture

10 Sep 2015 - 11:21 am | विशाल कुलकर्णी

ण विडंबने वाढत आहेत म्हणून मिपामध्ये राम उरला नाही असे सरसकटीकरण करणे किंवा चांगल्या(?) लेखनाच्या वाईट(?) विडंबनास अक्षम्य मानणे मला अयोग्य वाटते.

सहमत !

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Sep 2015 - 7:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

मिपावर दोन विभाग करावेत. एक विभाग 'विडंबन' आणि दुसरा विभाग 'दर्जेदार विडंबन'.

पैजारबुवा,

विडंबन हा वेगळा विभाग करावा याच्याशी प्रचंड सहमत.
चांगले वाईट हे वाचकांना ठरवू द्यावे. आणि जे मिपाच्या धोरणात बसत नाही त्यास संपादकांनी उडवून टाकावे.

एस's picture

10 Sep 2015 - 11:24 am | एस

दोन्ही विभागांसाठी वेगवेगळे कातरीधारक नेमावेत.

एस's picture

10 Sep 2015 - 11:25 am | एस

दोन्ही विभागाचे विडंबकही वेगवेगळे असावेत.

आता लाटकरसाहेबांच्या मूळ उपप्रतिसादाचे कोणीतरी विडंबन करा. आमचा पास!!!

नया है वह's picture

10 Sep 2015 - 5:29 pm | नया है वह

नाहीतर विडंबन स्पर्धाच होऊद्यात आता शशक प्रमाणे..

आक्रंदती मिपात आता राम नाही राहिला
जाहले संस्थळ जणू कट्टा पडिक बेकारसा...
सकस लिहिणारे मिपाकर आजला गेले कुठे
"मापं" ओलांडुन जाती भरला इथे बाजारसा...

>>>> प्रचंड असहमत !!

दमामि's picture

9 Sep 2015 - 12:48 pm | दमामि

अगदी!
पण हा सूर हल्ली दिसत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2015 - 12:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं विडंबन !

माहितगार's picture

9 Sep 2015 - 12:45 pm | माहितगार

काव्य, काव्य मतीतार्थ, आणि चर्चेची नोंद घेतली.

- उत्साहाने विंडंलबी (विंडबंन+जिलबी) पाडणारा माहितगार

मित्रहो's picture

9 Sep 2015 - 5:41 pm | मित्रहो

छान
विडंबन की मूळ कविता
नाही प्रेरणा वगेरे असे काही दिसले नाही

ही मूळ कविता आहे वरिजिनल, खास अभ्याच्या आग्रहाखातर!

मित्रहो's picture

10 Sep 2015 - 11:43 am | मित्रहो

वर विडंबनावर चाललेली चर्चा आणि मस्त विडंबन अशा प्रतिक्रीया मुळे गोंधळलो होतो.

विडंबन ही हवीच म्हणजे हवीच. चांगली वाइट वाचक ठरविनार. गायीसमोर पुरणपोळी आणि ढेप ठेवली तर ती ढेपच खानार आणि मनुष्य पुरणपोळीच खानार. आवड आपली आपली. सकस आहाराच्या नावाखाली साऱ्यांनीच जर कंदमुळे खाल्ली तर सारेच ऋषीमुनी होतील. मुक्त संस्थळाचा मूळ आधार आहे चांगले की वाइट ही कात्री न लागता मुक्त लेखन. ही संकलपना धोक्यात यायला नको.

साहीत्य, काव्य याच्या बरोबरीने विडंबनाचा एक स्वतंत्र विभाग असवा असे आग्रही मत असनारा
मित्रहो

विशाल कुलकर्णी's picture

10 Sep 2015 - 4:29 pm | विशाल कुलकर्णी

विडंबन ही हवीच म्हणजे हवीच. चांगली वाइट वाचक ठरविनार

१००% सहमत. याचबरोबर मिपा आपले संस्थळ आहे. त्याचा दर्जा टिकून राहावा ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे हे ही लक्षात ठेवायला आहे.

मित्रहो's picture

10 Sep 2015 - 7:58 pm | मित्रहो

याचबरोबर मिपा आपले संस्थळ आहे. त्याचा दर्जा टिकून राहावा ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे

१००% सहमत. दर्जा ही सापेक्ष संकल्पना आहे. याविषयावर तुमची वर सुंदर चर्चा चालली आहे. सारेच चांगले राहीले तर चागल्याचे महत्व संपते. सारेच गोड झाले तर मधुमेह होतो. तेंव्हा चांगले वाइट हे असनारच आणि असायलाही हवे. आपल्याला जे चांगले वाटले त्याला चांगले म्हणून उचलून धरणे आपले काम आहे.

दमामि's picture

11 Sep 2015 - 9:29 am | दमामि

मित्रहो, इकदम पटेश!

धन्यवाद धन्यवाद धमामि साहेब्/म्याडम
.
आता करत जाईन आग्रह...
लैच व्हायल्यावर. ;)

विवेकपटाईत's picture

11 Sep 2015 - 6:06 pm | विवेकपटाईत

जेवणाच्या ताटात कडू, गोड, आंबट आणि तिखट सर्वच असते. बाकी कुठले विडंबन दर्जेदार आहे आणि कुठले सुमार आहे हे वाचकांनाच ठरवू द्यावे. बाकी अनावश्यक द्वेष, शिव्याशाप असतील तिथेच संपादकांनी हस्तक्षेप करणे रास्त.

पन्नाशी निमीत्त श्री.दमामि यांचा सत्कार स्पेशल हातमोजे देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक- जेपी आणी तमाम विद्रोही कार्यकर्ते.

दमामि's picture

13 Sep 2015 - 7:33 am | दमामि

कसचं कसचं!
पण हातमोजे? त्यापेक्षा छत्री आहे का?

अत्रुप्त आत्मा's picture

14 Sep 2015 - 11:21 am | अत्रुप्त आत्मा

तुम्ही वापरता का? :p

तुडतुडी's picture

14 Sep 2015 - 5:23 pm | तुडतुडी

विडंबनं येवुद्यात हो . पण प्रत्येक धाग्यावर आणि त्यात एखाद्या गंभीर विषयावर विडंबन लिहिणं योग्य आहे का ? सं . मं . ने लक्ष घालावं