मोकळा आहे तरी ना मुक्त मी...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
7 Sep 2015 - 9:48 am

श्वास आहे घास नाही कोरडे नि:श्वास केवळ
भाकरीचा चंद्र नाही, चांदण्याचा भास केवळ

साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे
माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ

मिरग गेला हस्त गेला पांढरीला ओल नाही
धान नाही पेरणीला, पावसाची आस केवळ

प्राक्तनी सगळ्या जिवांच्या शेवटी मातीच आहे
मोह संपे ना तरीही, खेळ 'त्याचा' ख़ास केवळ

खोल नांदे जखम ओली वेदनेला अंत नाही
मोकळा आहे तरी ना मुक्त मी... आभास केवळ

अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने?
सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ

विशाल ५/०९/२०१५

करुणगझल

प्रतिक्रिया

दमामि's picture

7 Sep 2015 - 11:52 am | दमामि

वाह!!!!

प्राची अश्विनी's picture

7 Sep 2015 - 3:30 pm | प्राची अश्विनी

आवडली१

प्राची अश्विनी's picture

7 Sep 2015 - 3:32 pm | प्राची अश्विनी

आवडली!

माहितगार's picture

7 Sep 2015 - 4:03 pm | माहितगार

साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे
माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ

या ओळी आवडल्या

अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने?
सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ

या शेवटच्या ओळीत फारच निराशा दिसते.

यावरून कवी ज्ञानेश वाकुडकरांची शेतकर्‍यास आत्मविश्वास देऊ इच्छित एक कविता अलिकडेच वाचली नाव आठवत नाहीए आठवले की देतो.

विशाल कुलकर्णी's picture

8 Sep 2015 - 10:51 am | विशाल कुलकर्णी

अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने?
सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ

या शेवटच्या ओळीत फारच निराशा दिसते.

धन्यवाद. पण त्या ओळीत निराशा नाही तर स्वत्वावर, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला आहे. सगळे काही रामभरोसे न सोडता 'जगण्याचे' काही क्षण वेच. अशी आशावादी मागणी आहे. :)

पद्मावति's picture

7 Sep 2015 - 5:51 pm | पद्मावति

आवडली कवीता !

एस's picture

7 Sep 2015 - 7:17 pm | एस

कविता भेदक आहे.

पैसा's picture

7 Sep 2015 - 7:19 pm | पैसा

_/\_

एक एकटा एकटाच's picture

7 Sep 2015 - 9:32 pm | एक एकटा एकटाच

निव्वळ अप्रतिम

विशाल दा

विशाल कुलकर्णी's picture

8 Sep 2015 - 10:52 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी _/\_

कहर's picture

8 Sep 2015 - 10:59 am | कहर

मस्त

वेल्लाभट's picture

8 Sep 2015 - 11:10 am | वेल्लाभट

सुपर्ब ! क्लास

विशाल कुलकर्णी's picture

8 Sep 2015 - 11:14 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद श्रेष्ठी _/\_

ज्योति अळवणी's picture

10 Sep 2015 - 12:26 am | ज्योति अळवणी

अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने?
सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ

आवडली

प्राक्तनी सगळ्या जिवांच्या शेवटी मातीच आहे
मोह संपे ना तरीही, खेळ 'त्याचा' ख़ास केवळ

खलास!!!

बहुगुणी's picture

10 Sep 2015 - 2:47 am | बहुगुणी

वाचनखूण साठवली आहे.

नाखु's picture

10 Sep 2015 - 11:52 am | नाखु

मीही

विशाल कुलकर्णी's picture

10 Sep 2015 - 11:30 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद _/\_