सिन्धुताईंचा जन्म वर्धा जिल्ह्यातील 'पिंपरी मेघे या गावी झाला. त्यांच्या वडिलाचे नाव अभिमान साठे, ते गुराखी होते. सिंन्धु नकोशी मुलगी, म्हणून घरात तिला सर्वजण चिंधी' या नावाने हाक मारीत. त्यांच्या वडीलांनी बायकोच्या विरोधाला न जुमानता सिन्धुला शाळेत पाठवले. पण आईचा विरोध, आर्थिक परस्थिती, घरची जबाबदारी, बालविवाह या कारणामुळे चौथी पास झाल्यावर सिन्धुला शाळा सोडावी लागली.
सिन्धुताई 10 वर्षाची असताना त्यांचे लग्न ३० वर्षीच्या 'श्रीहरी सकपाळ'शी झाले. जेव्हा त्यांचे वय 20 वर्षाचे होते तेव्हा त्या 3 मुलांच्या आई झाल्या. गावकर्यांना त्यांच्या मजदुरीचे पैसे न देणार्या मुकादमाची तक्रार सिन्धुताईंनी जिल्हाधिकार्याकडे केल्यामुळे चिडलेल्या मुकादमाने सिन्धुताईच्या नवर्याला सिन्धुताईंना घराबाहेर काढण्यासाठी प्रवृत्त केले.
सिन्धुताई आईकड गेल्या तेव्हा त्यांच्या आईने ठेवून घेण्यास नकार दिला. सिन्धुताई अापल्या मुली सोबत रेल्वे स्टेशनवर राहु लागल्या. पेाट भरण्यासाठी भीक मागत व रात्री मुली सोबत स्मशानात राहत. त्यांच्या या संघर्षमय काळात त्यांना हा अनुभव आला की देशात कितीतरी मुले अनाथ आहेत त्याना आईची गरज आहे. तेव्हा त्यांनी निर्णय घेतला जो अनाथ त्यांच्याकडे येईल त्याच्या त्या आई होतील.
सिन्धुताईंनी आपले संपुर्ण जीवन अनाथ मुलांकरिता समर्पित केले आहे. त्यामुळे त्यांना माई" म्हणतात. त्यांनी 1000 अनाथ मुलांना दत्तक घेतले. त्यांची स्वत:ची मुलगी वकील आहे आणि त्यांनी दत्तक घेतलेली मुले आज डाक्टर, अभियंता, वकील आहेत. सिन्धुताईंना एकूण 273 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार कडून दिला जाणारा "अहिल्याबाई होऴकर" पुरस्कार आहे जो स्रिया आणि मुलांसाठी काम करणार्या समाजकार्यकर्त्यांना दिला जातो. 2010 साली त्यांच्या जीवनावर आधारित "मी सिन्धुताई सपकाळ" हा मराठी चित्रपट बनवला गेला. जो 54 व्या लंडन चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला.
प्रतिक्रिया
1 Sep 2015 - 9:25 pm | जेपी
लाटकर साहेब तुमचे लिखाण स्तुत्य आहे पण...
.
.
.
.
अस काही लिहा जे मिपाकरांना ठावुक नाही.
1 Sep 2015 - 9:33 pm | प्यारे१
गुण - ४.५/१०
2 Sep 2015 - 8:42 am | आनन्दा
हेच्च लिहायला आलो होतो. पण मी ५ देतो. विषय चांगला निवडलाय.
2 Sep 2015 - 1:48 pm | प्यारे१
चालतंय की!
2 Sep 2015 - 1:08 am | उगा काहितरीच
माहीत होतच , तरीही लेख आवडला !
2 Sep 2015 - 10:34 am | रायनची आई
माहित होतच.. तरीही लेख आवडला..तसही मिपावर ह्ल्ली खूप जिलब्यापाडू लिखाण येतयच.त्यापेक्षा तरी हा विषय खूप चांगला आहे.
2 Sep 2015 - 1:46 pm | इरसाल
तुमची निबंध लेखनाची स्टाईल मस्त आहे.
2 Sep 2015 - 2:13 pm | खटपट्या
चांगला लेख
2 Sep 2015 - 2:42 pm | प्रसाद गोडबोले
लाटकर राव , लेख बरा आहे पण जरा मोठ्ठा लिहा हो , लेखनात इन्टरेस्ट निर्माण होतो ना होतो तोच लेख संपतो .
बाकी मिपाच्या माई - सौ. नानासाहेब कुरसुंदीकर नेफळे असा लेख लिहिला असतात तर किमान १०० प्रतिसाद आले असते असे जाता जाता नमुद करु इच्छितो =))
3 Sep 2015 - 2:27 pm | नाखु
बद्दल माहीती नाही पण श्रीगुरुजींना किमान २ पानी एक असे पाच-सहा प्रतीसाद द्यावे लागले असते आणि धागाच ५ पानी झाला असता.
नियमीतजुगल्बंदीप्रेक्षक्महासंघ
3 Sep 2015 - 3:02 pm | होबासराव
आणि त्या प्रतिसादांचि सुरुवात "अरे माई" अशी असति :))
3 Sep 2015 - 3:08 pm | प्यारे१
कल्पनाविस्तार (या शब्दाचा नको) करा.
सर्वात कल्पनाविस्तारा ला मिळेल एक सातारी मिसळ.
(पुणेरी आणि कोल्हापुरी दोन्ही नको. मध्यातला शेन्टर काढलो.)
2 Sep 2015 - 5:05 pm | होबासराव
माई नेफळे आणि त्यांच्या ''ह्यांनि'' आपले संपुर्ण जीवन डुआयडि काढ्ण्यात समर्पित केले आहे. त्यामुळे त्यांना माई" म्हणतात. त्यांनी 100 डुआयडि दत्तक घेतले आहेत =:))
कृ् ह घ्या =:))