सलमा धरणाच्या रुपाने २००६ मध्ये सुरू झालेला भारताचा अफगाणीस्तानमधला सामाजिक मदत प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येईल. धरणात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. पुढच्या ९ ते १२ महिन्यांत १०० टक्के काम पुरे होईल.
१९५० कोटी भारतीय रुपये खर्चून दहा वर्षे चाललेल्या या प्रकल्पामुळे ८०,००० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली येणार आहे आणि त्यामधली ३ टर्बाईन्स ४२ मेगॅवॅट वीजनिर्मिती करतील.
या धरणाचा उपयोग अफगाणिस्तानच्या पश्चिम हेरात प्रांतातील रहिवाश्यांना होणार आहे. या प्रकल्पाने प्रभावित झालेल्या हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हेरात येथील भारतीय उपदूतावासाला (काउंसलेट) भेट देऊन पुष्पगुच्छांसह भारताचे आभार मानले. त्याचबरोबर, रस्त्यावर मानवी साखळी तयार करून १०० मीटर लांबीचे भारतीय आणि अफगाण ध्वज फडकावून आपले मनोगत एका अनवट कृतीने त्यांनी व्यक्त केले ! अनेक जणांनी व्टिटरच्या मदतीने भारताच्या सदिच्छेचा आदर केला तर काही जणांनी बॉलिवूड चित्रपटांतील गाणी गात रस्त्यावर मिरवणूक काढून आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्या प्रसंगाची काही क्षणचित्रे आणि व्टिटरचित्रे...
.
.
.
.
(संदर्भ : http://www.indiatimes.com/news/world/afghans-carry-100-metre-tricolour-t... )
.
प्रतिक्रिया
14 Aug 2015 - 12:50 pm | मदनबाण
वाह्ह ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vande Mataram feat Ustad Amjad Ali Khan :- The Song Of Freedom
14 Aug 2015 - 12:54 pm | पद्मावति
वाह मस्तं.
14 Aug 2015 - 1:19 pm | तुडतुडी
मस्त .बातमी छान आहे . पण आपण करापोटी १९५० कोटी अफगाणिस्तान मधल्या लोकांसाठी खर्च ? इकडे दुष्काळात होरपळून शेतकरी मरत असताना ? हे काही पटलं नाही
14 Aug 2015 - 1:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही लिहीले आहे त्यापेक्षा फार जास्त दूरदृष्टीने अश्या आंतरराष्ट्रिय योजना आखल्या जातात.
अश्या योजनांमुळे तयार होणार्या नागरिकांच्या आणि देशांच्या मैत्री व सदिच्छेमुळे अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे (अफगाणिस्तानला पाकिस्तानच्या बाजूने झुकण्यापासून दूर राखणे, भारतीय मालाची निर्यात, दुर्मिळ खनिजांची आयात, भविष्यातली बाजारपेठ, आंतरराष्ट्रिय संस्थातील मतदानात होऊ शकणारी मदत, इ इ) मिळतात. त्यांची गोळाबेरीज काही हजार कोटी रुपयांपेक्षा खूप जास्त आणि मोठ्या दूरगामी फायद्याची असते.
14 Aug 2015 - 2:30 pm | पगला गजोधर
पाकिस्तानी फौजांचे लक्ष फक्त पाकिस्तानच्या पूर्व सीमेवरती केंद्रित न राहता, त्यांना आता पश्चिमेकडे थोडे का होईना लक्ष ठेवावे लागेल (तालिबानमुक्त भारतमित्र अफगाणिस्तानच्याकडे )
14 Aug 2015 - 1:27 pm | यशोधरा
छान! चांगली बातमी.
14 Aug 2015 - 2:02 pm | मृत्युन्जय
झक्कास. युपीए ने केलेले असले तरी चांगले काम केलेले आहे. आंतरराष्ट्रीय सौर्हार्दाच्या दॄष्टीकोनातुन एक अतिशय चांगले पाऊल.
14 Aug 2015 - 2:05 pm | शलभ
चांगली बातमी.
14 Aug 2015 - 2:09 pm | अजया
वा!छान बातमी.
14 Aug 2015 - 2:36 pm | एस
छान बातमी. भारत अफगाणिस्तानसारख्या प्रदेशांत जिथे 'हार्ड पॉवर' वापरणे काही कारणांस्तव शक्य नाही तिथे आपली 'सॉफ्ट पॉवर' प्रस्थापित करून आपल्याला अनुकूल परिस्थिती घडवतो हे आग्नेय आशिया व मध्यआशियामधील अशा उदाहरणांवरून सिद्ध होते.
14 Aug 2015 - 2:50 pm | उगा काहितरीच
वाह ! कॉलर टाईट करून या भागात फिरायला आवडेल . ;-)
14 Aug 2015 - 9:07 pm | श्रीरंग_जोशी
तालिबानच्या पाडावानंतर तत्कालिन पंतप्रधान वाजपेयी यांच्या सरकारने अफगाणिस्तानला सढळ हस्ते मदत करण्याचे धोरण सुरु केले त्यास नंतरच्या सरकारांनीही जोमाने सुरु ठेवले.
त्याची फळे दिसली की आनंद वाटतो.
तालिबानच्या पाडावानंतर अफगाणिस्तानच्या सत्तेबाबत धोरण ठरवण्याच्या परिषदेत (६ + २) सहा भोवतालचे देश अन अमेरिका व रशिया यांचा समावेश होता. भारताला दूरच ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात अफगाणिस्तानाच्या पुनःउभारणीत भारताचे योगदान इतरांच्या तुलनेत खूपच उजवे आहे.
14 Aug 2015 - 9:19 pm | जडभरत
छान मस्त बातमी दिलीत!
14 Aug 2015 - 9:43 pm | पैसा
अशाच आणखी बातम्या याव्यात ही सदिच्छा!
14 Aug 2015 - 10:04 pm | सौन्दर्य
चांगली माहिती मिळाली. कदाचित वृत्तपत्रात आली नसावी किंवा चुकून नजरआड झाली असावी.
14 Aug 2015 - 10:25 pm | कैलासवासी सोन्याबापु
ईए काका,
माझ्यासाठी हा वैयक्तिक विजय आहे अशी माझी भावना आहे , कारण २००८ मधे जेव्हा काबुल ला एम्बेसी वर सुसाइड बॉम्बिंग झाले होते तेव्हा त्यात आमच्या फ़ोर्स च्या २ अधिकार्यांस वीरगती प्राप्त झाली होती (दोघांना ही मरणोपरांत कीर्तिचक्र आहे) त्यावेळी सुद्धा फ़ोर्स ने आपले २ सुरमा अधिकारी गमावले पण एम्बेसी उभी ठेवली होती :) तेव्हा तत्कालीन डीजी साहेबांनी "काही नाही होत तुम्ही रिकंस्ट्रक्शन प्रोग्राम सुरु ठेवा" असा आधार सरकार ला दिला होता, आज सलमा डैमच नाही तर डेलाराम झरांज हाईवे किंवा वाया अफगानिस्तान छाबर पोर्ट (इराण) कनेक्टिविटी हे भारताला अतुलनीय सामरिक एज देणारे प्रकल्प पुर्ण होत आहेत ते बीआरओ अन फ़ोर्स च्या जिगरबाज अधिकार्यांमुळे! तस्मात् ही एक वैयक्तिक आनंदाची बाब झाली!! आपले आभार आपण ही न्यूज़ शेयर केलीत!!
*त्या दोन नंतर आजतागायत फ़ोर्स ची सुद्धा एकही कैसुअल्टी नाही पुर्ण अफगाणिस्तानात
14 Aug 2015 - 10:36 pm | अर्धवटराव
एक तो वीरगतीचा दु:खदायक भाग सोडला तर बाकी माहिती एक नंबर.
14 Aug 2015 - 10:52 pm | राही
खरोखर स्फूर्तिदायक प्रतिसाद.
भारताचे परराष्ट्रधोरण दीर्घदृष्टीने आखलेले असते आणि त्याला सेनादलांचा भक्कम आधार असतो. त्यामुळेच परराष्ट्र धोरणात भारताची सहसा नाचक्की झालेली नाही, उलट यशच मिळाले आहे, एक चीनयुद्ध वगळता. भुटानमध्ये त्यांचा अतिडोंगराळ उंचसखल प्रदेशातून जाणारा राजमार्ग भारताने बांधलेला आहे. त्याला नावही इंदिरा गांधी यांचे दिले आहे.भुटानमध्ये सध्या चीनच्या प्रभावाला टक्कर द्यावी लागते आहे. इराणमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अस्तित्व राखण्याची धडपड अनेक वर्षांपासून चालू आहे
जय जवान. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
14 Aug 2015 - 11:18 pm | पैसा
ग्रेट!
14 Aug 2015 - 11:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद सोन्याबापु ही अधिक गौरवशाली माहिती इथे टाकल्याबद्दल.
भारतीय संरक्षक दलांचे अफगाणिस्तानात चाललेले "युद्धपरिस्थितीतले शांततापूर्ण काम (operations other than war under conditions of war)" सर्व माहितगार देश व संस्थांमध्ये वाखाणले जाते. पाकिस्तानप्रणीत माथेफिरू तत्वांमुळे होऊ शकणारे हल्ले/अडथळे लक्षात घेऊन भारतीय कामाची उघड प्रसिद्धी न करण्याचे धोरण आहे... हे दुर्दैवी आहे पण सद्यस्थितीत हेच सर्वात जास्त "फायदा/धोका" गुणोत्तर देणारे धोरण आहे. सर्वसाधारण अफगाण नागरिकाच्या मनात भारताबद्दल मैत्री/प्रेम-भावना आहे. पाकिस्तानची फूस असलेल्या बंदूकधारी डोकेफिरू संघटनांना न घाबरता तिथल्या जनतेने असे अत्युत्कट आणि प्रकट सद्भावना प्रदर्शन करणे हे पण बरेच काही बोलून जाते !
वीरगती प्राप्त झालेल्या भारताच्या गौरवशाली सिंहांना अभिमानी सॅल्युट !
15 Aug 2015 - 5:44 am | कैलासवासी सोन्याबापु
भारताने २००७ पर्यंतच ८५० मिलियन डॉलर ह्या प्रकल्पात घातले होते ! मिलिट्री प्रजेंस अफगाणिस्तानात नसताना सुद्धा कुठल्यातरी देशाने घातलेली ही सर्वात मोठी रक्कम होती, इतकी मोठी का तालिब चे ढाबे दणाणले व त्यांनी सलग २००८,-०९, -१० अशी ३ वर्षे एम्बेसी वर हल्ले केले होते
14 Aug 2015 - 11:34 pm | अनिरुद्ध.वैद्य
ग्रेट! ग्रेटच :)
15 Aug 2015 - 12:13 am | यशोधरा
ये हुई ना बात! हे शाब्बास!
15 Aug 2015 - 7:50 am | अजया
सलाम! _/\_
14 Aug 2015 - 10:59 pm | सर्वसाक्षी
वाचुन आनंद झाला
धन्यवाद
14 Aug 2015 - 11:07 pm | डँबिस००७
सुहास,
छान माहीती !! धन्यवाद !
बापु,
त्या २०१० च्या एंबसी वरच्या हल्ल्यानंतर आईसीआईच्या वरिष्ठ अधिकार्यांने मुबारक करताना चा फोन टॅप केला होता. त्या वेळचे रॉचे चिफ हल्ल्याच्या तयारीत होते, पण मनमोहन सींगांनी गुळणी धरुन ठेवली.
आता भारताच्या बरोबर अफगाणची गुप्तचर संस्था खांद्याला खांदा लावुन उभी आहे.
त्यांचा पुर्वीचा प्रमुख ३५ वर्षाचा अमरुल साले तर पाकिस्तानची जगभरातल्या सगळ्या मिडीया समोर वाभाडे काढत आहे. त्याने पहिल्यांदा ओ सामा बिन लादेन पाकिस्तानात कुठे लपलेला आहे हे अमेरिकेला सांगीतले होते. त्या पठ्ठ्याने पाकिस्तानच्या अध्यक्षालाच (मुशरर्फ) सांगीतले होते की ओसामा पाकिस्तानातच लपलेला आहे. सर्वांसमोर सांगीतल्यामुळे
मुशरर्फचा पाण उतारा झाला होता.
14 Aug 2015 - 11:13 pm | तीरूपुत्र
छान.आणखी एक नवीन मित्र देश वाढला.
15 Aug 2015 - 12:19 am | रेवती
छान बातमी.
15 Aug 2015 - 12:24 am | नंदन
माहिती. सोन्याबापू आणि राही यांचे प्रतिसादही खासच.
15 Aug 2015 - 2:21 am | तुमचा अभिषेक
छान बातमी,
दुसर्या देशात असे आपला झेंडा फडकणे, अभिमानास्पदच !
15 Aug 2015 - 4:23 am | अत्रुप्त आत्मा
जय हिंद!
15 Aug 2015 - 4:33 am | अत्रुप्त आत्मा
विजयी विश्व तिरंगा प्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा।
सदा शक्ति सरसाने वाला
प्रेम-सुधा बरसाने वाला
वीरों को हरसाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। 1।
लाल रंग बजरंगबली का
हरा अहल इस्लाम अली का
श्वेत सभी धर्मों का टीका
एक हुआ रंग न्यारा-न्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। 2।
है चरखे का चित्र सँवारा
मानो चक्र सुदर्शन प्यारा
हरे रंग का संकट सारा
है यह सच्चा भाव हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। 3।
स्वतन्त्रता के भीषण रण में
लखकर बढ़े जोश क्षण-क्षण में
काँपे शत्रु देखकर मन में
मिट जाये भय संकट सारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। 4।
इस झण्डे के नीचे निर्भय
लें स्वराज्य हम अविचल निश्चय
बोलो भारत माता की जय
स्वतन्त्रता हो ध्येय हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। 5।
आओ प्यारे वीरो आओ
देश-धर्म पर बलि-बलि जाओ
एक साथ सब मिल कर गाओ
प्यारा भारत देश हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। 6।
शान न इसकी जाने पाये
चाहें जान भले ही जाये
विश्व विजय कर के दिखलायें
तब होवे प्रण पूर्ण हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। 7।
================
रचना :- श्यामलाल गुप्त .
15 Aug 2015 - 8:02 am | मनोज श्रीनिवास जोशी
मस्त आणि अभिमानास्पद !
डॉ.सुहास म्हात्रे - अशी चांगली बातमी मिडिया मध्ये सहसा दिसत नाही , म्हणून विशेष आभार !
15 Aug 2015 - 3:42 pm | प्यारे१
+१ असेच.
सोन्याबापुंच्या पुरवणीमुळे आणखी छान वाटलं. (शहिद जवानांना विनम्र अभिवादन)
15 Aug 2015 - 8:48 am | विशाल कुलकर्णी
वाह...
ही बातमी शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक आभार !
15 Aug 2015 - 8:57 am | dadadarekar
मस्त
16 Aug 2015 - 12:38 am | डँबिस००७
पाकिस्तानने गेल्या ६९ वर्षात फक्त देशाच ईस्लामिकरण करण्याच काम केल, पाकिस्तानात कोणत्याही मुलभुत
गोष्टीवर विकास झालेला नाही. स्वत:ला अणुबॉ़ंब सक्षम देश म्हणुन मिरवणार्या ह्या देशात खरी परिस्थीती खुप वाईट आहे.
२० कोटी जनसंख्या अस लेल्या ह्या देशातील ५०% जनता २० ते २५ मधली तरुण जनता आहे, त्यातील ५४% तरुण फक्त शाळेत जातात, म्हणजे ४६% तरुण हे शाळेत जातच नाहीत. हीच आकडेवारी भारतात ९४% तर बांग्लादेशात
९६% अशी आहे.
ह्या २० कोटी लोकांच्या देशात वर्षाला २५०० पुस्तके प्रकाशीत होतात, फीनलँडसारख्या ५० लाख जनसंख्या असलेल्या देशात वर्षाला ६००० पुस्तके प्रकाशीत होतात. भारतात दरवर्षी ९०,००० पुस्तके प्रकाशीत होतात. १९४७ पासुन पाकिस्तानात जितके लोक पिएझडडी झालेले आहेत ते व्हडे लोक भारतात दर वर्षी पिएहडी करतात .
पाकिस्तानात पाण्याची टंचाई जाणवु लागलेली आहे.
गेल्या ६९ वर्षात त्यांनी एकही धरण बांधलेल नाही. त्या उलट काश्मिर मधुन आलेल्या सर्व नद्यांवर भारतात धरण बांधुन पाणी अडवलेल आहे. त्याचा परीणाम म्हणून पाकिस्तानात गेलेल्या सर्व नद्यांच्या पाणी प्रवाहात कमी आलेली आहे. पुर्वे कडुन येणार्या पाचही नद्यांची अश्यी परिस्थीती असताना आता पश्चिमे कडुन पाकिस्तानात येणारी एकुलती एक नदीवरही सलमा धरण बांधुन पाकिस्तानाच्या पाण्याची गोची करण्यात भारताला यश आलेल आहे .
16 Aug 2015 - 6:19 am | जुइ
चांगली बातमीच!!
16 Aug 2015 - 7:19 pm | श्रीगुरुजी
बातमी चांगली आहे. परंतु मिठाची चिमूट घेऊनच या बातमीकडे पहायला हवे. अफगाणिस्तान, विशेषतः अफगाणी, फारसे विश्वासार्ह नाही. थोड्या पैशासाठी कोणाचाही विश्वासघात करणे हे अफगाणी पठाणांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. जंजीर, काबुलीवाला इ. चित्रपटातून उदात्तीकरण केलेल्या पठाणांपेक्षा प्रत्यक्ष पठाण वेगळे असतात. अफगाणिस्तानात पठाणांचे प्राबल्य असल्याने व पाकिस्तानबरोबर असलेल्या सीमावर्ती प्रांतात दोन्ही देशात पठाण बहुसंख्य असल्याने जरा सावधच राहिले पाहिजे. तालिबानच्या काळात दोस्तम, गुलबदन हिकमतयार इ. पठाणांच्या स्वतःच्या सैन्याच्या टोळ्या होत्या. लादेन, मुल्ला ओमर इ. ना अमेरिकेने मारले असले तरी या छोट्या टोळ्या अजून संपलेल्या नाहीत. या टोळ्या अजिबात विश्वासार्ह नाहीत. अफगाणिस्तानात प्रामुख्याने पठाण, ताजिक व हाजरा जमातीचे नागरिक आहेत. या पैकी हाजरा सामाजिकदृष्ट्या खालच्या जातीचे समजले जातात. ताजिक भारताच्या बाजूने असले तरी संख्येने सर्वाधिक असलेले पठाण फारसे भारताच्या बाजूने नसून त्यांची सांस्कृतिक व धार्मिक दृष्ट्या पाकिस्तानशी जवळीक आहे.
२०११ मध्ये भारताच्या दौर्यावर आलेल्या अफगाणिस्तान पंतप्रधान करझाईंनी "भारत हा आपला मित्र असून पाकिस्तान हा अफगाणिस्तानचा जुळा भाऊ आहे" असे जाहीररित्या सांगितले होते.
"अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या वाढत्या सहकार्याबद्दल भारताने काळजी करण्याची गरज नाही" असे विधान अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी नुकतेच केले आहे. हेच अब्दुल्ला अब्दुल्ला तालिबानच्या काळात अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री होते.
त्यापूर्वी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी पाकिस्तानला भेट देऊन तिथल्या नेत्यांची व लष्करी प्रमुखांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर पाकिस्तान भूदलाचे प्रमुख जनरल राहील शरीफ आणि आयएसआय चे संचालक यांनी दोन वेळा अफगाणिस्तानला भेट देऊन तिथल्या नेत्यांची व लष्करी अधिकार्यांची भेट घेतल्याने भारत अस्वस्थ झाला होता.
या भेटीनंतर लगेचच अफगाणिस्तानने भारताकडून अवजड शस्त्रे घेण्याचा आपला करार स्थगित केल्यामुळे भारताची अस्वस्थता जास्तच वाढली आहे.
तालिबानशी बोलणी करण्यामध्ये अफगाणिस्तान चीनची सुद्धा मदत घेत आहे. चीन वेगाने अफगाणिस्तानात आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तान व चीन एकत्र येऊन भारताचा अफगाणिस्तानातील प्रभाव कमी करून स्वतःचा प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत.
काही काळापासून अफगाणिस्तानचे परराष्ट्र धोरण वेगाने बदलत असून पाकिस्तानशी अधिक जवळीक निर्माण करण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न सुरू आहे.
पाकिस्तान व अफगाणिस्तान या संदर्भात
Has India lost Afghanistan to Pakistan? हा 'अल झजीरा'तील लेख वाचनीय आहे.
या लेखातील काही परिच्छेद पुढीलप्रमाणे -
From the moment he assumed office, Ghani endeavoured to maintain closer contacts and ties with Pakistan's military establishment.
Sending Afghan cadets for military training to Pakistan, allowing Pakistani intelligence officers to interrogate detainees in Afghan detention facilities, conducting military operations on Afghan soil at the request of Pakistan's military, are but a few examples.
According to Pakistan's interior minister and local sources in Afghanistan, Kabul has also allowed Pakistani security forces to conduct "joint military operations" in the eastern parts of Afghanistan (Nangharhar, Kunar), which Kabul and Islamabad both later rejected.
In his speech at the 18th SAARC Summit in Kathmandu, Ghani even labelled the ongoing insecurity in his country as a "proxy war" between India and Pakistan, legitimising the Pakistani military's decades-old interferences in Afghanistan. Branding the conflict in Afghanistan as a "proxy war" validates the Pakistani military's mind-set and anxieties that India's increasing role in Afghanistan threatens its security and interests.
अजून एक वाचनीय लेख -
How the world takes new-born Pak-Afghan friendship
सारांश - अफगाणिस्तान निव्वळ भारतावर अवलंबून न राहता चीन आणि पाकिस्तानशी धोरणात्मक व लष्करी सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. अफगाणिस्तान व पाकिस्तान मध्ये समान धर्माचा धागा सुद्धा आहे. भारताने सावध रहायला हवे.
16 Aug 2015 - 10:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारताने सावध रहायला हवे.नक्कीच, पण या संदर्भात सार्वकालिक सत्य असे आहे...
१. "या जगात प्रत्येक राष्ट्राने इतर प्रत्येक राष्ट्रापासून सावध राहीलेच पाहिजे. कारण, "आंतरराष्ट्रीय राजकारणात मित्र नाही, केवळ हितसंबधच स्थायी असतात." (There are no permanent friends in international politics, only permanent interests.) हेच एकमेव सार्वकालीक स्थायी सत्य आहे"
२. भारताच्या (किवा कोण्या एका देशाच्या) हितसंबंधांचा सतत पाठपुरावा केला आहे अश्या दुसर्या एका देशाचे नाव सांगता येईल का ? नाही. याचा अर्थ भारताच्या बाजून कधीच कोणताही देश नव्हता असे नाही... जेव्हा ज्याला पाठिंबा देत येत होता आणि पाठीबा देणे सोईचे होते, तेव्हा त्याने तो दिला, नव्हता तेव्हा नाही दिला. अश्या अस्थायी परिस्थितीत, आपणही एकाद्या वेळेस पाठिंबा दिला नाही म्हणुन कायम रुसून न बघता, दुसर्याच्या नाईलाजांना समजून घेवून, आपल्या हितसंबंधांना योग्य ती कृती करायची असते.
३. बर्याचदा अत्यंत समान हितंबंध असल्याने काही राष्ट्रे बराच काळ बर्याच वेळा घट्ट दोस्ती असलेली राष्ट्रे दिसतात... पण त्यामागील मूळ अंतप्रेरणा "हितसंबंध" हीच असते... नाटोसारख्या घट्ट सामरीक संघटनेची सभासद राष्ट्रे लष्करी सामुग्रीचे कंत्राट काबीज करताना एकमेकावर कुरघोडी करताना दिसतात ते यामुळेच.
३. उघडपणे दृश्य कृती वरवर दिसते तशी पूर्ण सहमतीने केलेली कृती असू शकतेच असे नाही. ती वरवर हासर्या चेहर्याने पण सद्य वस्तूस्थितीमुळे झालेल्या नाईलाजाने स्विकारलेला निर्णय व कृती असू शकतात. (हे जेवढे आंतरराष्ट्रिय राजकारणात खरे आहे तवढेच वैयक्तिक जीवनात "बॉसच्या नाराजीने होऊ शकणार्या धोक्याला टाळण्यासाठी न पटलेले काम हसर्या चेहर्याने केले जाते" तेव्हाही खरे असते !)
४. माणसे असो वा राष्ट्रे, दोनच प्रकारची असतात...
(अ) क्रियावादी (proactive / active) : ही माणसे/राष्ट्रे गैरसोयीची वस्तूस्थिती बदलण्याचा प्रयत्न करून ती सोयीची करण्याचा प्रयत्न करतात... हे प्रयत्न दर काळच्या परिस्थितीप्रमाणे उघड किंवा गुप्त किंवा दिशाभूल करणारे असू शकतात. काही परिस्थितीत डोके थंड ठेवून काहीच न करता वस्तूस्थितीचे जवळून निरिक्षण करत राहणे आणि योग्य संधी हेरून तिचा फायदा उठवणे हा पण एक फार उपयोगी पर्याय असू शकतो.
(आ) प्रतिक्रियावादी (reactive) : ही माणसे/राष्ट्रे गैरसोयीची वस्तूस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्याचे धैर्य दाखवू शकत नाहीत किंवा त्यांच्या तेवढी मानसीक आणि/अथवा वास्तव ताकद नसते. त्यामुळे परिस्थिती जशी रेटून नेईल तसे वाहत जातात किंवा अविचारी प्रतिक्रियेचा भाग म्हणून एखादा आतताई निर्णय घेवून नंतर बहुदा पस्तावतात.
सद्य प्रतिकूल स्थितीत तगून राहणे आणि बर्याच काळपर्यंत यशस्वी होणे हे पहिल्या प्रकारच्या माणसात/राष्ट्रांत जास्त शक्य असते. यातही, आपण "नक्की काय आहोत आणि काय करणार आहोत ?" या संभ्रमात आपल्या प्रतिस्पर्ध्याला सतत गुंतवून ठेवणारे जास्त प्रमाणात यशस्वी होतात.
16 Aug 2015 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
थोडक्यात, कोणत्याही दोन देशांची यशस्वी दोस्ती तेव्हाच होते जेव्हा ती कोणाही एकाच्या अथवा दोघांच्या स्वार्थत्यागावर नसून दोघांच्याही स्वार्थावर (ज्याला गोग्गोड भाषेत हितसंबंध म्हणतात) अवलंबून असेल. असे हितसंबंध जुळवून आणणे हीच आंतरराष्ट्रिय राजकारणात सर्वात मोठी कसोटी असते !
17 Aug 2015 - 5:45 pm | राही
दोन्ही प्रतिसाद अतिशय आवडले. नेमके आणि चिरंतन सत्यावर बोट ठेवणारे.
17 Aug 2015 - 5:23 am | स्पंदना
अफगाणेस्तानच्या जनतेचा कौल पाहून फार आनंद झाला.
सोन्याबापू आणि श्रीगुरुजींचे प्रतिसाद सुद्धा माहीतीपूर्ण!!