अफगाणिस्तानात १०० मीटर लांबीचा तिरंगा फडकला !
सलमा धरणाच्या रुपाने २००६ मध्ये सुरू झालेला भारताचा अफगाणीस्तानमधला सामाजिक मदत प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येईल. धरणात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. पुढच्या ९ ते १२ महिन्यांत १०० टक्के काम पुरे होईल.
१९५० कोटी भारतीय रुपये खर्चून दहा वर्षे चाललेल्या या प्रकल्पामुळे ८०,००० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली येणार आहे आणि त्यामधली ३ टर्बाईन्स ४२ मेगॅवॅट वीजनिर्मिती करतील.
या धरणाचा उपयोग अफगाणिस्तानच्या पश्चिम हेरात प्रांतातील रहिवाश्यांना होणार आहे. या प्रकल्पाने प्रभावित झालेल्या हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हेरात येथील भारतीय उपदूतावासाला (काउंसलेट) भेट देऊन पुष्पगुच्छांसह भारताचे आभार मानले. त्याचबरोबर, रस्त्यावर मानवी साखळी तयार करून १०० मीटर लांबीचे भारतीय आणि अफगाण ध्वज फडकावून आपले मनोगत एका अनवट कृतीने त्यांनी व्यक्त केले ! अनेक जणांनी व्टिटरच्या मदतीने भारताच्या सदिच्छेचा आदर केला तर काही जणांनी बॉलिवूड चित्रपटांतील गाणी गात रस्त्यावर मिरवणूक काढून आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्या प्रसंगाची काही क्षणचित्रे आणि व्टिटरचित्रे...
.
.
.
.
(संदर्भ : http://www.indiatimes.com/news/world/afghans-carry-100-metre-tricolour-to-thank-india-for-reconstructing-the-salma-dam-244102.html )
.
वाचन
13369
प्रतिक्रिया
0