पाहुनी तुमची सोंगेढोंगे

शंकर पु. देव's picture
शंकर पु. देव in जे न देखे रवी...
26 Aug 2008 - 1:56 pm

पाहुनी तुमची सोंगेढोंगे मात्र कशी येईल दया ।
बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।

कशाला हवा झगमगाट एक भक्तीचा पुरेदिवा
प्रत्येकाच्या मनामनात माणुसकीची ज्योत लावा
तुमच्या इथल्या मांडणात उत्सवाची जाते रया
बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।१।।

नको मात्र फुलांचे ढीग वहा एकच लालफूल
फुलांच्या या ओझ्याखाली माझा दातच केलात गुल
ओंकाराचे रूप पहाव्या मोकळी ठेवा माझी काया
बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।२।।

प्रेमाने नाव घ्या कशाला बोंबलून करता आरती
फेकून तुमचे आवाज शप्पथ वाटे लवकर जावे वरती
उदबत्त्यांच्या धुरात मी तुमच्या कानी अत्तर काया
बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।३।।

दर वर्षी दहा दिवस शिक्षा भोगणे वाशिवी येते
दिव्यांच्या या झगझगाटात माझे अंगच फेकून निघते
माझी सुटका लवकर करा मीच पडतो तुमच्या पाया
बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।४।।

पुरे झाला पाहुणचार पुरे झाले मोदक लाडू
माझे एवढे शब्द तरी नका आता खाली पाडू
तुम्हीच सारे गणपती माझी अवकाळ गेली वाया
बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।५।।

कविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

26 Aug 2008 - 5:56 pm | प्राजु

सुंदर कविता.
खरंच.. आजचा सगळा गणशोत्सवाचा सोहळा पाहून बाप्पा असाच शोक करत असेल.
खूप आवडली. गणेशोत्सवाच्या धरतीवर ही कविता पेपर मधून द्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/