नमस्कार,
ऑगस्ट महिन्यात मराठी विकिपीडियास सर्वाधीक वाचकांच्या भेटी मिळतात. या कालावधीत नवनवीन सदस्यांना मराठी विकिपीडियाशी जोडण्यासाठी आणि लिहिते करण्यासाठी काही वेगळे करून पहाण्याचा मानस होता आणि आहे. या वेळी स्वांतत्र्य दिवसा निमीत्त मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत फारसे लेखन न केलेल्या लोकांनी दिलेले - म्हणजे तुमचे स्वतःचे शुभेच्छा संदेश ठळक पणे प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. उद्देश हाच कि लिहिण्याच्या फारशा अटी ठेवायच्या नाही आणि काय लिहू हा प्रश्नही कमीत कमी ठेवायचा. आजकाल प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाला हॅप्पी... डे म्हणतच असतो तेच अर्थात तुम्हाला आवडलेल्या शब्दांमध्ये स्वातंत्र्य दिवसाला मराठी विकिपीडियावरून करायचे एवढेच.
अर्थात हे संदेश मिसळपाव अथवा व्यनितून स्विकारले जाणार नाहीत ते मराठी विकिपीडियावर येऊनच पोस्ट करावे लागतील. ( हा धागालेख प्रतिसाद रहीत ठेवण्याची विनंती संपादकांना करत आहे.)
१) सदस्याची मराठी विकिपीडियावरील संपादन १०० पेक्षा कमी असावी किंवा एकाही संपादन संख्येचा अनुभव नसला तरी चालेल.
२) शुभेच्छा संदेश मराठीत असावा आणि शक्यतो मराठी विकिपीडियावर टंकीत केलेला असेल तर अधिक उत्तम.
३) संदेश आणि नमुद केलेले संदेश देणाऱ्याचे नाव सभ्यतेच्या संकेतांचे पालन करणारे असावे.
४) या विकिपानावरून अथवा येथील क्रमांक २ नंतरच्या कोणत्याही पानवरून आपण आपला शुभेच्छा संदेश लिहून पाहू शकता.
.
.
.
.
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4...
उपरोक्त छायाचित्र विकिमिडीया कॉमन्सच्या सौजन्याने. विकिपीडिया लोगो हा विकिमिडीया फाऊंडेशनचा अधिकृत कॉपीराइटेड लोगो आहे आणि त्या लोगोच्या वापरावर मर्यादा आहेत.
स्वातंत्र्य स्वस्त नसते, ते तुमच्या आमच्या सर्वांच्या जगण्याने, जगवण्याने आणि जागवण्याने टिकते !
प्रतिक्रिया
26 Jul 2015 - 7:04 pm | संपादक मंडळ
कृपया या धाग्यावर शुभेच्छा न देता विकिपीडियावरील लिंकवर द्याव्या.