कधी कधी निरर्थका लिहा बघू ज़रा उगा
असाच मी लिहूनिया प्रसिद्ध जाहलो जगा
असाच खेळ खेळलो पिळून शब्द काढले
अजून केस ओढतो कशास काव्य वाचले
इथून चार चोरले तिथून चार ढापले
करून भेळ चट्पटी विका म्हणून आपले
म्हणेल तो बळेबळे, "कळेल त्यांस चांगले"
छळेल प्रश्न हो मला, "कशास लोक पांगले?"
तुम्ही मला बघूनिया कशास दूर भागता
तुम्हास सोडणार का न काव्य हे सुनाविता?
पळा पळा छळेन मी विडंबने करेन मी
उदार काव्यप्रेमिका कशास लाइका कमी?
-- स्वामी संकेतानंद
आता मी पळतो..........
प्रतिक्रिया
25 Jul 2015 - 12:26 am | श्रीरंग_जोशी
प्रतिसाद सुचला नाही :-) .
बाकी ___/\___.
25 Jul 2015 - 12:35 am | स्वामी संकेतानंद
मांडवली करू. तुम्ही शीर्षक सुचवा मी प्रतिसाद सुचवतो. ;)
25 Jul 2015 - 2:07 pm | अत्रुप्त आत्मा
घ्या:- "निरर्थकांचे-स्वामी-अ भंग!" ;-)
25 Jul 2015 - 3:08 pm | स्वामी संकेतानंद
अभंग नसल्याने निरर्थकांचे अभंग म्हणता येणार नाही. पण मी आता ब्लॉगवर टाकताना 'निरर्थक कविता' हे शीर्षक दिले आहे. :P
25 Jul 2015 - 9:02 pm | अत्रुप्त आत्मा
ल्लुल्लुल्लुल्लुल्लु :-/ दुष्ट दुष्ट स्वामिज्जी! :-/
25 Jul 2015 - 2:36 pm | पैसा
ळॉळ! अद्भुत काव्य आहे हे! शीर्षक पण ढापायचे होते ना! हाकानाका!
25 Jul 2015 - 3:05 pm | विशाल कुलकर्णी
तैशी शमत हे ;)
25 Jul 2015 - 3:17 pm | स्वामी संकेतानंद
ढापण्यायोग्य शीर्षक दिसलेच नाही.
25 Jul 2015 - 3:50 pm | प्रचेतस
=)) =)) =))
25 Jul 2015 - 4:47 pm | जडभरत
:)