गुजरात........७ - मोढेरा...सूर्यमंदीर...

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in भटकंती
22 Jun 2015 - 10:43 pm

गुजरात........७ - मोढेरा...सूर्यमंदीर...

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मी आधीच कबूल केले आहे की प्रवासवर्णन (वाचकांना आवडू शकेल असे) लिहिणे फार अवघड आहे. पण परत परत मी तो प्रयत्न का करतो याला कारण आहेत उत्कृष्ट प्रवासवर्णने लिहिणारे मिपाकर. त्यांची प्रवासवर्णने वाचून मी परत परत चांगली प्रवासवर्णने लिहिण्याचा प्रयत्न करतो व परत परत तोंडघशी पडतो. तेव्हा दोष द्यायचा झालास तर खालील मिकाकरांना द्यावा लागेल. श्रीमती मधुरा देशपांडे, श्री श्रीरंग जोशी, प्रचेतस नावाचा वल्ली, डॉ. म्हात्रे, श्री. विशाल कुलकर्णी, श्री. देर्देकर, श्रीमती अजया, श्री मार्गी आणि असे अनेक, ज्यांची नावे राहिली आहेत त्यांनी उदार अंत:करणाने क्षमा करावी किंवा त्यांचे नाव येथे घेतले आहे हे गृहीत धरावे.

प्रवासवर्णन लिहिल्यावर परत वाचले असता मला सतत यात आपण काय विशेष लिहिले असे वाटत रहाते कारण त्यात खरोखरच विशेष काही नसते. बहुतेक वेळा मी तर फोटो टाकण्यासाठी प्रवासवर्णनाचा आसरा घेत असतो. तेही बरोबर नाही कारण प्रवासवर्णन हा साहित्यातील अत्यंत महत्वाचा, उपयोगी, करमणूकप्रधान, व उत्कंठा वाढविणारा एक साहित्यप्रकार आहे. प्रत्येक पानाच्या शेवटी किंवा प्रकरणाच्या शेवटी आता पुढे काय वाचण्यास मिळणार किंवा आता बहुदा असे असे असेल असा विचार करावयास लावणारे प्रवासवर्णन हे खरे प्रवासवर्णन. इब्नबतूताच्या प्रवासवर्णात मला हा अनुभव आला होता. इब्नबतुतावरील लेखात मी सुरवातीलाच म्हटले होते की रस्ता हे एक प्रचंड विद्यापीठ आहे. या विद्यापीठात नम्रतेनेच चालावे लागते. तसे नाही चालल्यास फटके अटळ आहेत. असो! जसे जसे फटके पडत जातात माणूस चुकांतून शिकत जातो; या नियमाला अनुसुरुन परत एकदा मोढेराच्या सूर्यमंदीराच्या भेटीचे प्रवासवर्णन लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. :-)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हिंदुस्थानातील सूर्यपूजा : वेदकालापासून इराण व हिंदुस्थानात सूर्यपुजा चालू आहे. अजुनही भारतात सूर्यपुजेला मान आहे. इराणमधून मात्र तिचे उच्चाटन झाले. पण मधे केव्हातेरी कुठेतरी काही पंथ अजूनही तेथे गुप्तपणे ही पूजा करतात असे वाचले होते. सूर्य हा उर्जेचा स्त्रोत आहे हे माणसाला प्रथमपासून माहीत असल्यामुळे वेदात त्याची प्रार्थना केली आहे. आजही परमेश्वराचे (सूर्याचे) आभार मानण्यासाठी आपण ही प्रार्थना करीत असतो. खरे तर या एकाच देवाची प्रार्थना केल्यास इतर कुठल्याही शक्तीची उपासना करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही, परंतु माणसाचे मन कशात आसरा शोधेल सांगता येत नाही. म्हणूनच त्याच्या असंख्य रुपांची तो प्रार्थना करीत असतो.
ॐ भूर्भुवः॒ स्वः ।
तत्स॑वितुर्वरे॑ण्यं
भ॒र्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि ।
धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त् ॥

सूर्याची मुर्ती.
सूर्याची मुर्ती कशी करावी याचे काही नियम आपल्या शिल्पशास्त्रात लिहून ठेवलेले आहेत त्याप्रमाणे त्याच्या दोन्ही हातात कमळे हवीत. ती त्या मुर्तीच्या खांद्यापर्यंत जायला हवीत. त्याच्या पायात बुट दाखविले पाहिजेत...त्याचे सात घोडे दाखविले पाहिजेत इ.इ. असे अनेक नियम शिल्पशास्त्रात लिहून ठेवले आहेत व त्याच प्रमाणे मूर्ती घडवाव्या लागत.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

भारतातही सूर्याची मंदीरे पार अफगाणिस्थान, पाकिस्तान पासून दक्षिणेपर्यंत सापडतात. त्यातील गुजरातमधील मोढेरा येथील सूर्यमंदीर मी नुकतेच पाहिले. आपल्या येथे प्रत्येक मंदिरामागे एखादी दंतकथा असते तशी याच्यामागेही आहे. रामाने एका ब्राह्मणाला म्हणजे रावणाला मारले म्हणून प्रायश्र्चित्त म्हणून एक यज्ञ करायचा होता. त्यासाठी त्याने एक मोढेरक नावाची नगरी वसविली. त्याचे पुढे झाले मोढेरा.

पुढे मोढेराला १०२६ साली सोलंकी घराण्याचा राजा भिमदेव याने हे सूर्यमंदीर बांधले. सोलंकी हे सूर्यवंशाचे असल्यामुळे हे स्वाभाविकच होते. मंदीराचे बांधकाम किती काळ चालले होते याची कल्पना नाही परंतू राजाने व त्याच्या कलाकारांनी हे मंदीर किती जीव ओतून बांधले आहे याची कल्पना त्यावरील कलाकुसरीवरुन येऊ शकते. बऱ्याच मंदीराप्रमाणे येथेही मावळत्या सूर्याची किरणे गाभाऱ्यात पडतात. भारतातील बरीचशी देवळे तीन भागात बांधली जातात.
गर्भगृह, गुढमंडप आणि असलाच तर स्वर्गमंडप.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या मंदिराची काही आपली स्वत:ची वैशिष्ठ्ये आहेत. एकतर पुष्करणीत (सूर्यमंदीरात याला सूर्यकुंड म्हणतात) पाय धुतल्याशिवाय या मंदीरात प्रवेश करता येत नसे, म्हणजे प्रवेश करण्याचा मार्गच असा आखला होता.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सूर्यकुंड अप्रतीम बघत रहावे असे आहे. सूर्यकुंडाच्या भोवती पायऱ्या व इतर देवतांची मंदीरे आहेत त्याची माहिती त्या त्या फोटोंच्या खाली दिलेली आहेत. सूर्यकुंड आयातकृती असून १७६ फूट लांब व १२० फूट रुंद आहे. यात स्नान केल्यावर किंवा सूर्याला अर्ध्य दिल्यावर साधकाला एकूण दोन मंडपातून जावे लागे जे गरुडस्तंभासारख्या खांबांवर उभे केले होते.

पहिल्या मंडपाचे उरलेले दोन खांब
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

काठावरची देवळे
शितळादेवी; हिच्या डोक्यावर सूप आहे. देवीच्या साथीत मुलांना देवी येऊ नयेत म्हणून भाविक हिची पुजा करीत व अजूनही करतात.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सूर्यकुंडाभोवती १०८ मुर्ती आहेत व चार कोपऱ्यात गणपती, नटराज, शितळामाता, व विष्णू यांची देवळे आहेत.

गणपती
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नटराजाची अत्यंत सुबक मूर्ती. त्याच्या नृत्यातील डौल बघण्यासारखा आहे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

श्री विष्णू
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या देवतांची देवळे एकसारख्या अशा देवळात आहेत.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१०८ मुर्तींपैकी काही
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सभामंडपाला एकूण ५२ खांब आहेत. खांबावरील नक्षिकाम अप्रतीमच्याही पलिकडील आहे. एक फोटो मला नीट घेता आला नाही. त्याच्या इतके कोरीव काम मी कुठेच पाहिले नाही.
सभामंडपाची काही छायाचित्रे:-
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

छतावरील नक्षिकाम
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सभामंडपात चारही बाजूंनी जाता येते. आतमधे खांबावर रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. छपराची उंची साधारणत: २३ फूट आहे. गुढमंढपातही अनेक शिल्पे कोरलेली आहेत काही कामसूत्रातीलही आहेत. याचे क्षेत्रफळ अंदाजे १३०० वर्ग फूट आहे. आतील भागात पूर्वी सूर्याची मुर्ती असावी. त्याच्याभोवती प्रदिक्षणेचा मार्ग ही आखलेला आहे. दर २१ मार्चला सूर्याची किरणे त्या मुर्तीवर पडतात. गुढमंडपात एक भुयार होते असे आमच्या गाईडने सांगितले जे सध्या बुजलेले आहे असेही सांगितले. खरे खोटे देव जाणे.

मंदीराच्या बाहेरील भिंतीवरील काही शिल्पे

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बर्‍याच नमंदीरात मंदीराचा भार उचलण्यासाठी गजथर दाखविलेला असतो. येथे मात्र कमळाचा थर दाखविलेला आहे....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गुढमंडपातून दिसणारा सभामंडप
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कमानीवरील कोरीवकाम
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सूर्यदेव
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आम्ही गेलो होतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मोढेराचा नृत्यमहोत्सव सुरु होणार होता. तेथे थांबता येणार नसल्यामुळे उदास होत आम्ही सूर्यमंदिराचा निरोप घेतला.

यानंतर आम्हाला पाटणला जगप्रसिद्ध असलेली रानीकी बाव पहायला जायचे होते; त्याबद्दल पुढच्या भागात.
पण तेथील एक अप्रतीम शिल्प येथे ट्रेलर म्हणून टाकायला हरकत नाही. हा फोटो मला दोन भागात काढावा लागला कारण मधे खांब येत होते. त्यानंतर लेन्स करेक्शन करुन एकत्र केला आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जयंत कुलकर्णी.

---------------------------------

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2015 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

सुंदर.........

शेवटाच्या ट्रेलरनी शिनूमाची ओढ प्रचंड लागली आहे.

वेल्लाभट's picture

22 Jun 2015 - 11:46 pm | वेल्लाभट

सुंदर फटू ! क्या बात है. इथे जाऊन आल्यामुळे अजूनच ओळखीचं वाटलं हे मंदिर. वाह.

राही's picture

23 Jun 2015 - 12:07 am | राही

प्रत्यक्ष मंदिराइतकाच आपला लेख आणि त्यातले फोटो सुंदर आहेत.
सम हाउ, पहाडी शिल्पकृतीपेक्षा मैदानी शिल्पकृती अधिक आकर्षक वाटतात असे वै. मत आहे. दिलवाडा अपवाद, पण राणकपुरही छान आहे. दिलवाड्यातही पहाडातली जागा सपाट करून मंदिर बांधले आहे. उंचीच्या वेगवेगळ्या पातळ्यांचा विचार करून नाही.
मोढेरा बाकी डोळे खिळून राहाण्याइतके सुंदर आहे.
बाह्यभागातल्या एका शिल्पपट्टिकेवर एक छोटेसे प्रसूतिचित्र आहे. त्यात 'स्क्वॉटिंग' स्थितीतली प्रसूती दाखवली आहे. तिथले गाईड हे अगदी छोटे शिल्प आवर्जून दाखवतात आणि आजकाल पश्चिमेकडे लोकप्रिय होऊ घातलेली ही प्रसूती मुळातली आपल्याकडचीच आहे असे अभिमानाने सांगतात. (सांगत असत, आता माहीत नाही.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2015 - 2:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोढेरा बाकी डोळे खिळून राहाण्याइतके सुंदर आहे.
+१००

लेख आणि फोटोग्राफी अत्यंत सुंदर आहे हेवेसांन.

दोन वर्षापूर्वी अगदी ध्यास घेऊन मोढेरा,रानी की बाव बघायला गेलो होतो.तुमच्या अप्रतिम फोटोंनी त्या सुंदर वास्तुंचे दर्शन पुन्हा होते आहे.पुभाप्र.

सर्वात प्रथम धन्यवाद मालिका पूर्ण करायचं मार्गी लावल्याबद्दल.फोटो फारच छान आले आहेत.

पाटील हो's picture

23 Jun 2015 - 10:03 am | पाटील हो

वर्णन आणि फोटो दोनीपण भारी

पैसा's picture

23 Jun 2015 - 10:42 am | पैसा

मंदिर अतिशय सुंदर आहे. आणि तुम्ही त्याची ओळख पण खूप छान करून दिली आहे. ते सगळे अलंकरण फोटोतून बघतच राहिले. सोन्याच्या दागिन्यांवर काम करावे इतके बारीक सुरेख काम आहे आणि मूर्ती फारच प्रमाणबद्ध, देखण्या. नशीबात असेल तर नक्की बघेन एकदा!

जयंत कुलकर्णी's picture

24 Jun 2015 - 12:51 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jun 2015 - 5:05 pm | अत्रुप्त आत्मा

रानीकी बाव .. येऊ दे आता लवकरात लवकर. भरपूर फोटोंसह.

कपिलमुनी's picture

24 Jun 2015 - 1:08 pm | कपिलमुनी

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.
पुष्करणीमध्ये निळे ठिपके दिसत आहेत ते काय आहे ?

अवांतर : येत्या हिवाळ्यात एक गुजराथ ट्रिप काढली पाहिजे.

जयंत कुलकर्णी's picture

24 Jun 2015 - 7:58 pm | जयंत कुलकर्णी

दुसर्‍या दिवशी जो कार्यक्रम होता, त्याचे ते लाईट आहेत....

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2015 - 3:05 pm | पिलीयन रायडर

मोढेरा हे एक अप्रतिम मंदिर आहे ह्यात काहि वादच नाही!!
तुमच्या फोटोंनी परत एकदा जावं वाटत आहे..!!

शेवटचा फोटो तर... अ प्र ति म!!!!

प्रचेतस's picture

24 Jun 2015 - 4:41 pm | प्रचेतस

अतिशय सुंदर.

मधुरा देशपांडे's picture

24 Jun 2015 - 4:48 pm | मधुरा देशपांडे

माहितीपुर्ण लेख आणि फोटो फारच सुंदर.

आदूबाळ's picture

24 Jun 2015 - 8:47 pm | आदूबाळ

जबरी!

भारतातली सूर्यपूजा का बंद पडली?

नाखु's picture

25 Jun 2015 - 11:52 am | नाखु

पूर्वाश्रमींच्या वल्लींबरोबर पाहणे एक अविस्मरणीय सोहळा असेल.

बुवा आता त्यांना तयार कराच!

अनुमोदक नाखु

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jun 2015 - 1:15 pm | अत्रुप्त आत्मा

सगळ्यांना मिळेल मोकळा वेळ
तेंव्हाच जमेल आगोबा भेळ

नन्दादीप's picture

25 Jun 2015 - 11:56 am | नन्दादीप

खरोखरीच अप्रतिम कोरीवकाम

खटपट्या's picture

25 Jun 2015 - 2:16 pm | खटपट्या

हाफीसातून फोटो दीसत नसल्यामुळे फक्त वर्णन वाचले. अप्रतीम वर्णनाने आत फोटो पहायची ओढ लागली आहे.

स्वाती दिनेश's picture

25 Jun 2015 - 6:44 pm | स्वाती दिनेश

वर्णन आणि फोटो दोन्हीही फार सुंदर!
स्वाती