प्रेम करुन करुन दमावं

चिन्ट्'s picture
चिन्ट् in जे न देखे रवी...
11 Jun 2015 - 11:19 am

प्रेम करुन करुन दमावं
असं आमच्या आयुष्यात कधी घडलंच नाही,
आणि तसं काही घडण्यासाठी कधी कोणी आमच्या प्रेमात पडलंच नाही.
प्रेमात होकार मिळवणार्‍याची गावात मोठी वट आहे,
समोरुन जर नकाराचा 'रेड' सिग्नल आला तर लगेचच गावच्या 'मजनु' चा डाग आहे
सैफ च्या म्हातारपणात तरी असं काय रहस्य दडलंय,
त्याला जर करीना पटतेय तर आमचच घोड कुठ अडलंय.
आता तर म्हणे पोरगी कशी पटवावी याचेसुध्दा क्लासेस आहेत,
तरी सुध्दा नकार मिळणार्‍याच्या ओठी तर मद्याचेच चिकटलेले ग्लास आहेत.
आता तर मीही म्हणतो नाही मिळाली प्रेयसी तर नसू दे,
लग्नानंतर येईलच की बायको,
फिर यारो डरना कायको?

-------------------
लेखन संपादित केले आहे

चारोळ्या

प्रतिक्रिया

जेपी's picture

11 Jun 2015 - 12:06 pm | जेपी

बाब्बौ...
असो आता सत्काराला येतो..

..पहिलीच ओळ काही हर्बल औषधांच्या जाहिरातीत फिट्ट बसावी.
.कॉपीराईट रजिस्टर करुन घेणे.. :)

..हा विनोद झाला..

लिहीत रहा.शुभेच्छा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Jun 2015 - 10:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ठ्ठो!!! =))
काही विशेष जाहिराती आठवल्या.

चिगो's picture

11 Jun 2015 - 11:54 pm | चिगो

.पहिलीच ओळ काही हर्बल औषधांच्या जाहिरातीत फिट्ट बसावी.

ROFL =)) साष्टांग दंडवत, गवि..
'आजकल के असंतुष्ट पारीवारीक जीवन का कारण है स्ट्रेस' टाईपातल्या ताकाला जाऊन भांडं लपवणार्‍या जाहिराती आठवल्या..

वेल्लाभट's picture

11 Jun 2015 - 12:27 pm | वेल्लाभट

:) बरं.

संदीप डांगे's picture

11 Jun 2015 - 12:31 pm | संदीप डांगे

मी फेसबूकवर आहे काय???

सतिश गावडे's picture

11 Jun 2015 - 12:59 pm | सतिश गावडे

अगदी असंच काही नाही. मराठी आंतरजाल सर्व प्रकारच्या वयोगटातील, सर्व प्रकारच्या शैक्षणिक थरांतील लोकापर्यंत पोहचलंय याची ही निशाणी आहे.

नाखु's picture

11 Jun 2015 - 1:09 pm | नाखु

नावातील उकार राहिल्याने असेलही कदाचीत!

खमक्या's picture

11 Jun 2015 - 1:05 pm | खमक्या

चिन्ट्, ही कविता आधी कुठे प्रकाशित केली होती का?

ओह् ओक्के, त्याला तुमच्यात प्रेम म्हणतात होय!!

वेल्लाभट's picture

11 Jun 2015 - 6:15 pm | वेल्लाभट

हाहाहाहाहाहाहाहाहाह
हाहाहाहाहाहाहाहाहहा
ह्ह्पुवा

जो गोडवा 'मुळ' लिखाणात होता तो शुद्धीकरण केल्याने हरवला ;)

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2015 - 7:43 pm | अत्रुप्त आत्मा

धीरज...

मत हारना!

नाव आडनाव's picture

11 Jun 2015 - 8:36 pm | नाव आडनाव

व्वा !

पहिल्याच लायनीत अख्ख्या कवितेचा अर्थ समजला. एकदम भारी लाईन.

प्रेम करुन करुन दमावं
दमल्यानंतर परत प्रेम करावं.

मला पण जमली कविता !

चिन्टभाव, ही कविता तुमच्या आवाजात रेकार्ड करून इथे ऑडियो टाका ना. (नक्की कोणत्या चालीत म्हणायची आहे ते कळेल.)