प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय...
चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
सोडून गेली रं मैना
दोस्त टाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
आज काल दिस रात
मला सुचंना कायी
पार झालो देवदास
आन्न पोटात जात न्हाई
येईना हो झोप मला
कुशीवर वळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
कसं सांगू काय झालं
खेळ खल्लास झाला
उडवलेला पैसा सगळा
आता वाया तो गेला
पैलवान मी मर्द गडी
आसू गाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
प्रतिक्रिया
9 Jun 2015 - 7:47 pm | बबन ताम्बे
काव्य आणि पैजारबुवांचे कवितेचे रसग्रहण, दोन्ही भन्नाट !
सध्या आय.टी. मधे रेसेशन आहे का? रेसेशन आले की अॅप्रैजल मनाप्रमाणे होत नै, सॅलरी रेज मिळत नाही, इन्फ्लेशनशी पगार जुळत नाही, मग नाईलाजाने मैनेसाठीचे बजेट कमी होते अन मैना नाराज होऊन, सोडून ("दुस-याकडे") जाते असे ऐकवीत आहे.
या काव्य सुमनामागे अशी काही कल्पित प्रेरणा दडली आहे का की ज्यामुळे भर पावसात आगडोंब उसळलाय?
:-)
9 Jun 2015 - 8:08 pm | सतिश गावडे
हे शिघ्रकाव्य आहे. प्रेरणा इथे आहे.
9 Jun 2015 - 8:10 pm | खटपट्या
काहीही हा बबन...
9 Jun 2015 - 8:20 pm | बबन ताम्बे
एका ऐकलेल्या जोकवरून हे सुचले.
सिच्युएशन : २००७/०८ ची आय. टी. तील मंदी.
दररोज एका बॅचलर आय.टी. इंजीनीयर बरोबर फिरणारी मुलगी विचारते.
"आज क्या खिलायेगा? "
तो , " क्या करे, रेसेशन है. पेमेंट कम आ रहा है आजकल"
ती " पाणीपुरी भी नही? "
तो , " क्या करे. इस टाइम सॅलरी भी कम आया है"
ती " तो आज कुछ् भी नही? "
तो" नही"
ती" तो ठिक है, आजसे तू मेरा भाई है"
कृ. ह. घे.
10 Jun 2015 - 9:59 am | काळा पहाड
कोंबडी पळालीची चाल पण लावता येईल.
10 Jun 2015 - 11:42 am | मदनबाण
ही... ही... ह्या.... ;)
उगाच असेच एक महान काव्य आठवले ! :- माझं हे सारं सामान गं सखू...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Everything You Wanted To Know About Indian Army's Operation In Myanmar
From ‘insertion’ to ‘kill’ and ‘out’: How India’s elite troopers avenged militant strike in Manipur
10 Jun 2015 - 2:47 pm | सतिश गावडे
मी कितीही आयडी बदलले तरीही सखू मात्र तिथंच आहे. ;)
29 Jun 2015 - 5:39 pm | जडभरत
"कामासाठी जर कोणी उपलब्ध नसेल तर आपण आपल्या हाताने काम करावे" याची साधी शिकवण हे मध्यमवर्गीय आईवडील मुलांना देत नाहीत आणि मग मुलांवर अशी गादिवर तळमळत पडण्याची वेळ येते.
हाहाहा
पाताळविजयम मद्राशी शिणेमातील हास्य
30 Jun 2015 - 12:50 pm | टवाळ कार्टा
चुकून पातळविजयम वाचले :D
1 Jul 2015 - 10:26 am | जडभरत
आयला प्रतिसादांचा रोख भलतीकडॅच वळला. असो, पण सगा साहेब कविता नादभरीच!
विरही पुरुषांच्या व्यथेला एक गगनभेदी वाचा फोडली!
दुस-या कुणाला सांगून समजतं का हो हे दु:ख!
मस्त रचना!
1 Jul 2015 - 10:32 am | टवाळ कार्टा
१०० झाल्याबद्दल सगाचा सत्कार ज्येष्ठ समाजसेविका सन्नी लिओनी यांच्या "एकटेपणा विसरण्याचे १०० प्रकार" याची सीडी देउन कर्णेत येत आहे
शुभेच्छूक - समस्त रामदेवी संप्रदाय
1 Jul 2015 - 2:32 pm | जडभरत
पातळविजयम असतं तर वरती हाहाहा च्या ऐवजी दुसरे आवाज नसते का आले?