गाभा:
नमस्कार मंडळी,
येत्या रविवारी इथे .. माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करायचा मानस आहे. कोणाकडे त्या पूजेची मराठीतून एम पी ३ आहे का? किंवा कोणत्या साईटवर ऑडीओ पूजा मिळू शकेल .. हे सांगेल का कोणी?
आपल्याकडे असल्यास मला कळवा. मी माझा गुगल पत्ता व्य. नि. मधून कळवेन.
धन्यवाद.
- प्राजु
प्रतिक्रिया
21 Aug 2008 - 1:31 am | खादाड_बोका
मी घरी गेल्यावर देसीटोरेंटवर पाहुन सांगतो.
श्रीराम जयराम जयजय राम ...
21 Aug 2008 - 1:38 am | संदीप चित्रे
माझ्याकडे कॅसेट आहे... पाहिजे तर कॉपी करून देतो पण रविवारपर्यंत कशी मिळेल तुला ?
न्यू जर्सी हून कोणी येणार आहे का तिथे ?
21 Aug 2008 - 1:41 am | प्राजु
तू ती सीडी वर कॉपी करू शकशील का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Aug 2008 - 1:39 am | रवि
येथे भेट देउन पहा ........
http://www.esnips.com/web/SatyanarayanPooja
21 Aug 2008 - 1:40 am | खादाड_बोका
http://www.badongo.com/file/2300940
मला तर स्वप्नातही भुक लागते....
21 Aug 2008 - 1:45 am | प्राजु
मिळाली लिंक. मी फेवरेट्स मध्ये ऍड केली आहे. धन्यवद ..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Aug 2008 - 5:20 pm | विसोबा खेचर
माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करायचा मानस आहे. कोणाकडे त्या पूजेची मराठीतून एम पी ३ आहे का? किंवा कोणत्या साईटवर ऑडीओ पूजा मिळू शकेल .. हे सांगेल का कोणी?
पूजा सांगायला मी येऊ का? दोन बियर सुटतील इतकी दक्षिणा घेईन! :)
तात्याभट.
21 Aug 2008 - 7:19 pm | प्रकाश घाटपांडे
आम्ही सव्वा बाटलीत भविष्य सांगायचो. ( पाव बाटली साठी आख्खी एक बाटली लागायचीच ना . अशी वायली कशी करता येनार?)पन नंतर बुर्जीपाव मोफत पाहिजे अशी अट होती. तसे आम्ही अल्पसंतुष्टीच.
प्रकाश घाटपांडे
22 Aug 2008 - 12:30 am | बिपिन कार्यकर्ते
तात्या, सत्यनारायणाच्या पूजेत सव्वाला महत्व असते. बिअर सव्वा बाटली (किंवा पिंप) मागा...
बिपिन.
21 Aug 2008 - 7:41 pm | रेवती
तिर्थ प्रसादाचं आमंत्रण नाही आलं.
रेवती
21 Aug 2008 - 7:44 pm | प्राजु
सर्वांनी तिर्थ प्रसादाल जरूर यावे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Aug 2008 - 11:09 pm | आपला अभिजित
प्राजुताई,
काही जण पूजा सांगण्याच्या बहाण्याने फक्त `तीर्था'ची अपेक्षा करतायंत. प्रसादाची नाही. असो.
तुम्हाला एखाद्या सत्शील, सदाचारी ब्राह्मणाला जेवायला घालायचंय का? जरूर कळवा. दक्षिणा म्हणून फक्त पुणे-अमेरिका (न्यू जर्सी का काय ते अमेरिकेतच आहे ना? आमचे भूगोलाचे वांधे आहेत!) यायचा - जायचा खर्च दिलात, म्हणजे झालं!
22 Aug 2008 - 12:49 am | भास्कर केन्डे
आपल्या कडे न.पा. च्या निवडनुकीत उमेद्वार सत्यणारायन करीतात... अन मग त्या-त्या वेळी महाग असलेल्या वस्तू (जसे कधी कांदे-बटाटे) भेट म्हणून देतात.
येथे सध्या निवडणुकांचा हंगाम आहेच... सत्यनारायण करून तिर्थ प्रसादा ऐवजी (वा सोबत) गॅसोलीन वाटलेत तर!! ... थांबा आत्ता ही कल्पना ओबामा अन मॅकेन च्या चंबूत कळवतो.
आपला,
(प्रसादभक्षक) भास्कर
आम्ही येथे वसतो.
22 Aug 2008 - 12:51 am | खादाड_बोका
हा बोका "दे.ब्रा. " आहे. केव्हाही ब्राह्मण म्हणुन बोलवा..ऐकदम तयार :D
मला तर स्वप्नातही भुक लागते....
22 Aug 2008 - 5:39 am | रेवती
हाच अनुभव को. ब्रा. बद्द्ल आहे!
रेवती