जायचे होते कुठे पण... गाव भलते लागले
वाडवडिलांच्या घरावर नाव भलते लागले ॥
बाग ती गेली कुठे हे निवडुंग नुसते वाढले
लावलेल्या त्या मुळावर घाव भलते लागले ॥ १ ॥
देवळाच्या दीपमाळा विकुनी कोणी टाकल्या
आणि कळसालाही आता भाव भलते लागले ॥ २ ॥
गाव हे झाले जुगारी सर्व नाती संपली
रोज या मातीत आता डाव भलते लागले ॥ ३ ॥
प्रतिक्रिया
22 Aug 2008 - 6:35 am | विसोबा खेचर
कविता ठीक वाटली..
शुभेच्छा...
तात्या.