वेदना

पंचम's picture
पंचम in जे न देखे रवी...
20 Aug 2008 - 1:00 pm

वेदना

त्या कोणत्या सावल्या होत्या
ज्यांचा माझ्यावर अधिकार होता
विस्कटलेल्या जखमांवर माझ्या
नियतीचा प्रहार होता.....

त्या सावल्याच होत्या की,
ठिणग्यांचा पाऊस
कारण झालेल्या जखमांनाही
रेशमी किनार होता...

आरक्त होऊनी पडले
माझे शरीर खाली
त्या जखमांनाही लागलेला
सुरा धारदार होता.....

वेदना कधी झाल्याच नाहीत
त्या धारदार सुर्‍याच्या
ज्याने दिल्या वेदना
त्याचाच आधार होता...

-पंचम

कविता

प्रतिक्रिया

मनीषा's picture

20 Aug 2008 - 9:05 pm | मनीषा

कारण झालेल्या जखमांनाही
रेशमी किनार होता... सुंदर