आई.....

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
18 May 2015 - 8:16 pm

नयनांची दोन पिल्ले
आसूसले घरटे
मायेच्या छप्पराला
काळजाची झुंबरे

पापण्यांच्या तोरणाला
अबोल आसवांची घुंगरे
हरवलेल्या ह्रदयतरंगावर
सूर ओळखीचे हळवे

अमुर्त स्वप्नशिल्पास
विचारांची जळमटे
जाळीदार मनचक्षूमध्ये
श्वासांचे बोजड तडफ़डणे

नभपोकळीच्या वाटेवरती
मेघकल्लोळाचे रणकंदन
मुक्त आत्म्याचे फ़क्त आता
नश्वर शरीरात रुदन
नश्वर शरीरात रुदन

------ शब्दमेघ

हे ठिकाण

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

18 May 2015 - 8:25 pm | विवेकपटाईत

कविता आवडली.

चुकलामाकला's picture

19 May 2015 - 7:53 am | चुकलामाकला

छान!

झंम्प्या's picture

19 May 2015 - 8:53 am | झंम्प्या

आवडली कविता. मला कवितेतलं एवढ कळत नाही, पण शीर्षक जे आहे ते फक्त मला पहिल्या कडव्यात दिसलं, नंतर शोधलं पन सापडलं नाही.

गणेशा's picture

19 May 2015 - 10:11 am | गणेशा

सर्वांचे आभार ...

आई नसताना ... मुलाची झालेली अवस्था आहे ह्या कवितेत.
त्यामुळे घरात तीचे अस्तित्व .. ती जिकडे गेली त्या नभपोकळीत शुन्य नजरेने पहातानाही कल्लोळ करत असणारे मन..तिच्या अधुर्‍या स्वप्नांसहित श्वास ही जड झालेल्या मुलाचे हे चित्रण...

झंम्प्या's picture

19 May 2015 - 1:10 pm | झंम्प्या

आता कळाल तुम्हाला काय म्हणायचं कवितेत.

अत्रुप्त आत्मा's picture

19 May 2015 - 2:21 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

मले बी फैल्या चारोळींणतर कैच सुदरत न्हवते ना भौ!

नाखु's picture

19 May 2015 - 2:31 pm | नाखु

भेट मगच बोलतो.

थेट्भेट नाखु

अति अवांतर कवीता बेष्ट! चांगलीच झोंबली(खपलीवर)