३. नको येवुस पोरी
२. नको बोलु बाबा काही
१. हरवली पोर माझी कविता नावाची !
मनोगतः शेवटी बापाच्या जाण्याने दु:खी झालेल्या लेकीचे(कवितेचे) हे काव्य ... समाजातील अश्या असंख्य दयनिय अवस्थेतील मिटल्या पापण्यात स्वप्ने दडलेल्या शेतकरी बापाचे चित्र सहज लिहिले गेले होते.. तुमच्या सर्वांचे आभार.
-
तुझ्या डोळ्यात बरसुन... कोरडीच ही कविता
आसवांच्या ओळींसंगे बाबा... गहिवरलेली तुझी कविता
मिटल्या पापण्यांच्या स्वप्नांत... अडखळणारी ही कविता
तुझ्या आठवांच्या थेंबानी.. हेलावणारी तुझीच कविता
माझं माहेर देऊळ
तुच होता मायबाप
क्षीण नसे कधी भाव
तिथं पिर्तीचे होते गाव
बोल ना रे बाबा काही
सांग ना रे काही
रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई
रातीच्या गच्च पहार्यात... तव आठवांची ही टिपुस कविता
वेदनेच्या अस्तित्व डोहात...खोल बुडालेली तुझी कविता
डोंगरायेव्हड्या दु:खात सार्या... तुझ्यासाठी हसणारी ही कविता
तुझ्याच साठी आज मात्र... शेवटचं रडणारी तुझीच कविता
प्राजक्ताच्या फुलांनी
दिले सर्वस्व झोकुनी
चालावे का मी तुझ्यामागे
सांग त्याच वाटेनी
आसवांच्या पालखीत
तव स्वप्नांची मुर्ती
क्षितिजापल्याड उडलेले
रिक्त भावनेंचे पक्षी
बोल ना रे बाबा काही
सांग ना रे काही
रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई
रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई
--शब्दमेघ
प्रतिक्रिया
14 May 2015 - 12:24 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मर मेल्या
कशाला?
14 May 2015 - 12:50 pm | ज्ञानोबाचे पैजार
हा भागही चांगला झाला आहे.
शेवटी त्या बापाला मारणे गरजेचे होते का?
पैजारबुवा,
14 May 2015 - 3:27 pm | गणेशा
गरजेचे नव्हते खरे.. पण सर्व कवितेमधील बोलणे हे न भेटता दुरुनच झालेले आहे..
बापाची परिस्थीती-- पोरीच्या विचारांनी आयुष्य जगत असलेला बाप .. आणि सासरी असलेली मुलगी.. त्यामुळे समाप्तीला दूराव्यातील ही सर्वात दूरची पातळी वाटली होती.. तसे ही बाप वयाने मोठा.. शिवाय शेतात राबुन ..आयुष्य खंगलेले.. त्यामुळे शेवट त्याच्या मरणा नंतरचा
14 May 2015 - 1:09 pm | नाखु
भेट मगच बोलतो..
तूर्तास इतकेच
बापूस नाखु
14 May 2015 - 2:38 pm | मृत्युन्जय
सुंदर आहे कविता.
14 May 2015 - 3:19 pm | प्यारे१
:(
का रे असं ?????
15 May 2015 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा
शेवट झालाच .. शेवटी!
15 May 2015 - 3:35 pm | गणेशा
धन्यवाद , सर्वांना त्या बापाचा शेवट झालेला कदाचीत आवडले नाही... त्याबदल दिलगीरी व्यक्त करतो...
संपादित करता येत नाहिये, नाहि तर मनोगत लिहिलेल्या २ लाईन काढुन टाकल्या असत्या..
9 Oct 2019 - 2:11 pm | गणेशा
इतर कविता वाचता वाचता, आपली जुनी कविता वाचावी म्हणुन पुन्हा ह्या ४ कविता सिरिज वाचल्या..
मस्त वाटल्या..
आजकाल कविता लिहावेसे वाटतच नाही
हरवली कविता माझी
15 Oct 2019 - 9:12 am | प्रचेतस
लिहित जा रे कविता.
तुझ्यातला कवी मारु नकोस. तुझ्या कविता वाचायला खूप आवडतात.
19 Oct 2019 - 7:33 pm | गणेशा
धन्यवाद वल्ली मित्रा ..
पण भटकंतीच्या , सायकलच्या आवडीने कवितेंवर मात केली .
कदाचीत बाप झाल्यावर पण प्रायोरिटी बदलली असेल , आणि सभोवतालचे सारे विश्व च बदलले . त्यामुळे कविता बंद झाली .
कदाचीत mee हाडाचा कवी कधी नव्हतो , ना मला माझ्या कविता तोंडपाठ , ना मला कविता ऐकवायला किंवा ऐकायला आवडतात .
वाचायला आवडतात मात्र अजूनही ते हि नसे थोडके .
तुझे विडंबने येऊदे ..
19 Oct 2019 - 7:48 pm | गणेशा
धन्यवाद वल्ली मित्रा ..
पण भटकंतीच्या , सायकलच्या आवडीने कवितेंवर मात केली .
कदाचीत बाप झाल्यावर पण प्रायोरिटी बदलली असेल , आणि सभोवतालचे सारे विश्व च बदलले . त्यामुळे कविता बंद झाली .
कदाचीत mee हाडाचा कवी कधी नव्हतो , ना मला माझ्या कविता तोंडपाठ , ना मला कविता ऐकवायला किंवा ऐकायला आवडतात .
वाचायला आवडतात मात्र अजूनही ते हि नसे थोडके .
तुझे विडंबने येऊदे ..
20 Oct 2019 - 6:26 am | प्रचेतस
माझीही विडंबने संपली आता :)
21 Oct 2019 - 12:12 am | मनिष
मलाही असंच वाटलं होतं काही वर्षांपुर्वी, पण परत येते कविता....
कधी ते नाही सांगता येतं, पण येते येवढं नक्की. मनापासून वाटल्याशिवाय मात्र लिहू नकोस.
अवांतरः धामणस्करांची "बऱ्याच दिवसात कविता लिहिली नाही म्हणजे बऱ्याच दिवसात स्वतःला भेटलो नाही" वाचली आहे का?