२. नको बोलु बाबा काही

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
12 May 2015 - 2:00 pm

१. हरवली पोर माझी
----------------------

नको बोलु बाबा काही
नको सांगु काही
रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई

हातानी तुझ्या जेंव्हा
मला भरवला घास
कामामध्ये असे तुझ्या
फक्त माझाच ध्यास

कसे विसरेल बाबा
तुझी करुण कहानी
फाटलेल्या सदर्‍यात
विनलेली नाती

धुळीमधी माखलेली
तुझी जिंदगाणी
आधाराची परि माझ्या
प्रेमाची सावली

अंगणात विसावता
मायेची अंगाई
वेड्या या पोरीची
बाबा तुच विठाई

प्राजक्ताच्या सड्यामध्ये
होती ओघळली कविता
सासराला जाताना
तुझी रडवेली बोली

फाटक्या या संसाराला
ठिगळाची घाई
दूराव्याच्या अंतरात
जीव जाळीत राहि

नको बोलु बाबा काही
नको सांगु काही
रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई

रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई !!

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 May 2015 - 2:07 pm | प्रचेतस

अप्रतिम.
गणेशाच्या कविता म्हणजे क्या बात...!!!!

मदनबाण's picture

12 May 2015 - 2:12 pm | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.

चुकलामाकला's picture

12 May 2015 - 2:15 pm | चुकलामाकला

आवडली!!!!!

नाखु's picture

12 May 2015 - 2:20 pm | नाखु

रडवून राहीलास रे !

जबहर्या रचना

अंगणात विसावता
मायेची अंगाई
वेड्या या पोरीची
बाबा तुच विठाई

निशब्द बापूस
नाखु

मधुरा देशपांडे's picture

12 May 2015 - 2:28 pm | मधुरा देशपांडे

हळवे करणारी सुरेख कविता.

अत्रुप्त आत्मा's picture

12 May 2015 - 2:55 pm | अत्रुप्त आत्मा

__/\__

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 May 2015 - 3:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

दोन्ही कविता आवडल्या,

(हळवा बाप) पैजारबुवा,

नीलमोहर's picture

12 May 2015 - 4:14 pm | नीलमोहर

कवी आणि कविता दोघांचीही बाजू..

श्रीरंग_जोशी's picture

12 May 2015 - 10:16 pm | श्रीरंग_जोशी

भावस्पर्शी रचना खूप भावली.

जुना गणेशा परतलाय याची खात्री पटली :-) .

विशाल कुलकर्णी's picture

13 May 2015 - 10:41 am | विशाल कुलकर्णी

नि:शब्द ....

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 May 2015 - 11:38 am | मिसळलेला काव्यप्रेमी

__/\__!

गणेशा's picture

13 May 2015 - 1:33 pm | गणेशा

सर्वांचे मनपुर्वक आभार

अर्व's picture

20 May 2015 - 3:20 pm | अर्व

खुप सुरेख कविता

फाटक्या या संसाराला
ठिगळाची घाई

ही शब्द बांधणी कमालीची प्रभावी वाटली..

अजया's picture

20 May 2015 - 7:29 pm | अजया

खूप आवडली...

यशोधरा's picture

20 May 2015 - 8:05 pm | यशोधरा

हळवी कविता..