आत्ताच आलो मिपावर,अंगात आहे कळ !
उडी मारली ज्या धाग्यावर तो माझाच होई !
होती बरीच रद्दी थोपु+ब्लॉगात !
कुठे न बघता,येथे टाकत राही !
उरले न आता काही,ठेविले जे मागे !
ते माझे मलाच वाचवत नाही !
फेकुनी देई झमेला,या नव्या त्रांगड्यात !
सुट्टे ना जे मिळाले मोजूनी आता पाही !
उघडून पाह्तो धागा,प्रतीसाद एक नाही !
वाचनांची संख्या वाढत मात्र राही !
काही करू तरी जिल्बीकंड शमेना !
वाहव्वाच्या भुलथापेत मी चूर राही !
रोज नवे धागे प्रसवीत मीच आहे !
वाचक पकला तरी निराश मी नाही !
टाकला धागा पहिला,लॉगिन झालो तेव्हा !
चावेल का मला कोणी, वाचेल तो जेंव्हा !
उमजून घेण्या थोडे,उगा रूजवात करावी !
फक्त कुणाशी, याची खबरबात नाही !
नाहीजात
आमची उबळ
आणि गेल्या पंधरा दिवासात आलेली जिल्बी ताटे.
प्रतिक्रिया
2 May 2015 - 5:07 pm | झंम्प्या
2 May 2015 - 5:18 pm | झंम्प्या
माझ्याकडून काही(ही)
प्रसवतेची कळा ही सांगू तरी कुणा मी
काही करू तरीही, फिरुनी येत राही,
शमे ना हा कंड कितीही यत्न करावे
कितीही पोस्ट करावे उफ़ाळून येत राही
शेवटी ठरवतो आता पुन्हा न प्रसवावे काही
पण शेवटी ही वसना न सुटून कधी जाई
2 May 2015 - 10:54 pm | पैसा
काही लिहिल्यावर पूर्वपरीक्षण करा हो! मूळ कविता दुरुस्त केली. आता प्रतिसाद पण?
2 May 2015 - 6:26 pm | अत्रुप्त आत्मा
आसन क्रमांक 3
चाखिव! ;-)
2 May 2015 - 6:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
@ नाखु आणि झंप्या : दोन्हीही प्रसुतीफले सुंदर आहेत !
2 May 2015 - 7:13 pm | जेपी
+13
2 May 2015 - 8:07 pm | विवेकपटाईत
उन्हाळ्यात जिलेबी वर थंड गोड दही टाकून घाल्यास मस्त आणि चविष्ट लागते.