दिवस संपला होता होता झालि संध्याकाळ
संध्येच्या त्या छायेमध्ये झोपे थकला बाळ
वाट वाकडी करून दिसाला संध्या छाया आली
बाळाच्या त्या चर्येवरती मावळणारि लाली
तो ही थकला ती ही थकली सांज वातीला जागा
उद्या पुन्हाही सकाळ होइल तोवरि कसला त्रागा?
मी ही वदतो छोटी कहाणी प्रत्येका दिवसाची
कुठे कुठे ती दिसे पौर्णिमा-बाकी ही अवसेची!
चला गड्यांनो समजुन घेऊ रूपक हे संध्येचे
जुने जाणते जे जगले ते साधे जीवन साचे
-----------------------------
अतृप्त..
प्रतिक्रिया
6 Apr 2015 - 7:55 pm | प्रचेतस
खूपच सुरेख आत्मूस.
6 Apr 2015 - 8:02 pm | विवेकपटाईत
सुंदर कविता, आवडली.
6 Apr 2015 - 9:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्तं...संध्येचं भावंविश्वं मस्तं रेखाटलय. :)
6 Apr 2015 - 10:02 pm | सतिश गावडे
हेच म्हणतो.
सांजवेळी संध्याकाळी कातरवेळ खुप बोलकी असते.
कविता आवडली !!!
6 Apr 2015 - 11:18 pm | सूड
गुर्जी संध्येला बसल्यानंतर तर हे भावविश्व आले नसेल ना? ;)
7 Apr 2015 - 8:54 am | नाखु
मूळ अवांतर किमान शब्दात कमाल आशय.
सविस्तर अवांतर : तांबीय जिल्बीपेक्षा याचेच क्लासेस काढा म्हणजे तुमची प्रतिभा (आणि प्रतीमासुद्धा) सकाळी-संध्याकाळी फुलतच राहील.
7 Apr 2015 - 9:32 am | अत्रुप्त आत्मा
@ : तांबीय जिल्बीपेक्षा याचेच
क्लासेस काढा म्हणजे तुमची प्रतिभा (आणि
प्रतीमासुद्धा) सकाळी-संध्याकाळी फुलतच
राहील.>> आशयघन प्रतिसादासाठि घन आशय धन्यवाद! आम्ही क्लासेस कशाचेच काढु शकत नाही. क्षमस्व!
परंतू या दोन्हीही बाजू-आमच्याच आहेत, याची आम्हाला नम्र जाणिव आहे. धन्यवाद!
7 Apr 2015 - 6:35 am | मदनबाण
छान... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Atu Amalapuram Remix... ;) { Kotha Janta }
7 Apr 2015 - 8:19 am | यशोधरा
अतिशय सुरेख जमली आहे कविता!
7 Apr 2015 - 8:33 am | पॉइंट ब्लँक
झकास.