मिसळपावार आमचे लेखनाचे शतक

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
17 Aug 2008 - 8:20 am

आज लिहूनी लेख मिसळपावावरी
झाली लेखनाची पहिली शंभरी

हुषार चोखंदळ असती येथले सभासद
मते देऊनी मनापासूनी घालती थोडा वाद
विसोबा खेचर,पिवळा डांबिस,बेसनलाडू,सर्कीट
टोपणनावे विचित्र असूनी संदर्भ त्याचा अवीट
कविता माझी वाचून यांनी केली त्रेधातिरपीट
कुणा आवडे कुणा नावडे हीच खरी निवड
योग्य ते लिहा! म्हणती तात्या काढून सवड

अजून नाही पुर्ण केले नऊ आठवडे
पाहूनी इथले कल्चर ध्यानी येतात क्रिकेटवेडे
तात्याराव करिती येथे प्रेक्षणीय यष्टिरक्षण
अंपायर होऊनी मत देती दिलीप बिरुटे हरक्षण
पिवळा डांबीस बेसनलाडू फेकती गुगुली बॉल
स्यान होझेच्या बांउडरीवरूनी सर्कीट घेती झेल

आम्हा वाटे तसेच लिहितो आम्ही आयुष्यभर
स्त्री-पुरूषाना मज्जाव नसे लिहिण्या घटकाभर
कित्येकानी लिहिली असतील अनेक लेखांची शतके
आम्हीच करतो अमुच्या शतकाची किंचीतशी कौतुके

(टिप--"क्रिकेटवेडे" हे यमक साधण्यासाठी वापरले आहे.एव्हडेच समजावे.)

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

17 Aug 2008 - 8:27 am | विसोबा खेचर

आम्हा वाटे तसेच लिहितो आम्ही आयुष्यभर
स्त्री-पुरूषाना मज्जाव नसे लिहिण्या घटकाभर
कित्येकानी लिहिली असतील अनेक लेखांची शतके
आम्हीच करतो अमुच्या शतकाची किंचीतशी कौतुके

वा! उत्तम कविता..! :)

पुढील लेखनाकरता शुभेच्छा...

(यष्टीरक्षक) तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

17 Aug 2008 - 8:57 am | श्रीकृष्ण सामंत

आभार तात्याराव,
आता आपल्याच प्रेरणेने आम्ही करीत आहो पुढल्या शतकाची वाटचाल
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सखाराम_गटणे™'s picture

17 Aug 2008 - 9:12 am | सखाराम_गटणे™

अभिनंदन आणि अनेक उत्तम लेख वाचायला दिल्यावद्दल आभार.
आम्हाला तुमचे लेख म्हणजे ऐक प्रेकारचे मार्गदर्शन पर दिपस्तंभ आहेत.
इतके अनेकोत्तम लेख वाचायला दिल्याबद्दल तुमचे आभार मानावेत तितकेच कमी.
असेच लेखन करत रहाल ही प्रार्थना.

सखाराम गटणे

श्रीकृष्ण सामंत's picture

17 Aug 2008 - 10:01 am | श्रीकृष्ण सामंत

सखाराम_गटणेजी,
आपल्या अशा प्रतिक्रियेने आम्हाला प्रेरणा जरूर मिळणार.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

18 Aug 2008 - 12:28 am | विसोबा खेचर

सामंतराव,

आम्हाला तुमचे लेख म्हणजे ऐक प्रेकारचे मार्गदर्शन पर दिपस्तंभ आहेत.
इतके अनेकोत्तम लेख वाचायला दिल्याबद्दल तुमचे आभार मानावेत तितकेच कमी.

या गटण्याच्या शब्दांवर जाऊ नका. तो बहुतेकदा गंभीर चेहेरा ठेऊन अशी वाक्ये उपरोधाने लिहितो.. :)

तात्या.

सहज's picture

17 Aug 2008 - 9:23 am | सहज

क्या बात है!!

द्विशतकासाठी शुभेच्छा!! [१८ आठवड्याच्या आत होउन जाउ दे]

बाकी गटणेशी सहमत!

श्रीकृष्ण सामंत's picture

17 Aug 2008 - 10:03 am | श्रीकृष्ण सामंत

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

पक्या's picture

17 Aug 2008 - 12:08 pm | पक्या

वा मस्त कविता.
लेखनाच्या शतकाबद्द्ल अभिनंदन आणि पुढील लेखनास शुभेच्छा.

>> आम्हीच करतो अमुच्या शतकाची किंचीतशी कौतुके
ही ओळ मस्तच.

श्रीकृष्ण सामंत's picture

17 Aug 2008 - 9:02 pm | श्रीकृष्ण सामंत

पक्याजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्राजु's picture

17 Aug 2008 - 9:09 pm | प्राजु

वयाची डायमंड ज्युबली .. लेखनाची प्लॅटीनम ज्युबली...सह्ही
कविता छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

17 Aug 2008 - 9:55 pm | श्रीकृष्ण सामंत

प्राजुजी,
बरोबर आहे आपलं म्हणणं .कधी कधी असं होतं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सर्किट ली's picture

18 Aug 2008 - 10:55 pm | सर्किट ली (not verified)

प्राजू !

डायमंड म्हणजे ६०, प्लॅटिनम, म्हणजे ७५. त्यामुळे लेखांची सेंचुरी म्हण किंवा शुद्ध मराठीत शतक. आणि वयाचा अमृत महोत्सव.

सामंतकाका,

शतक झाले आहेच, आता द्विशतक करा.

आम्ही वाचतो आहोत. (आमच्या प्रतिसादांचे शतक होईल तुमच्या लेखनाला तेव्हा कळवूच.)

- (बाऊंडरीवर झेल घेणारा चावट) सर्किट

देवदत्त's picture

17 Aug 2008 - 9:15 pm | देवदत्त

अभिनंदन..
आपले लेख थोडेसे वेगळेच असतात. आणखी असे विचार प्रवर्तक लेख येउ द्यात. :)

श्रीकृष्ण सामंत's picture

17 Aug 2008 - 9:57 pm | श्रीकृष्ण सामंत

देवदत्तजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल अभार.आपण म्हणता त्यासाठी मी अवश्य प्रयत्न करीन.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर's picture

18 Aug 2008 - 9:09 am | अरुण मनोहर

आम्हीच करतो अमुच्या शतकाची किंचीतशी कौतुके
सामंतजी, मिपावर इतकी वाईट परीस्थीती नाहीय. तुमच्या लेखनाचे इथे सर्वांकडुन कौतक होते. तसेच शतक पूर्ण केल्याबद्दल हार्दीक अभीनंदन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2008 - 12:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका,

लिहित रहा ... कारण माझ्यासारख्या काहिंना फक्त वाचायलाच वेळ मिळतो. तेव्हा इतरांना चांगलं वाचायला देण्याचं कर्तव्य कोणीतरी पार पाडलंच पाहिजे! ;-)

यमी

श्रीकृष्ण सामंत's picture

19 Aug 2008 - 9:53 pm | श्रीकृष्ण सामंत

अदिती,
तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
तू काही का कमी लिहितेस.जे काय लिहितेस ते उद्भोदक,विचार-प्रवर्तक आणि अभ्यासू असतं. उदा. तुझा "रेडिओ ऍस्ट्रॉनामीवरचा लेख".
वाचनाची वेळ निघून गेल्यावर लेखनाची वेळ नक्कीच येणार.आम्ही वाट पाहूं.मी मात्र लिहिण्यापासून कर्तव्यपरांङमुख होणार नाही.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

19 Aug 2008 - 8:24 pm | श्रीकृष्ण सामंत

अरुण मनोहरजी,
मी शतका बद्दलचं कौतूक म्हणतो.प्रत्येक "रन" बद्दल नाही.कदाचीत माझ्याकडून आपला गैरसमज झाला असावा.आपण सर्व भरभरून कौतूक करता म्हणूनच मी शतक गाठू शकलो नाही काय?
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विश्वजीत's picture

25 Aug 2008 - 10:22 pm | विश्वजीत

मी मात्र लिहिण्यापासून कर्तव्यपरांङमुख होणार नाही.

निर्धार आवडला.

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Aug 2008 - 9:31 am | श्रीकृष्ण सामंत

विश्वजीतजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com