एनआरआयची भारतभेट..

गवि's picture
गवि in काथ्याकूट
18 Mar 2015 - 11:04 am
गाभा: 

मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्‍याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्‍या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्‍याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक. तत्वांचा फोलपणा, परदेशातून आलेल्या मित्राकडून गिफ्ट्स, फाईव्ह स्टार खाना जमेल तितका वसूल करण्याची वृत्ती, अगदी आपण एरवी जिकडे जातही नाही अशा महागड्या ठिकाणी जाऊन त्याच्या खर्चाने हौस भागवून घेणं, आणि बरंच कायकाय. आणि वरुन जयाचं फाईव्ह स्टार अन्नाचा बकाणा तोंडात असतानाच श्रीपादला "पैशाच्या मागे गेलेला, प्रतिपक्षाला जाऊन मिळालेला भांडवलवादी" वगैरे म्हणणं..लहान मुलानेसुद्धा गिफ्ट मागून वसूल करणं..

अर्थात श्रीपादचीही एक अनावश्यक वा आवश्यक असो पण "गिफ्ट देण्याची" मानसिकता आहेच..ती खूप सटल आहे. ही दोन्ही बाजूंची मानसिकता कथेत मस्त आणि सहज दिसते.

वर्षा-दोन वर्षांतून, अन कधीकधी पाचदहा वर्षांनी एन आर आय लोक भारतात सुट्टी काढून येतात. महिना, पंधरा दिवस. त्या काळात येणार्‍या काही अनुभवांचं वर्णन "फॉर हिअर ऑर टु गो" या पुस्तकात थोडंसं वाचलं होतं.

माहेरी चार दिवस, सासरी चार दिवस, मित्रांसाठी पुण्यामुंबईत दोन दिवस, घरच्या इतर कौटुंबिक अन सरकारी भानगडी निस्तरण्यात आठवडा. वेगवेगळ्या प्रकारची जेवणं. तिथे सहज न मिळणारी घरगुती चव शोधायला जाणं अन इथेही तिकडच्याच पदार्थांची इंडियनाइज्ड व्हर्शन मिळणं. अनेक प्रतिमाभंग. असं बरंच काही असावं असं ऐकून अन वाचून वाटलं.

प्रत्यक्ष अनुभव मात्र फार थोडे लोक सांगतात. फारच थोडे. कडवटपणा नको म्हणून टाळत असतील.

भारतीय लोकांचेही अशा फ्लाईंग व्हिजिटवर आलेल्या परदेशी पाहुण्यांबद्दल ग्रह असतात. अ‍ॅटिट्यूड असतात.

परदेशात राहणार्‍या अन इथल्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे काय अनुभव आहेत? खरंच असे गिफ्टवसुली करणारे, फेवर्स मागणारे लोक प्रातिनिधिक म्हणता येतील का?

काही प्रश्न, टु बिगिन विथः

-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अ‍ॅटिट्यूड भासतो का?
-मत्सर हेवा दिसतो का?
-भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
-तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का?
-भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात?
-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
-चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का?
-परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?

अनेक प्रश्न मनात येतात अधुनमधून, पण या कथेच्या निमित्ताने ते विचारावेसे वाटले इतकंच.

परदेश म्हणजे या ठिकाणी प्रगत देश असं समजलेलं आहे. तिथे समृद्धी आहे असं गृहीत धरुन. अमेरिका, युरोपातले काही देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

18 Mar 2015 - 11:06 am | कपिलमुनी

:)
जागा पकडून बसलो आहे

फार धमासान युद्ध व्हावं हा धाग्याचा उद्देश नाही. पण मी माझे मित्र परदेशातून आले की त्यांना इथे खिलवणंपिलवणं आणि फिरवणं या सर्वाची आर्थिक आणि लॉजिस्टिक जबाबदारी आवर्जून उचलतो. कारण ते इथे मला भेटायला आलेत.

"मी तिथे परदेशात आलो तर तेव्हा मी त्यांचा पाहुणा..पण आज तुम्ही खर्च नाही करायचा.." असं दोस्तीखातर बजावतो.

पण अशी वर्णनं किंवा अनुभव वाचून वाईट वाटतं. हे अपवादच असावेत अशी आशा वाटते. थेट अनुभव घेणार्‍यांकडून ऐकायला आवडेल. नाव घेण्याचा प्रश्नच नाही. जेनेरिक अनुभव अशा रुपात सांगितले तरी बास आहे.

कपिलमुनी's picture

18 Mar 2015 - 11:21 am | कपिलमुनी

माझ्या एनारआय मित्रांचे अनुभव मिश्र आहेत.
बहुतेकजण मित्राम्च्या ओढीने भेटतात. इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात .
त्यामध्ये कधी श्रेष्ठत्वाची भावना वाटत नाही. ९० च्या दशकात एनारआयची जी क्रेझ होती ती आता राहिली नाहिये.
त्यामुळे त्यांच्या बरोबर वावरतानाचा सर्वसामान्यांचा न्यूनगंड कमी झाला आहे. इंपोर्टेड वस्तू , तंत्रज्ञान इथेही उपलब्ध झाले आहे त्या मुळे कम्युनिकेशन गॅप कमी झाली आहे.

आता उरलेल्या कॅटेगरीमधे काही नग असतात.. ते भेटायला आले की 'तिकडे' कसा चांगला आणि इकडे कसा वाईट एवढाच बोलतात. आपण समोरच्याला भेटायला आलोय. त्याला 'क्ष' देशाचा विकि सांगायला आलो नाही हे त्यांना मुळी कळतच नाही. आणि इकडचे काहीजण कोल्ह्याला द्राक्ष आंबट या न्यायाने तिकडच्या लोकांवर टीका करत असतात.

हे साधारण झाला बाकी वैयक्तीक खमंग अनुभव निवांत टंकतो

९० च्या दशकात एनारआयची जी क्रेझ होती ती आता राहिली नाहिये.
त्यामुळे त्यांच्या बरोबर वावरतानाचा सर्वसामान्यांचा न्यूनगंड कमी झाला आहे. इंपोर्टेड वस्तू , तंत्रज्ञान इथेही उपलब्ध झाले आहे त्या मुळे कम्युनिकेशन गॅप कमी झाली आहे.

सहमत !
पल्याडचं आयुष्य म्हणजे एकदम आरामदायक हा समज सुद्धा आता बदलला आहे.

मृत्युन्जय's picture

18 Mar 2015 - 11:34 am | मृत्युन्जय

एकही जवळचा एनाराय मित्र नसल्याने याबाबत काही प्रतिसाद देण्यास असमर्थ आहे. नाही म्हणायला एक अगदी जवळचा मित्र सध्या परदेशात असतो. पण तो एनआरआय आहे असे काही वाटत नाही. म्हणजे तो मधुनच जातो २ वर्षासाठी. मग परत येतो वर्ष दोन वर्ष असतो मग परत जातो. जेव्हा तिकडे असतो तेव्हा इथे धावती भेट देत नाही आणि जेव्हा इथे येतो तेव्हा काय इथलाच असतो मग कसला आलाय डोंबलाच एन आर आय. पण इतरांचे अनुभव वाचण्यासाठी सरसावून बसलो आहे. होउन जाउ द्यात घमासान.

काही चर्चा आता अनुषंगाने होणरच आहेत त्यमुळे मजा येइल. उदा.:

१. अल्याडचे लोक म्हणतील की चोंबडे एन आर आय परदेशात जाउन गुबगुबीत जगतात आणि भरल्य पोटाने तंगड्या पसरुन भारताच्या करुन स्थितीवर आणि भारतीयांच्या मानसिकतेवर टिप्पणी करतात.
२. अल्याडचे लोक म्हणतील की इथल्या सुविधा आणि साधन संपत्तीच्या जीवावर उच्च शिक्षण घेतले आणि थोड्या पैशासाठी इमान गहाण टाकुन गोर्‍यांच्या तुंबड्या भरताहेत झाले. मग इतकेच होते तर सब्सिडाइज्ड दरावर इथले शिक्षण घेताना लाज नाही का वाटली?
३. पल्याडचे लोक म्हणतील आमच्या जीवावर तुमच्या गमजा चालल्या आहेत. आम्ही परकीय गंगाजळी आणतो म्हणुन तुमचा बीओपी तग धरुन आहे नाहितर तुमचे हाला कुत्र्याने खाल्ले नसते.
४. पल्याडचे लोक म्हणतील इथल्या लोकांची सडकी मनोवृत्ती बदलायल तयार नाही. स्वतःला परदेशात जायला मिळाले नाही म्हणुन आमच्यावर जळतात. तुमची लायकी नाही म्हणुन तुम्हाला इकडे यायला जमले नाही. संधी मिळाली तर **णाला पाय लावुन इकडे यायला निघाल.
५. अल्याडचे लोक म्हणतील यांचे नखरे बघा. १० दिवसांसाठी येतात तर इथले प्रदूषण, लोकसंख्या, अस्व्च्छता यावर लेक्चर झोडुन जातात. जन्मतःच महालात उठले होते जणू. अर्रे वयाची २० -३० वर्षे इथेच काढलीत ना? एवढेच असेल तर या ना इथे आणि बदला परिस्थिती.
६. पल्याडचे लोक म्हणतील यांना सुधारण्याची इच्छाच नाही हो. कंस्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम सहनच करु शकत नाहित हे.
७. अल्याडचे लोक म्हणतील आमची संस्कृती, आमचे देशप्रेम भॉ भॉ भॉ. पल्याडचे लोक म्हणतील आमची प्रगती, आम्चे योगदान भॉ भॉ भॉ.

३ -४ दिवसांची निश्चिंती केली गविंनी.

..हे सर्व अपेक्षित नाही..लोक कसे वागतात ते जाणायचेय.

तेच म्हटल बर्याच दिवसात निवासी - अनिवासी वाद झालेला नाही
आता येणार मजा

पोपकोर्ण घेऊन बसतो, धागा योग्य दिशेला जाईल याची नेहमीचे यशस्वी कलाकार काळजी घेतीलच
कमीत कमी ३०० कुठे नाही गेले

कपिलमुनी's picture

18 Mar 2015 - 11:41 am | कपिलमुनी

गांव बसा नही के डाकू आ गये !

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2015 - 12:16 pm | अत्रुप्त आत्मा

पोपकोर्ण घेऊन बसतो, धागा योग्य दिशेला जाईल याची नेहमीचे यशस्वी कलाकार काळजी घेतीलच
कमीत कमी ३०० कुठे नाही गेले

>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/hysterical-laughter-smiley-emoticon.gif
==========================
मी पण...मी पण .. बसणार आता..पां डुब्बा च्या शेजारी! पॉपकॉर्णं घेऊण! =))
पण एकंदरीत ते ही कमी पडतील्,असं वाट्ट्य. म्हणून मग ज्येवानच घेऊण बसू...
http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-burger.gif
...कसे? ;)

कपिलमुनी's picture

18 Mar 2015 - 11:43 am | कपिलमुनी

बाकी मोदी सर्व एन आर आय लोकांचा फारच लांगुललाचन करतात बॉ !

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2015 - 11:50 am | डॉ सुहास म्हात्रे

धागा धुमसायला लागण्याआधीच येवढ्या समिधा टाकू नये. त्यांच्या भाराखाली विझून जाईल ना तो :) ;)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2015 - 12:36 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यांच्या भाराखाली विझून जाईल ना तो SmileWink>> सहमत आहे मी पण! ;)
पन मी काय म्हन्तो? कशाला ते एन.आय.आर.वर एव्हढं कुणी(कुणी ;) ) चिडायचं? :-/
एनाराय भारतात आलेले कित्ती चांगलं! आंम्हाला मस्त चॉकलेट देतात...दक्षिणेबरोबर.
===================
एनाराय आवक संघाचा समर् थकः-
अतृप्तभट आत्मावाले!

मृत्युन्जय's picture

18 Mar 2015 - 11:51 am | मृत्युन्जय

आर आय - एन आर आय खिचडी मध्ये मोदींचा तडका बसला तर धाग्याचे काश्मीर काय पार आयसिस, इराक, बोको हराम होइल हो. नका हो नका इतके बाँब एकत्र टाकु.

सुबोध खरे's picture

18 Mar 2015 - 12:18 pm | सुबोध खरे

रच्याकने-- "आर आय - एन आर आय" शिवाय एक अजून क्याटेगरी आहे "आर एन आय"( रेसिडेंट नॉन इंडियन). पैलतीरी नेत्र लावून बसलेले.

चिनार's picture

18 Mar 2015 - 12:40 pm | चिनार

*dance4* *DANCE* :dance:*dance4* *DANCE* :dance:
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

अगोचर's picture

18 Mar 2015 - 8:40 pm | अगोचर

किन्वा परदेशात जाउन पार नागरिकत्व घेउन परत आलेले

यसवायजी's picture

18 Mar 2015 - 11:52 am | यसवायजी

मज्जा येणार निश्चित।

बॅटमॅन's picture

18 Mar 2015 - 1:02 pm | बॅटमॅन

अंहं. "निच्छीत". ;)

कपिलमुनी's picture

18 Mar 2015 - 12:06 pm | कपिलमुनी

टिपीकल भेट

येणार येणार म्हणून येण्याआधीच निवडणुका , पाउस यांची चर्चा असते तशीच चर्चा एनआरआयच्या भारत भेटीची असते. विदेशातपण भरपूर दंगल चाललेली असते . एका महिन्यात कोणाला भेटायच , सासरी किती दिवस - माहेरी किती दिवस यावरून तुम्बळ युद्ध झालेले असते . मागच्या ट्रीपमधले हिशोब व्याजासकट ऐकवले जातात ( कोणाला म्हणून विचारू नका ! संसारात ऐकणारा एकच ). बुकिंग झाला की खरेदीची गडबड सुरू होते . इथे लग्नामधले सूड घेतले जातात. "त्या वेळी - या वेळी" ची उजळणी होते . तोवर इकडून काय आणायचा याची यादी मिळालेली असते. फ्लिपकार्ट वर चेक केले तर तिकडेच स्वस्त आहे असं वाटतं पण नेला नाही तर "एवढे डॉलर्स कमावतो पण एक पैसा सुटत नाही " अश्या वाग्बाणांना घाबरून इकडेच खरेदी आटोपली जाते मधे मधे "आता बरी आठवण आली भावाची " यासारखे चिमटे निघत असतात.

घरी कळते मूल असेल तर अजून धमाल असते . त्याचा इंडियन कल्चरचा क्रॅश कोर्स घेतला जातो . त्या बिचार्‍यला फक्त वाकून नमस्कार करायचा एवढाच लक्षात रहाते. सरते शेवटी घरादाराची व्यवस्था लावून कुटूंब भारतवारीस निघते.

प्रवासात कंफर्टेबल म्हणून घातलेली बर्मुडा आणि मोठ्या बॅगा अशा थाटात उतरले की उकाड्यामुळे आणि झोप न झाल्यामुळे झालेला त्रासिक चेहरा पाहिला की न्यायला आलेल्यांपैकी एकजण म्हणतो , आपल्या देशात पाउल ठेवल की यांचा तोंड वाकड :)

आणि सुरू होतो पार्ट : २

बाळ सप्रे's picture

18 Mar 2015 - 12:20 pm | बाळ सप्रे

आमच्या माहितितले एनाराय हे बिझनेसमन वगैरे नसून आयटीच्या कृपेने ऑनसाइट जाउन आलेले लोक असल्याने.. चॉकलेट्स वगैरे आणतात पण गिफ्ट वगैरे खूप जवळच्यांसाठीच असतात.. घाउक सर्वांना नसतात.. तिकडेही सामान्य जीवन जगत असल्याने (इथल्या तुलनेत जास्त सुखवस्तु असलं तरिही) श्रीमंतीचं प्रदर्शन वगैरे खास बघितल्याच नाही.. इकडच्या रीअल इस्टेट्च्या वाढत्या भावाने आजकाल ४-५ वर्ष साठवलेले डॉलर्स देखिल कमी पडायला लागलेत ते कुठलं प्रदर्शन करत बसणार!! बाकी आल्या आल्या धूळ,उकाडा,ट्रॅफिक,शिस्त वगैरेच्या नावाने शंख होतो काही दिवस.. पण ते चालायचच..

सांगलीचा भडंग's picture

18 Mar 2015 - 1:04 pm | सांगलीचा भडंग

सेम अनुभव आहे

एन आर आय मंजे प्रवासी भारतीय का ?

(प्रवासी भारतीय) जेपी

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2015 - 12:39 pm | श्रीगुरुजी

एकवेळ "एनआरआय" परवडले, पण "आरएनआय" अगदी डोक्यात जातात.

बेकार तरुण's picture

18 Mar 2015 - 12:57 pm | बेकार तरुण

मी काहि फार मुरलेला एन आर आय नाहिये, पण परदेशि येउन मला आता ३ वर्ष होतिल. ३ वर्षापुर्वि काहि कारणानि नोकरि बदलावि लागणार होति, तेव्हा मुंबईत (मी अर्थक्षेत्रात काम करत असल्यानि भारतात मुंबई हाच पर्याय आहे) मला नोकरि मिळालि नाहि म्हणुन ईकडे आलो.
मी दर सहा महिन्यानि भारतात येतो आणी उरलेले दिवस त्या ट्रिप चि वाट पहाण्यात घालवतो. आल्या दिवसापासुन बाहेर मिळेल तिथे हादडत असतो. आणी फक्त मीच नाहि तर आमच्या ५ वर्षाच्या मुलीलाहि पाण्यचा आणि खाण्याचा काहि एक त्रास होत नाहि.
भारतात मित्र आणि नातेवाईक भेटि हेच मुख्य आकर्षण असतं मला तरि. मी बहुधा पूर्ण दिवस घरि आई बाबांबरोबर घालवुन संध्याकाळी मित्र असा कार्यक्रम ठेवतो जास्तित जास्त दिवस. दोन तीनदा सिंहगड पण केला मित्र आणी भाऊ बहिणींसोबत.
बाकि ईथे काय चांगलं आणि तिथे काय वाईट असले विचार मी कधिच केला नाहि. मी दहा वर्ष मुंबईत आणी आधि खुप वर्ष पुण्यात काढल्यानि ह्या दोन्हि शहरांचि खूप ओढ आहे.
तसेच कदाचित ३च वर्ष झाल्यानि काहि फार बदल झालेत वगैरे पण कधि वाटत नाहि (फक्त टोल वाढलेत सोडुन).
राहिलि गोष्ट गिफ्ट्स चि - मी घरातिल लहान मुलांना सोडुन काहि गिफ्ट आणत नाहि. कारण आता बहुतेक सगळ्या वस्तु भारतातच चांगल्या आणि स्वस्तहि मिळतात आणी मी हाडाचा कंजुश आहे ;) .
मित्रांबरोबर कधि गिफ्ट्चा विषय पण निघत नाहि, बाकि चिडवा चिडवि मधे मला $ वाला म्हणुन एखादेवेळि तीर्थप्रसादाचे बिल भरावे लागते, पण ते त्याच ट्रिप मधे वसुल पण होते. शेवटि मला वाटत मैत्रिचे धागे किति पक्के आहेत ह्यावरच खूप गोष्टी अवलंबुन असतात. तेच नातेवाईकांबद्दल पण आहे.

यशोधरा's picture

18 Mar 2015 - 4:31 pm | यशोधरा

अर्रर्र! पुण्याची पण ओढ आहे म्हणता?? सापडलातच आता तुम्ही पुण्याद्वेष्ट्यांच्या तावडीत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2015 - 7:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

"लक्षपूर्वक र्‍ह्स्वदीर्घ उलटे लिहीणे हा एनारायचा गुणधर्म असावा यावर संशोधनाला जागा आहे काय ?" असा संशय येण्याइतपत सबळ पुरावा मिळाला आहे. धन्यवाद ! ;)

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2015 - 10:14 pm | पिवळा डांबिस

ते अर्थशास्त्रात काम करत असल्याने उगाच इकडेतिकडे दीर्घ ईकार-ऊकार टाकून उधळमाधळ करायची त्यांना सवय नसावी!

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2015 - 10:20 pm | पिवळा डांबिस

शेवटी हसरी स्मायली :) टाकायची आणि ह. घ्या म्हणायचं र्‍हायलं.
हो, तिच्यायला आजकाल मिपावर हे पण ल्ह्यायला लागतं!!! :)

हाडक्या's picture

18 Mar 2015 - 11:25 pm | हाडक्या

हो, तिच्यायला

एकदा पुण्यातल्या रस्त्यावर सरळमार्गी अशा आम्हाला एका व्यक्तीचा जोराचा धक्का लागला आणि आमच्याकडून हा उद्गार अभावितपणे निघाला. त्या माणसाने अश्लील शिवीचा वापर केल्याचा आरोप करून दंगा सुरु केला. तो येऊन धडकला ते बाजूलाच आणि ही शिवी नाही म्हणून कचकून भांडावे लागले ते आठवले. ;)

सिरुसेरि's picture

18 Mar 2015 - 3:20 pm | सिरुसेरि

एन आर आय लोकांना सुरुवातीला विदेशात खुप कष्ट , त्रास सहन करावे लागले असतील याची कल्पना आहे. परदेशातील जीवन / राहणीमान पद्धती , छोटे मोठे जॉब्स करुन उच्चशिक्षण पुर्ण करणे , खर्च , कर्ज , होमसिकनेस , तब्येतीच्या तक्रारी ,कम्युनिकेशन ,नोकरी , व्यवसाय , आर्थिक मंदी , रेसिझम , त्यातुन निर्माण होणारे धोके ही सर्व आव्हाने रोजच्या रोज सांभाळुन कोणी जर तेथे टिकुन सुबत्ता मिळवत असेल तर अशांचा सत्कारच केला पाहिजे .

सौंदाळा's picture

18 Mar 2015 - 3:24 pm | सौंदाळा

आद्य मिपाकर आणि पुरातन आम्रविकावासी पिवळा डांबिस यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संपादिका रेवती यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
सुगरण सानिकास्वप्निल यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2015 - 10:02 pm | पिवळा डांबिस

आद्य मिपाकर आणि पुरातन आम्रविकावासी पिवळा डांबिस यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

बसा, बसा! प्रतिक्षेत बसा!!
पण आम्ही या एनाराय किंवा आरएनआय या दोन्ही कॅटेगरीत नसल्याने आम्हीही पॉपकॉर्न (चिकन) घेऊन बसलेलो आहोत!!! :)
-पिवळा डांबिस (येनारनाय)

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2015 - 10:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

मंजे तुमी नक्की "पियाओ" आसनार ! चिकन चखण्याला चालतंय ;)

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2015 - 10:39 pm | पिवळा डांबिस

येस!
आम्ही 'खिलाओ-पिलाओ!' :)
म्हणून तर दक्षिण कॅलिफोर्नियातले बहुतेक कट्टे आमच्या घरी झालेत!! ;)

विकास's picture

18 Mar 2015 - 10:43 pm | विकास

म्हणून तर दक्षिण कॅलिफोर्नियातले बहुतेक कट्टे आमच्या घरी झालेत!!

मला वाटले तुम्ही अम्रिकेत असता. *mosking*

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2015 - 11:26 pm | पिवळा डांबिस

मला वाटले तुम्ही अम्रिकेत असता.

नाय बॉ!
उगीच खोटां कशाला बोलियाचां?
आमी आपले गरीब कॅलिफोर्नियावाले शेतकरी.
तुम्हां बॉस्टन अमेरिकनांसारखे हाय-फाय शिरिमंत नाय!!

प्रदीप's picture

19 Mar 2015 - 10:55 am | प्रदीप

आमी आपले गरीब कॅलिफोर्नियावाले शेतकरी.

थंय टेक्सासवाल्यांनी सवतोसुभो मांडलेलो आयकलेलो आमी! आता ह्यां क्यॅलीफोर्नियाचां खूळ केव्हाक झालां?

पिवळा डांबिस's picture

19 Mar 2015 - 9:43 pm | पिवळा डांबिस

हे बॉस्टनचे बामण आमकां गाववाल्यांक नेहमी अगदी टोचांन्-टोचांन बोलतंत. मगे आमी काय करूंचां?
तां काय नाय,
"पोर्टलंड, वेगास, फिनिक्स सहित संयुक्त कॅलिफोर्निया झालाऽऽऽच पाहिजे!!!!"
:)

श्रीरंग_जोशी's picture

19 Mar 2015 - 9:57 pm | श्रीरंग_जोशी

एकीकडे कॅलिफोर्नियाचे ६ भाग करण्याची चळवळ जोम धरत असताना....

CA split

संदर्भ - Petition to Split California Into Six States Gets Green Light

पिवळा डांबिस's picture

19 Mar 2015 - 10:04 pm | पिवळा डांबिस

कॅलिफोर्नियात अशे अनेक चळवळी येकाच वेळी चालू असतंत!
त्यातले आमी संयुक्त कॅलिफोर्नियावाले!!
तुमकां तां लॉजिक कळूचां नाय. येकतर तुमच्याकडे माणसांच कमी आणि त्यातली निम्मी निरक्षर!!!
:)

श्रीरंग_जोशी's picture

19 Mar 2015 - 10:08 pm | श्रीरंग_जोशी

आमच्या हिकडं तसंबी यकाच ठिकानी राहून बी सहा-सहा महिने दोन ठिकानी राहन्याचा अनिभाव घितो.
सहा महिने बर्फात लोळतो अन मग उरलेले सहा महिने तलावांच्या पाण्यात डुंबा डुंबा करतो :-) .

पिवळा डांबिस's picture

19 Mar 2015 - 10:19 pm | पिवळा डांबिस

पाण्यात डुंबा डुंबा करतो

हॅपी डुंबा डुंबा टू यू!!!
:)

पिडा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हय !!
आयना का बायना घेतल्याशिवाय जायना..
आवाज कोनाचा.....वगैरे

जय कॅलीफोर्निया. (जय कोकण (?))

श्रीरंग_जोशी's picture

19 Mar 2015 - 10:39 pm | श्रीरंग_जोशी

पिडा नाय वो पिडां.

:-)

पिवळा डांबिस's picture

19 Mar 2015 - 10:43 pm | पिवळा डांबिस

या दुरुस्तीवद्द्ल तुमचे १०० अपराध माफ आहेत!!

अनुस्वाराला खूप महत्व आहे.
उदा. चाचा आनि चांचा!
:)

विकास's picture

19 Mar 2015 - 10:47 pm | विकास

हे बॉस्टनचे बामण आमकां गाववाल्यांक नेहमी अगदी टोचांन्-टोचांन बोलतंत. मगे आमी काय करूंचां?

क्षमस्व, हा दोष माझा नाही तर बॉस्टनचा आहे. इथले पाणी प्यायल्याने तसा स्वभाव झाला असेल. *sorry2* तुमचे बरे आहे, कॅलिफोर्नियाचे पाणी प्यायचे म्हणजे... *mosking*

(ह घ्या हो!)

नंदन's picture

18 Mar 2015 - 11:27 pm | नंदन

म्हणून तर दक्षिण कॅलिफोर्नियातले बहुतेक कट्टे आमच्या घरी झालेत!! Wink

'बहुतेक' या शब्दावर आक्षेप.
या निष्काळजीपणाबद्दल पिडांकाकांचा कॅडबरी डेरी मिल्क (भारतीय, भारी इ.) देऊन सत्कार करण्यात येईल.

तिमा's picture

18 Mar 2015 - 3:50 pm | तिमा

तिथले अनुभव भरपूर ऐकले आहेत. ज्याची कष्ट करायची तयारी आहे आणि कित्येकदा विपरीत हवामानात जगण्याची तयारी आहे, अशा सर्वांना तिथे खूप छान वाटतं. रोजची दिनचर्या अगदी हेक्टिक असली तरी हक्काचे शनिवार-रविवार मिळतात, त्यांतला एक वार घरातल्या कामांसाठी गेला तरी एक दिवस मौजमजा करायला मोकळा असतो. बाकी मुलांचे शिक्षण, संस्कार यावर स्पेशल लक्ष ठेवावे लागते.
गिफ्ट मागणारे लोक प्रातिनिधिक वाटत नाहीत. खर्‍या जवळच्या लोकांना 'आपलं माणूस' किती दिवसांनी भेटलं, याचाच आनंद असतो. पण बहुतांशी नॉरेइं ना भारताची भावनिक गुंतवणूक असते आणि त्याच्या ओढीनेच ते येतात.
माझ्यासारख्या आळशी आणि कामचुकार माणसांना मात्र, आपलाच देश रहायला चांगला आहे.

रोजची दिनचर्या अगदी हेक्टिक असली तरी हक्काचे शनिवार-रविवार मिळतात,

..हे वीकेंडचं खरंच आहे का?

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2015 - 10:11 pm | पिवळा डांबिस

..हे वीकेंडचं खरंच आहे का?

तुम्ही 'नवरा' असाल तर अजिबात नाही!!!!!
;)

इरसाल's picture

19 Mar 2015 - 3:10 pm | इरसाल

"हे" घराबाहेरचं तुमचं माहित नसाव ही आशा करतो.

पिवळा डांबिस's picture

19 Mar 2015 - 10:25 pm | पिवळा डांबिस

न माहिती असायला काय झालं?
धा दुकानांतून फिरण्यात कसलं आलंय शिक्रेट?
:(

इरसाल's picture

20 Mar 2015 - 12:04 pm | इरसाल

मला वाटलं......का पिडता पिडा .....सॉरी सॉरी पिडां !

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Mar 2015 - 3:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

उसगावकर भारतात आले की चाकलेटं वाटत का सुटतात ते काही समजत नाही.
जो दिसेल त्याला "हे तिकडच चाकलेट आहे बरका" असे म्हणुन दोन तरी चाकलेटं हातावर टेकवतात.
आणि भारतातुन जाताना चाकलेटांच्या वजनाच्या एवढ्या चितळ्यांच्या बाकरवड्या घेउन जातात.
त्या बाकरवड्या परत गेल्यावर उसगावात जो दिसेल त्याला वाटतात का? ते माहित नाही.

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

18 Mar 2015 - 4:06 pm | प्रचेतस

अगदी अगदी.
आणि चाकलेटं पण ती सोन्या चांदीच्या रंगातल्या कागदात गुंडाळलेली बारक्या मोदकासारखी किंवा हर्शेचे बारके बार असतात. त्यापरास इथलं क्याडबरीचं डेअरी मिल्क कधीपण भारीच लागतं.

अनुप ढेरे's picture

18 Mar 2015 - 4:12 pm | अनुप ढेरे

त्या मोदकांना किसेस का काहितरी म्हणतात त्यांना. अगदीच टुकार... एम अँड एम आणणारे महाभागही पाहिलेत. जेम्सच्या गोळ्याच त्या...

योगी९००'s picture

18 Mar 2015 - 11:15 pm | योगी९००

आमच्या कंपनीतले काही चतूर महाभाग सर्व फॉरेनची चॉकलेट्स अंधेरीला किंवा पार्ल्याला खरेदी करतात आणि परदेशातून आणली म्हणून सांगतात...यामागे उद्देश हा की त्यांचा तिकडचा खर्च वाचतो व तेवढेच अर्धा/एक किलो वजन पण वाचते + चॉकलेटस प्रवासात खराब होणे किंवा गरम होऊन पाघळून जाणे असा प्रकार होत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2015 - 11:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

हल्ली ती फारिंगची बहुतेक सगळी चॉक्लेटा चौकातल्या कोअपर्‍यावरच्या १० X १० साईजच्या दुकानातपण मिळतात !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2015 - 9:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाही बरीच चाकलेटी मिळालीत देणा-याला प्रचंड आनंद असतो पहिल्यांन्दा ज्यांनी कोणी मला ती दिली तेव्हा उत्साहाने सुरुवातीला लैभारी वैग्रे वाटली पण थोड़ा अपेक्षाभंग आणि हल्ली माझा चेहरा उतरून जातो. आरं द्यायचं तर आपलं विदेशी असं त्याला हे काय म्हणतात ते दिलं पाहिजे. लाल, पिवलं, व्हाईट काचबंद माल पाहिजे आनंद कसा गगनाला टकरा घेऊन खाली आला पाहिजे. :)

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2015 - 9:58 am | अत्रुप्त आत्मा

@ लाल, पिवलं, व्हाईट काचबंद माल पाहिजे आनंद
कसा गगनाला टकरा घेऊन खाली आला पाहिजे.>>> :-D

कपिलमुनी's picture

18 Mar 2015 - 4:16 pm | कपिलमुनी

ड्युटी फ्री बॉटल आणणाराच खरा मित्र :)

आदिजोशी's picture

18 Mar 2015 - 4:26 pm | आदिजोशी

बाकीचे सगळे नुसतेच गोळ्या वाटून बोळवण करणारे :)
ड्युटी फ्री बॉटल हेच मैत्रीचे खरे मानक :)

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2015 - 11:04 pm | पिवळा डांबिस

ड्युटी फ्री बॉटल आणणाराच खरा मित्र

ते खरं, पण इंडियन गव्हरमिन्टवाले एनाराय लोगला साले लय सतावते! :)
माणशी फक्त दोन बाटल्या आणू देतात.
गेली कित्येक वर्षे मी चार (माझ्या नांवावर दोन आणि बायकोच्या नांवावर दोन) बाटल्या आणतो आहे. पण घरी जाऊन बॅग उघडली रे उघडली की चारही बाटल्या आमचे भाऊ-मेहुणे-साडू वगैरे मंडळी पसार करतात! मित्रांना द्यायला एक बाटली शिल्लक उरत नाही! :(
तेंव्हा तुमचं वजन वापरून जरा तो दोन बाटल्याचा नियम तरी थोडा शिथील करा की!

विकास's picture

18 Mar 2015 - 11:22 pm | विकास

हल्ली पब्लीक मुंबई विमानतळावर उतरले की बाहेर येताना मधेच लागणार्‍या ड्युटी फ्री शॉपिंग मधे खरेदी करते.

ओळखीच्यांतली एक जुनी गोष्ट. मुलगी-जावई दोनेक वर्षांनी सुट्टीवर आले. घरात आल्याआल्या स्टुल घेऊन माळ्यावर शोधाशोध सुरू केली. अर्धा पाऊण तासांनी वरून एक पितळी पिचकारी मिळाली तेव्हा एकदा त्यांचा जीव भांड्यात पडला. "अग आई याला तिकडे चांगली किंमत येतेय, नेणारेय."

असंका's picture

18 Mar 2015 - 4:52 pm | असंका

काय ट्विस्ट!! :-))

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

18 Mar 2015 - 5:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

शिरिष जेव्हा न्यु जर्सीहून येतो तेव्हा ढीगभर स्नीकर्स घेऊन येतो.तिकडे कामाला जाताना हल्ली खाकी चड्डी घालून जातात असे ऐकले आहे.न्यु जर्सीत 'अगदी भारतात असल्यासारखे वाटते' हे मात्र आवर्जून म्हणातो.ग्रीन कार्ड मिळाल्यापासून मात्र त्याला अमेरिकेचा 'कंटाळा' आला आहे.येथे आल्यावर पहिले काही दिवस वडापाव्,कोथिंबीर वडी,दुधी हलवा,मामलेदारची ती जगप्रसिद्ध मिसळ खाण्यात जातो.मग पुढचे काही दिवस अमेरिकेला,तेथील समाज्जीवनाला नावे ठेवणे...जायची वेळ आली की मात्र नूर पालटतो.

अनुप ढेरे's picture

18 Mar 2015 - 5:54 pm | अनुप ढेरे

ढीगभर स्नीकर्स

खायचे का घालायचे?

नाही, तिकडे पायात घालायच्या बुटांना देखील स्नीकर्स म्हणतात असं ऐकलं.

विकास's picture

18 Mar 2015 - 7:40 pm | विकास

अमेरिका जाउंदेत पण पासपोर्ट पण काढलेला नसताना, ८०च्या दशकाच्या भागात जेंव्हा काही एन आर आयज् चा मी लांबूनच (कारण घरातले, नात्यातले कोणीच नव्हते) जो अनुभव घेतला, तो डोक्यात जाणारा होता. तो काळ असा होता की अमेरीकेत जाणारे (म्हणजे मराठी माणसास माहीत असलेले) बहुतांशी आय आय टी आणि काही इतर विद्यालयातले उच्चशिक्षणासाठी गेलेलेच असत. मी देखील (आय आय टी नाही पण) ९०च्या सुरवातीस उच्चशिक्षणासाठी आलो. त्यावेळेस बॉस्टनला जाणार म्हणजे लोकं अरे माझा भाचा ह्युस्टनला जातो, मदत होईल असे म्हणत. किती हजार मैल आहेत ते देखील त्यांना कळायचे नाही! अशातच एका एनआरआयच्या वडीलांनी मला अमेरीकेसंदर्भातला क्रॅशकोर्स (अजून कुठे? पुण्यातच!) देताना, "इंडीया कशी थर्ड वर्ल्ड कंट्री" आहे हे सांगितल्याने एकूणच प्रकरण डोक्यात गेले होते. एका ओळखीच्या मुलाला, तो देखील अमेरीकेत जाणार होता आणि मी देखील म्हणून घरी (मुंबईत) फोन केला. तेंव्हा घरातून. "आमचा मुलगा अमेरीकेला जाणार असल्याने बिझी आहे." असे उत्तर मिळाले. त्याव्र मी म्हणले "मी पण उद्या चाललो आहे". तात्काळ, "हो का? अरे वा! कुठे, कधी?" म्हणलं, "राहूंदेत, तुम्ही बिझी असाल" आणि फोन ठेवला! असो.

गवि एन आर आय चा भारतातील अनुभव विचारत आहेत. पण हे अजून एक पुढचे... सुरवातीस युनिव्हर्सिटीत आणि कधी कधी इतरत्र देखील मला काही भारतीय भेटले, जे मला अमेरी़केतच भेटून, "मी (म्हणजे ते) कसे अमेरीकेत राहात आहेत" हे स्टाईल मधे दाखवायचे! तेंव्हा भारतातील भारतीयांनो असे कोणी एनआरआय भेटले तर वाईट वाटून घेऊ नका! ;)

सुरवातीची १-२ वर्षे मी घरात नियमितच पण अगदी नातेवाईकांना - मित्रांना देखील पत्रे लिहायचो. इमेल्स नव्हत्या! आणि फोन खूपच महाग होते. तरी देखील १-२ मिनिटांचा करायचो! परवडत नसले तरी घरी दर आठवड्याला फोन करायचोच. (तो देखील शेजारी, कारण घरी फोन नव्हता. म्हणून वेळ ठरवून!) त्यामुळे जेंव्हा पहील्यांदा दिड वर्षांनी भारतात गेलो, तेंव्हा कुठलीच गॅप दोन्ही बाजूंनी वाटली नाही.

जेंव्हा डॉट कॉम आणि एचवन चे पेव फुटले तेंव्हा हा प्रकार बराच कमी होऊ लागला. कारणे अनेक आहेत. अमेरीका (चांगले/वाईत दोन्ही अर्थांनी) काय आहे हे घरोघरी कळू लागले आणि त्यातील अप्रूप गेले. आता काही गविंच्या काही प्रश्नांची व्यक्तीगत उत्तरे:

-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अ‍ॅटिट्यूड भासतो का?

नाही

-मत्सर हेवा दिसतो का?

नाही
-भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
वर म्हणल्याप्रमाणे नक्कीच कमी झाले आहे जे चांगले आहे. पण म्हणून (अमेरीका/एन आर आय ना) तुच्छ लेखणे जर होत असेल ते योग्य नाही.

-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
नसतो.

-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
हल्ली भारतातील श्रीमंतीचेच जास्त प्रदर्शन होत असेल. ;) (हा व्यक्तिगत अनुभव नाही!)

-तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का?
भेटवस्तू आणल्या गेल्या तरी त्या प्रेमापोटी होतात. कुठल्याही ताणाने अथवा शो ऑफ ने होत नाहीत.

-भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात?
अजिबात नाही. किंबहूना भेट देयचीच असेल तर अनेकदा सरळ रुपयात कॅश पण दिली तर सोयीचे जाते.

-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
कधी कधी होते. त्यात गैर काहीच नसते. योग्य माहिती असल्यास देतो.

-चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का?
अजिबात नाही. भारतभेट झाली नाही तर चुटपूट लागते.

-परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?

सुदैवाने असे कधीच घडत नाही. कधी कधी एकत्र जाता येत नाही. पण जेंव्हा जातो (अगदी एकटे गेलो तरी) तेंव्हा आम्ही दोन्ही घरात आणि दोन्हीकडच्या नातेवाईकांबरोबर पण वेळ घालवतो. पण सगळ्यांना जायला आवडते. इथे घरात (आणि घराबाहेर देखील आमच्याशी) लेक (स्वतःच्या चॉईसनेच) शुद्ध मराठीतच बोलते. तसे ती जेंव्हा भारतात बोलायला लागते आणि लोकं म्हणायला लागतात, "अरे वा मराठी येते?", "किती छान बोलते मराठी" वगैरे वगैरे, तेंव्हा तिला जरा annoying होते. बाकी पाहुणा नाही, तर भारत-अमेरीका ही दोन्ही माझीच घरे आहेत असाच चांगल्या अर्थाने अ‍ॅटीट्यूड असतो.

तात्पर्यः
डोक्यात जाणारे अनुभव हे एन आर आय चे नसतात तर त्यामागील वृत्तीचे असतात. ते कधी कधी परदेशस्थ भारतीयाचे असतील,कधी कधी देशाचा उंबरठा न ओलांडणार्‍या त्याच्या घरच्यांचे असतील, तर या उलट एन आर आय जास्त जाणिवेने यथाशक्ती जास्त करत असतील. अनेकांच्या बायका भारतात राहून देखील सासुसासर्‍या़ंकडे पहात नसतील तर भारतात राहून सगळे पुरूष देखील सासुरवाडीच्या लोकांशी संबंध ठेवून असतील अशातला भाग नसतो... तेच मुलांच्या बाबतीत. आमच्या मुलीस (आणि अशी अनेक मुले आहेत) तिच्या मातृभाषेत बोलायला येत असेल आणि समोर गोर्‍या मैत्रिणी असल्या तरी आईवडीलांशी मराठीत बोलणे साहजीक होत असेल अथवा शाळेत अगदी पालकाची भाजी-भात नेण्यास पण लाज वाटत नसेल. पण भारतात राहूनही मुलांना याच गोष्टींची लाज वाटत असू शकेल...

म्हणून म्हणतो एन आर आय म्हणून नाही तर कुठल्यातरी पद्धतीचा न्यूनगंड (भले तो अहंगंड म्हणून वरकरणी दिसला तरी) हा या सगळ्याच्या मागे असतो. अमेरीकेतून आलेल्या एखाद्या भारतीय माणसाकडून दिसला की तो ठळकपणे जाणवतो इतकेच.

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2015 - 10:23 pm | पिवळा डांबिस

हा लागला मासा गळाला!!!
=))

विकास's picture

18 Mar 2015 - 10:27 pm | विकास

अमेरीकन मासा! ;)

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2015 - 10:34 pm | पिवळा डांबिस

भलामोठ्ठा अमेरिकन क्याटफिश की कायसासां म्हणतात तो!!!
:)

सुबोध खरे's picture

18 Mar 2015 - 7:56 pm | सुबोध खरे

@विकास
+१००
एन आर आय पेक्षा आर एन आय ( रेसिडेंट नॉन इंडियन्स) जास्त डोक्यात जातात.
माझे बरेचसे एन आर आय मित्र आजही जमिनीवर पाय ठेवून आहेत. घरी आल्यावर सरळ आमटी भात खायला सुद्धा अनमान करीत नाहीत. किंवा उगाच I am doing well ची शेखी हि मिरवत नाहीत.
अर्थात सगळेच तसे नाहीत. एका मित्राच्या बायकोने मुलाचा पार्श्वभाग धुण्यासाठी बिस्लेरीचा वापर केला वर इन्फेक्शन कसे परवडत नाही हेही सांगितले ते डोक्यात गेले. हा मित्र माझ्याकडे बघून हताशपणे हसला.

विकास's picture

18 Mar 2015 - 8:20 pm | विकास

एका मित्राच्या बायकोने मुलाचा पार्श्वभाग धुण्यासाठी बिस्लेरीचा वापर केला

=))

कठीण आहे! जवळपास २००५/०६ पर्यंत मी बिसलेरी वगैरे कधी वापरले नाही. आता बाहेर असताना वापरावे लागते. घरी असलो की फिल्टर्ड पाणी जे सगळेच घेतात तेच... विमानतळावरून पुण्याला जाताना फुडमॉल मधे न चुकता इम्युनायझेशनचा डोस म्हणून एक वडापाव खातो. ;)

आदूबाळ's picture

18 Mar 2015 - 8:22 pm | आदूबाळ

जवळपास २००५/०६ पर्यंत मी बिसलेरी वगैरे कधी वापरले नाही. आता बाहेर असताना वापरावे लागते. घरी असलो की फिल्टर्ड पाणी जे सगळेच घेतात तेच...

पिण्यासाठी की...

विकास's picture

18 Mar 2015 - 8:29 pm | विकास

अहो पिण्यासाठीच!

एस's picture

18 Mar 2015 - 8:47 pm | एस

हहपुवा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2015 - 9:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

इम्युनायझेशनचा डोस म्हणून एक वडापाव खातो.

हॅ.. हॅ... हॅ... आम्ही जीवाणू-विषाणूंना घाबरणारे नाही ! :) ;) विमानतळावरच नाही तर मुंबईची फेरी मारतानाही आमच्या गाडीला श्रीदत्त वडापाव, इ खायला ऑटोमॅटीक ब्रेक लागतो !

इतकेच काय, विमानातही कॉफीबरोबर "थ्री क्रीम्स अँड थ्री शुगर्स, प्लीज" अशी मागणी हवाईसुंदरीकडे करून ती त्या धक्क्याने पडतापडता कशी सावरून घेते हे पण नेहमीच बघतो ! ;) अर्थात, ते उगाचच नाही, हां ! साखरेला घाबरणारा नसल्याने ते सर्व विमानातल्या कडू कॉफीत घालून तिला गोड करून पितो ! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2015 - 8:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ विकास
मस्त पूर्वग्रहविरहित समतोल प्रतिसाद !

अजून थोडे काही...

दोन दशकांपेक्षा जास्त वेळ एनाराय असलो तरी एक पाय सतत (दर दोनचार महिन्यांनी) भारतात असल्याने नातेवाईक, मित्र अथवा जवळच्या ओळखीच्या मंडळींचे सुरुवातीची तीन-चार वर्षांतले परदेशाबद्दलचे कुतुहल सोडले तर तसा काही खास फरक वाटला नाही.

इलेक्ट्रॉनिक्स, सिंथेटिक कापड आणि चॉकलेटे याबाबतीत १९९० पर्यंत भारत आणि परदेशांत फार मोठा फरक होता त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्व भारतात आकर्षण होते आणि त्या गोष्टी भेट म्हणून आणायला आनंद वाटत असे. त्यानंतर येथे येताना काय भेट आणावी असा यक्षप्रश्न सतावू लागला. किंबहुना मोठ्या आवडीने एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणावी तर "हे मी गेल्या महिन्यातच नेटवरून मागवून घेतले आहे." असे ऐकून भ्रमनिरास होऊ लागल्यावर मुलाला "अकाउंटमध्ये दर वाढदिवसाला पैसे जमा करतो, त्याचे तुला काय घ्यायचे ते घे नाहीतर कुठेतरी गुंतव, नाहीतर इतर तुला आवडेल असे काही कर." असे सांगून दोन्ही बाजूंना पटणारी समजूतदार पळवाट काढली आणि सुखी झालो ! :)

१९९० नंतर भारतात खाजगी क्षेत्रात लक्षणीय बदल झाले. लोकांच्या, विषेशतः तरुणाईच्या, हाती पैसा खुळखुळू लागला. आयटी कंपन्यांच्या झकपक इमारती, त्या बघून इतर खाजगी इमारतीत झालेली सुधारणा, मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, इ आले. काही सन्माननिय अपवाद सोडता यापैकी बरेच हे परदेशातल्या नामवंत काऊंटरपार्टस् पेक्षा आकाराने आणि झगमगाटीत कमी पडत असले तरीसुद्धा १९९० पुर्वीचा भारत नजिकच्या आठवणीत असल्याने आनंद वाटू लागला. परदेशात बोलताना याचा सहजपणे अभिमानाने उल्लेख केला जाऊ लागला. त्यात भारताची वेगाने सुधारणारी अर्थव्यवस्था आणि संगणकव्यवसायातले वाढणारे वजन यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी दखल भर घालत होती.

एक शल्याची सल मात्र परदेशात गेल्याने निर्माण झाली, सतत वाढत राहीली आणि आजही वाढत आहे. ती म्हणजे भारतातली सार्वजनिक क्षेत्रातली दुरावस्था... मुळात खडबडीत व खड्ड्यांनी भरलेले आणि पावसाच्या दोन थेंबांतही विरघळणारे रस्ते; सरकारी इमारत म्हणजे अनेक वर्षे दुरुस्ती न केलेली, मळखाऊ, पिचकार्‍यांनी भरलेले जिने असलेली आणि अस्वच्छ व विस्कळीत आवार असलेली असणारच; या गोष्टी आजही तशाच आहेत. विकसित देशांतच नव्हे तर भारतापेक्षा बरेच कमी सधन असलेल्या अनेक देशांमध्ये असलेली सरकारी/खाजगी ठिकाणची स्वच्छता आणि टापटीप पाहिली की अजून विषण्ण वाटते. आपल्या येथे यात जवळच्या भविष्यात फार मोठा फरक पडेल अशी काही लक्षणे दिसत नाहीत. :( तसे व्हावे असे मात्र नेहमीच तीव्रतेने वाटत आले आहे.

स्वप्नांची राणी's picture

18 Mar 2015 - 11:19 pm | स्वप्नांची राणी

"एक शल्याची सल मात्र परदेशात गेल्याने निर्माण झाली, सतत वाढत राहीली आणि आजही वाढत आहे. ती म्हणजे भारतातली सार्वजनिक क्षेत्रातली दुरावस्था... मुळात खडबडीत व खड्ड्यांनी भरलेले आणि पावसाच्या दोन थेंबांतही विरघळणारे रस्ते; सरकारी इमारत म्हणजे अनेक वर्षे दुरुस्ती न केलेली, मळखाऊ, पिचकार्‍यांनी भरलेले जिने असलेली आणि अस्वच्छ व विस्कळीत आवार असलेली असणारच; या गोष्टी आजही तशाच आहेत. विकसित देशांतच नव्हे तर भारतापेक्षा बरेच कमी सधन असलेल्या अनेक देशांमध्ये असलेली सरकारी/खाजगी ठिकाणची स्वच्छता आणि टापटीप पाहिली की अजून विषण्ण वाटते. आपल्या येथे यात जवळच्या भविष्यात फार मोठा फरक पडेल अशी काही लक्षणे दिसत नाहीत. Sad तसे व्हावे असे मात्र नेहमीच तीव्रतेने वाटत आले आहे."

मधुनच ३-४ तास गायब होणारी विज (ट्रान्सफॉर्मर उडाला...) आणि १-२ दिवस जाणारे पाणी (पंप बिघडला..) हे पण अजूनही जसेच्या तसे आहे...निदान डोंबिवलीत तरी. पण ह्याबद्दल बोललात तर मात्र तुम्ही चढेल आणि उद्धट एनाराय ठरता, याचा अनुभव घेतलाय, ते पण एमायडीसीच्या बाहेरही ना गेलेल्यांकडून. त्यामुळे वरील गोष्ट खूप सलत असुनही हे बोलण्याची मात्र माझी हिम्मत नव्हती...अर्थातच तुमच्या हिम्मतीची दाद देते!!

तसेच जरा गर्दीच्या ठिकाणी आवर्जून दिले जाणारे धक्केही ...माफ करा मला...पण बदललेले नाहियेत. अर्थात आधी मी ह्या गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार असायचे , पण पोस्ट एनाराय , असा धक्का बसला की अक्षरशः हेलपाटून जाते. गवी तुमच्या विषयावर हे काही फार मोलाचे मत नाहीये पण ई. एक्कांच्या प्रतिसाद वाचून हे चटकन मनात आले.

बाकी, वरील एका प्रतिसादात 'बाहेरचे पाणी बिनदीक्कत पितो' असे वाचले , पण हल्ली तर तिकडचे लोकही घराबाहेर पडले तर फिल्टर्ड किंवा बाटलीतले पाणीच पितात बहुधा.

तसेच ते एनाराय ने बाटलीतल्या पाण्याने पोराचे पार्श्वभाग धूणे, हे 'हल्ली मुली बघायला गेल्यावर त्या, घरात डस्टबीन किती असे विचारतात, अश्या टाईपचे अर्बन लिजण्ड वाटतय.

विकास's picture

18 Mar 2015 - 11:27 pm | विकास

हे 'हल्ली मुली बघायला गेल्यावर त्या, घरात डस्टबीन किती असे विचारतात, अश्या टाईपचे अर्बन लिजण्ड वाटतय.

(सुदैवाने नात्यातील अथवा अगदी जवळच्या नाही पण) माहीतीतील मुलींबद्दल आणि अगदी अधिकृत स्त्रोतांकडून ऐकलेले असल्याने, असे म्हणावेसे वाटते की दुर्दैवाने हे अर्बन लिजंड नाही... :( अर्थात त्याच बरोबर प्रत्येक मुलगी असे विचारेल असेही नाही.

खटपट्या's picture

18 Mar 2015 - 9:26 pm | खटपट्या

जबरी धागाय !!

प्रभाकर पेठकर's picture

18 Mar 2015 - 10:02 pm | प्रभाकर पेठकर

>>>>परदेश म्हणजे या ठिकाणी प्रगत देश असं समजलेलं आहे. तिथे समृद्धी आहे असं गृहीत धरुन. अमेरिका, युरोपातले काही देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे.

गविंच्या वरील विधानामुळे 'एन. आर. आय' म्हणून गल्फात ३४ वर्षे काढलेला मी प्रतिसाद देण्यास, मतं व्यक्त करण्यास, अनुभव वाटून घेण्यास 'नालायक' (disqualified ह्या अर्थाने) आहे. पण व्यक्ती तितक्या प्रकृती ही उक्ती लक्षात घेऊन सर्वप्रकारचे अनुभव सर्वांना येतात आणि ते त्या त्या व्यक्तीसाठी वास्तव असतं. पण सार्वत्रीकरण, सामान्यीकरण करणं टाळावं.
माझ्या पाहण्यात एकच असा मित्र आला जो अमेरिकेच्या प्रेमात भारतात असल्यापासून होता आणि त्याचे अंतिम ध्येय अमेरिकेत स्थायिक होणे हे होते. त्याचे कारण देताना तो, अमेरिकेत मुलांचे शिक्षण चांगल्याप्रकारे होउ शकते असा त्याचा युक्तीवाद होता. ज्या शिक्षणाच्या बळावर तो अमेरिकेसारख्या जगातील बलाढ्य आणि समृद्ध देशात पाय ठेवणार होता ते त्याचे शिक्षण भारतातच आणि बडोद्यात झाले होते. पुढे तो अमेरिकेत गेला, स्थायिक झाला वगैरे वगैरे वगैरे.
मी वरील देशांमध्ये राहिलेलो नाही तरी पर्यटननिमित्ताने अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप, इजिप्त, बँग्कॉक वगरे देशांमध्ये फिरलो आहे. तिथल्या भारतियांमध्ये, ज्यांच्या घरी राहण्याचा प्रसंग आला, मला प्रेमाचाच अनुभव आला. कुठे कडवटपणा, दिखावा, भपका वगैरे वगैरे जाणवले नाही.
एन आर आय बद्दल भारतियांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून किंवा ऐकीव माहितीतून किंवा न्यूनगंडातून बरीच नकारात्मक भूमिका आढळून येते. ह्यावर आपले नाट्यसृष्टीतील ख्यातनाम नटसम्राट मोहन जोशी ह्यांच्या बरोबर जबरदस्त वादविवाद झाला होता. त्यांच्या मते अमेरीकेतील भारतिय, आपल्या आई-वडिलांना अमेरिकावारी घडवितात, ते त्यांचा तिथला भपका दाखविण्यासाठीच. मी सांगितलं असं नसतं. आई-वडीलांनी जे शिक्षण दिलं, संस्कार दिले त्याचे आपण केलेले चीज त्यांच्या नजरेखाली घालून, त्यांच्याकडून शाबासकी मिळवावी, आपली कृतज्ञता व्यक्त करावी, एव्हढा शुद्ध हेतू असतो. शिवाय आपल्या म्हातार्‍या आई-वडिलांना, ज्यांनी स्वतः खस्ता खाऊन आपल्याला मोठं केलं त्यांना, आपल्याकडून जमेल तसे सुख आणि आराम मिळवून द्यावा हा सदहेतू असतो. अमेरिकेचे जाऊ द्या. गावाकडून मुंबईत येऊन गिरणीत नोकरी करणारा आणि चाळीच्या एका खोलीत संसार करणाराही, मुंबईत स्थिरस्थावर झाल्यावर, आपल्या आई-वडिलांना मुंबईत आणून मुंबईचा फेर फटका घडवितो. चाळीच्या एका खोलीतील संसारात तो काय भपका दाखवत असतो? तर असो.

व्यक्तीतितक्या प्रकृती हेच खरे.

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2015 - 10:31 pm | पिवळा डांबिस

गल्फात ३४ वर्षे काढलेला मी प्रतिसाद देण्यास, मतं व्यक्त करण्यास, अनुभव वाटून घेण्यास 'नालायक' (disqualified ह्या अर्थाने) आहे.

खरं आहे. ती म्हणच आहे ना,
'गल्फात सोन्याच्या चिपा'
शिंचा उपयोग काय? :)
(ह. घ्या पेठकरकाका!!)

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2015 - 11:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

आसं कसं, आसं कसं ???

गल्फातले रस्ते सोन्याच्या चिपानी कवर केलेले हाय्त आनि घराच्या आवारात झुडूप लावाय्ला खणलं की लगेच तेल वर उडायला लागतंय. हात कुटं ?

धमाल मुलगा's picture

23 Mar 2015 - 7:06 pm | धमाल मुलगा

गल्फातून येताना आणलेल्या 'ग्रँड'ला जागून मी असं सर्टिफिकेट देतो की गल्फातले यनाराय फार भले असतात. भारतभेटीला आल्यावर झक्क चिकन-मासे खिलवतात, एकदम 'ग्रँड' कट्टा वगैरे करुन सगळ्यांना भेटतात.

त्यामानानं अमेरिकेतले येनाराय मात्र 'या आमच्या क्यालीफोर्नियाला..' अशी अशक्य कोटीतली आमंत्रणं देतात. :P

(पळाऽऽ तेज्यायला! नायतर डांबिसकाका तिथं बसून कानफाडून काढतील. :D )

कपिलमुनी's picture

23 Mar 2015 - 7:32 pm | कपिलमुनी

१००% खरे आहे .

पिवळा डांबिस's picture

23 Mar 2015 - 9:49 pm | पिवळा डांबिस

गल्फातले लोकं ग्रॅन्ड आहेतच, त्यात संशय नाही.

नायतर डांबिसकाका तिथं बसून कानफाडून काढतील.

नाय बॉ.
पण तुला कानफडायचा विषय निघायचा अवकाश की लगेच इथे, "काका तुम्ही कशाला उगाच? त्या धम्यालाच कानफाटवायचं ना? मी करतो!!" असं म्हणून उत्तर आणि दक्षिण कॅलिफोर्नियावासी मिपाकर व्हॉलेंटियरांची वेटिंग लिश्ट लागलीये.
ये इकडे, मग दाखवतो मज्जा!!
:)

धमाल मुलगा's picture

24 Mar 2015 - 6:53 pm | धमाल मुलगा

काय क्यालीफॉर्निया है का टेक्सास? जो उठतो तो हाणायचीच बात करतोय!
अरे हम का मंदीर का घंटा है का? जो भी आयेगा, बजा के चला जायेगा? =))

बॅटमॅन's picture

24 Mar 2015 - 7:20 pm | बॅटमॅन

मंदीर का घंटा

यावरून मराठ्यांनी पोर्तुगीज़ चर्चमधून लुटलेल्या अन नंतर देवळांत बसवलेल्या काही घंटांची आठवण झाली. ते गझनीचा मेहमूद वगैरे लोक सोनेनाणे लुटायचे, आमच्या लोकांनी लुटून लुटून लुटलं काय तर घंटा =))

खटपट्या's picture

18 Mar 2015 - 11:41 pm | खटपट्या

अल्पावधित पन्नाशी पार केल्याबद्द्ल.
सर्व एनाराय, येनारनाय संघटनेतर्फे आणि मिपा पडीक संघटने तर्फे फारीनची चाकलेटा द्येवन सत्कार....

विकास's picture

18 Mar 2015 - 11:44 pm | विकास

ते पण सौहार्दाच्या वातावरणात हिरव्या माजावरील चर्चा!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2015 - 11:53 pm | अत्रुप्त आत्मा

@ फारीनची चाकलेटा द्येवन सत्कार.... >>> चालेल..(त्यांना ;) )

आनी .. आमच्या कडून ह्यो गरमा गरम भजींचा घाना,
https://lh6.googleusercontent.com/VmOEGr3Mr-kiaGh16Oy46pCFwmPxxfKClS_T4tSL-Nk=w466-h829
कॉलिश्ट्रॉलचा इचार न करता ,कना कना हाना! ;)

विकास's picture

18 Mar 2015 - 11:57 pm | विकास

असले फोटो डकवून आम्हाला का हो अत्रुप्त असल्याची जाणीव करून देत आहात? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2015 - 12:39 am | अत्रुप्त आत्मा

=)) लागलं...योग्य जागी लागलं! =))

नेमका जेवायच्या टायमाला भजीचा फोटो टाकून जठराग्नी चाळवल्याबद्द्ल त्रिवार णीषेढ..

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Mar 2015 - 1:00 am | डॉ सुहास म्हात्रे

तांब्यापिठाधिपती महंतांनी मठाचे अत्युच्च सन्मानचिन्ह असलेल्या जिल्बीचा हक्क डावलून भ़जींच्या घाण्याचा फोटो दाखवल्याबद्दल त्येंचा मणापासूण टीव्र णीषेढ +D

तांब्यापिठाधिपती महंतांनी मठाचे अत्युच्च सन्मानचिन्ह असलेल्या जिल्बीचा हक्क डावलून भ़जींच्या घाण्याचा फोटो दाखवल्याबद्दल त्येंचा मणापासूण टीव्र णीषेढ

तांब्यापिठाधिपतींच्या णिषेढास तीव्र अणुमोदण.. :))

मणापासूण>>> ज्या मणभर जिलब्या खायला मिळाल्या असत्या त्या मणापासूण ना ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Mar 2015 - 10:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

+D

योगी९००'s picture

19 Mar 2015 - 10:40 am | योगी९००

मस्त विषय काढलात हो गवि...!!

थोड्याफार प्रमाणात माझे अनुभव सांगतो. माझे बरेचसे मित्र पल्याड सेटल आहेत. चार / पाच वर्ष मी सुद्धा पल्याड होतो आणि आयटी क्षेत्रात असल्याने हे अनुभव रोजचेच आहेत.

मित्रांकडून विचित्र अनुभव कधीच नाही आला. पण आयटीतल्या अर्धहळकुंड्पिवळ्या कॅटेगिरी लोकांकडून मात्र बरेचसे अनुभव आले. असाच एकजण डेन्मार्कला २-३ महिन्यांसाठी जाऊन आला आणि आल्यावर बोलताना लगेच अ‍ॅक्सेंट मारत होता. त्याला एवढेच म्हंटले की बाबारे तिकडे इंग्रजी जास्त कोण बोलत नाहीत मग हा अ‍ॅक्सेंट कोठून घेतलास? आणि काही महिन्यांपुर्वी तू चार महिने चेन्नाईला होतास. त्यावेळी बरे दक्षिण भारतीय अ‍ॅक्सेंट नाही उचललास ... असे भरपुर नग भेटतात.

काही प्रश्नांची माझ्यापरीने उत्तरे..

-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अ‍ॅटिट्यूड भासतो का?
मी तिकडे असताना माझ्याशी बोलताना काही दुरच्या नातेवाईकांचा तसा अ‍ॅटिट्यूड भासला. पण ओवरऑल तितकासा अनुभव नाही.
मी इकडे असताना मला एक-दोन वेळा खरोखर वाटले की माझे मित्र/नातेवाईक तिकडे खूप enjoy करत आहेत आणि मी मात्र पुर्ण आठवडाभर कामं करत आहे. मूळ असे वाटण्यामागे कारण माझा तिकडचा चार वर्षातला काळ. भारतात माझा दिवस ६ ला सुरू होतो आणि रात्री ११ ला संपतो. रोज ऑफिसला जा-ये करताना लागणारा वेळ, ऑफिसमध्ये आपले client ने सांगितलेले काम + कंपनी पॉलिसी प्रमाणे करावे लागणारे इतर काम यामुळे बराचसा वेळ कामात जातो. पण परदेशात असताना मला फक्त ८ तासात होईल एवढेच काम असायचे (आणि भारतीय मुळ कंपनीतले काम फारच कमी असायचे) + ऑफिसला जा-ये करायला फक्त १५ मि. लागायचे. यामुळे भरपुर असा वेळ स्वतःसाठी + कुटुंबासाठी असायचा. यामुळे तिकडचे life style इथल्यापेक्षा खूपच छान असे नेहमीच वाटते. पण याची जाणीव मला तिकडून इकडे आल्यावर झाली. तिकडे असताना संध्याकाळचा वेळ याच्याशी (skype किंवा google+ वर) गप्पा मार किंवा फोन कर यात जायचा. प्रत्येक विकांताला कोठेतरी ट्रिप व्ह्यायची नाहीतर सोशल गॅदरींग्ज व्हायचे यामुळे खूप मजेत वेळ जायचा. पण हीच गोष्ट भारतात आल्यावर मुळीच शक्य झाली नाही. एकतर skype वर काम असेल तरच मी login करतो आणि त्यात कोणी उगाच पिंग केले तर सरळ सरळ त्याला ignore करतो असेच झाले आहे. (पण मी तिकडे असताना मात्र स्वतः दुसर्‍याला गप्पांसाठी बोलवायचो आणि mostly माझ्यासारखेच onsite असणारे माझ्याशी बोलण्यास तयार व्हायचे.). भारतात आल्यावर विकांत ट्रिप खुपच कमी झाल्यात. याचे मूळ कारण म्हणजे ज्या गोष्टी मी इतर दिवशी करू शकत नाही त्यासर्व शनीवार/रवीवारी कराव्या लागतात. तसेच कोठेही गेले तरी गर्दी या कारणामुळे बर्‍याच वेळा जाण्याची इच्छाच होत नाही. सोशल गॅदरींग्ज जवळ जवळ नाहीतच कारण माझ्यासारखीच परीस्थिती इतरांची असल्याने प्रत्येक विकांताला कोणाला तरी कोठली तरी personal commitment असायचीच. त्यामुळे तिकडे life-style चांगले आहे यावर मी ठाम आहे.

अर्थात माझ्या कोठल्याही तिकडच्या नातेवाईकाच्या /मित्राच्या घरची जबाबदारी मला नसल्याने मी तसा अ‍ॅटीटयुड कोणालाच दिला नाही. पण समजा एखाद्याच्या घरची जबाबदारी वारंवार आली आणि मला थोडेफार भोगावे लागले तर माझ्याकडून तसा अ‍ॅटीटयुड दिला जाऊ शकतो.

-मत्सर हेवा दिसतो का?
थोडाफार मत्सर हेवा दिसतोच. ह्याला आपण काही करू शकत नाही. afterall we all are human beings. मी सुद्धा बर्‍याच वेळा तिकड्याच्या लोकांचे फेसबूक फोटो (barbeque, trips, cruise) वगैरे पाहून जळतोच.

-भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
विकास यांनी म्हणल्याप्रमाणे नक्कीच कमी झाले आहे.

-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
गिफ्ट मिळणे हा उद्देश बहूतेक नसावा. पण परदेशी सेटल होता येईल का असा उद्देश मात्र मला बर्‍याच वेळा दिसला.

-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
-तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का?
तितका अनुभव नाही. पण नव-नवीन गॅझेट्स मात्र आवर्जून दाखवली जातात. यात काही श्रीमंतीचे प्रदर्शन होत असावे असे वाटत नाही.

-भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात?
कधी नाराजी जाणवली नाही कारण कधी परदेशातून आल्यावर विदाऊट गिफ्ट कोणाकडे गेलो नाही तसेच कोणी माझ्याकडे विदाऊट गिफ्ट पण आले नाही. त्यामुळे हा प्रश्न पास...

-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
उत्तर विकास यांच्याप्रमाणे : कधी कधी होते. त्यात गैर काहीच नसते. योग्य माहिती असल्यास मदत करतोच.

-चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का?
अजिबात नाही. भारतभेट नको असे वाटत नाही पण काहीजणांकडे उगाचच गेलो असे वाटते.

-परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?
पास - कारण असे कधी कोणाच्या बाबतीत अनुभवले नाही.

बाकी एक गोष्ट मात्र मला वारंवार जाणवली. तिकडच्या NRI लोकांचे देश (भारत) प्रेम. तिकडे भारतात काय होतंय आणि काय नाही यावरच लोकांचा डोळा असतो. बराचसा वेळ भारत कधीच सुधारणार नाही किंवा त्यासाठी काय केले पाहिजे अशा (फक्त) चर्चा करण्यात जातो. उगाच कोणीतरी कोठल्यातरी भारतीय NGO शी संबंध ठेवून असतो तो वर्षातून हक्काने Donation वसूल करतोच. पण तोच माणूस इकडे सुट्टीवर किंवा कायमचा आला की NGO कडे पहात सुद्धा नाही. तिकडेच घर शोधत असताना भेटलेल्या एका NRI ने भारत किती छान आणि उगाच कशाला येथे येता यावर माझे बौधीक घेतले होते. अर्थात मी त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करत असल्याने "एवढे आहे तर भारतात का बरे जात नाही परत तुम्ही?" असा प्रश्न विचारण्यास धजावलो नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

19 Mar 2015 - 4:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान प्रतिसाद रे योग्या.
हल्लीची पिढी भारतावर जरा काही टिका झाली की लालबुंद होते.कारण-
१)दुधासाठी रांगेत उभे राहणे ह्यांनी पाहिलेले नाही.
२)टेलिफोनसाठी ४/५ वर्षे प्रति़क्षायादीत असणे अनुभवलेले नाही.
३)जुन्या तंत्रज्ञानावर आधारलेल्या फियाट्,अ‍ॅम्बेसेडोर घेण्यासाठी ह्यांनी डीलरच्या पायर्या झिजवलेल्या नाहीत.
४)लांबच्या प्रवासासाठी ४/४ तास रांगेत उभे राहणे,आयत्यावेळी रेल्वे प्रवासासाठी टी.सी.ची मनधरणी केलेली नाही.
हे अनुभवलेल्या पिढीला अमेरिका,युरोप स्वर्ग न वाटतो तर नवल!

योगी९००'s picture

19 Mar 2015 - 4:35 pm | योगी९००

आभारी आहे ...

मला योग्या म्हणून माझी आजी हाक मारायची. आज तिची आठवण तुमच्यामुळे झाली. तुमचे आभार...

पण एक शंका आहे...हल्लीच्या पिढीलाही अमेरिका/युरोप स्वर्गच वाटतो..जरी त्यांनी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनुभवले नसते तरी..याचे कारण काय असावे माईआजी?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

19 Mar 2015 - 5:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

लोक परदेशात जायचे कारण म्हणजे शॉपिंग मॉल्स्,गाड्या व आधुनिक राहणी हे वरवरचे आहे.पुण्याहून कलकत्त्याला जायचे नोकरीसाठी तर १० वेळा विचार करावा लागेल पण न्युयॉर्कहून तुझ्या त्या लॉस एंजेलिसला जाताना जास्त विचार नाही करावा लागणार.विचार म्हणजे-पाणी,शिक्षण्,रस्ते,ईतर कामे,भाषेच्या समस्या,राहणीमान ईत्यादी .काही वेगळ्या समस्या तेथे जरूर असतील पण त्या तुमच्या करियर किंवा नोकरी-धंद्याच्या आड येणार नाहीत.
अमेरिकेत,युरोपात नोकरीसाठी होणार्या मुलाखती भारताच्या तुलनेत खूपच सरळ-सोप्या असतात असे ऐकले आहे.
येथील वाढती लोकसंख्या व ढासळते राहणीमान ह्यामुळे नविन पिढीला अजूनही अमेरिका,युरोप स्वर्ग वाटत असेल तर नवल नाही.

अभिजीत अवलिया's picture

19 Mar 2015 - 4:52 pm | अभिजीत अवलिया

इस्पीकचा एक्का,पेठकर काका ह्यान्च्याशी सहमत.
माझे बरेच मित्र लवकर आयटी च्या क्रुपेने परदेशात गेले. तेव्हा मला सुद्धा खुप वाटयचे आपन सुद्धा जावे असे. सध्या मी सुद्धा यु.के. मधे आहे (पुन्हा आयटीची क्रुपा)(ह्यात स्वताचे कौतुक म्हनुन सान्गत नाहिये). परदेश कितीही सुन्दर असला तरी आपला देश तो आपला देश असतो. इथे कितीही सर्व छान छान असले तरी इथे कायम रहावे असे वाटत नाहिये मला.
आता काही लोकाना परदेशात जाउन आल्यावर आपल्या देशाला नावे ठेवायची खुप घानेरडी सवय असते. पण त्याला आपण काही करु शकत नाही. मी जेव्हा जुलै मधे परत जाइन तेव्हा मी मात्र असे काही करनार नाही आणी परदेशात गेल्याचा भपका सुद्धा मारनार नाही.
राहता राहीली गोश्त चॉकलेट्स ची. आतापर्यन्त मी इथे जी चॉकलेट्स खाल्ली त्यान्च्यापेक्शा मला आपले डेरी मिल्क चान्गले वाटले. त्यामुले एक समस्या माझ्या समोर निर्मान झालिय. इथुन जाताना नक्की कोनते चॉकलेट घेउन जावे हे मिपा वरच्या जानकारानी सान्गितले तर बरे होइल.

प्रभाकर पेठकर's picture

19 Mar 2015 - 5:12 pm | प्रभाकर पेठकर

किस, टॉबलरॉन, किट्कॅट वगैरे वगैरे ऑल टाईम फेवरीट चॉकलेट्स आहेत. त्यात चॉकलेट्सच्या चवीपेक्षा ह्या विश्वविख्यात नांवांचेच महात्म्य अधिक आहे.

मी अजून माझ्या लहानपणीच्या रावळगाव टॉफीची चव विसरलेलो नाही.

अल्पेन्लिबे नावाने आता जी गोळी मिळते , तिच्यात आणि रावळगावमध्ये (चव, टेक्स्चर, ए.) कमालीचे साम्य आहे. रावळगाव नाय मिळत आता पण अल्पेन्लिबेचे मात्र काय कौतुक!

संपत's picture

19 Mar 2015 - 10:33 pm | संपत

+१

कपिलमुनी's picture

19 Mar 2015 - 5:21 pm | कपिलमुनी

ते चॉकलेट "मिपा वरच्या जानकाराना" देणार असल्यासच मिपाकर सांगतील .. लै डँबिश !!

अभिजीत अवलिया's picture

20 Mar 2015 - 12:12 am | अभिजीत अवलिया

नक्की देऊ ना. तुम्ही फक्त सांगा.

आजानुकर्ण's picture

19 Mar 2015 - 8:46 pm | आजानुकर्ण

राहता राहीली गोश्त चॉकलेट्स ची

गोश्त चॉकलेट्स आणायची असल्यास ती पोर्क किंवा ल्याम्बची आणा. बीफची चॉकोलेटे मुंबईतले कस्टमवाले पकडण्याची शक्यता आहे.

हाडक्या's picture

19 Mar 2015 - 9:31 pm | हाडक्या

बीफची चॉकोलेटे मुंबईतले कस्टमवाले पकडण्याची शक्यता आहे.

नै हो कर्ण काका.. बीफ खायला बंदी नै कै.. फक्त गोवंशहत्याबंदी आहे.
(तसेही तो गोवंश अभारतीय असल्याने त्यास मारणे/खाणे इथे चालून जावे असे वाटतेय.. :) )

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2015 - 8:56 pm | श्रीगुरुजी

एनआरआय पब्लिक आपल्या नेटिव्ह कंट्रीला रिटर्न आल्यावर त्यांना मराठी वर्डस् रिमेंबर करायला डिफिकल्ट जातं असं ऐकलंय.

श्रीरंग_जोशी's picture

19 Mar 2015 - 8:59 pm | श्रीरंग_जोशी

मी भारतात सुटी घेऊन येतो तेव्हा माझं मराठी ऐकून लोकांना कौतुकमिश्रित आश्चर्य वाटतं अन परदेशात न गेलेल्यांचं आंग्लाळलेलं मराठी ऐकून मला आश्चर्य वाटतं अन वाईटही वाटतं.

कदाचित मी भारतात राहत असतो तर माझीही तशीच अवस्था असती.

विकास's picture

19 Mar 2015 - 9:16 pm | विकास

सहमत!

मधुरा देशपांडे's picture

19 Mar 2015 - 9:21 pm | मधुरा देशपांडे

सहमत.

अभिजीत अवलिया's picture

19 Mar 2015 - 11:48 pm | अभिजीत अवलिया

सहमत.

आनन्दिता's picture

20 Mar 2015 - 12:27 am | आनन्दिता

सहमत

अनुप ढेरे's picture

19 Mar 2015 - 9:33 pm | अनुप ढेरे

रेसिडेंट नॉन इंडियन्सना एवढं का हिणवलं जातं ते नाही कळालं. एनाराय कधीतरी या क्याटेगरीत असणारच की!!

आजानुकर्ण's picture

19 Mar 2015 - 9:51 pm | आजानुकर्ण

हा हा हा....
अहो अनुपराव एनाराय हे नाईलाजाने एनाराय झालेत. ते भारतात राहून परदेशाची आशा धरत नव्हते कै. ;) त्यामुळे ते जिथे कुठे आता आहेत तिथे राहून भारतीयपण जपतात!

(अणुपरावांचा फ्याण) आजानुकर्ण

पिवळा डांबिस's picture

19 Mar 2015 - 11:32 pm | पिवळा डांबिस

गवि,
तुमच्या धाग्याचं आता शतक झालंय, अभिनंदन!
तुम्ही उपस्थित केलेले इतर प्रश्न मला एका विशिष्ट चश्म्यातून विचारलेले वाटले म्हणून त्यांना उत्तरं देणार नाही. परंतु तुमचा शेवटचा प्रश्न जेन्युईन वाटला. आणि इथे अनेक तरूण एनाराय मिपाकर आहेत त्यांनाही पुढे हा प्रश्न फेस करायला लागेल म्हणून उत्तर देतो आहे...

परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?

नाही, असं नसतं. प्रथम फक्त नवरा-बायको आणि नंतर मुलं लहान असतांना कधीही भारतात येणं शक्य असतं. रजा काढली, मुलं काखोटीला मारली आणि आलं भारतात असं करता येतं. पण मग मुलं शाळेत जाऊ लागली की त्यांची शाळा बुडवून येणं उचित नसतं. ख्रिसमसची सुट्टी शाळांना जेमतेम दोन आठवडे असते. त्यात प्रवासाला लागणारा वेळ, जातांना आणि परत आल्यावर येणारा जेटलॅग (मुलांना जेटलॅगमधून रिकव्हर व्हायला मोठ्यांपेक्षा सहाजिकच जास्त दिवस लागतात) इत्यादि गृहीत धरून त्या सुट्टीत येणं प्रॅक्टिकल नसतं.
मग राहता राहिली त्यांची समर व्हेकेशन, ती दीड दोन महिन्यांची असते. पण गंमत अशी आहे की अमेरिकेत समर व्हेकेशन जून अखेरीला सुरू होते. त्यानंतर यायचं तर भारतात धो धो मान्सून कोसळत असतो. मुलांची कुठे जायची-यायची पंचाईत होते. पुन्हा तोपर्यंत तिथल्या भाचे-पुतण्यांची शाळा-क्लास वगैरे सुरू होतात त्यामुळे ती मुलं बराचसा वेळ घराबाहेरच असतात. मग इथली मुलं तिथे नुसती घरी बसून कंटाळतात.
पुन्हा इथली मुलं प्रायमरी स्कूल संपवून सेकंडरी-हायस्कूलला गेली की इथे समरमध्ये त्यांचेही खेळांचे वगैरे कॅम्प्स असतात. त्यांच्या त्या गरजेकडेही लक्ष देणं पालक म्हणून कर्तव्य असतं. मग नवरा-बायको दोघांपैकी एकाने येणं आणि दुसर्‍याने इथे राहून मुलांकडे लक्ष ठेवणं हे प्रॅक्टिकल सोल्यूशन म्हणून स्वीकारलं जातं. ते फार खुशीने स्वीकारलेलं नसतं. आणि इतकं करून वर जर त्याला तिथली लोकं झेंडावंदन वा फॉर्मॅलिटीज वगैरे समजली तर मग चीड येऊ शकते. मग जर असं कुणाला वाटलं की,'अरे मी माझी रजा वापरणार, माझा खर्च करून भेटीसाठी तिथे येणार आणि वर हे झेंडावंदन केलं असं म्हणणार, मग काय गरज आहे मला?' तर ते कटू असलं तरी फार अक्षम्य म्हणता येईल का?
(मला तरी असं झेंडावंदन वा फॉर्मॅलिटी असं माझे मित्र वा नातेवाईक कधीच म्हणालेले नाहीयेत, यापुढे जर माझ्यासमोर म्हणाले तर कानाखाली जाळ काढीन!!)
:)
बाकी एक गोष्ट इथे मला सांगाविशी वाटते की मला इतक्या वर्षांत माझ्या नातेवाईक वा मित्रमंडळींकडून कधीच वाईट अनुभव आलेले नाहियेत. सर्व मंडळी अगदी अगत्याने वागवत आली आहेत. अतिशय समर्थपणे माझं आदरातिथ्य करत आली आहेत. अगदी मिपाकट्ट्यांनासुद्धा मुंबईकर आणि पुणेकर मिपाकरांनी मला साधं माझं कट्ट्याचं कॉन्टॄब्युशन दे़खील देऊ दिलेलं नाहिये आणि त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे...

हेच सांगून सांगून कंटाळलो मी दुरच्या (आणि जवळच्या पण) नातेवाईकांना ...

विकास's picture

20 Mar 2015 - 12:57 am | विकास

पूर्णपणे सहमत.

आमच्याकडे सलग दोन आठवड्यापेक्षा शाळा बुडल्यास वर्ष रिपिट करावे लागू शकते अथवा शाळेतून नाव काढले जाते आणि परत अ‍ॅडमिशन प्रोसेस मधून जावे लागू शकते! त्यामुळे ख्रिसमस ऑलमोस्ट बादच. कारण शाळेला सुट्टी फक्त आठवडाभर (२४ ते १). अगदीच लग्नकार्य असले तर तारेवरची कसरत करून आणि भरपूर परमिशन्स काढण्याची डोकेदुखी करून जावे लागते.

मला तरी असं झेंडावंदन वा फॉर्मॅलिटी असं माझे मित्र वा नातेवाईक कधीच म्हणालेले नाहीयेत, यापुढे जर माझ्यासमोर म्हणाले तर कानाखाली जाळ काढीन!!

मला देखील असला अनुभव आलेला नाही, त्यामुळे पुढे पिडांनी म्हणलेल्या प्रतिक्रिया अनुभवण्याचा अनुभव माझ्या मित्र - नातेवाईकांना आलेला नाही! :)

अगदी मिपाकट्ट्यांनासुद्धा मुंबईकर आणि पुणेकर मिपाकरांनी मला साधं माझं कट्ट्याचं कॉन्टॄब्युशन दे़खील देऊ दिलेलं नाहिये आणि त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे...

च्यायला हे आधी नाही सांगायच होय? ;)

..पिडाकाका..प्रश्न चष्म्यातून आहेत हे उघड आहे. आपण कोणीच चष्म्याशिवाय शुद्ध प्रश्न उत्तरं करु शकत नाही.
..मी इथे थेट मित्रांच्या तोंडून ऐकलंय की मुलं भारतात यायला स्पष्ट नाही म्हणतात..काही पत्नींनी स्वतः भारतात यायचंच नाहीये असं सांगितलं. झेंडावंदन हाही माझा शब्द नव्हे.
..तरीही लार्जर ऑडियन्सचं मत मागितलं..अनेकांनी दिलं.
..तुमच्या मात्र कानाखालच्या जाळातून बरीच उत्तरं मिळाली. चष्माविरहीत प्रतिसादाचं उत्तम उदाहरण.
आभारी आहे.

..पिडाकाका..प्रश्न चष्म्यातून आहेत हे उघड आहे.

तुम्हालाही हे मान्य आहे हे उत्तम. म्हणूनच त्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या भानगडीत पडलो नाही.

..मी इथे थेट मित्रांच्या तोंडून ऐकलंय की मुलं भारतात यायला स्पष्ट नाही म्हणतात..काही पत्नींनी स्वतः भारतात यायचंच नाहीये असं सांगितलं. झेंडावंदन हाही माझा शब्द नव्हे.
..तरीही लार्जर ऑडियन्सचं मत मागितलं..अनेकांनी दिलं.

तुम्ही ऐकलं असेलही. कुणी काय ऐकलंय याला दुसरी व्यक्ती फारशी चॅलेंज करू शकत नाही. तुम्ही तुमच्या मित्रांकडून जे काही ऐकलंय त्याचा अर्थ इतकाच की ते त्या तुमच्या मित्रांच्या बाबतीत खरं असावं...
पण इथल्याइथेच मी, विकास आणि नाटक्या ह्या तीन इथे दीर्घकाळ राहिलेल्या मिपाकरांनी तुम्हांला आमचं परस्परांशी जुळणारं मत दिलंय की. आता इथे एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही तुमच्या मित्रांकडून फक्त 'ऐकलंय'. इथे आम्ही तिघांनी स्वतः फर्स्ट-हॅन्ड 'अनुभवलंय'. थोडा तरी फरक आहे की नाही? आता कुठल्या ऑडियन्सचं मत मानायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. शिवाय सगळे आम्हां तिघांसारखे असतील असं नाही किंवा सगळे तुम्हाला भेटलेल्या ऑडियन्ससारखे असतील असंही नाही. व्यक्ति तितक्या प्रकृती. मी फक्त आमच्या बायका-मुलांवर सरसकटीकरणामुळे होऊ पाहणारे संभाव्य आरोप खोडून काढण्यासाठी सत्य परिस्थीती काय असते ते सांगितलं. मी आणि विकासने इथे सांगितलेल्या ह्या सगळ्या फॅक्टस आहेत (सुट्या, पावसाळा, इकडच्या आणि तिकडच्या शाळांची वेळापत्रकं वगैरे) कुणीही व्हेरिफाय करून बघू शकतो. तुमच्या मित्रांनी सांगितलेलं व्हेरिफाय करायला तुम्हाला त्यांच्या भारतात न येणार्‍या बायका-मुलांची साक्ष काढावी लागेल, नाहीतर व्हेरिफाय कसं करणार?

..तुमच्या मात्र कानाखालच्या जाळातून बरीच उत्तरं मिळाली. चष्माविरहीत प्रतिसादाचं उत्तम उदाहरण.
आभारी आहे.

त्यात बरीच उत्तरं काही नाहीत, एकच सरळ उत्तर आहे. अगत्य हे दोन्ही बाजूंनी असावं लागतं. मी दुसर्‍यांना त्यांनी काय करावं हे सांगितलेलं नाहिये. दुसरा एखादा कुणी असला झेंडावंदन वगैरे अपमान मुकाट्याने सहन करून घेणारा असेलही. मी फक्त जर मी अगत्याने केलेल्या कृतीची कुणी अशी संभावना माझ्या पुढ्यात (माझ्या पाठी कोण काय बोलेल यावर माझा कंट्रोल नसतो आणि मला त्याची फिकीरही नसते) केली तर माझी प्रतिक्रिया काय असेल ते मी सांगितलं. ही जर-तरची गोष्ट आहे.
मी माझ्या शेवटच्या परिच्छेदात मला स्वतःला भारतात भरभरून प्रेम आणि अगत्यच मिळालंय हे ही अभिमानाने सांगितलंय.
यापुढे काय मानायचं आणि न मानायचं ही सर्वस्वी तुमची मर्जी. पण त्यामुळे वास्तव बदलत नाही...

चिनार's picture

20 Mar 2015 - 10:31 am | चिनार

पिडा साहेब

एक अवांतर प्रश्न ,
असं ऐकण्यात आलाय की अमेरिकेतील शाळेचा अभ्यासक्रम आणि आपल्याइथला अभ्यासक्रम ह्यात जमीन - आसमानाचा फरक आहे. मुलगा/ मुलगी २ दुसरी- तिसरीत असेपर्यन्त्त त्यांना अमेरिकेच्या शाळेतून भारताच्या शाळेत आल्यावर फारसा फरक पडत नाही . पण थोडा वरच्या इयत्तेत गेल्यावर इथल्या शाळेत ते Adjust होऊ शकत नाही. आणि vice versa !
हे खरे आहे का ?

नेत्रेश's picture

20 Mar 2015 - 10:34 am | नेत्रेश

हेच सांगायचे होते, पण एवढा नोठा प्रतिसाद काही लिहीता आला नाही.

तसे आता LA County च्या सगळ्या शाळा संपुर्ण शैक्षणीक वर्ष दर वर्षी थोडे थोडे सरकऊन एप्रिल मध्ये संपवणार आहे. आधी ते जुन मध्ये संपत असे, आता मे मध्ये संपते आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Mar 2015 - 11:47 am | डॉ सुहास म्हात्रे

+१
बाकी एक गोष्ट इथे मला सांगाविशी वाटते की मला इतक्या वर्षांत माझ्या नातेवाईक वा मित्रमंडळींकडून कधीच वाईट अनुभव आलेले नाहियेत. सर्व मंडळी अगदी अगत्याने वागवत आली आहेत. अतिशय समर्थपणे माझं आदरातिथ्य करत आली आहेत.

याला तर +१००

खरं सांगायचे तर ही एनाराय मुले भारतात येत नाहीत हेच बराय. बाप्या बाया आपले मन रमवतात, पण मुलांना गुंतवून ठेवणे फार कठीण जाते. त्यात ही मुले येतात त्यावेळी भारतातील मुलांचे शाळा क्लास जोरात चालू असतात. ते सांभाळून ह्या मुलांबरोबर भारतीय मुलांना वेळ घालवावा लागतो. शिवाय भाषेचा एक मोठा प्रश्न उभा राहतो. बरीच एनाराय मुले मराठी बोलू शकत असली तरी मराठीत गप्पा मारू शकत नाहीत. त्यांचे हिंदी कच्चे (आजच्या पिढीची संपर्क भाषा) आणि इंग्रजी उच्चार आमच्या मुलांना अगम्य वाटतात. त्यामुळे भारतीय पोरे आई वडिलांच्या (खरे तर आजी आजोबांच्या) धाकाखातर जुळवून घेत राहतात पण एकूणच आपल्या फोरेन कझिन्सना वैतागली असतात. एनाराय पोरांचेही तसेच होत असावे.

सुबोध खरे's picture

20 Mar 2015 - 10:06 am | सुबोध खरे

पि डां साहेब
तुम्ही म्हणता आहात ते पटते. मी साधे विशाखापटणम ला असताना बायकोच्या चुलत बहिणीचे लग्न औरंगाबादला असताना मला असा प्रश्न पडला होता. लग्न रविवारी असले तरीही शुक्रवारी सायंकाळी रेल्वेने निघायचे शनिवारी अपरात्री (०२. ००) पुण्यात पोहोचायचे तिथून बात taxi पकडून औरंगाबादला पोहोचायचे परत रविवारी रात्री निघून सोमवारी रात्री पोहोचायचे. यात परत मुलांच्या परीक्षा शाळा बुडवणे रजा काढणे इ सव्य अपसव्य करत राहायचे.परत आई वडील म्हणतात अरे एवढा पुण्यापर्यंत आलास तर मुंबईला तरी यायचे. दगदग सोडून काहीही मिळत नाही. (त्या काळात मुबई विशाखापतनम असे विमानही नव्हते).
या ऐवजी माझा भाऊ म्हणाला तुला प्रवासाला १५ हजार खर्च येईल त्यापेक्षा ५ हजार रुपयाचे घसघशीत भेटवस्तू तिला दे. ती आयुष्यभर लक्षात ठेवेल. बर येणारे लोक काय म्हणतात "वा वा एवढ्या लांबून तुम्ही आलात छान". पण त्यासाठी एवढा व्याप करून मुलांना त्रास देऊन येणे हे अव्यवहारी होते असा निष्कर्ष काढला आणि यानंतर जर आपल्या सुटीच्या आसपास असलेले समारंभला हजर राहत असे आणि लोकांना सांगत असे काय करणार लष्करात सुटीच मिळत नाही.मग पार विदेशातून एवढे कष्ट काढून येण्याचा तर प्रश्नच उरत नाही. राहिली गोष्ट लोकांची सगळ्या रस्त्यांना भरपूर फाटे कशाला आहेत?
लोकांनी चांगले म्हणावे म्हणून काही कष्ट करण्याची माझी मुळातच तयारी नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Mar 2015 - 11:55 am | डॉ सुहास म्हात्रे

मुद्दलातली बात !

...राहिली गोष्ट लोकांची सगळ्या रस्त्यांना भरपूर फाटे कशाला आहेत?
लोकांनी चांगले म्हणावे म्हणून काही कष्ट करण्याची माझी मुळातच तयारी नाही.

जर माझ्या येण्याने कोणाला आनंद असेल आणि माझ्या जाण्याने मला आनंद असेल तरच त्या भेटीत मजा आहे. नाहीतर घरी मजेत लोळत रहावे किंवा दुसरीकडे कुठे फिरायला जावे. दोघांपैकी कोणा एकाला किंवा दोघानाही मनस्ताप हवा कशाला ?!

अनुप ढेरे's picture

20 Mar 2015 - 11:21 pm | अनुप ढेरे

अमेरिका/प.युरोप मध्ये राहणारे एनाराय आणि गल्फ-बिल्फ किंवा आफ्रिकेमध्ये राहणारे एनाराय यांच्या श्रेष्ठ कनिष्ठ असं काही असतं का?

विचारणारा माणूस त्याच्याकडे कधी येनाराय त्यावर अवलंबून असतं... ;)

नगरीनिरंजन's picture

22 Mar 2015 - 1:51 pm | नगरीनिरंजन

असतो की! अमेरिकेतले ते श्रेष्ठ, युरोपातले ते मध्यम आणि इतरत्रचे कनिष्ठ असा एनाराय आणि आराय लोकांमध्येही सुप्त समज जाणवला आहे.

अनुप ढेरे's picture

23 Mar 2015 - 4:54 pm | अनुप ढेरे

सहमत आहे. उमेरिकन एनाराय आणि अफ्रिकन/अरबी एनाराय यांना एका क्याटेगरीत टाकायला नको खरतर. याबाबत मोहिम सुरु करीन म्हणतो.

पर्नल नेने मराठे's picture

19 May 2015 - 10:04 am | पर्नल नेने मराठे

:ओ

संपत's picture

22 Mar 2015 - 5:19 pm | संपत

परदेशस्थ नातेवाईक असलेल्या एका भारतीयाचे मत:

-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?

परदेशी गिफ्ट्सचे अप्रूप आजकाल अजिबातच राहिलेले नाही. अर्थातच कुणाकडूनही गिफ्ट मिळाले कि आनंद हा होतोच. मग ते गिफ्ट देशी असो कि विदेशी.

-मत्सर हेवा दिसतो का?

परदेशस्थ मंडळी आली कि त्यांना आजी आजोबांकडून दिले जाणारे महत्व भारतीय मुलांना तरी खटकतेच. अर्थात ह्यात परदेशापेक्षा बऱ्याच काळाने झालेली भेट हेच कारण आहे असे समजून सांगितले तरी मनात कुठेतरी रहातेच आणि क्वचित ते बाहेरही पडते.

मयुरा गुप्ते's picture

24 Mar 2015 - 10:45 pm | मयुरा गुप्ते

पिडां, विकास, नाटक्या सौ टक्के की बात बोली है.

१४-१५ वर्ष भारताबाहेर राहुन अनेक जाणीवा, सीमारेषा पुसट होत गेल्यात.
आता मुलांच्या शाळा, आमची ऑफिसची सुट्टी ह्या सर्वांचं व्यस्त प्रमाण आहे, पण ही परिस्थीती सगळीकडेच दिसते की. थोडे फार अपवाद असतीलही पण बहुतांश हेच दृष्य आहे. त्यासाठी देशाच्या सीमा पार केल्याच पाहीजेत असं काही नाही.
मदतीचा हात, मायेचा ओलावा,फुल नं फुलाची पाकळी दिल्यावर होणारा अतिशय आनंद ह्या टु वे ट्रॅफिक सारख्या गोष्टी आहेत.
मुलं, पत्नी भारतात यायला तयार नसतात ह्या मागे अजुन काही वेगळी कौटुंबिक कारणं असावीत का हा ही एक विचार मनात येउन गेला. कारण नुसतं देश आवडत नाही हे कारण बरचं वरवरचं असावं.
असो. चालायचचं.

-मयुरा.