मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक. तत्वांचा फोलपणा, परदेशातून आलेल्या मित्राकडून गिफ्ट्स, फाईव्ह स्टार खाना जमेल तितका वसूल करण्याची वृत्ती, अगदी आपण एरवी जिकडे जातही नाही अशा महागड्या ठिकाणी जाऊन त्याच्या खर्चाने हौस भागवून घेणं, आणि बरंच कायकाय. आणि वरुन जयाचं फाईव्ह स्टार अन्नाचा बकाणा तोंडात असतानाच श्रीपादला "पैशाच्या मागे गेलेला, प्रतिपक्षाला जाऊन मिळालेला भांडवलवादी" वगैरे म्हणणं..लहान मुलानेसुद्धा गिफ्ट मागून वसूल करणं..
अर्थात श्रीपादचीही एक अनावश्यक वा आवश्यक असो पण "गिफ्ट देण्याची" मानसिकता आहेच..ती खूप सटल आहे. ही दोन्ही बाजूंची मानसिकता कथेत मस्त आणि सहज दिसते.
वर्षा-दोन वर्षांतून, अन कधीकधी पाचदहा वर्षांनी एन आर आय लोक भारतात सुट्टी काढून येतात. महिना, पंधरा दिवस. त्या काळात येणार्या काही अनुभवांचं वर्णन "फॉर हिअर ऑर टु गो" या पुस्तकात थोडंसं वाचलं होतं.
माहेरी चार दिवस, सासरी चार दिवस, मित्रांसाठी पुण्यामुंबईत दोन दिवस, घरच्या इतर कौटुंबिक अन सरकारी भानगडी निस्तरण्यात आठवडा. वेगवेगळ्या प्रकारची जेवणं. तिथे सहज न मिळणारी घरगुती चव शोधायला जाणं अन इथेही तिकडच्याच पदार्थांची इंडियनाइज्ड व्हर्शन मिळणं. अनेक प्रतिमाभंग. असं बरंच काही असावं असं ऐकून अन वाचून वाटलं.
प्रत्यक्ष अनुभव मात्र फार थोडे लोक सांगतात. फारच थोडे. कडवटपणा नको म्हणून टाळत असतील.
भारतीय लोकांचेही अशा फ्लाईंग व्हिजिटवर आलेल्या परदेशी पाहुण्यांबद्दल ग्रह असतात. अॅटिट्यूड असतात.
परदेशात राहणार्या अन इथल्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे काय अनुभव आहेत? खरंच असे गिफ्टवसुली करणारे, फेवर्स मागणारे लोक प्रातिनिधिक म्हणता येतील का?
काही प्रश्न, टु बिगिन विथः
-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अॅटिट्यूड भासतो का?
-मत्सर हेवा दिसतो का?
-भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
-तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का?
-भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात?
-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
-चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का?
-परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?
अनेक प्रश्न मनात येतात अधुनमधून, पण या कथेच्या निमित्ताने ते विचारावेसे वाटले इतकंच.
परदेश म्हणजे या ठिकाणी प्रगत देश असं समजलेलं आहे. तिथे समृद्धी आहे असं गृहीत धरुन. अमेरिका, युरोपातले काही देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे.
प्रतिक्रिया
न माहिती असायला काय झालं?
धा दुकानांतून फिरण्यात कसलं आलंय शिक्रेट?
:(
मला वाटलं......का पिडता पिडा .....सॉरी सॉरी पिडां !
उसगावकर भारतात आले की चाकलेटं वाटत का सुटतात ते काही समजत नाही.
जो दिसेल त्याला "हे तिकडच चाकलेट आहे बरका" असे म्हणुन दोन तरी चाकलेटं हातावर टेकवतात.
आणि भारतातुन जाताना चाकलेटांच्या वजनाच्या एवढ्या चितळ्यांच्या बाकरवड्या घेउन जातात.
त्या बाकरवड्या परत गेल्यावर उसगावात जो दिसेल त्याला वाटतात का? ते माहित नाही.
पैजारबुवा,
अगदी अगदी.
आणि चाकलेटं पण ती सोन्या चांदीच्या रंगातल्या कागदात गुंडाळलेली बारक्या मोदकासारखी किंवा हर्शेचे बारके बार असतात. त्यापरास इथलं क्याडबरीचं डेअरी मिल्क कधीपण भारीच लागतं.
त्या मोदकांना किसेस का काहितरी म्हणतात त्यांना. अगदीच टुकार... एम अँड एम आणणारे महाभागही पाहिलेत. जेम्सच्या गोळ्याच त्या...
आमच्या कंपनीतले काही चतूर महाभाग सर्व फॉरेनची चॉकलेट्स अंधेरीला किंवा पार्ल्याला खरेदी करतात आणि परदेशातून आणली म्हणून सांगतात...यामागे उद्देश हा की त्यांचा तिकडचा खर्च वाचतो व तेवढेच अर्धा/एक किलो वजन पण वाचते + चॉकलेटस प्रवासात खराब होणे किंवा गरम होऊन पाघळून जाणे असा प्रकार होत नाही.
हल्ली ती फारिंगची बहुतेक सगळी चॉक्लेटा चौकातल्या कोअपर्यावरच्या १० X १० साईजच्या दुकानातपण मिळतात !
मलाही बरीच चाकलेटी मिळालीत देणा-याला प्रचंड आनंद असतो पहिल्यांन्दा ज्यांनी कोणी मला ती दिली तेव्हा उत्साहाने सुरुवातीला लैभारी वैग्रे वाटली पण थोड़ा अपेक्षाभंग आणि हल्ली माझा चेहरा उतरून जातो. आरं द्यायचं तर आपलं विदेशी असं त्याला हे काय म्हणतात ते दिलं पाहिजे. लाल, पिवलं, व्हाईट काचबंद माल पाहिजे आनंद कसा गगनाला टकरा घेऊन खाली आला पाहिजे. :)
-दिलीप बिरुटे
@ लाल, पिवलं, व्हाईट काचबंद माल पाहिजे आनंद
कसा गगनाला टकरा घेऊन खाली आला पाहिजे.>>> :-D
ड्युटी फ्री बॉटल आणणाराच खरा मित्र :)
बाकीचे सगळे नुसतेच गोळ्या वाटून बोळवण करणारे :)
ड्युटी फ्री बॉटल हेच मैत्रीचे खरे मानक :)
ड्युटी फ्री बॉटल आणणाराच खरा मित्रते खरं, पण इंडियन गव्हरमिन्टवाले एनाराय लोगला साले लय सतावते! :) माणशी फक्त दोन बाटल्या आणू देतात. गेली कित्येक वर्षे मी चार (माझ्या नांवावर दोन आणि बायकोच्या नांवावर दोन) बाटल्या आणतो आहे. पण घरी जाऊन बॅग उघडली रे उघडली की चारही बाटल्या आमचे भाऊ-मेहुणे-साडू वगैरे मंडळी पसार करतात! मित्रांना द्यायला एक बाटली शिल्लक उरत नाही! :( तेंव्हा तुमचं वजन वापरून जरा तो दोन बाटल्याचा नियम तरी थोडा शिथील करा की!
हल्ली पब्लीक मुंबई विमानतळावर उतरले की बाहेर येताना मधेच लागणार्या ड्युटी फ्री शॉपिंग मधे खरेदी करते.
ओळखीच्यांतली एक जुनी गोष्ट. मुलगी-जावई दोनेक वर्षांनी सुट्टीवर आले. घरात आल्याआल्या स्टुल घेऊन माळ्यावर शोधाशोध सुरू केली. अर्धा पाऊण तासांनी वरून एक पितळी पिचकारी मिळाली तेव्हा एकदा त्यांचा जीव भांड्यात पडला. "अग आई याला तिकडे चांगली किंमत येतेय, नेणारेय."
काय ट्विस्ट!! :-))
शिरिष जेव्हा न्यु जर्सीहून येतो तेव्हा ढीगभर स्नीकर्स घेऊन येतो.तिकडे कामाला जाताना हल्ली खाकी चड्डी घालून जातात असे ऐकले आहे.न्यु जर्सीत 'अगदी भारतात असल्यासारखे वाटते' हे मात्र आवर्जून म्हणातो.ग्रीन कार्ड मिळाल्यापासून मात्र त्याला अमेरिकेचा 'कंटाळा' आला आहे.येथे आल्यावर पहिले काही दिवस वडापाव्,कोथिंबीर वडी,दुधी हलवा,मामलेदारची ती जगप्रसिद्ध मिसळ खाण्यात जातो.मग पुढचे काही दिवस अमेरिकेला,तेथील समाज्जीवनाला नावे ठेवणे...जायची वेळ आली की मात्र नूर पालटतो.
ढीगभर स्नीकर्सखायचे का घालायचे?
नाही, तिकडे पायात घालायच्या बुटांना देखील स्नीकर्स म्हणतात असं ऐकलं.
अमेरिका जाउंदेत पण पासपोर्ट पण काढलेला नसताना, ८०च्या दशकाच्या भागात जेंव्हा काही एन आर आयज् चा मी लांबूनच (कारण घरातले, नात्यातले कोणीच नव्हते) जो अनुभव घेतला, तो डोक्यात जाणारा होता. तो काळ असा होता की अमेरीकेत जाणारे (म्हणजे मराठी माणसास माहीत असलेले) बहुतांशी आय आय टी आणि काही इतर विद्यालयातले उच्चशिक्षणासाठी गेलेलेच असत. मी देखील (आय आय टी नाही पण) ९०च्या सुरवातीस उच्चशिक्षणासाठी आलो. त्यावेळेस बॉस्टनला जाणार म्हणजे लोकं अरे माझा भाचा ह्युस्टनला जातो, मदत होईल असे म्हणत. किती हजार मैल आहेत ते देखील त्यांना कळायचे नाही! अशातच एका एनआरआयच्या वडीलांनी मला अमेरीकेसंदर्भातला क्रॅशकोर्स (अजून कुठे? पुण्यातच!) देताना, "इंडीया कशी थर्ड वर्ल्ड कंट्री" आहे हे सांगितल्याने एकूणच प्रकरण डोक्यात गेले होते. एका ओळखीच्या मुलाला, तो देखील अमेरीकेत जाणार होता आणि मी देखील म्हणून घरी (मुंबईत) फोन केला. तेंव्हा घरातून. "आमचा मुलगा अमेरीकेला जाणार असल्याने बिझी आहे." असे उत्तर मिळाले. त्याव्र मी म्हणले "मी पण उद्या चाललो आहे". तात्काळ, "हो का? अरे वा! कुठे, कधी?" म्हणलं, "राहूंदेत, तुम्ही बिझी असाल" आणि फोन ठेवला! असो.
गवि एन आर आय चा भारतातील अनुभव विचारत आहेत. पण हे अजून एक पुढचे... सुरवातीस युनिव्हर्सिटीत आणि कधी कधी इतरत्र देखील मला काही भारतीय भेटले, जे मला अमेरी़केतच भेटून, "मी (म्हणजे ते) कसे अमेरीकेत राहात आहेत" हे स्टाईल मधे दाखवायचे! तेंव्हा भारतातील भारतीयांनो असे कोणी एनआरआय भेटले तर वाईट वाटून घेऊ नका! ;)
सुरवातीची १-२ वर्षे मी घरात नियमितच पण अगदी नातेवाईकांना - मित्रांना देखील पत्रे लिहायचो. इमेल्स नव्हत्या! आणि फोन खूपच महाग होते. तरी देखील १-२ मिनिटांचा करायचो! परवडत नसले तरी घरी दर आठवड्याला फोन करायचोच. (तो देखील शेजारी, कारण घरी फोन नव्हता. म्हणून वेळ ठरवून!) त्यामुळे जेंव्हा पहील्यांदा दिड वर्षांनी भारतात गेलो, तेंव्हा कुठलीच गॅप दोन्ही बाजूंनी वाटली नाही.
जेंव्हा डॉट कॉम आणि एचवन चे पेव फुटले तेंव्हा हा प्रकार बराच कमी होऊ लागला. कारणे अनेक आहेत. अमेरीका (चांगले/वाईत दोन्ही अर्थांनी) काय आहे हे घरोघरी कळू लागले आणि त्यातील अप्रूप गेले. आता काही गविंच्या काही प्रश्नांची व्यक्तीगत उत्तरे:
-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अॅटिट्यूड भासतो का?
नाही
-मत्सर हेवा दिसतो का?
नाही
-भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
वर म्हणल्याप्रमाणे नक्कीच कमी झाले आहे जे चांगले आहे. पण म्हणून (अमेरीका/एन आर आय ना) तुच्छ लेखणे जर होत असेल ते योग्य नाही.
-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
नसतो.
-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
हल्ली भारतातील श्रीमंतीचेच जास्त प्रदर्शन होत असेल. ;) (हा व्यक्तिगत अनुभव नाही!)
-तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का?
भेटवस्तू आणल्या गेल्या तरी त्या प्रेमापोटी होतात. कुठल्याही ताणाने अथवा शो ऑफ ने होत नाहीत.
-भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात?
अजिबात नाही. किंबहूना भेट देयचीच असेल तर अनेकदा सरळ रुपयात कॅश पण दिली तर सोयीचे जाते.
-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
कधी कधी होते. त्यात गैर काहीच नसते. योग्य माहिती असल्यास देतो.
-चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का?
अजिबात नाही. भारतभेट झाली नाही तर चुटपूट लागते.
-परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?
सुदैवाने असे कधीच घडत नाही. कधी कधी एकत्र जाता येत नाही. पण जेंव्हा जातो (अगदी एकटे गेलो तरी) तेंव्हा आम्ही दोन्ही घरात आणि दोन्हीकडच्या नातेवाईकांबरोबर पण वेळ घालवतो. पण सगळ्यांना जायला आवडते. इथे घरात (आणि घराबाहेर देखील आमच्याशी) लेक (स्वतःच्या चॉईसनेच) शुद्ध मराठीतच बोलते. तसे ती जेंव्हा भारतात बोलायला लागते आणि लोकं म्हणायला लागतात, "अरे वा मराठी येते?", "किती छान बोलते मराठी" वगैरे वगैरे, तेंव्हा तिला जरा annoying होते. बाकी पाहुणा नाही, तर भारत-अमेरीका ही दोन्ही माझीच घरे आहेत असाच चांगल्या अर्थाने अॅटीट्यूड असतो.
तात्पर्यः
डोक्यात जाणारे अनुभव हे एन आर आय चे नसतात तर त्यामागील वृत्तीचे असतात. ते कधी कधी परदेशस्थ भारतीयाचे असतील,कधी कधी देशाचा उंबरठा न ओलांडणार्या त्याच्या घरच्यांचे असतील, तर या उलट एन आर आय जास्त जाणिवेने यथाशक्ती जास्त करत असतील. अनेकांच्या बायका भारतात राहून देखील सासुसासर्या़ंकडे पहात नसतील तर भारतात राहून सगळे पुरूष देखील सासुरवाडीच्या लोकांशी संबंध ठेवून असतील अशातला भाग नसतो... तेच मुलांच्या बाबतीत. आमच्या मुलीस (आणि अशी अनेक मुले आहेत) तिच्या मातृभाषेत बोलायला येत असेल आणि समोर गोर्या मैत्रिणी असल्या तरी आईवडीलांशी मराठीत बोलणे साहजीक होत असेल अथवा शाळेत अगदी पालकाची भाजी-भात नेण्यास पण लाज वाटत नसेल. पण भारतात राहूनही मुलांना याच गोष्टींची लाज वाटत असू शकेल...
म्हणून म्हणतो एन आर आय म्हणून नाही तर कुठल्यातरी पद्धतीचा न्यूनगंड (भले तो अहंगंड म्हणून वरकरणी दिसला तरी) हा या सगळ्याच्या मागे असतो. अमेरीकेतून आलेल्या एखाद्या भारतीय माणसाकडून दिसला की तो ठळकपणे जाणवतो इतकेच.
हा लागला मासा गळाला!!!
=))
@विकास
+१००
एन आर आय पेक्षा आर एन आय ( रेसिडेंट नॉन इंडियन्स) जास्त डोक्यात जातात.
माझे बरेचसे एन आर आय मित्र आजही जमिनीवर पाय ठेवून आहेत. घरी आल्यावर सरळ आमटी भात खायला सुद्धा अनमान करीत नाहीत. किंवा उगाच I am doing well ची शेखी हि मिरवत नाहीत.
अर्थात सगळेच तसे नाहीत. एका मित्राच्या बायकोने मुलाचा पार्श्वभाग धुण्यासाठी बिस्लेरीचा वापर केला वर इन्फेक्शन कसे परवडत नाही हेही सांगितले ते डोक्यात गेले. हा मित्र माझ्याकडे बघून हताशपणे हसला.
एका मित्राच्या बायकोने मुलाचा पार्श्वभाग धुण्यासाठी बिस्लेरीचा वापर केला
=))
कठीण आहे! जवळपास २००५/०६ पर्यंत मी बिसलेरी वगैरे कधी वापरले नाही. आता बाहेर असताना वापरावे लागते. घरी असलो की फिल्टर्ड पाणी जे सगळेच घेतात तेच... विमानतळावरून पुण्याला जाताना फुडमॉल मधे न चुकता इम्युनायझेशनचा डोस म्हणून एक वडापाव खातो. ;)
जवळपास २००५/०६ पर्यंत मी बिसलेरी वगैरे कधी वापरले नाही. आता बाहेर असताना वापरावे लागते. घरी असलो की फिल्टर्ड पाणी जे सगळेच घेतात तेच...पिण्यासाठी की...
इम्युनायझेशनचा डोस म्हणून एक वडापाव खातो.
हॅ.. हॅ... हॅ... आम्ही जीवाणू-विषाणूंना घाबरणारे नाही ! :) ;) विमानतळावरच नाही तर मुंबईची फेरी मारतानाही आमच्या गाडीला श्रीदत्त वडापाव, इ खायला ऑटोमॅटीक ब्रेक लागतो !
इतकेच काय, विमानातही कॉफीबरोबर "थ्री क्रीम्स अँड थ्री शुगर्स, प्लीज" अशी मागणी हवाईसुंदरीकडे करून ती त्या धक्क्याने पडतापडता कशी सावरून घेते हे पण नेहमीच बघतो ! ;) अर्थात, ते उगाचच नाही, हां ! साखरेला घाबरणारा नसल्याने ते सर्व विमानातल्या कडू कॉफीत घालून तिला गोड करून पितो ! :)@ विकास
मस्त पूर्वग्रहविरहित समतोल प्रतिसाद !
अजून थोडे काही...
दोन दशकांपेक्षा जास्त वेळ एनाराय असलो तरी एक पाय सतत (दर दोनचार महिन्यांनी) भारतात असल्याने नातेवाईक, मित्र अथवा जवळच्या ओळखीच्या मंडळींचे सुरुवातीची तीन-चार वर्षांतले परदेशाबद्दलचे कुतुहल सोडले तर तसा काही खास फरक वाटला नाही.
इलेक्ट्रॉनिक्स, सिंथेटिक कापड आणि चॉकलेटे याबाबतीत १९९० पर्यंत भारत आणि परदेशांत फार मोठा फरक होता त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्व भारतात आकर्षण होते आणि त्या गोष्टी भेट म्हणून आणायला आनंद वाटत असे. त्यानंतर येथे येताना काय भेट आणावी असा यक्षप्रश्न सतावू लागला. किंबहुना मोठ्या आवडीने एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणावी तर "हे मी गेल्या महिन्यातच नेटवरून मागवून घेतले आहे." असे ऐकून भ्रमनिरास होऊ लागल्यावर मुलाला "अकाउंटमध्ये दर वाढदिवसाला पैसे जमा करतो, त्याचे तुला काय घ्यायचे ते घे नाहीतर कुठेतरी गुंतव, नाहीतर इतर तुला आवडेल असे काही कर." असे सांगून दोन्ही बाजूंना पटणारी समजूतदार पळवाट काढली आणि सुखी झालो ! :)
१९९० नंतर भारतात खाजगी क्षेत्रात लक्षणीय बदल झाले. लोकांच्या, विषेशतः तरुणाईच्या, हाती पैसा खुळखुळू लागला. आयटी कंपन्यांच्या झकपक इमारती, त्या बघून इतर खाजगी इमारतीत झालेली सुधारणा, मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, इ आले. काही सन्माननिय अपवाद सोडता यापैकी बरेच हे परदेशातल्या नामवंत काऊंटरपार्टस् पेक्षा आकाराने आणि झगमगाटीत कमी पडत असले तरीसुद्धा १९९० पुर्वीचा भारत नजिकच्या आठवणीत असल्याने आनंद वाटू लागला. परदेशात बोलताना याचा सहजपणे अभिमानाने उल्लेख केला जाऊ लागला. त्यात भारताची वेगाने सुधारणारी अर्थव्यवस्था आणि संगणकव्यवसायातले वाढणारे वजन यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी दखल भर घालत होती.
एक शल्याची सल मात्र परदेशात गेल्याने निर्माण झाली, सतत वाढत राहीली आणि आजही वाढत आहे. ती म्हणजे भारतातली सार्वजनिक क्षेत्रातली दुरावस्था... मुळात खडबडीत व खड्ड्यांनी भरलेले आणि पावसाच्या दोन थेंबांतही विरघळणारे रस्ते; सरकारी इमारत म्हणजे अनेक वर्षे दुरुस्ती न केलेली, मळखाऊ, पिचकार्यांनी भरलेले जिने असलेली आणि अस्वच्छ व विस्कळीत आवार असलेली असणारच; या गोष्टी आजही तशाच आहेत. विकसित देशांतच नव्हे तर भारतापेक्षा बरेच कमी सधन असलेल्या अनेक देशांमध्ये असलेली सरकारी/खाजगी ठिकाणची स्वच्छता आणि टापटीप पाहिली की अजून विषण्ण वाटते. आपल्या येथे यात जवळच्या भविष्यात फार मोठा फरक पडेल अशी काही लक्षणे दिसत नाहीत. :( तसे व्हावे असे मात्र नेहमीच तीव्रतेने वाटत आले आहे.
"एक शल्याची सल मात्र परदेशात गेल्याने निर्माण झाली, सतत वाढत राहीली आणि आजही वाढत आहे. ती म्हणजे भारतातली सार्वजनिक क्षेत्रातली दुरावस्था... मुळात खडबडीत व खड्ड्यांनी भरलेले आणि पावसाच्या दोन थेंबांतही विरघळणारे रस्ते; सरकारी इमारत म्हणजे अनेक वर्षे दुरुस्ती न केलेली, मळखाऊ, पिचकार्यांनी भरलेले जिने असलेली आणि अस्वच्छ व विस्कळीत आवार असलेली असणारच; या गोष्टी आजही तशाच आहेत. विकसित देशांतच नव्हे तर भारतापेक्षा बरेच कमी सधन असलेल्या अनेक देशांमध्ये असलेली सरकारी/खाजगी ठिकाणची स्वच्छता आणि टापटीप पाहिली की अजून विषण्ण वाटते. आपल्या येथे यात जवळच्या भविष्यात फार मोठा फरक पडेल अशी काही लक्षणे दिसत नाहीत. Sad तसे व्हावे असे मात्र नेहमीच तीव्रतेने वाटत आले आहे."मधुनच ३-४ तास गायब होणारी विज (ट्रान्सफॉर्मर उडाला...) आणि १-२ दिवस जाणारे पाणी (पंप बिघडला..) हे पण अजूनही जसेच्या तसे आहे...निदान डोंबिवलीत तरी. पण ह्याबद्दल बोललात तर मात्र तुम्ही चढेल आणि उद्धट एनाराय ठरता, याचा अनुभव घेतलाय, ते पण एमायडीसीच्या बाहेरही ना गेलेल्यांकडून. त्यामुळे वरील गोष्ट खूप सलत असुनही हे बोलण्याची मात्र माझी हिम्मत नव्हती...अर्थातच तुमच्या हिम्मतीची दाद देते!! तसेच जरा गर्दीच्या ठिकाणी आवर्जून दिले जाणारे धक्केही ...माफ करा मला...पण बदललेले नाहियेत. अर्थात आधी मी ह्या गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार असायचे , पण पोस्ट एनाराय , असा धक्का बसला की अक्षरशः हेलपाटून जाते. गवी तुमच्या विषयावर हे काही फार मोलाचे मत नाहीये पण ई. एक्कांच्या प्रतिसाद वाचून हे चटकन मनात आले. बाकी, वरील एका प्रतिसादात 'बाहेरचे पाणी बिनदीक्कत पितो' असे वाचले , पण हल्ली तर तिकडचे लोकही घराबाहेर पडले तर फिल्टर्ड किंवा बाटलीतले पाणीच पितात बहुधा. तसेच ते एनाराय ने बाटलीतल्या पाण्याने पोराचे पार्श्वभाग धूणे, हे 'हल्ली मुली बघायला गेल्यावर त्या, घरात डस्टबीन किती असे विचारतात, अश्या टाईपचे अर्बन लिजण्ड वाटतय.
हे 'हल्ली मुली बघायला गेल्यावर त्या, घरात डस्टबीन किती असे विचारतात, अश्या टाईपचे अर्बन लिजण्ड वाटतय.
(सुदैवाने नात्यातील अथवा अगदी जवळच्या नाही पण) माहीतीतील मुलींबद्दल आणि अगदी अधिकृत स्त्रोतांकडून ऐकलेले असल्याने, असे म्हणावेसे वाटते की दुर्दैवाने हे अर्बन लिजंड नाही... :( अर्थात त्याच बरोबर प्रत्येक मुलगी असे विचारेल असेही नाही.
जबरी धागाय !!
>>>>परदेश म्हणजे या ठिकाणी प्रगत देश असं समजलेलं आहे. तिथे समृद्धी आहे असं गृहीत धरुन. अमेरिका, युरोपातले काही देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे.
गविंच्या वरील विधानामुळे 'एन. आर. आय' म्हणून गल्फात ३४ वर्षे काढलेला मी प्रतिसाद देण्यास, मतं व्यक्त करण्यास, अनुभव वाटून घेण्यास 'नालायक' (disqualified ह्या अर्थाने) आहे. पण व्यक्ती तितक्या प्रकृती ही उक्ती लक्षात घेऊन सर्वप्रकारचे अनुभव सर्वांना येतात आणि ते त्या त्या व्यक्तीसाठी वास्तव असतं. पण सार्वत्रीकरण, सामान्यीकरण करणं टाळावं.
माझ्या पाहण्यात एकच असा मित्र आला जो अमेरिकेच्या प्रेमात भारतात असल्यापासून होता आणि त्याचे अंतिम ध्येय अमेरिकेत स्थायिक होणे हे होते. त्याचे कारण देताना तो, अमेरिकेत मुलांचे शिक्षण चांगल्याप्रकारे होउ शकते असा त्याचा युक्तीवाद होता. ज्या शिक्षणाच्या बळावर तो अमेरिकेसारख्या जगातील बलाढ्य आणि समृद्ध देशात पाय ठेवणार होता ते त्याचे शिक्षण भारतातच आणि बडोद्यात झाले होते. पुढे तो अमेरिकेत गेला, स्थायिक झाला वगैरे वगैरे वगैरे.
मी वरील देशांमध्ये राहिलेलो नाही तरी पर्यटननिमित्ताने अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप, इजिप्त, बँग्कॉक वगरे देशांमध्ये फिरलो आहे. तिथल्या भारतियांमध्ये, ज्यांच्या घरी राहण्याचा प्रसंग आला, मला प्रेमाचाच अनुभव आला. कुठे कडवटपणा, दिखावा, भपका वगैरे वगैरे जाणवले नाही.
एन आर आय बद्दल भारतियांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून किंवा ऐकीव माहितीतून किंवा न्यूनगंडातून बरीच नकारात्मक भूमिका आढळून येते. ह्यावर आपले नाट्यसृष्टीतील ख्यातनाम नटसम्राट मोहन जोशी ह्यांच्या बरोबर जबरदस्त वादविवाद झाला होता. त्यांच्या मते अमेरीकेतील भारतिय, आपल्या आई-वडिलांना अमेरिकावारी घडवितात, ते त्यांचा तिथला भपका दाखविण्यासाठीच. मी सांगितलं असं नसतं. आई-वडीलांनी जे शिक्षण दिलं, संस्कार दिले त्याचे आपण केलेले चीज त्यांच्या नजरेखाली घालून, त्यांच्याकडून शाबासकी मिळवावी, आपली कृतज्ञता व्यक्त करावी, एव्हढा शुद्ध हेतू असतो. शिवाय आपल्या म्हातार्या आई-वडिलांना, ज्यांनी स्वतः खस्ता खाऊन आपल्याला मोठं केलं त्यांना, आपल्याकडून जमेल तसे सुख आणि आराम मिळवून द्यावा हा सदहेतू असतो. अमेरिकेचे जाऊ द्या. गावाकडून मुंबईत येऊन गिरणीत नोकरी करणारा आणि चाळीच्या एका खोलीत संसार करणाराही, मुंबईत स्थिरस्थावर झाल्यावर, आपल्या आई-वडिलांना मुंबईत आणून मुंबईचा फेर फटका घडवितो. चाळीच्या एका खोलीतील संसारात तो काय भपका दाखवत असतो? तर असो.
व्यक्तीतितक्या प्रकृती हेच खरे.
गल्फात ३४ वर्षे काढलेला मी प्रतिसाद देण्यास, मतं व्यक्त करण्यास, अनुभव वाटून घेण्यास 'नालायक' (disqualified ह्या अर्थाने) आहे.खरं आहे. ती म्हणच आहे ना, 'गल्फात सोन्याच्या चिपा' शिंचा उपयोग काय? :) (ह. घ्या पेठकरकाका!!)
आसं कसं, आसं कसं ???
गल्फातले रस्ते सोन्याच्या चिपानी कवर केलेले हाय्त आनि घराच्या आवारात झुडूप लावाय्ला खणलं की लगेच तेल वर उडायला लागतंय. हात कुटं ?
गल्फातून येताना आणलेल्या 'ग्रँड'ला जागून मी असं सर्टिफिकेट देतो की गल्फातले यनाराय फार भले असतात. भारतभेटीला आल्यावर झक्क चिकन-मासे खिलवतात, एकदम 'ग्रँड' कट्टा वगैरे करुन सगळ्यांना भेटतात.
त्यामानानं अमेरिकेतले येनाराय मात्र 'या आमच्या क्यालीफोर्नियाला..' अशी अशक्य कोटीतली आमंत्रणं देतात. :P
(पळाऽऽ तेज्यायला! नायतर डांबिसकाका तिथं बसून कानफाडून काढतील. :D )
१००% खरे आहे .
गल्फातले लोकं ग्रॅन्ड आहेतच, त्यात संशय नाही.
नायतर डांबिसकाका तिथं बसून कानफाडून काढतील.नाय बॉ. पण तुला कानफडायचा विषय निघायचा अवकाश की लगेच इथे, "काका तुम्ही कशाला उगाच? त्या धम्यालाच कानफाटवायचं ना? मी करतो!!" असं म्हणून उत्तर आणि दक्षिण कॅलिफोर्नियावासी मिपाकर व्हॉलेंटियरांची वेटिंग लिश्ट लागलीये. ये इकडे, मग दाखवतो मज्जा!! :)
काय क्यालीफॉर्निया है का टेक्सास? जो उठतो तो हाणायचीच बात करतोय!
अरे हम का मंदीर का घंटा है का? जो भी आयेगा, बजा के चला जायेगा? =))
मंदीर का घंटायावरून मराठ्यांनी पोर्तुगीज़ चर्चमधून लुटलेल्या अन नंतर देवळांत बसवलेल्या काही घंटांची आठवण झाली. ते गझनीचा मेहमूद वगैरे लोक सोनेनाणे लुटायचे, आमच्या लोकांनी लुटून लुटून लुटलं काय तर घंटा =))
अल्पावधित पन्नाशी पार केल्याबद्द्ल.
सर्व एनाराय, येनारनाय संघटनेतर्फे आणि मिपा पडीक संघटने तर्फे फारीनची चाकलेटा द्येवन सत्कार....
ते पण सौहार्दाच्या वातावरणात हिरव्या माजावरील चर्चा!
@ फारीनची चाकलेटा द्येवन सत्कार.... >>> चालेल..(त्यांना ;) )
आनी .. आमच्या कडून ह्यो गरमा गरम भजींचा घाना,
कॉलिश्ट्रॉलचा इचार न करता ,कना कना हाना! ;)
असले फोटो डकवून आम्हाला का हो अत्रुप्त असल्याची जाणीव करून देत आहात? ;)
=)) लागलं...योग्य जागी लागलं! =))
नेमका जेवायच्या टायमाला भजीचा फोटो टाकून जठराग्नी चाळवल्याबद्द्ल त्रिवार णीषेढ..
तांब्यापिठाधिपती महंतांनी मठाचे अत्युच्च सन्मानचिन्ह असलेल्या जिल्बीचा हक्क डावलून भ़जींच्या घाण्याचा फोटो दाखवल्याबद्दल त्येंचा मणापासूण टीव्र णीषेढ +D
तांब्यापिठाधिपती महंतांनी मठाचे अत्युच्च सन्मानचिन्ह असलेल्या जिल्बीचा हक्क डावलून भ़जींच्या घाण्याचा फोटो दाखवल्याबद्दल त्येंचा मणापासूण टीव्र णीषेढतांब्यापिठाधिपतींच्या णिषेढास तीव्र अणुमोदण.. :))
मणापासूण>>> ज्या मणभर जिलब्या खायला मिळाल्या असत्या त्या मणापासूण ना ;)
+D
काकुंना