नक्षीची दुसरी बाजू.
महिला दिन विशेषांकातली नक्षी ही सर्वात आवडलेली कथा!! पण कुठेतरी एकांगी वाटली. बाई दिवसभर राबत असते मान्य, पण पुरुषही हातावर हात ठेवून बसलेले नसतात. त्यांनीही स्वत:च्या आवडीनिवडी मागे टाकलेल्या असतात. खरंतर दोन्हीकडचा विचार व्हायची गरज आहे.
त्यानिमित्ताने, नक्षीची दुसरी.....फारशी न दिसणारी बाजू मांडायचा छोटासा प्रयत्न!!
आज फार दिवसांनी नीट पाहिला आरसा
होता तिशीतच तरी दिसे थोराड जरासा
आठ्या आल्या भाळावरी अन खुंट वाढलेले
काया रापली जराशी, जरा गाल आत गेले
मागे माघारीण उभी, होती उगा त्रासलेली
प्रेयसीच की पूर्वीची आता जरा सुटलेली
एक शाळेला गेलेले, एक घेई कडेवरी
हाती कामांची घे यादी, झाली कावरीबावरी
संपे भांड्यांचा रगाडा फोटोफ्रेम पुसू लागे
गप्पा सप्ताहभराच्या सांगे, फिरे मागे मागे
फ्रेम पाहुनिया एक जरा मनी थबकला
होता तोच की पूर्वीचा, आता पार हरवला
उभा संसार ओढता कसे नाकी नऊ आले
जरा स्थिर होतो तोच तीन दोनाचे की झाले
भूतकाळ आठवूनि खिन्न हसला मनाशी
घाव लपवून सारे, रेखे संसाराची नक्षी
प्रतिक्रिया
25 Mar 2015 - 3:29 pm | नाखु
सूडराव मस्त "काटा" छापा वाचलाच नव्हता.
धुळवडीतले "चिमणबोल" वाचले. (आणि वाचवले)