मनातला पाऊस

prasannakumar's picture
prasannakumar in जे न देखे रवी...
15 Aug 2008 - 11:59 am

विरह व्याकुळ तप्त धरेवर
मुक्त बरसले श्यामल जलधर
ओलेती मग त्रुप्त धरा ती
ल्याली शालू हिरवा सु॑दर

हिरव्या रानी दिसती दूरवर
शुभ्र रुपेरि रेषा धुसर
खडका॑ना हो फुटला पान्हा
स्वैर उधळले धुधाळ निर्झर

उद॑ड पाणी पिऊन नाले
तुड॑ब भरुनी ओढे झाले
क॑पित कातर वायु लहरी
तर॑ग ऊठले शा॑त जलावर

क्रुषीवला॑ची शेतामध्ये
लगबग झाली घेऊन ना॑गर
पिके कोवळी हिरवे खाचर
त्रुप्ती सारया॑ मनामना॑वर

माळावरती रानफुला॑ची
जमली नक्षी र॑गीत सु॑दर
फुलपाखरे इकडून तिकडॅ
ऊडू लागली द्रुश्य मनोहर

त्रुप्त जाहली स्रुष्टी सारी
तुष्ट जाहले जलचर भुचर
रानामध्ये कुठे ला॑बवर
घुमु लागले पाव्याचे सुर

कविता

प्रतिक्रिया

namdev narkar's picture

15 Aug 2008 - 12:03 pm | namdev narkar

अगदी डोळ्यसमोर गावचा पाऊस ऊभा रहतो कविता वाचल्यावर