मी
सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
माझे आदर्श गांधी, सावरकर , मार्क्स वगैरे
मला मनापासून पटतो स्त्रियांचा सन्मान , त्यांचे स्वातंत्र्य वगैरे
मी मानतो हवे ते कपडे घालण्याचा ,कुठल्याही वेळी , कठेही एकटीने फिरण्याचा त्यांचा हक्क वगैरे
बलात्कार , स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील गुन्हे ई .वर मी चिडतो वगैरे
त्यावर तावातावाने बोलतो ,चर्चा करतो , फेसबुक वर लिहितो वगैरे ……
डिलीट करतो न चुकता मी कॉम्प्युटर वरची ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे
लॉक असतो माझा मोबाईल, अश्लील मेसेज, फोटो मी वाचतो, फोरवर्ड करतो , उडवतो वगैरे
मित्रांमध्ये खाजगीतले माझे विनोद ऐकून लाजतील दादा कोंडके, सचिन यार्दी वगैरे …
दिसली समोर बाई की चवीने बघतो तिचा खोल गळा, लो वेस्ट फाशन वगैरे
आणि काढतो तिची मापे, मनातल्या मनात दाबतो वगैरे
मिळाला एकांत की डोळ्यासमोर आणतो दिवसभरात दिसलेल्या बाया , सनी लिओन वगैरे …
आजची बातमी ऐकून मुठी वळवून म्हणतो मी ,भे****,मा*** फाशी दिली पाहिजे या मुकेशला वगैरे
मी सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
(कवितेपेक्षा चर्चेसाठी जास्त योग्य वाटले )
प्रतिक्रिया
9 Mar 2015 - 10:45 am | अवतार
फक्त स्त्री याचक नसून शोषित आहे असा अर्थ अभिप्रेत आहे. उर्वरित प्रतिसादाशी सहमत.
9 Mar 2015 - 10:49 am | अनुप ढेरे
वाह... मस्तं प्रतिसाद. आवडला. तो चित्रपट देखील प्रचंड आवडतो!
12 Mar 2015 - 3:28 pm | स्वलेकर
<<<<स्त्रीमुक्ती म्हणजे पुरूषांच्या सत्तेमधून मुक्ती असा मर्यादित अर्थ नेहमीच काढला जातो. खरेतर स्त्रियांची स्वतःच्या गुलामगिरिच्या मानसिकतेतून मुक्ती असा अर्थ असायला हवा.>>>> वाह!
9 Mar 2015 - 1:55 am | अगम्य
परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पेढे वाटतात त्यात मुलगा किंवा मुलीच्या लिंगाचा प्रश्न नसतो. ते केवळ परीक्षेतल्या यशासाठी असते. जन्माच्या वेळी मुलगा की मुलगी इतकीच information असते. पेढे किंवा बर्फी वाटून ती information आपोआप दिली जाते. मुलगा किंवा मुलगी ह्यात कमी-जास्त असे काही नाही. परंतु भेद जरूर आहे. आणि तो भेद वेगवेगळ्या प्रकारे celebrate करायला हरकत नसावी. लोक शेवटी मुलगा झाला किंवा मुलगी झाली असेच सांगतात ना? की भेद करू नये म्हणून फक्त आम्हाला बाळ झाले इतकेच सांगायचे? केवळ मुलगी झाल्यावर बर्फी वाटली म्हणून कोणाला प्रतिगामी ठरवणे चुकीचे आहे.
"पुरुषांचे मन जेव्हा स्त्रियांचा मूक आक्रोश समजून घेण्याइतके प्रगल्भ होईल तेव्हा स्त्रीमुक्ती हा शब्द इतिहासजमा होईल. आणि हे केवळ कडक कायदे आणि शिक्षा करून होणार नाही. सामाजिक परिवर्तनाची सुरुवात हि नेहमीच आंतरिक परिवर्तनापासून होत असते." ह्याबद्दल शंभर टक्के सहमत.
असो. मूळ मुद्द्याशी आपण सहमत आहोत. चर्चा ह्या लहानशा बाबीवरून भरकटायला नको.
9 Mar 2015 - 9:35 am | अवतार
हा वैयक्तिक प्रश्न आहे. पेढे की बर्फी हे प्रत्येकाने ठरवावे. मला पटत नाही एवढेच. बहुत काय लिहीणे.
9 Mar 2015 - 12:33 pm | स्पंदना
वरील सर्व प्रतिसाद वाचले. भारतात बापाने मुलींवर केलेले बलात्कार अश्या बातम्या एक सहा सात तरी पेपर मध्ये वाचलेल्या आठवताहेत, सिंगापूर मध्ये अश्या घटना चायनीज परीवारात आणि मलेशियन परिवारात घडल्याच्या सर्रास बातम्या होत्या.
सगळ्यात धक्कादायक होती ती तीन बायकांच्या कुटुंबातली घटना. परीवार अर्थातच मुस्लिम. त्या घरच्या बापाने स्वत:च्या मुली ह्या इस्लाम्च्या आधारे त्याची खाजगी मालमत्ता असल्याचे सांगुन वयाच्या ८व्या वर्षी पासून त्यांना तो सांगेल तेंव्हा त्याच्या खोलीत पाठवायची आज्ञा दिली होती. सगळ्यात मोठी मुलगी हा अत्याच्यार सहा वर्षे सहन करत होती, लागोपाठ दुसरी बहीण जेंव्हा या अत्याच्याराला बळी पडू लागली आणि अतिशय आजारी पडली तेंव्हा त्या दोघींनी हे शाळेत सांगितल आणि मग ही केस पोलीसांकडे गेली.
फॉरेस्ट गंप या चित्रपटातली जेनी सुद्धा अशीच बापाच्या अत्याच्यारांची बळी दाखवली आहे, अन त्यात फॉरेस्ट म्हणतो" सम टाइइम्स देर आर नॉट इन्फ स्टोन्स"
बर्याच इग्लीश जून्या मुव्हीज मध्ये किंवा सत्य घटनांवर आधारीत चित्रपटांमध्ये बापाचा मुलीवर अत्याच्यार ही गोष्ट दाखवलेली आहे, त्यामुळे हे सामाजिक सत्य आपण नाकारू शकत नाही. त्या पुढे मग भाऊ काय, आते भाऊ काय, मामा काय आणि काका काय...किस झाड की पत्ती.
एकूण व्यक्तीगत स्त्रीयांबद्द्लची भावना हीच एक चर्चेची गोष्ट उरते. असले पुरुष घरी जाऊन घरच्या स्त्रीयांशी वेगळा व्यवहार करत असतील ही कल्पनाच चुकीची आहे. घरात सुद्धा ते घरातल्या स्त्रीयांशी असाच व्यवहार करत असतात आणि घर सांभाळायच, कुटूंब टिकवायच, घरअण्याचे नाव राखायचे ही सगळी जबाबदारी स्त्रईयांवर असल्याने त्या ते जमेलत्या पद्ध्तिने झाकून घालतात.
वर कोनीतरी बोटभर दोरीने हत्ती बांधल्याची जे उदाहरण दिले आहे ते खरंच खरं ठरत अश्या वेळी. पुन्हा आणी पुरुष नसलेल्या कुटुंबाला आपल्या समाजात "अश्यांचा" फारच त्रास होतो, अन बहूतेक सज्जन बघे होतात.
9 Mar 2015 - 1:54 pm | संदीप डांगे
धन्यवाद. तुम्ही अगदी योग्य शब्दात मांडले. असे काही नसतेच असे म्हणून सामाजिक सत्य लपवण्याचा भाबडा प्रयत्न लोकांची झापडबंद मानसिकता दर्शवते. ओळखी-अनोळखी स्त्रीयांवर अत्याचार करणारे स्वतःच्या नात्यातल्या स्त्रियांबद्दल पवित्र भावना ठेवत असतील असे मानणे म्हणजे दांभिकपणाची हद्द आहे.
9 Mar 2015 - 6:35 pm | पिलीयन रायडर
संदीप डांगे..
ह्या धाग्यावरचे तुमचे प्रतिसाद आवडले.
पुरुष स्वतःच्या आई-बहीण-मुली ची कामना करु शकतो म्हण्लं तर इतका वादंग उठायचं कारण काय ते समजलं नाही (आणि बहुतांश की प्रत्येक वगैरे शब्दाचा किस पाडत बसणे सुद्धा..)
भारत हा फार मोठा देश आहे आणि त्यात सभ्य समजले जातील असे पुरुष फार कमी.. ह्या न त्या प्रकारे स्त्रीला चपलेखालीच ठेवण्याचे प्रयत्न प्रत्येक घरात होत असतातच. काही ठिकाणी बदल होत आहे.. पण अजुन फार मोठा काळ जावा लागणारे हे सगळं बदलायला..
बापानीच मुलीवर अत्याचार केला ह्या बातम्या तर आता धक्का सुद्धा देत नाहीत. बलात्काराची बातमी रक्त खवळु न देता वाचण्या इतपत मी बधिर झाले आहे आता.. समाज केव्हाच झाला असणार..
तुमच्या मतांशी मी सहमत आहे.. इथे लेख वाचणारे मुठभर लोक असा विचार सहनही करु शकत नसतील (उत्तमच गोष्ट आहे ही..) पण विदा पाहिला तर असे लाखो लोक नक्की निघतील ज्यांनी केवळ विचारच नाही तर असल्या विकृत गोष्टी केल्या देखील आहेत..
पैलवान ह्यांचाही प्रतिसाद आवडला.
9 Mar 2015 - 8:42 pm | सुबोध खरे
ओळखी-अनोळखी स्त्रीयांवर अत्याचार करणारे स्वतःच्या नात्यातल्या स्त्रियांबद्दल पवित्र भावना ठेवत असतील असे मानणे म्हणजे दांभिकपणाची हद्द आहे.
डांगे साहेब
अस नसतं. माणसाचे मन हे कप्प्यांचे बनलेले असते. आपण दुसर्याच्या बहिणीला छेडतो आहोत हे माणूस सहज विसरतो पण कुणी आपल्या बहिणीला छेडतो आहे हे पाहून तोच माणूस खवळून उठतो. तसच "दुसर्या" बाईला त्रास देणारा माणूस स्वतःच्या बहीणीवर आत्यंतिक प्रेम करणारा असा आपल्याला सहज दिसतो. माणसं दुटप्पी असतातच. हे म्हणणे दांभिकपणा आहे असे मला वाटत नाही.
10 Mar 2015 - 12:21 am | संदीप डांगे
दुसर्याच्या बहिणीला छेडतो आहोत हे माणूस सहज विसरतो पण कुणी आपल्या बहिणीला छेडतो आहे हे पाहून तोच माणूस खवळून उठतो.
डॉक्टरसाहेब, वरील वाक्यात दिसणारी मानसिकता आणि मी मांडत असलेली मानसिकता ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक सहज दिसून येते. दुसरी दिसत नाही. परंतू उपलब्ध विदा आणि त्याच्यावरून केलेल्या ढोबळ अंदाजावरून मी हा निष्कर्ष काढला आहे. माझा निष्कर्ष सपशेल चुकीचाही असू शकतो. पण यावर प्रस्तुत क्षेत्रातल्या तज्ञांना आज ना उद्या मुलभूत संशोधन करावेच लागेल. सरकारी अहवालांमध्ये ह्याच्या वाढत्या प्रमाणाबाबतीत चिंता व्यक्त केली गेली आहे. इंसेस्ट फँटसी साठी पॉर्न इंडस्ट्रीमधे वाढलेली मागणी इ. याचे पुरावे आहेत की खोल अंतर्मनात काहीतरी चालू असलेच पाहिजे. लोक खरंच बेसिक इंस्टिंक्टने वागत आहेत की चंगळवाद त्यांना विकृत करत चाललेला आहेत यावर अभ्यास व्ह्यायला पाहिजे. इंसेस्ट प्रकरणे कितीही भयावह असतील तरी ती नोंदवली जातीलच याची कुणीही खात्री देऊ शकत नाही. नोंदवल्या जाणार्या एका प्रकरणामागे नोंद होत नसलेली इंसेस्ट नसलेली १० प्रकरणे असतील तर इंसेस्ट असलेली १००० प्रकरणेसुद्धा असू शकतात. याचे कारण सामाजिक दबाव, कुटुंबाची प्रतिष्ठा वैगेरे आहे.
सुसंस्कृत समाजाने कितीही नाकारले तरी पॉर्न ही एक बरीच मोठी इंडस्ट्री आहे. लोकसंख्येच्या अगदी ०.०१% असणार्या विकृत लोकांच्या जिवावर एवढी बाजारपेठ उभी होणे अशक्य आहे. अधिक धक्कादायक आणि अधिक वेगळे द्यायचे म्हणून पॉर्न इंड्स्ट्री बर्याच गोष्टी बाजारात आणत असते. त्यातल्या ज्या आवडतात त्याच टिकतात. नाहीतर नाकारल्या जातात. अमेरिकेतल्या वाढत्या इंसेस्ट पॉर्नबद्दल विचार करणारा एक लेख. मी आज इथे मांडतोय म्हणून खटकत असेल पण पुढे ५-१० वर्षात हे लोण आपल्याकडेही येइल, आपल्या कोवळ्या मुलांना सावरण्यासाठी आपण तयार राहीलं पाहिजे. असं काही नसतंच म्हणून ते नाकारणं जास्त घातक आहे.
मानवी मन खरंच कुणाला समजले आहे का पूर्णपणे? कित्येक लग्नाळू मित्रांशी बोलतांना ते होणार्या पत्नीस आपल्या लैंगिक गरजा पूर्ण करायला मिळणारे एक साधन समजतात हे धक्कादायकरित्या कळले आहे. आपल्या बायकोने 'दुसरा कुणी' शोधू नये या दिव्य समजापायी तीला पहिल्या रात्री 'इंप्रेस' करावं म्हणून धडपडणारे आणि त्यासाठी अत्यंत चुकीचे उपाय करणारे नवरे सुद्धा सहज दिसून येतील. लग्न हे दोन जिवांचे, दोन घरांचे मिलन वैगेरे रोमँटीक गप्पा लग्नमंडपात शोभून दिसतात. पण आपल्या पत्नीला एक स्वतंत्र माणूस म्हणून वागवणारे, तिच्या इच्छांचा आदर करणारे पुरुष फारच कमी असतात. असे न करणारे पुरुष सामाजिकरित्या कबूल करणार नाहीत. त्यामुळे त्याचा विदा मी देऊ शकणार नाही. म्हणून ते सत्यच नाही असेही नाही. स्त्रीयांनी बोलायला हवे आता.
मी मांडत असलेले विचार कदाचीत अतिरंजीत असतीलही. पण अतिरंजीत असा शिक्का मारल्याने त्याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही असा एक विचार प्रचलित होऊ शकतो. तेवढे टाळता आले तर बरे.
10 Mar 2015 - 12:41 am | बॅटमॅन
नै म्हणजे ओव्हरऑल ज्ञानाच्या नावाने बर्याच जणांची बोंब असते आणि त्यापायी ते बरेच अडाण** प्रकार करतात हे खरंच आहे, पण बायकोने दुसरा कुणी शोधू नये असे वाटणे ही भावना चूक आहे असं म्हणायचं आहे का?
10 Mar 2015 - 1:54 am | संदीप डांगे
बॅटमॅनभौ, होतंय काय की मला ते नेमकं कसं मांडावं कधी कधी सुचत नाय...
म्हणण्याचा अर्थ असा होता की स्त्रीयांना काहीतरी भन्नाट लागत असतं, ते देण्यात आपण कमी पडू, त्यामुळे ती दुसरा शोधेल अशी काही नकारात्मक भावना असते. 'बायकोच्या मना'पेक्षा ती 'मला सोडून दुसरीकडे जायला नको' ही पुरूषी अहंकाराची भावना जास्त मोठी असते. बायकोला नेमकं काय लागतं हे तिच्याशी बोलून ठरवण्याऐवजी (हे हायली इंपॉसिबल आहे आपल्याकडे) इकडून तिकडून काही-बाही ऐकून बघून लोक्स फार मजेदार पण तितकेच बेसलेस गैरसमज पाळत असतात. भावना चूक नसली तरी गैरसमज चूक आहेतच की.
माझ्या एका लग्न जवळ आलेल्या मित्राचा हा किस्सा आहे. शितावरून भाताची परिक्षा नाही करत पण एकंदर समज कसे असतात याचा अंदाज येइल. तो माझ्याशी येणार्या अनुभवांबद्दल सल्लामसलत करत होता. त्याला पहिलीच रात्र 'गाजवायची' होती. मी त्याला म्हटले की एकदम कुठल्याही पद्धतीची घाई करू नको, तिलाही नविन घरी, नविन माणसांमधे रुळायला जरा वेळ दे. एकमेकांना समजुन घेत एक-एक पायरी चढ. त्यामुळे तुझ्या समजुतदारपणाबद्दल तिच्या मनात आयुष्यभर आदर राहील. त्याला ते काही समजतच नव्हते. उपरोधिकपणे म्हणाला, 'ठीक आहे, काही करत नाही, समजून घेत बसतो सहा महिने. बायको म्हणू देत नवर्यात काय दम नाही.' मी सरळ त्याच्या हातात निरामय कामजीवन हे ह्या विषयावरचं एक उत्तम पुस्तक दिलं आणि म्हटलं बाबारे तूही वाच, तिलाही दे.
लग्नांनंतर दोन महिन्यांनी भेटला, म्हणाला जसा विचार केला तसं काहीच नसतं. आपण आजवर बघितलेलं काहीच अनुभवायला आलं नाही. मी म्हटलं मित्रा, दुसर्यांना कार चालवतांना बघून आपल्याला तो फार रुबाबात चाललाय असं वाटतं, स्वतः स्टेअरिंगवर बसल्यावर कळतं रुबाब वैगेरे फक्त बघणार्याला दिसतो, चालवणार्याला कळतं नक्की काय ते. पुढे सवय झाल्यावरच खरी ड्रायविंगची मजा येते. नुसतं रुबाब दाखवत बसलास तर ड्रायविंग येणारंच नाही. मजा तर नाहीच नाही.
असो, असे आहे तर ते. त्याला द्यायच्या आधी खुद्द ते पुस्तक मीपण वाचले. माझ्याही बर्याच पुरुषी संकल्पनांना धक्का बसला. :-)
12 Mar 2015 - 4:11 pm | बॅटमॅन
धन्यवाद. बाकी सहमत आहे हेवेसांनल.
12 Mar 2015 - 7:31 pm | सुबोध खरे
'बायकोच्या मना'पेक्षा ती 'मला सोडून दुसरीकडे जायला नको' ही पुरूषी अहंकाराची भावना जास्त मोठी असते.
या वरून मला माझा एशियन हार्ट मधील एक अनुभव आठवला. तेथे माझ्याकडे एक लिंग शैथिल्य( ERECTILE DYSFUNCTION)च्या तपासासाठी रुग्ण आला होता वय वर्षे ६० (PENILE DOPPLER)या तपासणी साठी. यात लिंगामध्ये इंजेक्शन देऊन त्याचा रक्तपुरवठा तपासला जातो. . आफ्रिकेत झाम्बिया किंवा झैरे देशातील कुठल्यातरी जमातीचा चीफ होता. त्याला त्याची नवी चौथी बायको सोडून जाऊ नये म्हणून जोमदार पौरुषत्व पुन्हा प्राप्त करायचे होते. चौथ्या बायकोचे वय होते १८ वर्षे. मला हसू आले आणी तो गेल्यावर मी माझ्या दुसर्या साथीदाराला म्हटले कि आज ना उद्या याची बायको याला सोडून जाणारच. कायाकल्प वाजीकरण वगैरे कविकल्पनात ठीक आहे.
ही "पौरुषत्वाची"(?) भावना माणसांमध्ये इतकी प्रबळ असते त्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. आणी तरुण वयात आपण किती पुरुष आहोत याची शंका बहुसंख्य पुरुषांत कधी तरी डोके काढते. (यात ८०-८५% पुरुष मोडतात कदाचित बरेच जास्त).
"बायकोला नेमकं काय लागतं हे तिच्याशी बोलून ठरवण्याऐवजी (हे हायली इंपॉसिबल आहे आपल्याकडे) " यात बायकांना तरी कुठे माहिती असतं आपल्याला नकी काय हवं आहे.
हा या धाग्याचा विषय नाही म्हणून मी येथे थांबतो. कदाचित यावर एक वेगळा धागा सुद्धा काढेन (आळसातून वेळ मिळाला कि)
10 Mar 2015 - 12:54 am | आजानुकर्ण
डांगेसाहेब, तुमचे सर्व प्रतिसाद वाचनीय आहेत. तुमचे सगळेच विचार पटतात असे नाही पण मांडणीची पद्धत नक्कीच चांगली आहे.
10 Mar 2015 - 2:36 am | संदीप डांगे
धन्यवाद! :-)
10 Mar 2015 - 1:41 am | प्रभाकर पेठकर
>>>> कित्येक लग्नाळू मित्रांशी बोलतांना ते होणार्या पत्नीस आपल्या लैंगिक गरजा पूर्ण करायला मिळणारे एक साधन समजतात हे धक्कादायकरित्या कळले आहे. आपल्या बायकोने 'दुसरा कुणी' शोधू नये या दिव्य समजापायी तीला पहिल्या रात्री 'इंप्रेस' करावं म्हणून धडपडणारे आणि त्यासाठी अत्यंत चुकीचे उपाय करणारे नवरे सुद्धा सहज दिसून येतील.
बापरे! जग बरंच पुढे गेलय म्हणायचं. मी 'लग्नाळू' होतो तेंव्हा तेंव्हा माझ्या किंवा माझ्या इतर 'लग्नाळू' मित्रांच्या डोक्यात असले कांही विचार नव्हतेच. आम्ही बरेच मागासलेले होतो असेच म्हणायचे.
>>>>लग्न हे दोन जिवांचे, दोन घरांचे मिलन वैगेरे रोमँटीक गप्पा लग्नमंडपात शोभून दिसतात.
मला नाही वाटत. कारण ह्या विचारांवरच आजतागायत अनेक संसार टिकलेले आहेत.
10 Mar 2015 - 2:31 am | संदीप डांगे
बापरे! जग बरंच पुढे गेलय म्हणायचं.
गेलंच आहे हो काका. आजकाल सातवी-आठवीच्या मुलांना गर्लफ्रेंड नसली तर काँप्ले़क्स येतो. तुमच्या काळात वर्गात पहिले नाही आलो तरच काय तो काँप्लेक्स येत असणार. बाकी, तुमच्या काळातल्या आठवणी ऐकायला बरे वाटेल.
ह्याच विचारांवर संसार टिकलेले आहेत. हे वरकरणी बरोबर वाटत असले तरी:
ज्या मूळ कारणासाठी विवाह होतात त्याबद्दल खात्रीलायक आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शन वधूवरांना मिळावे यासाठी स्पष्ट प्रयत्न होतात? याउलट 'पाण्यात पडल्यावर पोहायला येते', 'आम्ही नाही का संसार केला इतकी वर्ष' वैगेरे वाक्य ऐकायला मिळतात. माझ्या माहीतीप्रमाणे (बहुसंख्य शब्द वापरायची भीती वाटू लागलीय आताशा) स्त्रियांना मुलं होतात पण ऑरगॅझम काय असतो ते आयुष्यभर कळत नाही. परत शरीरसंबंध व तत्सम गोष्टी पाप आहेत अशी विचित्र सामाजिक मान्यता. नवर्याने मागणी केल्यावर हजर राहावे असा सामाजिक संकेत. ह्याविषयावर लिहिण्यासारखे भरपूर आहे अजून.
संस्कृती, सामाजिक दबाव आणि प्रतिष्ठेचा प्रश्न नसता तर किती संसार खरोखर टिकले असते याबद्दल शंकाच आहे.
त्यामुळे लग्न हे दोन जिवांचे, दोन घरांचे मिलन वैगेरे संकल्पना रोमँटीक आहे असे मला वाटते.
10 Mar 2015 - 3:35 am | प्रभाकर पेठकर
>>>>आजकाल सातवी-आठवीच्या मुलांना गर्लफ्रेंड नसली तर काँप्ले़क्स येतो.
पुन्हा मी सुदैवी. माझ्या पाहण्यात अशी कॉम्प्लेक्स असणारी मुले नाहीत.
>>>>>तुमच्या काळात वर्गात पहिले नाही आलो तरच काय तो काँप्लेक्स येत असणार.
इथेही सुदैवी. मला (आणि माझ्या मित्रांना) असला कांही कॉम्प्लेक्स अज्ज्जिबात नव्हता.
>>>>माझ्या माहीतीप्रमाणे (बहुसंख्य शब्द वापरायची भीती वाटू लागलीय आताशा) स्त्रियांना मुलं होतात पण ऑरगॅझम काय असतो ते आयुष्यभर कळत नाही.
ज्या पुढारलेल्या समाजांमध्ये ऑरगॅझम म्हणजे काय हे वयाच्या १० व्या/१२ व्या वर्षीच मुलींना तोंडपाठ असतं अशा पुढारलेल्या समाजातल्या कुमारिका(?), विवाहित, परित्यक्ता, घटस्फोटीता वगैरे वगैरे स्त्रीयांच्या समस्या रोजच टिव्हीवर पाहात असतो, वर्तमानपत्रातून वाचत असतो. त्यांमुळे, ऑरगॅझम म्हणजे काय हे समजल्याने आपल्या भारतिय स्त्रीयांच्या समस्या कमी होतील की वाढतील हा वादाचाच विषय आहे. ऑरगॅझमचे ज्ञान आवश्यक आहे असे मला वाटत नाही. त्यातूनही ज्यांना पाहिजे त्यांना डॉक्टरांकडून मिळू शकते.
मिडियाच्या वाढत्या धबधब्याखाली हे ज्ञान घरोघर पसरत चालले आहे. पण ही प्रगती आहे का? ऑरगॅझम म्हणजे काय हे भारतिय स्त्रीयांना ठाऊक नसेल असे मला वाटत नाही (तसा माझा अभ्यास नाही) पण ठाऊक असले तरी अशा विषयांवर चर्चा करणे ह्याचा प्रचंड संकोच असतो हे मान्य.
>>>>शरीरसंबंध व तत्सम गोष्टी पाप आहेत अशी विचित्र सामाजिक मान्यता.
पती-पत्नीतील शरीरसंबंधाला निदान आपल्या समाजात तरी 'पाप' मानत नाहीत.
10 Mar 2015 - 3:56 am | संदीप डांगे
ऑरगॅझमचे ज्ञान आवश्यक आहे असे मला वाटत नाही.
हे विधान जरा स्फोटक आहे. यावर स्त्रियांच्या बाजूने खरंच चर्चा झाली पाहिजे.
शरीरसंबंध व तत्सम गोष्टी पाप आहेत अशी विचित्र सामाजिक मान्यता. यावर स्वतंत्र धागा काढतो. माझं मत नीट मांडायला जमत नाही मला. त्यामुळे बरेच गैरसमज होत आहेत.
10 Mar 2015 - 4:10 am | संदीप डांगे
पुन्हा मी सुदैवी. माझ्या पाहण्यात अशी कॉम्प्लेक्स असणारी मुले नाहीत.
हा तुमचा वैयक्तिक अनुभव असावा. माझ्या निरिक्षणात आजकालच्या मुला-मुलींचं वावरणं आहे. शाळकरी वेषात दप्तर पाठीला लावून तासंतास रस्त्याच्या कडेला बोलत बसणारे 'कपल्स', क्लासेस सुटल्यावर एकमेकांशी चालणारे व्यवहार, वैगेरे बरंच काय काय चाललंय. १९९१ नंतर जन्मलेल्या पिढीवर वाढत्या टीव्ही-सिनेमांच्या आणि जागतिकीकरणाच्या आक्रमणाचे बरेच चांगले-वाईट परिणाम झाले आहेत. अमेरिकन कल्चर छुप्या-उघड पद्धतीने आपल्याकडे आलंय. फेसबुकवर टीनेजर लोकांच्या गप्पांचे विषय आणि आपल्या टीनेजर काळातल्या गप्पांचे विषय यात बरीच क्रांतीकारक तफावत आहे.
10 Mar 2015 - 10:29 am | प्रभाकर पेठकर
>>>>शाळकरी वेषात दप्तर पाठीला लावून तासंतास रस्त्याच्या कडेला बोलत बसणारे 'कपल्स', क्लासेस सुटल्यावर एकमेकांशी चालणारे व्यवहार, वैगेरे बरंच काय काय चाललंय.
हि सत्यपरिस्थिती मलाही मान्य आहे. हे प्रकार मीही बघत असतो आजूबाजूला. पण हल्लीची पिढी आमच्यापेक्षा जास्त पुढारलेली आहे. त्यांच्या मित्र-मैत्रिणी ह्या नात्यात शारीरिक आकर्षण, वखवखलेपणा 'दिसून' येत नाही. दोन मित्रांची किंवा दोन मैत्रीणींची मैत्री असावी तशी ही 'फ्रेंडशीप' जाणवते.
ही नाती मी नाकारत नाही. पण तसे नाते नसेल तर 'कॉम्प्लेक्स येतो' हे मला कुठे दिसत नाही.
10 Mar 2015 - 9:02 am | चुकलामाकला
काका तुमची पिढी सुदैवी खरेच!
>>>>आजकाल सातवी-आठवीच्या मुलांना गर्लफ्रेंड नसली तर काँप्ले़क्स येतो.
हे सत्य आहे . माफ करा व्यक्तिगत उदाहरण आहे पण माझी मुलगी सहावीत असताना तिच्या वर्गातील ५० मुलांपैकी ४५ मुलांना gf /bf होते. आणि आपल्याला नाही यामुळे तिला inferiority complex येऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करावा लागला . ती ज्या सहा एत जाते ती मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गीयांची शाळा आहे
>>>>ऑरगॅझमचे ज्ञान आवश्यक आहे असे मला वाटत नाही
वंदना खरे यांचे योनीच्या मनीच्या गुजगोष्टी तुम्ही एकदा पहा असे मनापासून वाटते
10 Mar 2015 - 10:46 am | प्रभाकर पेठकर
>>>>>हे सत्य आहे . माफ करा व्यक्तिगत उदाहरण आहे पण माझी मुलगी सहावीत असताना तिच्या वर्गातील ५० मुलांपैकी ४५ मुलांना gf /bf होते. आणि आपल्याला नाही यामुळे तिला inferiority complex येऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करावा लागला .
व्यक्ती-व्यक्तीच्या स्वभावात भयंकर तफावत असते. तुमच्या मुलीच्या बाबतीत असे घडले नसेलच असे मी म्हणत नाहिए. पण तेच इतर सर्वांच्या बाबतीत सत्य आहे हे मला मान्य नाही. माझा मुलगाही ह्या वयातून गेला आहे. भावाची मुले, बहिणीची मुलगी तसेच अनेक मित्रांची मुले ह्या वयात आहेत किंवा ह्या वयातून गेली आहेत. त्यांना मी जवळून पाहात असतो त्यांच्याशी माझा संवाद असतो. आता त्यांच्या आईवडिलांशी संवाद साधून अशी 'कॉम्प्लेक्स'वाली मुले शोधीन. पण शोधावी लागताहेत म्हणजे ही गोष्ट सर्वसामान्य झालेली नाही असे मला वाटते.
खरं पाहता ह्या विषयावर मिसळपावच्या महिला सदस्यांनी त्यांचे विचार मांडावेत. पण अनाहिता सुरु झाल्यापासून महिलासदस्य 'इथे' आपली मते व्यक्त करीत नाहीत हे जाणवते.
ऑरगॅझमचे ज्ञान आवश्यक आहे असे मला वाटत नाही. हे माझे वाक्य एकूण प्रतिसादातून वेगळे काढून वाचल्याने अज्ञानमूलक वाटत आहे. माझा मुद्दा स्त्रीयांच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी ते आवश्यक नाही असे मत मी मांडले आहे. त्यातून ज्यांना गरज आहे त्यांना डॉक्टरांकडून माहिती मिळू शकते असेही मी नमूद केलेले आहे.
10 Mar 2015 - 12:26 pm | सुबोध खरे
डांगे साहेब
पॉर्न इंडस्ट्री मध्ये सतत नवीन काय आणायचे यातून आपला टी आर पी वर ठेवण्यासाठी बर्याच गोष्टी दाखविल्या जातात त्याचा अर्थ त्याला मागणी आहेच असे म्हणता येत नाही. केवळ नाविन्य म्हणून ते पाहण्यासाठी बरेच लोक तेथे जातात. अत्यंत भिकार सिनेमा सुद्धा पहिल्या आठवड्यात मोठा धंदा करून जातो त्यासारखेच ते आहे किंवा केवळ चवीत बदल म्हणून बरेच सामिष खाणारे मगरीचे किंवा गिधाडाचे मास खाऊन पाहतात तसाच हा प्रकार आहे.पॉर्न मध्ये स्त्रीपुरुष यांचे संबंध आणि त्यांच्या लिंगांचे प्रदर्शन आणि त्यातून होणार्या अत्य्युच्च सुखाचा अनुभव(orgasm) हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे परंतु रोज पुरण पोळी किंवा चिकन खाणार्या लोकांना दुसरे काही तरी खायची इच्छा होते तसाच हा प्रकार आहे. तू नळीवर किंवा जालावर अशा कार्यक्रमाला जास्त टिचक्या मिळतात याचे कारण वेगळे आहे. वर वर्णन केलेले क्लासिक पॉर्न लोकांकडे साठवलेले ( सीडी वर किंवा हार्ड डिस्कवर) परंतु असे इतर पॉर्न incest, bestiality( प्राण्याबरोबर सम्भोग) sadism इ गोष्टी लोक साठवून ठेवत नाहीत . त्याची बहुतेकांना लवकर किळस येते.
असे असूनही इनसेस्टचे प्रमाण कोणत्याही समाजात बर्यापैकी असते. नगण्य नक्कीच नाही. आणि हे प्रमाण ज्या समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाचे स्पर्श सुद्धा झालेला नाही अशा सुदूर क्षेत्रात किंवा आदिवासी भागातही सहज आढळते. याचे साधे कारण निसर्ग हेच आहे. जुन्या म्हणी आहेतच कि विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते वितळणारच. परंतु स्वतःच्या आई, बहिणी किंवा मुलीबद्दल कामवासना उसळणे हे तुमच्या बालपणापासूनच्या संस्काराचे फलित असते त्यामुळे अत्यंत नराधम असणारा माणूस सुद्धा स्वतःच्या बहिणीच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असतो. पण हेच तो आपल्या मामे किंवा आत्ते बहिणीबद्दल किंवा आपल्या मेहुणी बद्दल असणार नाही. कारण अशा संबंधाना समाजाने दिलेली मान्यता तो लहानपणापासून गृहीत धरत असतो. सतःच्या शेतात भरपूर पिक असताना सुद्धा शेजार्याच्या शेतातून चोरी करण्याची वृत्ती अशीच आहे. याचे कारण मानवी मनात स्व आणि परका यात स्पष्टपणे असणारी सीमारेषा.स्वतःच्या मुलाने खेळणे मोडले तर ते चालते पण दुसर्याच्या मुलाने अनवधानाने जर थोडेसे जरी खराब केले तरी त्याचा आपल्याला येणारा संताप याला हीच रेषा कारणीभूत असते. याकारणास्तव मी बहुसंख्य पुरुष स्वतःच्या आई-बहीण-मुली ची कामना करु शकतो याला असहमती दर्शविली आहे. मानवी मन हे अतिशय विचित्र आहे पण असे कप्पे तयार करणे हे त्याला (मनाला) सोपे जाते. याच कारणामुळे एखादा अत्यंत देवभोळा सरकारी अधिकारी दाबून पैसे खाताना दिसतो किंवा सार्वजनिक जीवनात किडा मुंगीला सुद्धा स्पर्श न करणारा जैन माणूस धंद्यात अत्यंत निर्दयीपणे वागतो.(ती गोष्ट वेगळी आणि हि गोष्ट वेगळी हि मनाने घेतलेली ढाल असते यामुळे नितीमत्ता आणि फायदा यातील द्वन्द्व(conflict) याने मनाला होणारा त्रास/ टोचणी खुप कमी होते. ( defence mechanism of mind).
असो हा विषय अतिशय गहन आहे हे लिहताना माझाही गोंधळ(confusion) होईल आणि वाचताना आपलाही यास्तव येथेच थांबतो. .
10 Mar 2015 - 12:42 pm | संदीप डांगे
तुम्ही योग्य पद्धतीने मांडले आहे. असो. माझ्यामते माझंपण याविषयावर अजून बोलणे उचित ठरणार नाही. काही अपवाद वगळता चर्चा उत्तम झाली. यानिमित्ताने थोडा अभ्यासपण झाला. जुन्या माहितीवर आधारित संकल्पना सुधारण्यात आल्या. काही अतिशय नविन माहिती मिळाली.
मी पण या धाग्यावर इथेच थांबतो. धन्यवाद !
10 Mar 2015 - 1:58 pm | प्रभाकर पेठकर
उत्तम प्रतिसाद. मी तर ह्याही पुढे जाऊन म्हणेन की तरूणपणी एखादि नटी, किंवा ओळखितली सुंदर मुलगी स्वप्नात येऊन तरूणाचे रंजन करते आणि स्खलन होऊ शकते. पण जिच्यावर प्रेम केले किंवा जी भविष्यातील पत्नी म्हणून आपल्या बरोबर असते तिच्या बाबतीत अशी स्वप्ने पडत नाहीत. आपल्या मनांत असे विचार येणं नैसर्गिक असतं तरी पण आपल्या विचारांवर काबू ठेवून नैतिकतेच्या चौकटीत राहणे ह्याला आपले संस्कार जबाबदार असतात. सतत शरीरसंबंधांबद्दल विचार करणं आणि प्रत्येक स्त्री कडे 'त्या' दृष्टीने पाहणे ही विकृती आहे. आपण फक्त नर-मादी नसतो. आपल्याजवळ विचारशक्ती असते, सामाजिक कायदे, बंधनं आपण मानत असतो त्यामुळे वेगळ्या नातेसंबंधांमध्ये वेगळ्या भावना असतात. अर्थात हा नियम नाही. नैतिक बंधन आहे त्यामुळे ते झुगारणारेही असतातच.
ह्याचाच दुसरा भाग म्हणजे शिव्या. तरुणपणी मित्रांबरोबर असताना बोलताना अनेक शिव्या आपण वापरत असतो पण हेच आई-वडील-बहिण-भाऊ-शिक्षक ह्यांच्याशी संवाद साधताना अनवधानानेही शिव्या तोंडात येत नाहीत. ह्याला माझ्या माहितीतील अपवाद म्हणजे आपले तात्या अभ्यंकर. त्यांना सर्वत्र शिव्या आणि असंसदिय शब्दांचा वापर करणं फार अभिमानास्पद वाटतो. असो.
10 Mar 2015 - 2:45 am | स्पंदना
दांभिक आणि आरोप यातला फरक मलाच कळेना की काय? सत्य नाकारणे म्हणजे दांभिकपणा, आणि असत्य थापणे किंवा थोपणे म्हणजे आरोप अशी माझी तरी साधी सोप्पी व्याख्या आहे,
तर डॉक्टर साहेब काय आहे, छेड ही निरागस दुतर्फा आनंद देणारी अशी समजू, की एखाद्या मुलीला ड्रेस वरुन, एखादी शीळ घालून तिचे लक्ष वेधून घेणे.
आपण बोलतओ आहोत ते त्या पुढे जाउन स्त्रीला स्पर्श करणार्या, त्रास देणार्या आणि अपमानकारक रित्या वागवणार्या लोकांबद्दल; ज्यांची मजल बलात्कारापर्यंत पोहोचू शकते. त्यांना स्री ही फक्त एक मादी या स्वरुपातच दिसते. मग ती बहिण असो, पत्नि असो, वा मेहूणी.
अगदी सालस सज्जन लोक सुद्धा चेष्टेच्या नावाखाली साली आधी घरवाली म्हणुन बोलुन का होइना पण मनाच्या एका कप्प्यातली दुसर्याला असे म्हणु तरी शकतो ही वर्चस्वाची भावना सुखावुन घेतात. आता याला तोडीस तोड म्हणुन जोक मध्ये दिराला आधा घरवाला म्हंटलेले कितीजण जोक म्हणुन सुद्धा साहू शकतात देव जाणे.
10 Mar 2015 - 3:17 am | संदीप डांगे
दिराला आधा घरवाला
नाय ओ ताई, संस्कृतीला हादरे बसतील ना? तिथे तर वहिनी-दिरामधे आई-मुलाचे नाते असले पाहिजे अशी साळसूद अपेक्षा आहे. यासाठी लक्ष्मण कसा सीतेच्या चरणाकडे पाहून बोलत असे याचे दाखले दिले जातात.
याबद्दल अधिक ईथे वाचता येइल.
10 Mar 2015 - 12:02 pm | सुबोध खरे
दिराला आधा घरवाला यात अनैसर्गिक असे काही नाही. "एक चादर मैलीसी" हा चित्रपट पहिला असेल तर अशा चालीरीती भारतात अजूनही अस्तित्वात आहेत हे लक्षात येईल . पंजाब हरियाना मध्ये नवर्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवेचे धाकट्या भावाशी लग्न लावून देतात( चादर डाल देना). अशी प्रत्यक्ष उदाहरणे माझी लष्कराच्या नोकरीत मी चार तरी पाहिलेली आहेत. आणि त्यातील एका अधिकार्याला मी आत्ताच एक महिन्यापूर्वी भेटलो आहे.
10 Mar 2015 - 12:15 pm | संदीप डांगे
स्पंदनाताईंनी ते ज्या संदर्भात म्हटले आहे तो वेगळा आहे. बायको मरण पावल्यास तिच्या अविवाहित बहिणीशी किंवा नवरा मरण पावल्यास त्याच्या अविवाहित भावाशी लग्न लावून देणे फार सामान्य बाब आहे भारतात.
प्रश्न होता की साली आधी घरवाली मधे जी कल्पना विनोदी पद्धतीने मांडली जाते तीच कल्पना उलट झाली तर चालत नाही. त्यासाठीच चारू गुप्ता यांच्या पुस्तकाचा मी दुवा दिला. पुस्तक वाचण्यासारखे आहे. दिराने वहिनीला मातेसमान पहावे, वहिनीने दिराला मुलासमान पाहावे ही सामान्यपणे समाजात भावना दिसून येते. पण त्याच वेळेस जावयाने मेहूणीला मुलीसमान किंवा मेहूणीने जावयाला बापासमान मानले पाहिजे असे सांगितलेले मला तरी आठवत नाही.
10 Mar 2015 - 12:40 pm | सुबोध खरे
स्त्रीला स्पर्श करणार्या, त्रास देणार्या आणि अपमानकारक रित्या वागवणार्या लोकांबद्दल; ज्यांची मजल बलात्कारापर्यंत पोहोचू शकते. त्यांना स्री ही फक्त एक मादी या स्वरुपातच दिसते. मग ती बहिण असो, पत्नि असो, वा मेहूणी.
स्पंदना ताई,
मी वर म्हटल्या प्रमाणे माणसांचे मन कप्पयानी बनलेले असते. तो बायकोला किंवा मेहुणीला जसे वागवतो तसाच तो आई किंवा बहिणीला किंवा मुलीला वागवत असेल याबद्दल मी आक्षेप घेला आहे.कारण बायकोला खालच्या पातळीवर वागवणे हे समाजाने मान्यता दिलेले आहे. पण आई किंवा बहिणीबद्दल वासना बाळगणे हे अत्यंत हीन माणसाचे लक्षण आहे हे त्याला लहानपणापासून मिळालेले बाळकडू असते मकार किंवा भकाराने सुरुवात होणार्या शिव्या हेच दाखवतात आणि असा माणूस समाजात अत्यंत हीन पातळीचा समजला जातो हे ऐकत तो लहानाचा मोठा होतो
परंतु साली तो आधी घरवाली होती ही हे तर तो लहानपणापासून ऐकत आल्याने तिच्या बद्दल गैर वागणे हे चुकीचे तर सोडाच पण तो आपला हक्कच आहे असे मानतो. शिवाय एखाद्या माणसाने आपल्या मेहुनिशी अतिप्रसंग केला तर समाज त्याच्याकडे वाईट दृष्टीने पाहत नाही तर "क्षमाशील" वृत्तीने पाहतो. पण तोच त्याने जर सख्ख्या बहिणीबरोबर किंवा मुलीबरोबर अतिप्रसंग केला तर समाज त्याचे धिंडवडे काढेल. मूळ सामाजिक गृहीतात आपण गल्लत करीत आहात असे मला वाटते.
10 Mar 2015 - 8:50 am | चुकलामाकला
@संदीपजी
तुमचे अभ्यासपूर्ण विचार आवडले .
स्त्रीकडे एक वस्तू म्हणूनपहिले जाते हे दुर्दैवाने सत्य आहे. आणि अनेक समस्यांचे हे मूळ आहे .
मला सरसकटिकरण करायचे नाही पण प्रत्येकाने प्रामाणिकपणे स्वत:ला हे विचारायची गरज आहे की
१ मी सुद्धा (माझ्याही नकळत) स्त्री कडे वस्तू म्हणून पाहतो का?
२ बऱ्याच शिव्या या स्त्री वरुन दिल्या जातात . त्या वापरताना माझ्या मनातील स्त्री सन्मान कुठे जातो ? (नवीन शिव्या तयार करण्याची गरज आहे असे म्हणू हवे तर )
३ पोर्न बघणे याला मी गुन्हा म्हणत नाही (ती गरज देखील असेल) पण आज whatsapp , संदेश इतक्या विविध माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आपण नकळत त्याला सामोरे जात असतो .त्याचे काही दुष्परिणाम होत आहेत का?
भाजपा किंवा आप (दिल्लीत पहिल्यांदा निवडून आले तेव्हा ) यांच्या यशात सोशल मिडिया वरून केल्या सतत पाठवलेल्या संदेशांचा विनोदांचा गेलेल्या प्रचाराचा मोठा हात आहे हे सत्य आहे . तसाच परिणाम या "A " ग्रुप मधील संदेशांचा , क्लिप्स चा होत आहे का हा विचार आणि अभ्यास करण्याचा विषय आहे.
४ जची सामाजिक स्थिती भयंकर आहे . एक मोठठा तरूण वर्ग असा आहे जो बेकार आहे किंवा अजून पुरेसे अर्थार्जन करीत नाही . त्यामुळे लग्नाचे वय पुढे ढकलले जाते . आणि शारीरिक भूक तर असतेच. आपली समाजरचना अजूनही या समस्येला सुदृढ उत्तर देऊ शकत नाही . निर्भया केस मधले गुन्हेगार या वर्गातील आहेत . ( इथे त्यांना , ,त्यांच्या क्रूर क्रुत्याला पाठीशी घालायचा बिलकुल हेतू नाही कृपया लक्षात घ्यावे तर एका भीषण वस्तवामागील कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न आहे)
अशावेळी असे मेसेज किंवा क्लिप्स आगीत तेल तर ओतत नाहीत ना?
फक्त हा वर्गच नाही तर तथाकथित सभ्य आणि उच्चभ्रू वर्गात या गुन्ह्यांचे प्रमाण कमी नाही . प्रथम विचार होतो मग कृती . स्पंदना ताईंनी म्हटल्याप्रमाणे ,
" अगदी सालस सज्जन लोक सुद्धा चेष्टेच्या नावाखाली साली आधी घरवाली म्हणुन बोलुन का होइना पण मनाच्या एका कप्प्यातली दुसर्याला असे म्हणु तरी शकतो ही वर्चस्वाची भावना सुखावुन घेतात" हे सत्य आहे . वरवर अगदी harmless वाटणार्या अशा विनोदांवर देखील आता विचार करण्याची वेळ आली आहे .