निर्भया डॉक्युमेंटरी वगैरे ....

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in काथ्याकूट
4 Mar 2015 - 2:45 pm
गाभा: 

मी
सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
माझे आदर्श गांधी, सावरकर , मार्क्स वगैरे
मला मनापासून पटतो स्त्रियांचा सन्मान , त्यांचे स्वातंत्र्य वगैरे
मी मानतो हवे ते कपडे घालण्याचा ,कुठल्याही वेळी , कठेही एकटीने फिरण्याचा त्यांचा हक्क वगैरे
बलात्कार , स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील गुन्हे ई .वर मी चिडतो वगैरे
त्यावर तावातावाने बोलतो ,चर्चा करतो , फेसबुक वर लिहितो वगैरे ……

डिलीट करतो न चुकता मी कॉम्प्युटर वरची ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे
लॉक असतो माझा मोबाईल, अश्लील मेसेज, फोटो मी वाचतो, फोरवर्ड करतो , उडवतो वगैरे
मित्रांमध्ये खाजगीतले माझे विनोद ऐकून लाजतील दादा कोंडके, सचिन यार्दी वगैरे …
दिसली समोर बाई की चवीने बघतो तिचा खोल गळा, लो वेस्ट फाशन वगैरे
आणि काढतो तिची मापे, मनातल्या मनात दाबतो वगैरे
मिळाला एकांत की डोळ्यासमोर आणतो दिवसभरात दिसलेल्या बाया , सनी लिओन वगैरे …

आजची बातमी ऐकून मुठी वळवून म्हणतो मी ,भे****,मा*** फाशी दिली पाहिजे या मुकेशला वगैरे
मी सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे

(कवितेपेक्षा चर्चेसाठी जास्त योग्य वाटले )

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2015 - 3:56 pm | पिलीयन रायडर

स्त्री-पुरुषांना एकमेकांची शाररिक ओढ वाटणं हे स्वाभाविक आहे. त्यातही पुरुषांना ती अजुनच तीव्रतेनी जाववणं ही त्यांची नैसर्गिक जडण-घडण आहे. सभ्य वा असभ्य.. सरवच पुरुषांना तशी जाणवत असावी. त्यामुळे पॉर्न बघतो किंवा "तसल्या" कल्पना करतो म्हणुन कुणी असभ्य ठरवावा का? पॉर्न बघतो आणि वर "असल्या नराधमांना फाशी दिली पाहिजे" म्हणतो तो दुतोंडी असेल का? स्त्रियाही पॉर्न बघतात.. त्यांना तरीही रेप वगैरे गोष्टींचा त्रास होतोच, त्याही तीव्रतेने प्रतिक्रिया देतात.. त्याही दुतोंडी असतात का?
माझ्या मते असभ्य माणुस तो असावा ज्याला स्त्रीची केवळ शाररिक ओढच आहे.. त्याशिवाय तिला काही मन आहे.. तिचं तिला काही स्वातंत्र्य आहे, अधिकार आहेत हे ज्याला मान्य नाही तो..
असा माणुस केवळ तिला तसं कल्पत नाही तर समोर दिसणार्‍या आणि आवाक्यातल्या प्रत्येक स्त्रि शरीरावर त्याचा जणु जन्मसिद्ध हक्क आहे असं वागतो.. आपाप्ल्या कुवती प्रमाणे तिला जाता येता मुद्दाम सहेतुक स्पर्श करतो.. किंवा बसमध्ये उलट्या दिशेने चढुन-उतरुन नको तिथे हात लावतो.. गर्दीचा फायदा घेऊन त्रास देतो.. एकटी सापडली तर बळजबरी करतो.. चौघांना मिळुन उचलता आली तर मेंदुतल्या प्रत्येक विकृत भावना ट्राय करुन पहातो.. जमल्यास मारुन टाकतो..

प्रत्येक पॉर्न बघणारा पुरुष हे करत नाही.. आणि प्रत्येक पुरुष निश्चितपणे पॉर्न बघतो.. त्यासाठी त्याची कारणं काहीही असतील.. ती चुक आहेत का बरोबर.. असं करावं की करु नये हे मला माहित नाही.. पण तरी अनेक (बहुतांश म्हणायचा मोह होतोय..पण दुर्दैवानी तसं नाहीये..) पुरुषांच्या मनात सीमारेषा पक्की असावी..

त्यामुळे मला नाही वाटत की "तसल्या" गोष्टी बघुनही पुन्हा आरोपींना शिव्या घालणारे, दुतोंडीच असतात.. सरसकट सगळ्या पुरुषांना झोडपण्यात अर्थ नाही..

Madhavi_Bhave's picture

4 Mar 2015 - 4:51 pm | Madhavi_Bhave

सह्मत!!!

माझ्या मते असभ्य माणुस तो असावा ज्याला स्त्रीची केवळ शाररिक ओढच आहे.. त्याशिवाय तिला काही मन आहे.. तिचं तिला काही स्वातंत्र्य आहे, अधिकार आहेत हे ज्याला मान्य नाही तो..

अगदी नेमके.

अत्रन्गि पाउस's picture

5 Mar 2015 - 12:25 pm | अत्रन्गि पाउस

अगदी अगदी

नाखु's picture

5 Mar 2015 - 12:59 pm | नाखु

खंप्लिट अनुमोदन

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2015 - 10:40 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

बाकी कवितेत/मुक्तकात, चुकल्या पेक्षा माकल्यातच जास्त भावना !

बाप्पू's picture

4 Mar 2015 - 6:25 pm | बाप्पू

आपल्याशी पूर्णपणे सहमत .

सांगलीचा भडंग's picture

4 Mar 2015 - 6:39 pm | सांगलीचा भडंग

सहमत . उत्तम प्रतिसाद

मोहनराव's picture

4 Mar 2015 - 6:46 pm | मोहनराव

उत्तम प्रतिसाद

चुकलामाकला's picture

4 Mar 2015 - 8:03 pm | चुकलामाकला

प्रतिसाद आवडला आणि विचार पटले.

स्वाती२'s picture

4 Mar 2015 - 8:03 pm | स्वाती२

सहमत!

सरसकट सगळ्या पुरुषांना झोडपण्यात अर्थ नाही..
माझ्या मते असभ्य माणुस तो असावा ज्याला स्त्रीची केवळ शाररिक ओढच आहे.. त्याशिवाय तिला काही मन आहे.. तिचं तिला काही स्वातंत्र्य आहे, अधिकार आहेत हे ज्याला मान्य नाही तो.

सहमत.

बाळ सप्रे's picture

5 Mar 2015 - 12:17 pm | बाळ सप्रे

नेमका प्रतिसाद..

आपल्या भावनांना वाट करुन देताना दुसरे कोणी त्यामुळे ऑफेन्ड होउ नये यासाठी ब्राउजिंग हिस्ट्री डिलीट करणे वगैरे तर खरा सभ्यपणा..
मानवी मनात प्रचंड विचार चालू असतात... त्यातले नेमके काय प्रकट करायचे आणि काय मनातच ठेवायचे की ज्यायोगे दुसर्‍याच्या वैयक्तिक कक्षेत प्रवेश होणार नाही हे ज्याला समजते तो सभ्य ..

मृत्युन्जय's picture

5 Mar 2015 - 12:28 pm | मृत्युन्जय

पिराच्या एका प्रतिसादातच धागा संपला आहे खरे म्हणजे. बाकिच्यांनी फक्त +१ केले तरी चालेल :)

चिगो's picture

5 Mar 2015 - 5:57 pm | चिगो

+१००

सुधीर's picture

5 Mar 2015 - 5:05 pm | सुधीर

http://m.youtube.com/watch?v=fLg131SZk1o
विषय नाजूक आहे. बर्याच प्रश्नांना स्पर्ष करतो. आणि तो योग्य पद्धतीने हाताळला आहे.

आणि प्रत्येक पुरुष निश्चितपणे पॉर्न बघतो

हे कसे समजले?
मला किमान एक तरी माणुस माहित आहे की जो पॉर्न बघत नाही.

बाकी प्रतिसाद +१

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 6:17 pm | प्रसाद गोडबोले

मीही आजवर अजिबात पॉर्न पाहिले नाहीये .

सौंदाळा's picture

5 Mar 2015 - 6:18 pm | सौंदाळा

बघा २ जण इथेच झाले.
उगा आपले काहीतरीच

बॅटमॅन's picture

5 Mar 2015 - 6:27 pm | बॅटमॅन

मीही नाही.

मृत्युन्जय's picture

5 Mar 2015 - 6:31 pm | मृत्युन्जय

पॉर्न म्हणजे काय?

बॅटमॅन's picture

5 Mar 2015 - 6:35 pm | बॅटमॅन

हाच प्रश्न मलाही पडला आहे.

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 6:40 pm | प्रसाद गोडबोले

+२

हेच विचारतो .

हाडक्या's picture

5 Mar 2015 - 9:10 pm | हाडक्या

पॉर्न म्हणजे काय?

बाळाला द्या पॉर्न पॉर्न,
बाळ होईल गुटगुटीत छान.. :)))

(वि.सू. : पहिल्या ओळीतले बाळ १८+ असावे असे कायदा सांगतो)

कानडाऊ योगेशु's picture

6 Mar 2015 - 1:51 pm | कानडाऊ योगेशु

पॉर्न म्हणजे काय?

बहुदा पॉपकॉर्न चा अपभ्रंश का काय म्हणतात ते असावे.

पिलीयन रायडर's picture

5 Mar 2015 - 6:31 pm | पिलीयन रायडर

१. तुम्हाला बघणारे किती माहित आहेत आणि न बघणारे किती? मी बघणारे असंख्य लोक सांगु शकते, तुम्ही न बघणारे दोनच सांगु शकला आहात. त्यामुळे अपवादाने नियम सिद्ध होतो वगैरे...

२. बघा.. न बघा.. मला काही फरक पडत नाही.. मी कुणाला जज सुद्धा करत नाहीये. मी फक्त मुद्दा मांडला की पॉर्न बघणे हा सभ्यतेचा निकष असु शकत नाही.

३. ते जे दुर्मिळ २ लोक (किंवा अजुनही) आहेत जे पॉर्न बघत नाहीत, त्यांचे माझ्यातर्फे मनापासुन अभिनंदन..! वैयक्तिक पातळीवर मलाही ती गोष्ट आवडत नाही.

सौंदाळा's picture

5 Mar 2015 - 6:58 pm | सौंदाळा

कहर आहे
दोनच सांगु शकला म्हणजे माझ्या जवळाच्या ५-६ मित्रांपैकी जे आहेत ते मी सांगितले
मी प्रत्येक ओळखीच्या विचारत नाही बाबारे तु पॉर्न बघतोस का
आता इथेच तीन झाले प्रगो, बॅट्मॅन, मृत्युंजय असे बरेच असतील.

मी बघणारे असंख्य लोक सांगु शकते

टाळ्या, इतक्यातच प्रत्येकवरुन असंख्यवर आला

पिलीयन रायडर's picture

5 Mar 2015 - 7:28 pm | पिलीयन रायडर

भाऊ.. मुद्दा "प्रत्येक पुरुष पॉर्न बघतो" हा आहे की "पॉर्न बघणे सभ्य की असभ्य" हा आहे?
मला काय म्हणायचय ते मी पहिल्या प्रतिसादातच नीट लिहीलय. तुम्ही फाटे फोडत आहात, मुद्द्याला धरुन चर्चा असती तर मी वेळ दिला सुद्धा असता.
शिवाय मी पॉर्न बघणे / न बघणे ह्यावरुन कुणाला दुखावेल असं काहिही विधान केलेले नाही. त्यामुळे तुम्ही का किस पाडताय ते कळायला मार्ग नाही. (किस पाडायला तर मी सुद्धा "कशावरुन तुम्ही खरं बोलताय? तुमच्या माहितीची पडताळणी कुणी न कशी करावी?" वगैरे वगैरे काहिही मुद्दे काढु शकतेच.. फक्त अजुन मला तरी धाग्याचा विषय काय आहे ह्याचे भान आहे..)
ह्याउप्पर.. मी जे लिहीते ते मी प्रुव्ह करावच असं कुठे लिहीलय? मला जे वाटतं ते मी लिहीलं. त्याला बरोबर मानाच असा काही आग्रह केला नाहीये..
तस्मात.. तुमच्याशी अजुन ह्या मुद्द्यावर बोलायची इच्छा आणि वेळ तर त्याहुनही नाही...
धन्यवाद!

मुद्दा पटला त्यासाठी +१ आधीच लिहीले होते
आक्षेप एकाच वाक्याला

प्रत्येक पुरुष हा निश्चितच पॉर्न बघतो या एकाच वाक्याला आहे

हे ही स्प्ष्ट लिहिले होते.
आणि हे निश्चितच दुखावणारे विधान असु शकते.
हेच विधान बहुतांश पुरुष पॉर्न बघतात / बघत असावेत असे लिहिले असतेत तर प्रश्नच नव्हता.

कशावरुन तुम्ही खरं बोलताय? तुमच्या माहितीची पडताळणी कुणी न कशी करावी?"

तुम्ही तर प्रत्येक पुरुष बघतो असे लिहिले आहे याची पडताळणी / पाहणी तुम्ही कशी केली? हे विचारले तर तुम्ही लगेच

ह्याउप्पर.. मी जे लिहीते ते मी प्रुव्ह करावच असं कुठे लिहीलय? मला जे वाटतं ते मी लिहीलं. त्याला बरोबर मानाच असा काही आग्रह केला नाहीये..

त्यामुळे तुम्ही किती सिरियली आणि मुद्देसुद लिहिता हे कळुन चुकले.

पिलीयन रायडर's picture

5 Mar 2015 - 7:46 pm | पिलीयन रायडर

"बहुतांश पुरुष पॉर्न बघतात"
- असे माझ्या प्रतिसादात वाचावे..

मझ्यामते आता कुणाच्या भावना दुखावल्या जाउ नयेत. मुळात मी पोर्न बघणे ह्या गोष्टीला चांगलं वाईट काहीच म्हणत नसल्याने मी "प्रत्येक" म्हणलं तरी माझ्याकडुन मी कुणावर चांगलं वाईट असण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुठलाच आरोप करत नाहीये.
पण तुम्हाला ते आक्षेपार्ह वाटत असेल तर ठिके.. मी माझं वाक्य "बहुतांश" करायला तयार आहे (मला ते मान्य नाही तरीही..)

त्यामुळे तुम्ही किती सिरियली आणि मुद्देसुद लिहिता हे कळुन चुकले.

बरं...

सौंदाळा's picture

5 Mar 2015 - 7:54 pm | सौंदाळा

धन्यवाद
खरच सांगतो माझ्या ५-६ जवळच्या मित्रांपैकी एकजण अजिबात पॉर्न बघायचा नाही, बाकीचे बघायचे तेव्हा हा यायचा नाही.
खुपच देवभोळा आणि अत्यंत हुशार मुलगा. पण त्याच्या अशा सवयींमुळे त्याला बाकीची मुलेच विक्षिप्त समजायची (आम्ही ५/६ मित्र सोडुन)
अजुन एक पॉर्न बघण्यामुळे अशा (बलात्करी) लोकांच्या वि़कृत मानसिक भावनांचा निचरा होत असेल असे म्हणावे तर ते ही नाही. उलट पॉर्न सहज उपलब्ध झाल्यापासुन बलात्काराच्या प्रमाणात वाढ झालीय (विदा नाही)

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 7:54 pm | प्रसाद गोडबोले

पण

पॉर्न म्हणजे नक्की काय ?

प्रदीप's picture

5 Mar 2015 - 9:16 pm | प्रदीप

पॉपकॉर्नचा शॉर्टफॉर्म आहे तो. :)

पॉपकॉर्न म्हणजे काय? अनेकवेळा विशीष्ट विषयांवरील चर्चा इथे कुणी सुरू केली (उदा. पुणे- मुंबई) की जे घेऊन अनेकजण झाडांवर चढून बसतात, ते!

हाडक्या's picture

5 Mar 2015 - 9:15 pm | हाडक्या

आता इथेच तीन झाले प्रगो, बॅट्मॅन, मृत्युंजय असे बरेच असतील

अरारा.. तुमाला वरचे पर्तिसाद कल्लेच नाय म्हनायचे मग.
खासकरून बॅट्याची "किर्तू" तर बरीच प्रसिद्ध आहे.. (हो हो "किर्तू"च) :))))

किर्तू आमची न्हवे. तुमची आहे काय =))

हाडक्या's picture

6 Mar 2015 - 2:53 pm | हाडक्या

आमची असती तर काय.. तुमाला मुक्त संचार दिला असता सगळीकडे.. ;)

कानडाऊ योगेशु's picture

6 Mar 2015 - 1:56 pm | कानडाऊ योगेशु

आणि प्रत्येक पुरुष निश्चितपणे पॉर्न बघतो

हे जर विवादास्पद विधान असेल तर त्यात असा बदल करतो.

प्रत्येक पुरुषाच्या मनाता पॉर्न बघायची इच्छा असतेच असते.

आणि ज्या पुरुषाच्या मनात अशी इच्छाही असत नाही तर मै कहता हूं कि वोह पुरुष पुरुष ही नही है बल्की......... महापुरुष है!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2015 - 4:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकतर हे टोक, नाहीतर दुसरं, हे काही बरोबर नाही... काळ्या-पांढर्‍या टोकांच्या मध्ये अख्खा वर्णपट पडला आहे, चुकलामाकला !

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2015 - 7:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

पिरांना +१००

सस्नेह's picture

4 Mar 2015 - 5:29 pm | सस्नेह

सरसकटीकरण पटले नाही.

प्रसाद१९७१'s picture

4 Mar 2015 - 6:38 pm | प्रसाद१९७१

मला पैसे मिळावेत असे वाटणे चुक नाही, पण ते मिळवण्यासाठी चोरी किंवा खून करणे चुक आहे.

उगाचच काहीतरी लिहीले आहे असे दिसतय. खरे तर अगदी निरर्थक आहे.

आदिजोशी's picture

4 Mar 2015 - 7:00 pm | आदिजोशी

उगाच ताज्या विषयाचा वापर करून टिआरपी मिळवण्यासाठी केलेली कविता आहे. मुळ विषयाचे गांभीर्यच कळले नाही हे स्पष्टपणे जाणवते आहे.

उगाचच काहीतरी लिहीले आहे असे दिसतय. खरे तर अगदी निरर्थक आहे.

उगाच ताज्या विषयाचा वापर करून टिआरपी मिळवण्यासाठी केलेली कविता आहे.

असहमत.

मुळ विषयाचे गांभीर्यच कळले नाही हे स्पष्टपणे जाणवते आहे.

अंशतः सहमत.

त्यांनी कळकळीने लिहिलंय असं वाटतय ( मी चूक असेन तरी ही) पण बेसिकमध्ये लोचा आहे आणि पिराने वरती स्प्ष्ट केलाय.

चुकलामाकला's picture

4 Mar 2015 - 9:56 pm | चुकलामाकला

समजून घेतल्याबद्दल धन्यवाद!
मला काही प्रश्न अस्वस्थ करतात
आजकाल खाजगी आणि जाहीर यातील फरक पुसट होत चाललाय . फु बाई फु वगैरे विनोदी मालिकांमधले विनोद हे नवीन नाहीत , आम्हीही एका वयात हे करायचो पण आतासारखे ते सर्वमान्य झाले नव्हते. आज ऑफीस मधील ट्रेनमधील सहकारी, वगैरे जेव्हा सरळ सरळ बरोबरीने काम करणाऱ्या मुलींच्या बद्दल जे बोलतात, ते बरयाचदा सभ्य नसतेच . पण पूर्वीपेक्षा अलीकडे त्याचे प्रमाण खूप वाढलेय .
वयात आलेल्या माझ्या मुलीला आज ट्रेन मधून बसधून एकटी पाठवताना भीती वाटते हे सत्य आहे, आधी विचार जन्मतात आणि मग कृती होते. पोर्न बघणे म्हणजे असभ्य मुळीच नाही पण याचे वाढते प्रमाण ( सहज ऊपलब्ध असल्यामुळे आणि आता ते सर्वमान्य झाल्यामुळे) पुढे अशा अनेक मुकेशाना जन्म तर देणार नाही ना ?

आजच दवाखान्यातला रिसेप्शन मुलीला एक मुलगा बरेच दिवस त्रास देतोय म्हणुन पोलिस कंप्लेंट करावी लागली, इन्सपेक्टर मॅडमने जेंव्हा त्याला धुतला तेंव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली की साहेबांना फक्त ती फिरवण्यासाठी हवी होती,बाकी काही नाही. ही विकृत मानसिकता वेळीच थांबवणे गरजेचे आहे.नव्हे प्रत्येक सुजान नागरिकाने यात पुढाकार घेवुन हे थांबवले पाहिजे.चुका स्त्री आणी पुरुष दोन्ही बाजुने होतात पण त्या वेळीच आटोक्यात आणल्या गेल्याच पाहिजेत.

काळा पहाड's picture

5 Mar 2015 - 7:00 pm | काळा पहाड

तुमच्याकडे दंबूक आहे ना डॉक्टर! कशाला पोलीस कंप्लेंट.

बाबा पाटील's picture

6 Mar 2015 - 8:47 pm | बाबा पाटील

पुलिस की मार से पुलिस का डर सबसे बडा होता. अस कुठ तरी ऐकल होत बुवा.
दुसरे घटना क्लिनिकच्या परिसरातील होती,अशा वेळी कायदाचा बांबुच बरा असतो नाही का.

नाखु's picture

5 Mar 2015 - 9:38 am | नाखु

तरी सरसकटीकरण करणे पटणारे नाही..
जी गोष्ट्/कृती आपल्या मुली/बहिण्/आई/मैत्रीण बाबत बोललेली वा कल्पना केलेली सुद्दा आपल्याला तिरस्कृत्/निंदनीय वाटते ती मी इतरांबाबतही करणार नाही.
हा दृष्टीकोण दोन्ही बाजूंनी ठेवणे हितावह आहे.

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 2:38 pm | संदीप डांगे

चुकलामाकला यांच्या कवितेशी सहमत आणि पिराताईंच्या प्रतिसादाशी सहमत. दोन सर्वस्वी वेगवेगळे मुद्दे आहेत हे आपण समजून घेतले पाहीजे असे मला वाटते.

कवितेमधे मांडलेली वस्तुस्थिती आहे आणि प्रतिसादामधे मांडलेला आदर्शवाद आहे. 'असे आहे' आणि 'असे असावे' या दोन मुद्द्यांमधे फक्त वाद होऊ शकतात, कुठलेही परिणामकारक निष्कर्ष निघू शकत नाहीत.

कवितेतल्या परिस्थितीतून प्रत्येक पुरुष जातोच जातो, हे प्रत्यक्ष सत्य आहे. कुणी पुरूष हे नाकारत असेल तर तो ढोंगी आहे. स्त्रियांचे कपडे, मुक्त फिरणे वैगेरे गोष्टी फक्त एक साधन आहे स्त्रियांवर सत्ता गाजवायला उत्सुक पुरुषांचे. उद्या सगळे नागडे फिरायला लागले तरी स्त्रियांवर मालकीहक्क दाखवायला पुरुष आणखी काही शोधून काढतील. हा प्रश्न आजचा नाही आहे. पुराणकाळापासून परस्त्री मातेसमान मानण्याची शिकवण द्यावी लागावी यातूनच परस्त्रीकडे बघायची नैसर्गिक उर्मी आणि त्याचा स्पष्ट हेतू दर्शवते. मनातला निसर्ग स्त्रीकडे खेचतो तर समाजाचे लादलेले नियम, संस्कार तसे करण्यापासून रोखतात. याच दोलायमान अनैसर्गिक स्थितीतून स्त्रियांसाठीचे जाचक नियम तयार केले जातात. तिने हे घालू नये, असे बोलू नये, तसे फिरू नये. कारण काय तर त्यामुळे आमच्यातला निसर्ग उडी मारून बाहेर येइल मग आमचा काय दोष? असा बाळबोध प्रश्न पुरुष विचारतात.

पुरुषसत्ताक समाजामधे स्त्रियांना एक स्वतंत्र माणूस म्हणून मान्यता देणे हे खरंच जड जाते. त्यांच्याकडे लिंगविरहीत नजरेने बघणे कुणालाच शक्य होत नाही. स्वतःच्या आईवर, मुलीवर, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष याची स्पष्ट उदाहरणे आहेत. यांचे प्रमाण लाखात एक असले तरी बहुसंख्य पुरुष विशिष्ट वयात निदान अशा समागमाची इच्छा बाळगणारे तरी असतातच. पण या इच्छा खूप खूप व्यक्तिगत आणि लपवलेल्या असतात. कारण सामाजिक मान्यता नाही म्हणून. लैंगिक शिक्षणाचा येथे काहीही उपयोग नाही. ते म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी प्रकार आहे. लैंगिक संबंधांबाबत मुक्त विचार असणार्‍या समाजातही बलात्कार होतातच. स्त्रियांकडे फक्त लैंगिक सुख देणारी वस्तू म्हणून पाहणे हेच समस्यांचे मूळ आहे. तिची संमती असल्याशिवाय संबंध करू नये असा विचारही याच धारणेतून येतो. गायीचा मूड बघून गवळी दूध काढतात म्हणजे ते गायीला एक स्वतंत्र प्राणी म्हणून मान्यता देतात असा अर्थ होत नाही. ज्या दिवशी स्त्रिया समागमाचा निर्णय स्वत:चा स्वतः कुठल्याही आदेशाशिवाय, सामाजिक संकेताशिवाय, दडपणाशिवाय घेतील त्या दिवशी स्त्रीला एक स्वतंत्र माणूस म्हणून मान्यता मिळाली असे मानता येइल. बागेतले प्रत्येक फूल हे आपण हुंगावे म्हणून फुलले आहे असे विचार समस्त पुरुष सोडून देतील तो सुदिन.

दुसरा विचार: बलात्काराच्या घटनांना विरोध करणारे पुरूष. यांचा नेमका कशाला विरोध असतो ही एक वेगळीच बाब आहे. बहुतेक पुरूष बलात्कारी इसमास निर्मम शिक्षा व्हाव्यात अशा तिव्र भावना व्यक्त करतात. त्यामागे स्त्रियांना माणूस म्हणून वागणूक मिळावी हा स्पष्ट हेतू दिसत नाही. बर्‍याचदा असे बघण्यात आले आहे की उच्चवर्गीय स्त्रीवर निम्नवर्गीय पुरुषाचा बलात्कार समाजास जास्त त्रास देणारा ठरतो. निर्भया प्रकरण एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. माध्यमांमधे चर्चिल्या जाणार्‍या आणि लक्षात राहणार्‍या प्रकरणांमधे बलात्काराच्या मूळ प्रेरणेपेक्षा वर्गीय संघर्ष जास्त दिसून येतो. (जाणकारांनी काही वेगळे मत मांडल्यास स्वागत आहे.) याच प्रकरणात समान वर्गीय परिस्थिती असती तर खरेच हे प्रकरण एवढे चघळले गेले असते का किंवा भूतकाळात एखादे उदाहरण आहे का?

बलात्कारास विरोध होत नाही तो फक्त त्यातल्या अमानुषपणास होत आहे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे.

तिसरा विचारः बलात्काराच्या घटना रो़खण्यासाठी सरकार किंवा समाज ज्या काही सुधारणा सुचवत आहे त्या खरंच हास्यास्पद आहेत असे माझे व्यक्तिगत मत आहे.

तुर्तास इतकेच.

कपिलमुनी's picture

5 Mar 2015 - 5:21 pm | कपिलमुनी

स्वतःच्या आईवर, मुलीवर, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष याची स्पष्ट उदाहरणे आहेत. यांचे प्रमाण लाखात एक असले तरी बहुसंख्य पुरुष विशिष्ट वयात निदान अशा समागमाची इच्छा बाळगणारे तरी असतातच.

अहो विकृत , बहुसंख्य शब्द काढा

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 5:59 pm | संदीप डांगे

मुनीवर,

माझ्या वाक्याला व्यक्तिगत घेण्याची काही गरज नाही. मानसशास्त्राच्या या क्षेत्रातल्या तज्ञ लोकांकडून खात्री करून घ्या. तुम्ही असे तज्ञ असाल तर तुमचा अभ्यास मांडा. सत्य त्रासदायक आहे म्हणून मला विकृत म्हणण्यात काही अर्थ नाही.

बॅटमॅन's picture

5 Mar 2015 - 6:02 pm | बॅटमॅन

विदा द्या की. एखाद्या मानसशास्त्रज्ञाने सहज तुमची मजा केली नसेल कशावरून?

स्वतःच्या आईबहिणीबरोबर संभोगाची इच्छा होणारे किती % पुरुष असतात समाजात याचा काय विदा आहे ते बघायला आवडेल.

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 6:10 pm | प्रसाद गोडबोले

http://en.wikipedia.org/wiki/Oedipus_complex

Sigmund Freud, who coined the term "Oedipus complex" believed that the Oedipus complex is a desire for the parent in both males and females; Freud deprecated the term "Electra complex", which was introduced by Carl Gustav Jung in regard to the Oedipus complex manifested in young girls. -- विकिपेदिया

फ्रॉईडच्या थेर्‍या जशाच्या तश्या अलीकडे कोणीच स्वीकारत नाहीत हो. हा लै जुना माल झाला आता.

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 6:15 pm | प्रसाद गोडबोले

अ‍ॅग्रीड इन्डीड !

( मी हेच खालच्या प्रतिसादात टाईपत होतो )

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 6:14 pm | प्रसाद गोडबोले

सिग्मंडराव भलताच यड*वा महान मानसशास्त्रज्ञ होता ... त्याची कित्येक मते आजच्या काळात आधुनिक मासशास्त्रज्ञांनी चुकीची ठरवली आहेत . हे ही त्यातील एक असु शकेल . २०० वर्षांपुर्वी त्याने जेव्हा हे मत मांडले असेल तेव्हा काय गदारोळ झाला असेल ह्याची कल्पना करवत नाही .

पण काही म्हणा सिग्मनड खत्रुड होता !

बॅटमॅन's picture

5 Mar 2015 - 6:15 pm | बॅटमॅन

अगदी अगदी.

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 6:26 pm | संदीप डांगे

एखाद्या मानसशास्त्रज्ञाने सहज तुमची मजा केली नसेल कशावरून

असेही असेल... कदाचित.

विदा मिळाल्यास जरूर देइन.

कपिलमुनी's picture

5 Mar 2015 - 6:07 pm | कपिलमुनी

व्यक्तिगत घेणारच नाही . या विधानाचा निषेध मिपाकर करतीलच .
आणि तुम्ही ते विधान केले आहे त्यामुळे कोणत्या तज्ञ लोकांकडून तुम्ही ही माहिती मिळवलीत?

पॉर्न जगता मधे आई-मुलगा,बहिन-भाऊ यांच्या विषयीचे विडीओ आनी कथा यांना जास्त मागनी असते.

अत्रन्गि पाउस's picture

8 Mar 2015 - 8:01 am | अत्रन्गि पाउस

पोर्न फिल्म्स मधे आधी जाहीर करतात का ? आता समोरील जोडी अमुक तमुक नात्यातली आहे ...वगैरे ? किंवा प्रेक्षकांना पोर्न 'कथा' आवश्यक असते ??
नै काये कि मी पोर्न बघत नाही म्हणून विचारले

पॉर्न फिल्म मधे काम करनारे हे कलाकार असतात.खरे नाते नसते. स्टोरी असते.नाते जाहिर करतात. शेवट ठरलेला असतो .बरेच दिवस वडील - मुलगी यांची फिल्म टॉप व्हीवड लिस्ट मधे होती.
पॉर्न च सोडा,सॉंग ऑफ आईस अॅड फायर ह्या जगप्रसीद्द पुस्तकावर बेतलेल्या गेम ओफ्फ थ्रोनस ह्यामलिकेत दाखवलेले बहीन भावाचे संबंध आनी लोकांना त्याविशयी असलेली उत्सुकता हेही वाढलेल्या टीआरपी चे एक कारण आहे.(एकमेव नव्हे)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Mar 2015 - 11:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गेम ऑफ थ्रोन्स ची तुलना पॉर्न शी करु नका. धन्यवाद. ती कथा ज्या काळामधे आणि रेल्म मधे घडतीये त्या काळामधे सर्रास बहिण भावाचही लग्न लाउन देत असतं. त्या संबंधांमागे जी काही "पॉवर कॉन्संट्रेशन" ची कारणं आहेत ती आणि सरसी लॅनिस्टरचा स्वभावही लक्षात घ्या. एका उत्कृष्ट कथेला अश्या खालच्या पातळीवर नेउ नका.

विषय पॉर्न चा नसुन रक्तातील नात्यातील संबंधाबद्दल आहे. डांगे यांनी वापरलेला बहुसंख्य शब्द भारतीय संस्कृतित वाढलेल्या लोकांना नक्कीच चूकीचा वाटेल, तो चूकीचा आहेच. परंतु तसे नसतेच,किंवा दुर्मीळ असते असे बोलुन जी आगपाखड चालू आहे ती चुक वाटते. इतर सस्तन प्रान्यांमधे असे संबंध असतात. मानवाने आपल्या विचारांनी उत्तम सामाजिक व्यवस्था निर्माण केली. त्यात बेसिक इन्सींक्ट वर मर्यादा घालन्यात आल्या आहेत.

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2015 - 5:55 pm | श्रीगुरुजी

स्वतःच्या आईवर, मुलीवर, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष याची स्पष्ट उदाहरणे आहेत. यांचे प्रमाण लाखात एक असले तरी बहुसंख्य पुरुष विशिष्ट वयात निदान अशा समागमाची इच्छा बाळगणारे तरी असतातच. पण या इच्छा खूप खूप व्यक्तिगत आणि लपवलेल्या असतात. कारण सामाजिक मान्यता नाही म्हणून.

शी! ही वाक्ये अत्यंत विकृत मानसिकतेची आणि पराकोटीच्या अज्ञानाची परमावधी असलेली आहेत.

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 6:13 pm | संदीप डांगे

वा वा गुरूजी,
झेपले नाही म्हणून सरळ विकृत आणि अज्ञानी?
'काय आहे' आणि 'काय असावे' यावर इथे परत फ्रेंच हत्याकांडासारखा वादविवाद करण्यात अर्थ नाही.

पोलिसांच्या अहवालाप्रमाणे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बलात्कारी पुरुष हे प्रत्यक्ष नात्यातले, अतिशय जवळचे नातलग आणि रोजच्या ओळखीतले असतात. होणारे बलात्कार आणि प्रत्यक्ष नोंदवले जाणारे बलात्कार यात प्रचंड तफावत आहे हे तर उघड सत्य आहे. त्यानुसार होणारे बलात्कार आणि होऊ शकणारे बलात्कार यांच्यातही तेवढीच तफावत आहे.

तरी मी 'बहूसंख्य' असा शब्द वापरला आहे. सिग्मंड फ्रायडसारखं सरसकटीकरण केले नाही.

"पोलिसांच्या अहवालाप्रमाणे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बलात्कारी पुरुष हे प्रत्यक्ष नात्यातले, अतिशय जवळचे नातलग आणि रोजच्या ओळखीतले असतात".
प्रत्यक्ष नात्यातले म्हणजे बाप, सख्खा भाऊ किंवा मुलगा नव्हेत. तर मावस चुलत ई भाऊ किंवा मामा काका ई असतात. यात संस्काराचा मोठा भाग आहे.
आपण दिलेले उदाहरण हे बलात्कारी पुरुषांचे आहेत. मुळात सर्वसामान्य लोकांत बलात्कारी किती आहेत आणी त्यातील बापकिंवा सख्खा भाऊ किती?
म्हणजे आपल्या मुलीवर किंवा बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष ६२ कोटी मध्ये किती असतील काही शे ?
याच्या १०० पट माणसे तशी इच्छा मनात बाळगणारे असतील तरीही हे प्रमाण नगण्यच असेल. बहुसंख्य म्हणजे निदान ५१% हवेत या न्यायाने ३२ कोटी पुरुष आपल्या आई मुली किंवा बहिणीवर एकदा तरी बलात्काराची इच्छा बाळगून आहेत/ होते हे म्हणणे फारच अतिशयोक्ती आहे.
कोणत्य स्त्रीशी संभोग करावा आणि कोणाबरोबर नाही यात संस्कृतीचा फार मोठा भाग आहे. काही संस्कृती मध्ये सख्ख्या बहिणीबरोबर लग्न करणे मान्य आहे. परंतु भारतीय संस्कृती मध्ये हे निषिद्धच आहे यात आई किंवा मुलगी येणे अर्थात शक्यच नाही. मग जर आपल्या म्हणण्याप्रमाणे ३२ कोटी पुरुष अशी इच्छा बाळगून असतील तर आपले संस्कार अगदी प्राण्यांपेक्षाही खालच्या थराचे मानायला पाहिजेत. कारण वन्य प्राण्यांमध्ये हि सख्ख्या भाऊ बहिणीत/ आई मुलात संकर होताना दिसत नाही. सिंह वाघ किंवा कोल्हे कुत्रे यात आपल्या कळपापासून नर दुसर्या कळपात जातो /हाकलला जातो.
तेंव्हा आपले म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही असे वाटते. मनोविकार शास्त्रात असे वाचल्याचे आठवत नाही. फ्रोईडची गृहीतके कालबाह्य आणि चुकीची मानलेली असून आता फक्त मनोविकाराचा इतिहास म्हणून शिकवली जातात हे नम्रपणे नमूद करू इच्छितो.

संदीप डांगे's picture

6 Mar 2015 - 12:00 am | संदीप डांगे

माझ्या प्रतिसादात मी 'भारतीय' पुरूष असे विशेषण वापरलेले नाही आणि ते मला अध्याह्रतही नाही. विषय भारतीय संस्कृतीचा नाही. आपल्या संस्कृतीत मान्य नाही म्हणून ते सत्य नाही असे नाही ना? वाघ-सिंहाचे कळप नसतात. कोल्हे-कुत्रे यांचे कळप असले तरी बरेच नर एकाच कळपात असतात. मादीसाठी त्यांच्यात लढाया होतात. त्यांच्यात संकर होत नाही असे आपले म्हणणे चुकीचे आहे असे वाटते. कारण कळप हे कुटंबासारखे असतात पण त्यांच्यात माणसांप्रमाणे स्थळ सांगून येत नाही. एका कळपातून दुसर्‍या कळपात जाणे इतके सहज नसते.

मनुष्यप्राण्याची मूळ नैसर्गिक अवस्था आणि सद्य सामाजिक परिस्थिती यात प्रचंड तफावत आहे. कालमानानुसार बर्‍याच समजुतींमधे फरक पडत आलेला आहे. तो पडत राहीन. त्यामुळे मान्यता बदलतात पण नैसर्गिक सत्य बदलत नाही. सामाजिक संस्कार तर वरून लादलेले आहेत. तसे नसते तर बलात्कार वाईट संस्काराचा भाग आहे असे मानल्या गेले नसते. (बलात्कार हा वेगवेगळ्या मानसिक, शारिरीक भावभावनांचा परिणाम आहे. चांगल्या-वाईट संस्कारांशी त्याचे काही घेणे-देणे नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.)

स्त्रियांकडे बघणार्‍या पुरुषांच्या नजरा बघणे हा माझा फार जुना छंद. त्यांच्या नजरा आपण पकडल्यावर होणारे त्यांचे चेहरे बघून मजेदार करमणूक होते. सगळ्याच नाही पण बहुसंख्य पुरुषांच्या वखवखलेल्या नजरा स्त्रियांकडे भक्ष्य म्हणून बघत असतात. इतके की नजरेनेच मनातल्या मनात काम उरकून घेतात. ते नैसर्गिक आहे असे स्वतःपुरते ते मानतात त्यावर एकमेकांची भलामण सुद्धा करतात. ते सगळे बलात्कारी आहेत किंवा करू शकतात असे काहीच नाही. म्हणून त्यांच्यात तशी इच्छाच नाही असे नाही. (थोडक्यात, कुणाचाही काहीही भरवसा देता येत नाही.)

मुळात बलात्कार आणि अंतर्मनातले शारिरीक आकर्षण हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यांची गल्लत होऊ नये.

बादवे, सिग्मंड फ्रायड नंतर समाजाच्या प्रचलित जाणीवा हलवून सोडणारे काही कुणी मांडले आहे का?

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2015 - 8:36 pm | श्रीगुरुजी

>>> झेपले नाही म्हणून सरळ विकृत आणि अज्ञानी?

तुमच्या निराधार आणि विकृत कल्पना इतरांना झेपाव्या अशी तुमची अपेक्षा दिसतेय.

एकतर तुम्ही जी विकृत विधाने केली आहेत ती निराधार आहेत कारण तुम्हीच कबूल केलंय की तुमच्याकडे कोणतीही आकडेवारी नाही. तरीसुद्धा तुम्ही "बहुसंख्य" पुरूषांना तुमच्या निराधार विकृत कल्पनेत बसवून मोकळे झालात आणि चक्क त्याचे समर्थन करीत आहात.

>>> पोलिसांच्या अहवालाप्रमाणे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बलात्कारी पुरुष हे प्रत्यक्ष नात्यातले, अतिशय जवळचे नातलग आणि रोजच्या ओळखीतले असतात. होणारे बलात्कार आणि प्रत्यक्ष नोंदवले जाणारे बलात्कार यात प्रचंड तफावत आहे हे तर उघड सत्य आहे. त्यानुसार होणारे बलात्कार आणि होऊ शकणारे बलात्कार यांच्यातही तेवढीच तफावत आहे.

यातले किती टक्के बलात्कार मुलाने स्वतःच्या आईवर, सख्ख्या बहिणीवर, स्वतःच्या सख्ख्या मुलीवर केले आहेत? याची आकडवारी आहे का? का मनाला येईल ते फेकायचं आणि त्याचं समर्थन करत बसायचं?

खाली डॉ. सुबोध खरे यांनी मुद्देसूद प्रतिसाद दिला आहे. तो तुम्हाला समजला असावा अशी फक्त आशाच करू शकतो. नसेल समजला तर फक्त सहानुभूती व्यक्त करू शकतो.

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2015 - 8:41 pm | श्रीगुरुजी

वरील प्रतिसाद समजला असावा अशी इच्छा आहे. नसेल समजला किंवा समजून उमजून परत स्वतःच्या विकृत समजूतीचे समर्थन करत रहाल, तर मात्र तुम्हाला तुमच्याच निष्कर्षांवर आधारीत एक अत्यंत असभ्य व अवघड प्रश्न विचारीन. तो प्रश्न विचारायची खरोखरच इच्छा नाही, परंतु स्वतःच्या वाक्यांचे समर्थन सुरूच ठेवलेत तर तो प्रश्न असभ्य असला तरी विचारावाच लागेल.

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 10:03 pm | संदीप डांगे

सुखी राहा...

तुम्हाला नेहमीच प्रत्येक गोष्ट वैयक्तिक आणि व्यक्तिगत केल्याशिवाय चैन पडत नाही असे दिसते. त्यामुळे आपल्याला काही वाद घालायचा नाही बुवा. कारण मी बीफ खाणार्‍यांची बाजू घेतली तर 'तुम्हाला' असे 'वाटते' की मीपण बीफ खाणाराच आहे म्हणून त्यांची बाजू घेतो आहे. आम्ही दिलेले कुठलेही पुरावे तुम्हाला चालत नाहीत. स्वत:ला पाहिजे तो निष्कर्ष काढून तुम्ही न्यायाधिशाच्या भुमिकेत शिरता असा अनुभव आहे. अशा चर्चांना आणि असे निष्कर्ष काढणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो.

तुमच्या संस्कारी मनाला 'बहुसंख्य' शब्द खटकला असेल, भावना दुखावल्या असतील तर मागे घेतो. पण तुम्हाला पटत नाही म्हणून जगात असे काही नसतेच असे मात्र म्हणू नका. आणि मी ते इथे मिपावर मांडले म्हणजे त्याचे समर्थन करतो असेही म्हणू नका.

जर्मन सरकारचा निर्णय

अमेरिका

भारत

इथे वाचा

भारत

आणखी भरपूर काही आहे. जेपींनी सांगितल्याप्रमाणे गूगलून बघा.

आजानुकर्ण's picture

5 Mar 2015 - 10:26 pm | आजानुकर्ण

ब्रम्हदेव आणि सरस्वतीचे उदाहरण दिले तर गुरुजींना कदाचित समजेल असे वाटते. (आपल्या महान संस्कृतीतील त्यांना ते लगेच पटेल)

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2015 - 11:32 am | श्रीगुरुजी

>>> तुम्हाला नेहमीच प्रत्येक गोष्ट वैयक्तिक आणि व्यक्तिगत केल्याशिवाय चैन पडत नाही असे दिसते. त्यामुळे आपल्याला काही वाद घालायचा नाही बुवा.

इथे व्यक्तिगत काहीही नाही. आकडेवारी आणि पुरावा नसताना सुद्धा तुमचा विकृत निष्कर्ष तुम्ही जनरलाईज केलात त्याला माझा आक्षेप आहे.

>>> कारण मी बीफ खाणार्‍यांची बाजू घेतली तर 'तुम्हाला' असे 'वाटते' की मीपण बीफ खाणाराच आहे म्हणून त्यांची बाजू घेतो आहे. आम्ही दिलेले कुठलेही पुरावे तुम्हाला चालत नाहीत.

कधी दिलेत पुरावे? आपला विकृत निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कोणतीही आकडेवारी नाही असं तुम्हीच लिहिलं आहे.

>>> स्वत:ला पाहिजे तो निष्कर्ष काढून तुम्ही न्यायाधिशाच्या भुमिकेत शिरता असा अनुभव आहे. अशा चर्चांना आणि असे निष्कर्ष काढणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो.

मी पुराव्यांशिवाय निष्कर्ष काढत नाही. तुमचं एकदम उलटं आहे. तुम्ही कोणताही पुरावा/आकडेवारी नसताना स्वतःला पाहिजे तो निष्कर्ष काढून मोकळे होता. तुम्ही इतरांना फाट्यावर मारा किंवा अजून कोठेही मारा, पुराव्याशिवाय निष्कर्ष काढणे आणि त्याचे अट्टाहासाने समर्थन करीत राहणे हे तुमचे व्यवच्छेदक लक्षण आहे ही वस्तुस्थिती आहे.

>>> तुमच्या संस्कारी मनाला 'बहुसंख्य' शब्द खटकला असेल, भावना दुखावल्या असतील तर मागे घेतो.

तुमच्या विकृत मनोवृत्तीला 'बहुसंख्य' शब्द योग्य वाटला असेल.

>>> पण तुम्हाला पटत नाही म्हणून जगात असे काही नसतेच असे मात्र म्हणू नका. आणि मी ते इथे मिपावर मांडले म्हणजे त्याचे समर्थन करतो असेही म्हणू नका.

तुम्हाला जे असावंसं किंवा व्हावंसं वाटतं ते जगात असतंच किंवा होतंच असं नाही. तुम्ही आपल्या कविकल्पनेतून जे काही निष्कर्ष काढता ते आकडेवारीनिशी किंवा पुराव्यानिशी सिद्ध करा एवढंच आमचं म्हणणं.

संदीप डांगे's picture

7 Mar 2015 - 8:53 am | संदीप डांगे

तुमच्या सुसंस्कृत प्रतिसादास उत्तर द्यायची अजिबात गरज नाही पण माझं विकृत मन काही केल्या आवरत नाही. म्हणून ओकतो. व्यक्तिगत नाही म्हणता वरून वैयक्तिक शेरेबाजीही करता हे बाकी खास. असे काही नसेल तर मज पामराला तुमचे दिव्य मराठी कळत नाही असे मान्य करतो. (इथला 'मान्य करतो' हा शब्द उचलून डांगेंनी चूक मान्य केली अशी बोंबाबोंब करत फिरू नका. पीलीज.)

तुम्हाला जे असावंसं किंवा व्हावंसं वाटतं ते जगात असतंच किंवा होतंच असं नाही.>>

गुरुजी, तुम्ही सभ्यतेच्या मर्यादा ओलांडता आहात असे तुम्हाला वाटत नाही काय? मी दिलेल्या लिंका तपासून बघितल्या नसतीलच याची खात्री आहे. बघितल्या असतील तर त्या मी दिल्या आहेत म्हणून तुमच्या न्यायालयात रद्द्बातल ठरतात हेही चांगलेच ठावूक आहे. इंसेस्ट हा प्रकार जगात अस्तित्वातच नाही असे तुमच्या न्यायालयात सिद्ध होईल.

तुम्हाला एवढी आग लागण्यासारखं काय आहे माझ्या प्रतिसादात? तो तुमचा सुसंस्कृत छंद असेल पण म्हणून संपूर्ण प्रतिसाद न वाचता, न विचार करता एका वाक्यावर - तेही एका शब्दावर - धुमाकुळ घालायला मिळतो म्हणून किती सुटायचे याला काही मर्यादा?

आपल्या कविकल्पनेतून जे काही निष्कर्ष काढता ते आकडेवारीनिशी किंवा पुराव्यानिशी सिद्ध करा एवढंच आमचं म्हणणं.>>
माझ्या काही सिद्ध करण्याने तुमच्या मान्यता बदलणार आहेत का? कुणाच्यातरी काहीतरी सिद्ध करण्याने काही महत्त्वाच्या विषयांमधल्या तुमच्या मान्यता बदलल्या, तुम्ही आपलं अज्ञान मान्य केले, माघार घेतली, माफी मागितली याचा काही पुरावा देता काय? तरच तुमच्यासारख्या विद्वान मंडळींसोबत वाद घालण्यात काही अर्थ.

बरं, मी म्हणतोय ते खोटं आहे असे म्हणून मोकळे व्हा ना? दुसर्‍यास हीन, विकृत ठरवल्याशिवाय तुमच्या परमसंस्कारी आत्म्याला परमसंस्कारी असल्याची खात्री पटत नाही का? की चुकून मी म्हणतो ते खरं निघेल याची भीती वाटते? तसे काही नसेल तर मग एवढं खालच्या पातळीवर येऊन दुसर्‍यास हिणकस ठरवून तुम्हाला काय आसुरी आनंद होतो तो तुम्हालाच माहीत.

३३ ओळींच्या माझ्या प्रतिसादात मी लिहिलेले सारेच्या सारे माझ्या कवीकल्पना असून मी एक विकृत विचारांचा माणूस आहे ही सिद्ध करण्याची कोण ही धडपड? मी इतका महत्त्वाचा माणूस आहे की मिपासारख्या लाखो संकेतस्थळापैकी एकावर असणार्‍या हजारो धाग्यांपैकी एका धाग्यावरच्या शेकडो प्रतिसादापैकी नेमका माझाच प्रतिसाद आणि त्यातला एकच शब्द अखंड ब्रह्मांड हलवण्यास कारणीभूत ठरावा हे माझ्या आजच लक्षात आले. तसे होऊ नये म्हणून गुरुजी रणांगणावर लढायीला निघाल्यासारखे षड्डू ठोकून आव्हानं देतायत. अशा बाष्कळ आव्हानांना मी काडीचीही किंमत देत नाही कारण मी म्हणेल तेच सत्य, मलाच सारे कळते, माझे तेच खरे, इतर सर्व अज्ञानी मूर्ख अशी स्वतःची सर्वश्रेष्ठ, सर्वज्ञानी समजूत करून घेतलेली नाही. मी माझ्या स्वतःच्या ज्ञानाला, आकलनाला, माहीतीला, मताला काडीचीही किंमत देत नाही. तुम्ही ती देताय हे माझे अहोभाग्य.

मी आधीच बॅटमॅन यांना उत्तर देतांना माझ्या विधानाच्या सत्यतेची खात्री नाही असे सुचित केले होते. मुद्दा 'बहुसंख्य' ह्या शब्दावरच्या आक्षेपाचा होता. तो शब्द मीच व्यवस्थित आकडेवारी मांडून मागेही घेतला आहे. याचा अर्थ असा होत नाही की जगात असे काही घडतच नाही. वर्तमानपत्रांतून पित्यापासून मुली गर्भवती राहल्याच्या बातम्या वाचल्या आहेत. भावांनी बहीणींवर केलेल्या बळजबरीच्या बातम्या वाचल्या आहेत. हे प्रकार ऐकून विश्वास बसत नाही पण तुमचा विश्वास नाही म्हणून हे घडतच नाही असे नाही. भले प्रमाण ०.०१% असले तरीही.

त्या विधानाचा अर्थ पुरुषांना सरसकट बलात्कारी ठरवणे कधीच नव्हता. मूळ नैसर्गिक प्रवृत्तींचा मागोवा घेणे हा होता. प्रत्येक सजिवाचे ध्येय वंशवृद्धी हेच आहे. नर किंवा मादी न मिळाल्यास स्वतःमधे जनुकिय बदल घडवून प्रजनन करणार्‍या प्रजाती आहेत. तेव्हा विशिष्ट परिस्थितीमधे आई-वडीलांपासून अपत्य होणे फार आश्चर्याची बाब नाही. आजचा मानव हा कधीकाळी इतर प्राण्यांप्रमाणे व्यवहार करत होता. ते नेमके कसे होते हे कळणे अशक्य आहे. पण म्ह्णून आजच्या सामाजिक संकेतांना प्रमाण ठरवून त्याच्याकडे बघणे चुकीचे आहे. काळानुसार सामजिक बदल होत आजचा सुसंस्कृत मानव तयार झाला आहे. पण मूळ प्राणीय प्रवृत्ती बदलल्या नाहीत तर सामाजिक संकेताखाली दाबून टाकल्या आहेत. टॉयलेट मॅनर्स हे त्याचे साधे उदाहरण. आजचा मानव नर मादी मिळवण्यासाठी दुसर्‍या नराशी भांडून आपल्या शक्तीचं प्रदर्शन करून मादीला जिंकत नाही. मादीला जिंकण्यासाठी शिक्षण, पैसा, संपत्ती, प्रभाव, कला, बुद्धी याचा वापर करतो. म्हणजेच हिंसेचा वापर न करता श्रेष्ठत्वाची लढाई करतोच. संकेत बदलले पण मूळ वृत्ती तीच आहे.

समाजाच्या मान्यता आणि मूळ प्राणिय प्रवृत्ती यांचे कायम द्वंद्व माणसाच्या मनात सुरु असते. प्राण्यांमधे असलेला फाईट ऑर फ्लाईट हा पवित्रा त्याला फक्त सामाजिक संकेतांमुळे घेता येत नाही. चित्र-विचित्र सामाजिक संकेत डोक्यात बाळगून प्रत्येक गोष्ट निसर्गनियमाविरूद्ध करायला लागत असल्याने प्रचंड दडपणाखाली असलेला माणूस कधीही कशाही पद्धतीने व्यक्त होऊ शकणारा भयंकर प्राणी झाला आहे. जिथे संकेत बलवान ठरतात तिथे माणूस संस्कारी आणि सभ्य मानला जातो. जिथे निसर्ग बलवान ठरतो तिथे विकृत आणि असभ्य.

आपल्या डीएनए मधे हाच आदिमानव कायम असतो, लोक त्याला नाकारतात. नाकारू देत. निर्भया सारख्या घटनांमधून तो बाहेर पडतो. लोक तर्क लावत बसतात असे कसे झाले. दमन हीच संस्कृती असल्यावर अजून काय अपेक्षीत आहे?

बाकी तुमच्यासारखे मिपाकर खुद्द डार्विन इथे काही सांगायला आलातर त्यालाही भंडावून सोडतील. जगात तर त्यालाही विरोध करणारे भरपूर आहेत. म्हणून काय कुणी विचार मांडूच नये काय? विचार मांडणार्‍यालाच विकृत ठरवणारे वादविवादपटू प्रथमच पाहिले. (मी स्वतःला डार्वीनच्या पंक्तीला बसवले आहे. विश्वाला अजून एक हादरा, धावा धावा, वाचवा जगाला.)

ता.क.: जगातल्या तमाम सुसंस्कृत मानवांना नर-मादी असे संबोधून विकृत सरसकटीकरण केल्याच्या आरोपाखाली आता नवी केस टाका कोर्टात. त्याचाही तुम्ही पुरावा खचितच मागाल आणि नाकाराल याचे पुरेपुर खात्री आहे. धन्यवाद!

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2015 - 1:02 pm | श्रीगुरुजी

एक तर तुम्ही अत्यंत चुकीचा, असत्य आणि विकृत प्रकारचा दावा केलात आणि नंतर अनेकांनी मुद्देसूदपणे तुमचा प्रतिवाद करून तुमचा दावा खोटा ठरविल्यानंतर सुद्धा अजूनही तुम्ही त्याचे रेटून समर्थन करीत आहात. धन्य आहे!

>>> तुमच्या सुसंस्कृत प्रतिसादास उत्तर द्यायची अजिबात गरज नाही पण माझं विकृत मन काही केल्या आवरत नाही.
म्हणून ओकतो.

हे अगदी खरं

>>> व्यक्तिगत नाही म्हणता वरून वैयक्तिक शेरेबाजीही करता हे बाकी खास. असे काही नसेल तर मज पामराला तुमचे दिव्य मराठी कळत नाही असे मान्य करतो. (इथला 'मान्य करतो' हा शब्द उचलून डांगेंनी चूक मान्य केली अशी बोंबाबोंब करत फिरू नका. पीलीज.)

कोठेही वैयक्तिक शेरेबाजी केलेली नाही. तुमचा दिव्य शोध हा अत्यंत विकृत स्वरूपाचा असून पूर्ण खोटा आहे हेच मी लिहिले आहे. शोध तुमचाच आहे, इतरांचा नाही. त्यामुळे टीका तुम्हालाच सहन करावी लागणार, इतरांना नाही. 'बोंबाबोंब' या शब्दावरून तुम्ही अजूनही शिमग्याच्या आनंदातच मग्न आहात असं दिसतंय.

>>> तुम्हाला एवढी आग लागण्यासारखं काय आहे माझ्या प्रतिसादात? तो तुमचा सुसंस्कृत छंद असेल पण म्हणून संपूर्ण प्रतिसाद न वाचता, न विचार करता एका वाक्यावर - तेही एका शब्दावर - धुमाकुळ घालायला मिळतो म्हणून किती सुटायचे याला काही मर्यादा?

मला एकट्याला तो प्रतिसाद खटकलेला नाही. इतर अनेकांना तो खटकला आहे. एकानेही तुम्हाला अनुमोदन दिलेले नाही यातच काय ते समजा. फक्त 'बहुसंख्य' हा शब्द न वाचता आपला संपूर्ण प्रतिसाद वाचा. एकदा वाचून नाही समजला तर पुन्हा एकदा वाचा. आपल्या पत्नीला, भावाबहिणींना, मित्रांना वाचायला द्या आणि नंतर त्यांची प्रतिक्रिया बघा. असले भीषण प्रतिसाद लिहिणे हा तुमचा असंस्कृत छंद असेल, पण म्हणून किती खालची पातळी गाठायची याचा विचार करा.

>>> माझ्या काही सिद्ध करण्याने तुमच्या मान्यता बदलणार आहेत का? कुणाच्यातरी काहीतरी सिद्ध करण्याने काही महत्त्वाच्या विषयांमधल्या तुमच्या मान्यता बदलल्या, तुम्ही आपलं अज्ञान मान्य केले, माघार घेतली, माफी मागितली याचा काही पुरावा देता काय? तरच तुमच्यासारख्या विद्वान मंडळींसोबत वाद घालण्यात काही अर्थ.

वाद घाला नाही तर घालू नका. पण तुम्ही कोण मला पुरावा मागणारे?

>>> बरं, मी म्हणतोय ते खोटं आहे असे म्हणून मोकळे व्हा ना? दुसर्‍यास हीन, विकृत ठरवल्याशिवाय तुमच्या परमसंस्कारी आत्म्याला परमसंस्कारी असल्याची खात्री पटत नाही का?

तुम्ही जे लिहिलं आहे ते निव्वळ खोटं नसून अत्यंत बीभत्स आहे. हे आधीच लिहिलं आहे. वाचलं नाहीत वाट्टं?

>>> की चुकून मी म्हणतो ते खरं निघेल याची भीती वाटते? तसे काही नसेल तर मग एवढं खालच्या पातळीवर येऊन दुसर्‍यास हिणकस ठरवून तुम्हाला काय आसुरी आनंद होतो तो तुम्हालाच माहीत.

अजूनही अट्टाहास कायम दिसतोय.

>>> ३३ ओळींच्या माझ्या प्रतिसादात मी लिहिलेले सारेच्या सारे माझ्या कवीकल्पना असून मी एक विकृत विचारांचा माणूस आहे ही सिद्ध करण्याची कोण ही धडपड?

मी त्या एका परिच्छेदावरच प्रतिक्रिया दिली आहे. त्या परिच्छेदातील दावा नक्कीच विकृत स्वरूपाचा होता.

>>> मी इतका महत्त्वाचा माणूस आहे की मिपासारख्या लाखो संकेतस्थळापैकी एकावर असणार्‍या हजारो धाग्यांपैकी एका धाग्यावरच्या शेकडो प्रतिसादापैकी नेमका माझाच प्रतिसाद आणि त्यातला एकच शब्द अखंड ब्रह्मांड हलवण्यास कारणीभूत ठरावा हे माझ्या आजच लक्षात आले.

कोणीही काहीही घाण लिहिलं तर मी विरोध करणारच.

>>> तसे होऊ नये म्हणून गुरुजी रणांगणावर लढायीला निघाल्यासारखे षड्डू ठोकून आव्हानं देतायत. अशा बाष्कळ आव्हानांना मी काडीचीही किंमत देत नाही

नका देऊ.

>>> कारण मी म्हणेल तेच सत्य, मलाच सारे कळते, माझे तेच खरे, इतर सर्व अज्ञानी मूर्ख अशी स्वतःची सर्वश्रेष्ठ, सर्वज्ञानी समजूत करून घेतलेली नाही. मी माझ्या स्वतःच्या ज्ञानाला, आकलनाला, माहीतीला, मताला काडीचीही किंमत देत नाही. तुम्ही ती देताय हे माझे अहोभाग्य.

मी तुमच्या मताला अजिबात किंमत देत नाहीय्ये. तुम्ही जी निराधार बेछूट विधाने केली आहेत ती खोडून काढतोय.

>>> मी आधीच बॅटमॅन यांना उत्तर देतांना माझ्या विधानाच्या सत्यतेची खात्री नाही असे सुचित केले होते. मुद्दा 'बहुसंख्य' ह्या शब्दावरच्या आक्षेपाचा होता. तो शब्द मीच व्यवस्थित आकडेवारी मांडून मागेही घेतला आहे.

तुम्ही हा शब्द ज्या प्रतिसादात मागे घेतला तो प्रतिसाद ०६/०३/२०१५ १४:३२ या वेळी दिलेला आहे. माझा प्रतिसाद त्यापुर्वीच ०६/०३/२०१५ ११:३२ या वेळी दिलेला होता. इतर सर्वांनी टीकेची झोड उठविल्यावर तुम्हाला उपरती झाली.

>>> याचा अर्थ असा होत नाही की जगात असे काही घडतच नाही. वर्तमानपत्रांतून पित्यापासून मुली गर्भवती राहल्याच्या बातम्या वाचल्या आहेत. भावांनी बहीणींवर केलेल्या बळजबरीच्या बातम्या वाचल्या आहेत. हे प्रकार ऐकून विश्वास बसत नाही पण तुमचा विश्वास नाही म्हणून हे घडतच नाही असे नाही. भले प्रमाण ०.०१% असले तरीही.

आधी तावातावाने म्हणत होता की बहुसंख्य पुरूष (म्हणजे किमान ५१%) असे करतात. आता हेच प्रमाण ०.०१% पर्यंत खाली आणलेलं दिसतंय. प्रगती आहे.

>>> त्या विधानाचा अर्थ पुरुषांना सरसकट बलात्कारी ठरवणे कधीच नव्हता. मूळ नैसर्गिक प्रवृत्तींचा मागोवा घेणे हा होता.

कसली आली आहे डोंबलाची नैसर्गिक प्रवृत्ती आणि कसला डोंबलाचा मागोवा ! काहीही बेछूट विधानं करायची आणि त्याचं रेटून समर्थन करत बसायचं.

>>> प्रत्येक सजिवाचे ध्येय वंशवृद्धी हेच आहे. नर किंवा मादी न मिळाल्यास स्वतःमधे जनुकिय बदल घडवून प्रजनन करणार्‍या प्रजाती आहेत. तेव्हा विशिष्ट परिस्थितीमधे आई-वडीलांपासून अपत्य होणे फार आश्चर्याची बाब नाही. आजचा मानव हा कधीकाळी इतर प्राण्यांप्रमाणे व्यवहार करत होता. ते नेमके कसे होते हे कळणे अशक्य आहे. पण म्ह्णून आजच्या सामाजिक संकेतांना प्रमाण ठरवून त्याच्याकडे बघणे चुकीचे आहे.

बरं, मग त्याकाळचे सामाजिक संकेत प्रमाण माना.

यापुढे लिहिलेले प्रवचन वाचता वाचता झोप आली, त्यामुळे उत्तर देत नाही.

तुमचे महनीय विचार, तुमचं आकलन, तुमच्या चुकीच्या असल्या तरी ठाम असलेल्या समजूती इ. इ. तुम्हालाच लखलाभ होवोत. परंतु काही घाण लिहिलंत तर नक्कीच इथले सदस्य विरोध करतील.

संदीप डांगे's picture

7 Mar 2015 - 3:26 pm | संदीप डांगे

फक्त 'बहुसंख्य' हा शब्द न वाचता आपला संपूर्ण प्रतिसाद वाचा. एकदा वाचून नाही समजला तर पुन्हा एकदा वाचा. आपल्या पत्नीला, भावाबहिणींना, मित्रांना वाचायला द्या आणि नंतर त्यांची प्रतिक्रिया बघा. असले भीषण प्रतिसाद लिहिणे

ते 'बहुसंख्य' वालं विधान वगळूनही संपूर्ण प्रतिसाद 'भीषण' आहे? काय भीषण आहे आणि कसे ते जरा सांगाल का? म्हणजे इथून पुढे 'लोकांना आवडेल तेच लिहावं' याबद्दल निर्णय घेता येइल. स्त्रियांना एक 'स्वतंत्र माणूस' म्हणून समाजाने वागवावं अशी अपेक्षा करणे पुरूषी-वर्चस्ववादी मानसिकतेसाठी भीषण आहेच. तुम्हालाही तसंच वाटतं?

लोकानुयासाठी लिहायची मला काही गरज नाही. पटलं तर घ्या नाहीतर सोडा पण माझे प्रतिसाद विकृत व घाण आहेत की नाहीत याचे मॉरल पोलिसींग करायची तुम्हास काही एक आवश्यकता नाही. माननीय संपादक आपली जबाबदारी व्यवस्थित निभावतात.

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2015 - 10:07 pm | श्रीगुरुजी

>>> ते 'बहुसंख्य' वालं विधान वगळूनही संपूर्ण प्रतिसाद 'भीषण' आहे? काय भीषण आहे आणि कसे ते जरा सांगाल का? म्हणजे इथून पुढे 'लोकांना आवडेल तेच लिहावं' याबद्दल निर्णय घेता येइल. स्त्रियांना एक 'स्वतंत्र माणूस' म्हणून समाजाने वागवावं अशी अपेक्षा करणे पुरूषी-वर्चस्ववादी मानसिकतेसाठी भीषण आहेच. तुम्हालाही तसंच वाटतं?

तुमच्या प्रतिसादातील इतर फाफटपसार्‍याबद्दल मी लिहिलंच नव्हतं. 'बहुसंख्य' पुरूषांना कोणताही पुरावा किंवा आकडेवारी नसताना तुम्ही ज्या प्रकारात ढकलून दिलं होतं (का तर तुम्हाला तसं वाटतं म्हणून, पुरावा आहे म्हणून नाही), त्या घाणेरड्या वाक्यांना मी विरोध केला होता. निव्वळ मी विरोध केलेला नसून इतर अनेकांनी तुमच्या त्या घाण विधानांचा विरोध केलेला आहे व एकानेही समर्थन केले आहे हे लक्षात आले असेलच.

जे काय लिहायचं ते खरं असेल तर लिहा, लोकांना आवडेल किंवा नावडेल याचा विचार करू नका. परंतु, स्वतःच्या घाण कविकल्पना सत्य म्हणून खपवू नका.

>>> लोकानुयासाठी लिहायची मला काही गरज नाही. पटलं तर घ्या नाहीतर सोडा पण माझे प्रतिसाद विकृत व घाण आहेत की नाहीत याचे मॉरल पोलिसींग करायची तुम्हास काही एक आवश्यकता नाही. माननीय संपादक आपली जबाबदारी व्यवस्थित निभावतात.

असं असेल तर स्वतःचे घाण विचार स्वत:च्या दैनंदिनीत लिहून रोज रात्री झोपताना पारायणे करा. असले किळसवाणे विचार सार्वजनिक करू नका. सार्वजनिक ठिकाणी असलं काही लिहिल्यावर प्रतिक्रिया येणारच. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चव्हाट्यावर मांडता तेव्हा त्याचा सार्वजनिक पंचनामा होणारच. त्याची तयारी ठेवा किंवा आपले विचार सार्वजनिक करूच नका.

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2015 - 10:08 pm | श्रीगुरुजी

>>> निव्वळ मी विरोध केलेला नसून इतर अनेकांनी तुमच्या त्या घाण विधानांचा विरोध केलेला आहे व एकानेही समर्थन केले आहे हे लक्षात आले असेलच.

हे वाक्य असे वाचावे.

निव्वळ मी विरोध केलेला नसून इतर अनेकांनी तुमच्या त्या घाण विधानांचा विरोध केलेला आहे व एकानेही समर्थन केलेले नाही हे लक्षात आले असेलच.

संदीप डांगे's picture

8 Mar 2015 - 3:32 pm | संदीप डांगे

सभ्य आणि सुसंस्कृत लोकांमधे जेव्हा आपण चर्चा कराल तेव्हा कायम खालील वाक्य लक्षात ठेवा.
'मला तुझ्या म्हणण्यांतला एक शब्दही पटत नाही, पण तुला तुझे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते मांडण्याच्या आड कोणी येत असेल तर त्याचेशी मी प्राणपणाने लढेन.'

दुसरे असे: वादविवादात सभ्य लोक खालचा नियम पाळतात.
“It is not allowable to arraign the motives of a member, but the nature or consequences of a measure may be condemned in strong terms. It is not the man, but the measure, that is the subject of debate.”

प्रतिसादावर प्रतिक्रिया देण्यास तुम्हाला कुणीही बंदी घातली नाही. पण प्रतिसादकर्त्यास सरळ विकृत आणि असभ्य म्हणणे मिपाच्या सांसदिय धोरणात बसते का? तुमच्या एकूण प्रतिसादांवरून तुम्ही किती सभ्यतेचे निकष पाळत आहात ते दिसत आहेच. तुमच्या मते आपल्या चित्रांमधून नग्न स्त्री-देहाचे चित्रण करणारे चित्रकार विकृत असले पाहिजेत. शारिरिक रचनेच्या अभ्यासासाठी देहाची चिरफाड करणारे डॉक्टर्सही विकृत असले पाहिजेत.

बहुसंख्य शब्द मागे घेऊनही तुम्हाला माझा प्रतिसाद खटकतोच आहे याचा अर्थ तुम्हाला सत्य समोर आलेले चालत नाही. तेव्हा इतरांना काय लिहावे याचे सल्ले देण्यापेक्षा आपण काय वाचावे यावर तुम्हीच विचार केलेला बरा.

ज्यापद्धतीने तुम्ही प्रतिवाद करत आहात तो सभ्य नाही हे मी नमूद करू इच्छीतो. त्यास माझा प्रखर आक्षेप आहे. डॉ. खरेंनी संतुलीत आणि अभ्यासपूर्ण प्रतिवाद केला आहे. त्यातून सभ्य सुसंसकृत लोकांमधे वादविवाद कसा करावा हे तुम्हाला शिकता येइल. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो.

बाकी आकडेवारी आणि पुरावा याबद्दलच्या विदाभ्रमिष्टांच्या सततच्या आग्रहाचं विश्लेषण करणारा लेख लिहितो आहेच. तो वाचाल तेव्हा चर्चा करू. धन्यवाद! माझ्यापुरता हा वादविवाद इथे संपला आहे.

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2015 - 6:37 pm | श्रीगुरुजी

मा. संपादक,

माझ्या खालील प्रतिसादात काहीही असभ्य, मिसळपाव संस्थळाच्या धोरणांच्या अथवा नियमांच्या विरूद्ध लिहिलं असेल तर तातडीने प्रतिसाद काढून टाकावा ही विनंती.
________________________________________________________________________________

>>> सभ्य आणि सुसंस्कृत लोकांमधे जेव्हा आपण चर्चा कराल तेव्हा कायम खालील वाक्य लक्षात ठेवा.
'मला तुझ्या म्हणण्यांतला एक शब्दही पटत नाही, पण तुला तुझे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते मांडण्याच्या आड कोणी येत असेल तर त्याचेशी मी प्राणपणाने लढेन.'

मी तेच करतोय. तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्यासाठी मी किंवा संकेतस्थळाच्या प्रशासकांनी किंवा इतर कोणीही अजिबात प्रतिबंध केलेला नाही. सभ्य आणि सुसंस्कृत लोकांशी चर्चा असो वा असभ्य आणि असुसंस्कृत लोकांशी चर्चा असो, हे तत्व मी नेहमीच पाळतो.

>>> दुसरे असे: वादविवादात सभ्य लोक खालचा नियम पाळतात.
“It is not allowable to arraign the motives of a member, but the nature or consequences of a measure may be condemned in strong terms. It is not the man, but the measure, that is the subject of debate.”

मी तेच केले आहे. तुमच्या अत्यंत निराधार आणि घृणास्पद विधानांचा मी विरोध केलेला आहे. तुमचा व्यक्तिगत विरोध केलेला नाही.

>>> प्रतिसादावर प्रतिक्रिया देण्यास तुम्हाला कुणीही बंदी घातली नाही. पण प्रतिसादकर्त्यास सरळ विकृत आणि असभ्य म्हणणे मिपाच्या सांसदिय धोरणात बसते का? तुमच्या एकूण प्रतिसादांवरून तुम्ही किती सभ्यतेचे निकष पाळत आहात ते दिसत आहेच.

तुमची ती विशिष्ट विधाने विकृत आणि असभ्य आहेतच, पण ती निराधार व असत्य सुद्धा आहेत. तुमची खालील विधाने पुन्हा एकदा वाचूया.

स्वतःच्या आईवर, मुलीवर, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष याची स्पष्ट उदाहरणे आहेत. यांचे प्रमाण लाखात एक असले तरी बहुसंख्य पुरुष विशिष्ट वयात निदान अशा समागमाची इच्छा बाळगणारे तरी असतातच. पण या इच्छा खूप खूप व्यक्तिगत आणि लपवलेल्या असतात. कारण सामाजिक मान्यता नाही म्हणून.

विशिष्ट वयात स्वतःची आई, मुलगी, बहीण इ. बरोबर समागम करावा अशी "बहुसंख्य" पुरूषांची इच्छा असते हे कोणत्या महाभागाने सांगितलं तुम्हाला? तुम्हाला अशी इच्छा निर्माण झाली होती का कधी? आता तुम्ही पुरूष असल्याने आणि तुमच्या दाव्यानुसार "बहुसंख्य" पुरूषांना अशी इच्छा निर्माण होत असल्याने तुम्हालाही अशी इच्छा निर्माण झाली असणारच. अशी इच्छा निर्माण झाली नसल्यास तुम्ही खोटे बोलत आहात किंवा अशी इच्छा निर्माण झाली असल्यास तुमची विचारसरणी असभ्य आहे हा निष्कर्ष नक्कीच काढता येतो.

एकतर तुम्ही अत्यंत प्रक्षोभक आणि असभ्य विधाने केलीत आणि दुसरं म्हणजे या विधानांच्या सत्यतेचा कोणताही आधार/पुरावा तुमच्याकडे नाही हेही कबूल केलंत. ज्या ज्या सदस्यांनी तुमच्या विधानांचा विरोध केला त्यांना उलट प्रतिसाद देऊन आपल्या असत्य विधानांचे समर्थन करायचा आटोकाट प्रयत्न तुम्ही केलात. नंतर आपल्या विधानांचे समर्थन करणे अशक्य झाले तेव्हा शहाजोगपणे "मी बहुसंख्य हा शब्द मागे घेतो" असे संभावितपणे लिहिले. मुळात ज्या दाव्यामागे कोणतीही आकडेवारी नाही, पुरावे नाहीत, जी केवळ तुमची कविकल्पना आहे असे घृणास्पद दावे करावेच का? आणि अशा दाव्यांना इतरांनी विरोध केला तर त्यांच्यावरच आगपाखड करताय.

कदाचित मी असभ्य असेन. कदाचित ज्या सदस्यांनी तुम्हाला विरोध केला आहे त्यांना सत्याला सामोरे जायची हिंमत नसेल किंवा त्यांने तुमचे महनीय, क्रांतिकारक विचार समजलेले नसतील. मी एक सोपा उपाय सुचविलेला आहे. तुमची वरील वाक्ये तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना ऐकवा आणि त्यांची प्रतिक्रिया बघा.

>>> तुमच्या मते आपल्या चित्रांमधून नग्न स्त्री-देहाचे चित्रण करणारे चित्रकार विकृत असले पाहिजेत.

आहेतच.

>>> शारिरिक रचनेच्या अभ्यासासाठी देहाची चिरफाड करणारे डॉक्टर्सही विकृत असले पाहिजेत.

नाही. कारण मानवी आरोग्यासाठी ते अशी चिरफाड करतात.

>>> बहुसंख्य शब्द मागे घेऊनही तुम्हाला माझा प्रतिसाद खटकतोच आहे याचा अर्थ तुम्हाला सत्य समोर आलेले चालत नाही. तेव्हा इतरांना काय लिहावे याचे सल्ले देण्यापेक्षा आपण काय वाचावे यावर तुम्हीच विचार केलेला बरा.

ज्या विधानांना कोणताही आधार नाही, कोणतीही आकडेवारी नाही अशी विधाने सत्य कशी? तुम्ही काहीही फेकावं आणि मी त्याला सत्य समजून त्याचा स्वीकार करावा अशी तुमची अपेक्षा दिसतेय. तुम्ही जेव्हा सार्वजनिक संस्थळावर लिहिता तेव्हा तुमची इच्छा असली किंवा नसली तरी ते वाचलं जाणारच आणि त्याच्यावर प्रतिक्रिया येणारच. इतरांनी आपले लेखन वाचू नये अशी इच्छा असल्यास लिहू तरी नये किंवा स्वतःच्या खाजगी दैनंदिनीत लिहावे.

>>> ज्यापद्धतीने तुम्ही प्रतिवाद करत आहात तो सभ्य नाही हे मी नमूद करू इच्छीतो. त्यास माझा प्रखर आक्षेप आहे.

तुम्ही जे लिहिलं आहे ते सभ्य नाही हे मी नमूद करू इच्छितो.

>> डॉ. खरेंनी संतुलीत आणि अभ्यासपूर्ण प्रतिवाद केला आहे. त्यातून सभ्य सुसंसकृत लोकांमधे वादविवाद कसा करावा हे तुम्हाला शिकता येइल. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो.

कोणाकडून काय शिकायचं हे तुम्ही मला शिकविण्याची आवश्यकता नाही. याबाबतीत मी तुम्हाला सल्ला विचारलेला नाही.

>>> बाकी आकडेवारी आणि पुरावा याबद्दलच्या विदाभ्रमिष्टांच्या सततच्या आग्रहाचं विश्लेषण करणारा लेख लिहितो आहेच. तो वाचाल तेव्हा चर्चा करू. धन्यवाद! माझ्यापुरता हा वादविवाद इथे संपला आहे.

जरूर लिहा.

संदीप डांगे's picture

8 Mar 2015 - 7:03 pm | संदीप डांगे

आपली पात्रता दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2015 - 10:15 pm | श्रीगुरुजी

माझी पात्रता समजण्याची पात्रता तुमच्यात आल्याबद्दल अभिनंदन!

मृत्युन्जय's picture

6 Mar 2015 - 1:38 pm | मृत्युन्जय

९५ टक्क्यांपेक्षा जास्त बलात्कारी पुरुष हे प्रत्यक्ष नात्यातले, अतिशय जवळचे नातलग आणि रोजच्या ओळखीतले असतात.

हा विदा इथे अतिशय अयोग्य आहे असे नमूद करु इच्छितो.

तुम्ही म्हणता " बहुसंख्य" म्हणजे १०० तले ५१ असे धरुयात. बलात्कार करणारे १ लाखात एक असतात असे धरुयात (ढोबळमानाने एकुण लोकसंख्येच्या ५०% म्हणजे ६० करोड पुरुष धरले आणि त्यातील ५०% सज्ञान धरले तर ३० करोड पुरुष धरुयात. तुम्ही म्हणता यातले १५.५ करोड तशी अपेक्षा धरतात)

आता रेप बद्दल बोलुयात. भारतात दर वर्षी २५००० बलात्काराच्या घटना घडतात. असे मानुयात की १० पैकी एकच मुलगी पुढे येते. म्हणजे २५०००० बलात्कार होतात. म्हणजे ३० करोड लोकांपैकी केवळ अडीच लाख लोक बलात्कारी असताना (हे प्रमाण ०.०८% होते). तुम्ही हे सरसकटीकरण करत आहात हे नक्कीच विचित्र वाटते.

संदीप डांगे's picture

6 Mar 2015 - 2:32 pm | संदीप डांगे

९५ टक्क्यांपेक्षा जास्त बलात्कारी पुरुष हे प्रत्यक्ष नात्यातले, अतिशय जवळचे नातलग आणि रोजच्या ओळखीतले असतात.

हे मी नाही म्हणत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा अहवाल आहे.

http://ncrb.nic.in/CD-CII2012/cii-2012/Table%205.4.pdf
TOTAL (ALL INDIA) 24470
parents: 393
Relatives: 1585
Neighbours: 8484
Other Known Persons: 14008

A rapist creates an opportunity that allows for a situation where there is privacy so that his control over the victim is complete. Figures point to the fact that most rapists are married. Experts believe that two prime reasons for rape, which have little to do with the marital status, are uncontrolled urge to enact sexual fantasies and to dominate. Therefore, it is not a crime of opportunity that is carried out in the spur of the moment, as rapists depose in their defence or make it sound to be a consensual act, but in most cases rape is well-planned and a considered act. The rapist actually enacts the rape in his mind for many times before he actually carries it out; the opportunity in most of the cases is created by manipulating situation carefully. That is why as many as 90 per cent cases are of 'Date Rape' where the victim is known to the rapist.

It is worrying that the crime against women is growing as percentage of total Indian Penal Code crimes, with about 21,000 cases of rape reported in India in 2007, growing at the rate of 7 per cent. Of this, 405 cases were that of incest.

Read more at: http://indiatoday.intoday.in/story/The+iceberg+of+rape/1/46911.html

बलात्कार करणारे आणि अजाणतेपणी शारिरीक आकर्षण मनात उद्भवणारे यात गल्लत करू नये.

"बहुसंख्य" शब्दाला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे तो मागे घेत आहे. कुठलेही सरसकटीकरण नाही.

मृत्युन्जय's picture

6 Mar 2015 - 2:41 pm | मृत्युन्जय

माझा आक्षेप केवळ बहुसंख्य शब्दाला होता. तो तुम्ही मागे घेतलात, बाकीच्या गोष्टींबद्दल मला फारसे ज्ञान नाही.

सुबोध खरे's picture

6 Mar 2015 - 2:58 pm | सुबोध खरे

डांगे साहेब
आपल्या सांख्यिकीनुसार बलात्कारात parents म्हणजे बाप फक्त ३९३/२४४७० म्हणजेच ०.०१६% इतके कमी आहेत. यात सख्खाच नव्हे तर सावत्र बाप सुद्धा येतो. बर्याच वेळेस सावत्र बाप सख्ख्या बापापेक्षा जबाबदार असलेला आढळलेला आहे. तेंव्हा आपण कितीहि विदा देण्याचा प्रयत्न केलात तरीही सख्खा बाप आणि मुलगा हे आपल्या आई आणि मुलीवर बलात्कार करण्याची इच्छा बाळगून असतील हे मान्य करणे अशक्य आहे. सख्खा भाऊ असण्याची शक्यता थोडीशी जास्त असेल ४०५/२१०००= ०. ०१९ पण तरीही "बहुसंख्य" हा अतिशयोक्तीपूर्ण आहे यात शंका नाही.
साहेब बलात्कारीत स्त्रीवर उपचार किंवा सोनोग्राफी करण्याचे काही प्रसंग माझ्यावर आलेले आहेत. कारण बर्याच वेळेस त्या स्त्रीला अंतर्गत अवयवांना काही इजा झाली आहे का हे पाहावे लागते त्यामुळे या विषयावर माझे थोडे फार वाचनही होते. बहुसंख्य पुरुष पोर्न बघतात याशी मी सहमत आहे परंतु "स्वतःच्या आईवर, मुलीवर, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष याची स्पष्ट उदाहरणे आहेत. यांचे प्रमाण लाखात एक असले तरी बहुसंख्य पुरुष विशिष्ट वयात निदान अशा समागमाची इच्छा बाळगणारे तरी असतातच. पण या इच्छा खूप खूप व्यक्तिगत आणि लपवलेल्या असतात " हे विधान फारच अतिरंजित आहे यात मला तिळमात्र शंका नाही.

संदीप डांगे's picture

8 Mar 2015 - 6:44 pm | संदीप डांगे

भारतात दर वर्षी २५००० बलात्काराच्या घटना घडतात. असे मानुयात की १० पैकी एकच मुलगी पुढे येते. म्हणजे २५०००० बलात्कार होतात. म्हणजे ३० करोड लोकांपैकी केवळ अडीच लाख लोक बलात्कारी असताना (हे प्रमाण ०.०८% होते)

तुमच्या गणिताबद्दल काही चुकीचे नाही. पण गणित कसे मांडता यावरही बरेच अवलंबून आहे.

१. १० पैकी १ मुलगी पुढे येते असे इथे मानले आहे. याचा खात्रीलायक विदा नाही. नोंदवले जाणारे बलात्कार २ पैकी १ असेही असू शकतात आणि १०० पैकी १ असेही असू शकतात्, १००० पैकी १ असेही असू शकतात. न नोंदवले जाणार्‍या गोष्टींचा विदा कसा काय असू शकतो? फक्त अंदाज असू शकतो. हा अंदाज लावणार्‍याच्या पुर्वग्रहाने प्रभावित होऊ शकतो. सरकारचा अंदाज ३०-४५% आहे. एनजीओंचा अंदाज ९०% वैगेरे आहे. विदा आहे म्हणजे फक्त नोंदवले आहे. प्रत्यक्ष आकडेवारीचा तो पुरावा नव्हे.

२. दर वर्षी २५०००: दर वर्षी हा शब्द फार महत्वाचा आहे. ३० करोड मधून २०१२ या वर्षी 24,923 हजार गुन्हे दाखल झाले. २०१३ मधे 33,707 गुन्हे दाखल झालेत. ३० करोड पुरुष २०१२ आणि २०१३ या दोन्ही वर्षात तेच होते. मागच्या ५ वर्षाचा विचार करता १,२६,४०५ गुन्हे नोंद झाले आहेत. ह्या ५ वर्षातही ३० करोड पुरुष तसेच आहेत हे लक्षात घ्या.

२००१ ते २०१४ या १५ वर्षांचा विचार करता सुमारे ३ लाखापेक्षा जास्त प्रत्यक्ष बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले आहेत.

आता इथे तुमचे गणित लावले तर ३ लाख गुणिले १० = ३० लाख एवढे गुन्हे झालेत ज्याची नोंद झाली नाही.

३. प्रत्यक्ष बलात्कार च्या सोबतच बळजबरी करणे, अतिप्रसंग, लैंगिक इच्छेचं प्रत्यक्ष प्रदर्शन, सूचक प्रदर्शन ह्या घटना नोंदवल्या जातात. आयपीसी धारा ३५४ आणि ५०९ नुसार २००९-२००१३ मधे २,८९,६८४ गुन्हे नोंदवले आहेत.

२००१ ते २०१४ या १५ वर्षांचा विचार करता सुमारे ९ लाख अतिप्रसंग, विनयभंग हे गुन्हे नोंदवले गेले आहेत.

आता इथे तुमचे गणित लावले तर ९ लाख गुणिले १० = ९० लाख एवढे गुन्हे झालेत ज्याची नोंद झाली नाही. तरी यात सहेतुक स्पर्श, कामांध नजरेने बघणे (ज्याचा पिडीत स्त्री पुरावा देऊ शकत नाही पण तिने ते अनुभवलेले असते) याचा समावेश नाही.

म्हणजे तुमच्या गणिता नुसार ९० लाख + ३० लाख = १ करोड २० लाख गुन्ह्यांची नोंद झाली नाही असा फक्त अंदाज आहे. यात ९५% पेक्षा जास्त ओळखीचे लोक आहेत. लक्षात असू द्या या १५ वर्षात कुठल्याही वेळेला भारतात किमान २५ करोड पुरुष उपस्थित आहेत.

४. कुठलाही लैंगिक गुन्हा करणे आणि लैंगिक इच्छा असणे यात खूप फरक आहे. ढोबळ अंदाजाने, झालेल्या एका लैंगिक गुन्ह्यामागे होऊ शकणारे १० गुन्हे जरी मानले तरी ही संख्या १२ करोड होऊ शकते. किंवा जास्तही होऊ शकते. पण कमी निश्चितच होणार नाही. निश्चितच ही संख्या कुठल्याही वेळेस भारतात उपलब्ध पुरुषांच्या ५१% पेक्षा जास्त असू शकते. परस्पर संमतीने होणार्‍या पण समाजमान्यता नसणार्‍या लैंगिक संबंधांचीही कुठे नोंद होत नाही. त्यांचीही संख्या वरच्या आकड्यात धरली नाही आहे. याचा अर्थ ते अस्तित्वात नाहीच असे नाही.

लोकसंख्येच्या बाबतीत मांडल्या जाणार्‍या टक्केवारीच्या खेळाचा मला सर्वस्वी तिरस्कार आहे. याच मुर्ख टक्केवारीच्या आधारावर सरकार नागरिकास जगण्यास दिवसाला ३५ रुपये पुरे असे माणुसकीहिन विधान करू शकते. नुकसानभरपाई म्हणून संकटग्रस्त शेतकर्‍याच्या हातावर रु. २ फक्त चा धनादेश ठेवू शकते.

१२० कोटी जनते मधे १२ जरी बलात्कार झाले तरी माझ्या मते त्याची संपूर्ण जबाबदारी १२० कोटी जनतेवर येतेच येते. त्यापासून ते पलायन करू शकत नाही. टक्केवारीमधे गोष्टी अगदी छोट्या दाखवल्या जाऊ शकतात किंवा मोठ्याही.

पैलवान यांच्या विधानाला दुजोरा देत म्हणू इच्छितो की टक्के बघण्यापेक्षा लोकांकडे बघा. घाणीत उतरायला आवडत नाही म्हणून घाणीपासून डोळे फिरवणे योग्य नाही. कुणी घाणीकडे बोट दा़खवते त्यालाच घाणेरडा म्हणणे तर अत्यंत हास्यास्पद आहे.

संदीप डांगे's picture

8 Mar 2015 - 8:29 pm | संदीप डांगे

http://ncrb.gov.in/CD-CII2013/Chapters/5-Crime%20against%20Women.pdf

gg

लोकसंख्या:
S.No. Census Year Population % Change
6 2001 1,028,737,436 21.5
7 2011 1,210,726,932 17.7

Age structure
0–14 years 31.2% (male 190,075,426/female 172,799,553) (2009 est.)
15–64 years 63.6% (male 381,446,079/female 359,802,209) (2009 est.)
65 and over 5.3% (male 29,364,920/female 32,591,030) (2009 est.)

incest प्रकार गुगलुन बघा.लै काय सापडल...

पॉर्न जगता मधे आई-मुलगा,बहिन-भाऊ यांच्या विषयीचे विडीओ आनी कथा यांना जास्त मागनी असते.

खटपट्या's picture

8 Mar 2015 - 1:58 pm | खटपट्या

वगिश,
मिपावर आपले स्वागत आहे. आपल्या या विधानाला वर उत्तर दिलेलेच आहे. पोर्न पहाणारे कीतीजण त्यातील कथेसाठी पॉर्न पहातात ? आणि आपण म्हणता तसे जर आई-मुलगा, बहीण-भाउ यांच्या विषयीच्या कथांना जर मागणी असेल तर, अशी मागणी करणारे विक्रुतच म्हणायला हवेत.
धन्य ते पॉर्न पहाणारे आणि अश्या मागण्या करणारे...

अभिजित - १'s picture

5 Mar 2015 - 6:39 pm | अभिजित - १

हे तुमचे वाक्य चुकीचे आहे. हे असे कोणी ठरवले ? कि हे तुमचे मत आहे ?

"बलात्कारास विरोध होत नाही तो फक्त त्यातल्या अमानुषपणास होत आहे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. "

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 6:45 pm | संदीप डांगे

माझे मत आहे. समाजाचे दोन पातळ्यांवर वेगवेगळे वागणे यांतून ते झाले आहे. बलात्कार-पिडीतांकडे बघण्याची समाजाची दृष्टी तेच सांगते.

अभिजित - १'s picture

6 Mar 2015 - 9:19 pm | अभिजित - १

चूक वाटले तर उडवून टाका .. पण यांचे मत किती खराब आहे हे त्यांना समजावे अशी इच्छा ... परदुख शीतल असते ..
कारण त्यांच्या मते बलात्काराला काही तितका विरोध नाही.
माझे मत असे आहे कि ५०० / १००० बलात्कारी लोकांना एकाच दिवशी फाशी द्यावे. हाल करून .. जिथे गुन्हा सिद्ध झाल्या तिथे तरी. जसे कि निर्भया प्रकरण ..
आणि संदीप डांगे यांचे मत अतिशय धक्कादायक आहे. निदान मला तरी वाटले. मग मी पण तितकीच धक्कादायक प्रतिक्रिया दिली ..

संदीप डांगे's picture

7 Mar 2015 - 12:49 am | संदीप डांगे

वरची तुमची मुक्ताफळे तुम्ही माझ्या तोंडी घालू पाहताय ते माझ्या प्रतिसादात कुठेतरी ध्वनित होत आहे काय? ३३ ओळींच्या माझ्या प्रतिसादात तुम्हाला माझे एकमेव वाक्य खटकले?

बलात्कारास विरोध झाला असता तर तुमच्या दिव्य आकलनशक्तीला तो समाजात दिसून आला असता. स्त्रियांना समाज देत असलेल्या वागणुकीत बदल दिसला असता. एकट्या फिरू नका, चाकू-मिरची पावडर बाळगा, कराटे-कुंगफू शिका हे सर्व स्त्रियांनाच करायला लावणारा समाज अजूनही स्त्रीलाच कारण समजतो हे तुमच्या लक्षात येत नाही काय? ९५% बलात्कारी ओळखीचेच असतात. त्यांच्या विरूद्ध स्त्रियांनी कुठे कुठे आणि कसा कसा विरोध व प्रतिकार करावा? त्यांना प्रतिकार करण्याची शिकवण देणारा तुमचा समाज पहिलेछूट पुरूषांनी बलात्कारच करू नये म्हणून नेमके काय करत आहे? बलात्कार नक्की काय असतो हे तुम्हाला तरी नीट समजले आहे काय?

समाजाचा बलात्कारास विरोध नाही त्यातल्या अमानुषपणास आहे हा माझा निष्कर्ष आहे. त्यातून 'माझा बलात्कारास विरोध नाही' हा चमत्कारिक आणि आश्चर्यजनक निष्कर्ष आपल्या ज्या दिव्य मेंदूने काढला आहे त्यास राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात ठेवले पाहिजे. तुम्ही 'तोड-मरोड-पेश-कर' चॅनेलवरचे टीनपाट पत्रकार दिसता.

चला आता तुमचे स्वतःचे वाक्य घेऊ:

माझे मत असे आहे कि ५०० / १००० बलात्कारी लोकांना एकाच दिवशी फाशी द्यावे. हाल करून .. जिथे गुन्हा सिद्ध झाल्या तिथे तरी. जसे कि निर्भया प्रकरण ..

५०० / १००० बलात्कारी लोकांना: 'बलात्कारी लोक' ही काय कुठली जमात, जात, वंश आहे का गोळा करून आणायला? चोर-दरोडेखोर यांच्या काही जाती असतात असे पोलिस मानतात. तुम्हीही तसेच मानता काय? बलात्कारी असे कुणाच्या कपाळावर किंवा कुठल्याही अवयवावर लिहीले असते काय? मानसशास्त्रिय चाचण्यांमधे एखादा पुरूष बलात्कारी होता, आहे, किंवा होऊ शकतो असे सिद्ध करता येते का? सांगायचा मुद्दा असा की बलात्कारी पुरूष कुठेही, कुणीही होऊ शकतो. त्याला जात, धर्म, वंश, शिक्षण, संपत्ती, पुर्वेतिहास असा कुठलाही निकष लावता येत नाही.

एकाच दिवशी फाशी द्यावे: फाशी द्यावे अशी मागणी करणार्‍याच्या भावनेमागे 'ती शिक्षा सर्वोच्च असून गुन्हेगाराला न्याय्य अशी आहे' असे त्याचे वाटणे असते. फाशी देऊन आपला राग तत्सम कृत्यावर तेवढ्याच प्रखरतेने प्रदर्शीत करायचा आहे असे त्याला दाखवायचे असते. पण न्यायव्यवस्था फाशी ही दुर्मिळात दुर्मिळ गुन्ह्यांमधे द्यावी असे मानते. असे गुन्हे करणारांना समाजात राहू देणे घातक असते. फाशी किंवा तत्सम अघोरी शिक्षा देऊन गुन्हेगार संपेल, गुन्हा नाही संपणार. फाशी देऊन पिडीतेस न्याय मिळाला असा आपला ग्रह करून देण्यात सरकार, न्यायव्यवस्था यशस्वी झाली म्हणजे त्यापुढे कुणी बलात्कार करणारच नाही असा होत नाही. याचा ढळढळीत पुरावा निर्भया प्रकरणानंतरही होणारे बलात्कार आहेत. बलात्कारी आणि बलात्कार निर्माणच होऊ नये म्हणून काहीही न करणारा समाज फाशीच्या शिक्षेची मागणी करतो हे तितकेच मुर्खपणाचे आहे जितके एखादा शेतकरी तण उगवूच नये म्हणून काहीच प्रयत्न न करता वाढलेले तण उपटायला महागडी यंत्रे कशी विकत घेता येतील याचा विचार करतो आणि या तणानी आपले कसे नुकसान केले आहे असे ज्याला त्याला सांगत बसतो.

तुमच्या वाक्यातून मी असाही अर्थ काढू शकतो की बलात्कार झाल्यास तुम्हाला काही फरक पडत नाही फक्त बलात्कार्‍यास फाशी होणे महत्वाचे.

समाजाचा सगळा फोकस फाशी होण्यावर आहे, गुन्हाच घडू नये यावर नाही.

अत्यंत अमानुष शिक्षा देऊनही सौदी अरबमधील बलात्कार थांबलेले नाही. त्यामुळे फाशी ही शिक्षा बलात्कार थांबवेल अशी अपेक्षा धरणार्‍यांनी जरा जमिनीवर उतरावे. शिक्षेच्या भीतीपेक्षा योग्य शिक्षण, संस्कार आणि सद्विचार गुन्हा घडण्यापासून रोखण्यास समर्थ आहेत. दुर्दैवाने संस्कार आणि सद्विचार यांना आपला समाज काय किंमत देतो हे आपणास माहित नाही का?

जिथे गुन्हा सिद्ध झाल्या तिथे तरी: गुन्हा सिद्ध होणे ही एक महाप्रचंड किचकट प्रक्रिया आहे हे आपणास माहित नसावे. आपण जरा न्यायव्यवस्थेचा अभ्यास करा, बलात्काराच्या प्रकरणात गुन्हा सिद्ध होणे हे किती कठीण आणि फिर्यादीस मानसिकरित्या बलात्कारापेक्षाही त्रासदायक आहे हे लक्षात येइल. इकडून नाणं टाकलं की तिकडून कोकच्या बाटलीसारखा न्याय बाहेर येत नाही साहेब. त्यात गुन्हेगार श्रीमंत, राजकारणी, वजनदार आणि मान्यवर असेल तर विसराच. सगळी व्यवस्था पुरुषांच्या मानसिकतेची आणि कायदे स्त्री-धार्जिणे असतांना अशा विचित्र परिस्थितीत नि:पक्षपाती न्याय होइलच याची काय खात्री. तसेही न्यायालयात फक्त निर्णय सुनावले जातात, न्याय मिळत नाही. जे मिळतं त्याला न्याय म्हणण्याची जगरीत आहे. पुराव्याअभावी नराधम बलात्कारी सुटतात. खोट्या केसेस झाल्याने आयुष्यातून उठलेले असंख्य पुरुष आहेत. त्यांचे कुठे नाव येत नाही की कुणी त्यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवत नाही.

स्त्रीने आरोप केला की तो खराच मानून प्रत्येक पुरूषाला नराधम समजून फासावर लटकवायला लागले तर समाजात माजणार्‍या अराजकाचा तुम्ही काहीतरी विचार केला आहे काय?

एक आदर्श(?) म्हणून निर्भयाच्या केसचे उदाहरण पाहू. यात बलात्कार झाल्याचे भक्कम पुरावे आणि साक्षीदार होते. त्यामुळे पोलिसांना सबळ आरोपपत्र दाखल करता आले. सर्व स्पष्ट आणि धडधडीत समोर असतांना आरोपींच्या वकिलांचे युक्तिवाद तोकडे पडले. त्यात आरोपीचे वकिलही काय दर्जाचे होते हे डॉक्युमेंटरीत दिसून आले. त्याच केसमधे राहूल गांधी आरोपी आणि कपिल सिब्बल वकिल असते व विरूद्ध कितीही सबळ पुरावे असते तर हाच निकाल आला असता याची तुम्ही छातीवर हात ठेवून खात्री देऊ शकता काय?

प्रत्येक बलात्कार हा याच प्रकारे होतो काय? हजारो स्त्रिया रोज विविध दडपणाखाली, दहशतीखाली, गैरसमजूतीखाली दबून बलात्कार सहन करत आहेत. त्या बलात्कार कसा सिद्ध करणार आहेत? सगळीकडे स्त्रीया अनामिक भयाखाली वावरत आहेत. फाशीच्या फँटसीमधे धुंद असलेला तुमचा समाज त्यांना दहशतमुक्त करण्यासाठी नक्की काय करत आहे?

असो.

कायदे सक्षम आहेत. ते पाळण्याची मानसिकता समाजात नाही. त्यामुळे कितीही कठोर कायदे केले तरी ते न्यायालयाचे सुविचार यापलिकडे त्यांना काडीचेही महत्त्व नाही. सुजाण नागरिकत्व म्हणजे काय याची कपर्दिकही ओळख नसलेल्या समाजाला गर्दीच्या मानसशास्त्राप्रमाणे वागायला आवडते. विचारपुर्वक आणि योग्य दुरगामी परिणाम करणारे निर्णय घेणे, ते सक्षमपणे राबवणे यात प्रचंड हिंमत व धैर्य लागते. समाजाला असा खरोखर कामाला लावणारा विचार नको असतो, झुंडीच्या बेधुंद मानसिकतेत रमायला कष्ट पडत नाहीत. तुम्हीही तेच करत आहात.

आज बरेच जण नागालँडमधे झालेल्या प्रकाराबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. असेच झाले पाहिजे, हेच योग्य आहे असे सगळ्यांना वाटत आहे. पण एक समाज म्हणून आपण हिंस्त्र होत चाललो आहोत हे लक्षात आले काय कुणाच्या? गुन्हा सिद्धही न होता मारलेला माणूस हा बलात्कारी म्हणून मारला की दुसर्‍या धर्माचा, दुसर्‍या देशाचा आमच्या गावात येऊन 'आमच्या बायकांवर' अत्याचार करतो म्हणून वर्गसंघर्षातून मारल्या गेला हे कोण तपासणार? नागा लोकांमधे बलात्कार कधी झालेच नाहीत काय? किंवा आता अजिबात होणार नाहीत काय? आपल्या हिंस्त्र कृतीतून नुसता राग व्यक्त करून खरंच स्त्रियांना समाज एक दहशतमुक्त आकाश देऊ शकतो का?

या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसतीलच कारण तुम्ही तेवढा विचार करण्याच्या कुवतीचे दिसत नाही. त्यामुळे सुखी राहा.

असंका's picture

7 Mar 2015 - 10:52 am | असंका

_/\_

असंका's picture

7 Mar 2015 - 10:53 am | असंका

फारच योग्य....धन्यवाद!

चिगो's picture

7 Mar 2015 - 5:15 pm | चिगो

उत्तम प्रतिसाद..

सुधीर's picture

7 Mar 2015 - 9:52 pm | सुधीर

प्रतिसाद आवडला.
समाजाचा बलात्कारास विरोध नाही त्यातल्या अमानुषपणास आहे हा माझा निष्कर्ष आहे.
बलात्कार, विनयभंग अमानुष असोत नसोत समाजाचा विरोध असायला हवा.

उत्तम प्रतिसाद.. खूप कमी वेळा तुम्ही तुम्हाला काय म्हणायचेय ते तुम्ही मांडू शकलाय.. :)
याचा उत्तम लेख बनू शकेल.

कोंबडी प्रेमी's picture

5 Mar 2015 - 5:16 pm | कोंबडी प्रेमी

स्वतःच्या आईवर, मुलीवर, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष याची स्पष्ट उदाहरणे आहेत. यांचे प्रमाण लाखात एक असले तरी बहुसंख्य पुरुष विशिष्ट वयात निदान अशा समागमाची इच्छा बाळगणारे तरी असतातच

खरेच ???

कपिलमुनी's picture

5 Mar 2015 - 5:29 pm | कपिलमुनी

डॉक्युमेंटरी पाहिली.
आपल्या देशामधल्या लोकांची मते ऐकली की लाज वाटते. बीबीसी ने ही डॉक्युमेंटरी बनवली हे फार चांगला केला .
आपल्या देशामधली काही लोकांची घाणेरडी मानसिकता समोर आली.

स्वप्नांची राणी's picture

5 Mar 2015 - 6:08 pm | स्वप्नांची राणी

+१...मी पण पाहिली... आपल्या समाजाचा आरश्यातला विकृत चेहेराच दिसतोय त्यात. कदाचित म्हणूनच झाकून ठेवलाय..

प्रभाकर पेठकर's picture

7 Mar 2015 - 12:28 pm | प्रभाकर पेठकर

कपिलमुनी,

डॉक्यूमेंटरीतला निष्कर्ष कुठल्या दिशेने जावा ते आधी ठरवून त्यानुसार मुलाखती दाखवता येतात. दहा मधल्या तिघांनी मूर्खासारखी विधानं केली आणि तीच तुमच्या डॉक्यूमेंटरीत दाखवली की जगात असाच समज पसरणार की भारतिय समाजच विकृत आहे. बाकी सात जणांची चांगली मते जगासमोर येतच नाहीत.

सौंदाळा's picture

5 Mar 2015 - 5:35 pm | सौंदाळा

काय नेमाडे वगैरे वगैरे का नायगावकर वगैरे स्वप्नात आले होते की काय?

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 6:23 pm | प्रसाद गोडबोले

डेव्हील्स अ‍ॅकडोव्हसी

थोडीशी डेव्हील्स अ‍ॅक्डोव्हसी करण्याचा प्रयत्न करीत आहे .

हा निर्भयाबलात्कारी ठार विकृत माणुस आहे ह्यात शंका नाही ....पण तरीही "माणुस" आहे , त्याला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे , कितीही विकृत आणि निर्बुध्द असले तरीही !

त्याने ते भारतीय कोर्टापुढे मांडले आणि त्याला कायद्याने फाशी दिली ... आता त्याला ह्या मुलाखती द्वारे जगापुढे बोलायचे असल्यास बोलु द्यावे ... जगाला ठरवु दे त्याच्या युक्तीवादात काही तरी स्विकाराह आहे का ते ! एरव्ही तुमचे आमचे न्युज चॅनल टीव्हीवर न्याय निवाडा करत असतातच की ! हा त्यात आला तर काय बिघडले ?

शिवाय ह्या निमित्ताने , त्याचा युक्तीवाद जगभरासाठी निषेधार्ह होईल आणि त्या विकृताच्या फाशीच्या शिक्षेवर जागतिक शिक्का मोर्तब होईलच की !

तसे यात असहमत होण्यासारखे काही दिसत नाही, पण या निमित्ताने त्या प्राण्याला फुकटची प्रसिद्धी मिळून त्याचे अजून सिम्पथायझर्स देखील तयार होतील ते नकोय.

स्वप्नांची राणी's picture

5 Mar 2015 - 6:32 pm | स्वप्नांची राणी

सिम्पथायझर्स नक्की तयार होणार नाहीत. शब्दागणीक त्याचा विकृतपणाच जाणवतो. त्या डॉक्यु मधल्या शर्मा वकिलाचे आणि त्या दुसर्‍या नालायकाचे विचार या विकृत प्राण्यापेक्षा जास्त भयंकर आहेत.

सुबोध खरे's picture

5 Mar 2015 - 6:56 pm | सुबोध खरे

या न्यायाने अजमल कसाबचे म्हणणेही जगापुढे मांडायला आणि प्रसिद्धी द्यायला परवानगी द्यायला हवी

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 7:27 pm | प्रसाद गोडबोले

इंडीड

अजमल कसाब , अफजल गुरु , राजीव चे मारेकरी , इन जनरल सगळ्याच गुन्हेगारांना स्वतःचे म्हणणे जगापुढे मांडायचा अधिकार असायला हवा .

स्वप्नांची राणी's picture

5 Mar 2015 - 7:59 pm | स्वप्नांची राणी

बीबीसी च्या पाकीस्तानी अतिरेक्यांवरही डॉक्यु आहेत आणि त्या पाकीस्तानात बॅन झालेल्या आहेत...

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 8:11 pm | प्रसाद गोडबोले

येक्झॅक्टली !!

आपण पाकिस्तान नाही , आपण भारत आहोत ... आणि म्हणुनच बलात्कारी असला , पशुतुल्य असला तरीही एक माणुस म्हणुन आपण त्याला त्याचे मत मांडायला दिले पाहिजे !

सुबोध खरे's picture

5 Mar 2015 - 9:26 pm | सुबोध खरे

प्रगो साहेब
दुर्दैवाने कसाबसारख्या मेंदू धुतलेल्या माणसाचे दर्पोक्तीपूर्ण उद्गार वाचून काही भडक डोक्याचे तरुण जिहादला तयार होऊ शकतात नव्हे होतातच. या बलात्कार करणाऱ्या माणसाचे उद्गार ऐकून किंवा जालावर वाचून तशाच विकृत वृत्तीच्या माणसाना आपण आणि आपली विचार सरणी बरोबर आहे असे वाटू लागते.( कित्येक लोक जालावर उपलब्ध असलेली प्रत्येक गोष्ट त्रिकाळ अबाधित सत्य आहे म्हणून प्रसारित( forward) करताना आढळतातच ना?)
तेंव्हा भाषण, स्वातंत्र्य मानवी हक्क इ गोष्टी नराधमाना किंवा जे गुन्हेगार आहेत हे न्यायालयात सिद्ध झाले आहे अशा गुन्हेगारांना उपलब्ध करणे हे कितपत व्यवहार्य आहे. हे सगळे उच्च विचार उच्चभ्रू बार मध्ये बसून किंवा मेणबत्त्या पेटवून मोर्चा काढणार्यांना ठीक आहेत.

हाडक्या's picture

5 Mar 2015 - 9:59 pm | हाडक्या

प्रगो.. काय झालंय हो.. आज काल तुमची मते तार्किक व्हायला लागली आहेत आणि वरून ती पटायलापण लागली आहेत.
(कधी असं होईल असं वाटलं नव्हतं.. ;) )

सुबोध खरे's picture

6 Mar 2015 - 10:15 am | सुबोध खरे

प्रगो साहेब
चित्रफितीत मुकेशचे असे म्हणणे आहे कि त्याने फक्त बस चालवली बलात्कार केलाच नाही तरी त्याला फाशी दिली गेली आहे. आता यात प्रत्यक्ष निवाड्यात काय म्हटलेले आहे हे न दाखवता त्याचे मत एकतर्फी दाखवले गेल्याने तो निर्दोष आहे हे मान्य केल्यासारखे आहे. जर जलदगती न्यायालयाने फाशी दिली आणि फेरविचारात उच्च न्यायालयाने ती कायम केली याचा अर्थच त्याच्या विरुद्ध सज्जड पुरावा असणार. मग असे असताना चित्रफितीत विपर्यास होतो हि वस्तुस्थिती स्पष्ट होते. याच कारणास्तव अशा एकतर्फी चित्रफितीना सेन्सोर बोर्डाकडे पाठविणे आवश्यक आहे.
बाकी जागतिक मताचे आपल्याला का देणे घेणे असावे ते कळले नाही. तुम्ही जग मताचे मिंधे नाही. कित्येक देशात फाशी ची शिक्षा नाही. मग त्यांच्या मताप्रमाणे तर आपण १८ व्या शतकात आहोत त्यांच्या मताला केराची टोपली हेच उत्तर आहे.

अभिजित - १'s picture

5 Mar 2015 - 6:42 pm | अभिजित - १

निर्भायाच्या आई वडिलांचा या माहिती पट ला पाठींबा आहे. ती रडत हे म्हणाली कि - आम्ही मेलो तरि कोर्टात केस चालत च राहील.
justice delayed is justice denied

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Mar 2015 - 8:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

धागा आल्यापासुन विचार करतोय काय प्रतिसाद द्यावा ते. पिरातैंच्या प्रतिसादाशी ९०% सहमत.

आपली इच्छा भले मग ती साधी बोलायची असो किंवा थेट बलात्कार-खुनासारखी अत्यंत गंभीर बाब असो. आपली इच्छा दुसर्‍यावर लादणे हीच विकृतपणाची गोष्ट आहे. :(

डॉक्यु मध्ये आरोपिला सिंपथी मिळेल असे काहीही मला वाटले नाही. उलट पुरषी अहंकाराच्या विचारांचा पर्दाफार्ष केला आहे. खास करून आरोपिच्या वकिलांची वक्तव्य लक्षात घेण्याजोगी आहेत. या गंभीर विषयाला सामाजिक असमानतेचाही एक पदर आहे ते अधोरेखित केले आहे. त्यातूनच आरोपिच्या पत्नीचे आई-वडलांचे मत समजते. ते समाजाचं मागासलेपणच दाखवतं. गंभीर विषयावर संयत पणे हाताळलेली डॉक्यू वाटली.. दुर्दैवाने आपल्या समाजाचा विद्रुप चेहराच समोर येतो. आपल्यापुढे असलेल्या प्रश्नांची जाणीव होते. अशा फिल्मवर बॅन आणणं योग्य नाही हे माझे वैयक्तीक मत आहे. एआयबी च्या बॅन मुळे मला वाईट नाही वाटलं (कारण कदाचित त्यात फक्त मनोरंजन मूल्य असेल) पण यावर बॅन म्हणजे समाजाला एखाद्या विचारांपासून रोखण हे आहे. डॉक्यू फॅक्ट सांगते, काय योग्य काय अयोग्य हे ज्याचं त्याने ठरवावं.

मोहनराव's picture

5 Mar 2015 - 8:34 pm | मोहनराव

+१ सहमत

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Mar 2015 - 8:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

डॉक्युमेंट्रीची लिंक मिळेल का?

काही वेळापुर्वी तुनळीवर होती. आता गायब केली गेली आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Mar 2015 - 10:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

धन्यवाद.

मदनबाण's picture

6 Mar 2015 - 10:20 am | मदनबाण

मिपा प्रशासनास विनंती...
वरील डॉक्युमेंटरीचा दुवा काढुन टाकावा... कारण सध्या यावर { या प्रसारणा विषयी } बराच कायदेशीर खेळ चालला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Balam Pichkari... { Yeh Jawaani Hai Deewani }

काळा पहाड's picture

5 Mar 2015 - 11:04 pm | काळा पहाड

अजमल कसाब , अफजल गुरु , राजीव चे मारेकरी , इन जनरल सगळ्याच गुन्हेगारांना स्वतःचे म्हणणे जगापुढे मांडायचा अधिकार असायला हवा .

अजिबात नाही. एक सामान्य माणूस म्हणून सांगतो. फार गृहीत धरताय तुम्ही आम्हाला. त्या मुकेश का कोण त्याच्या घरच्यांना आधी मारून टाकून, ते त्याला दाखवून मग साधारण ४-५ वर्षांनी त्याला फाशी द्यायला हवं. कायदा गेला...

तिमा's picture

6 Mar 2015 - 8:08 am | तिमा

हे डॉक्युमेंटरीला बंदी घालणे, म्हणजे सत्याला सामोरे जायला घाबरणे. एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर त्याची तक्रार न नोंदवता, असं काही झालंच नाही' असं सांगणारे काहीजण असतात(अब्रुच्या भीतिने). आपले सरकारही अशाच पद्धतीने वागत आहे.

सुबोध खरे's picture

6 Mar 2015 - 10:06 am | सुबोध खरे

तिमा साहेब डॉक्युमेंटरीला बंदी घालावी असे मलाही वाटत नाही फक्त काही हलकट लोकांचे म्हणणे ( वकिलांचे) इ कसे बिनबुडाचे आणि तालिबानी आहे हे स्पष्ट करून सांगायला हवे होते . सर्व सामान्य माणूस जालावर आलेल्या माहितीचे विश्लेषण न करता सकृतदर्शनी आहे तसे स्वीकारतो. यातून तालिबानी वृत्तीच्या माणसाना आपली मनोवृत्ती बरोबर आहे या विचारसरणीला खतपाणीच( reinforcement) मिळते. माझा आक्षेप फक्त डांगे साहेबांच्या, "स्वतःच्या आईवर, मुलीवर, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष याची स्पष्ट उदाहरणे आहेत. यांचे प्रमाण लाखात एक असले तरी बहुसंख्य पुरुष विशिष्ट वयात निदान अशा समागमाची इच्छा बाळगणारे तरी असतातच" या वक्तव्य बद्दल होते.
सरकारने बंदी घालण्याचे कारण त्या चित्रफितीतच आहे. अर्ध्यापेक्षा जास्त खासदारांवर गंभीर गुन्ह्यांसाठी खटले भरलेले आहेत त्यांच्या वर जलदगती कोर्टात खटले का चालवत नाहीत या प्रश्नाने हे स्पष्ट होते.

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2015 - 11:07 am | श्रीगुरुजी

>>> माझा आक्षेप फक्त डांगे साहेबांच्या, "स्वतःच्या आईवर, मुलीवर, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष याची स्पष्ट उदाहरणे आहेत. यांचे प्रमाण लाखात एक असले तरी बहुसंख्य पुरुष विशिष्ट वयात निदान अशा समागमाची इच्छा बाळगणारे तरी असतातच" या वक्तव्य बद्दल होते.

तुम्ही अत्यंत मुद्देसूद प्रतिवाद करूनसुद्धा आणि स्वतःचे विधान सिद्ध करण्यासाठी स्वतःकडे कोणतीही आकडेवारी नसताना सुद्धा हे आपल्या निराधार आणि विकृत विधानाचे अजूनही समर्थन करीत आहेत याचा खेद वाटतो.

संदीप डांगे's picture

6 Mar 2015 - 1:54 pm | संदीप डांगे

ही बंदी दिग्दर्शकेने केलेल्या बेकायदेशीर कृत्यास प्रतिउत्तर म्हणून आहे. खुद्द माहितीपटात आक्षेपार्ह किंवा लपवावेसे वाटणारे काहीही नाही हे इथे नमूद करू इच्छीतो. माहितीपटावर बंदी न घालता फक्त दिग्दर्शीकेवर कारवाई करणे अपेक्षीत होते. तसे न केल्याने सरकारविरूद्ध भलताच ग्रह झालेला आहे. आजकाल सरकार आपल्या कुठल्याच निर्णयाचे स्पष्टीकरण देत नाही हे जास्त घातक आहे.

एका गुन्हेगाराची मानसिकता समाजापुढे त्याच्याच शब्दात मांडल्याने त्याला कुठल्याही प्रकारची सहानुभूती मिळत नाही. पण ती समजून घ्यायला ते मांडल्या जाणे आवश्यक आहे. न्यायालयात जे काही होते ते सर्वच सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही. माहितीपटात गुन्हेगारांच्या मानसिकतेची कारणे आणि सुशिक्षीत, जबाबदार लोकांची विचारसरणी यांवर चांगलाच प्रकाश पाडला आहे. विशेषतः आरोपीच्या वकिलांची मुक्ताफळे ऐकून समाजाची एकंदर विचारपातळी समजते.

तरूणाईचे आंदोलन अगदी योग्य प्रकारे आणि परिणामकारक पद्धतीने दाखवले आहे. त्यामुळे भारतीय समाजाची एकांगी प्रतिमा मांडली आहे असे म्हणता येणार नाही.

माहितीपटात हे गुन्हेगार समाजाच्या विचारसरणीची, व्यवस्थेची अपत्ये आहेत असा विचार मांडला आहे. म्हणजेच पुढे असे काही घडू नये म्हणून सामाजिक परिस्थिती तातडीने बदलण्याची खरी गरज आहे असा मुद्दा मांडला आहे. आमचे संस्कार श्रेष्ठ संस्कार म्हणून ढोल बडवणार्‍या समाजाला चांगला आरसा दा़खवला आहे.

काळा पहाड's picture

6 Mar 2015 - 10:34 am | काळा पहाड

दिमापूर (नागालॅंड) - तुरुंगात असलेल्या बलात्कारातील आरोपीला चार हजार जणांच्या जमावाने तुरुंगातून बाहेर खेचत नग्न करून केलेल्या हाणामारीत आरोपीचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना नागालॅंडमधील दिमापूर जिल्ह्यात घडली आहे.

सय्यद फरीद खान (वय 35) हा आरोपी बांगलादेशातून स्थलांतरित असल्याचाही संशय आहे.

एक पाऊल योग्य दिशेने.

पॉइंट ब्लँक's picture

6 Mar 2015 - 11:22 am | पॉइंट ब्लँक

बहुसंख्य लोक पॉर्न पाहतात किंवा बहुसंख्य लोकांमध्ये ईनसेस्ट कल असतो ह्या दोन्ही गोष्टी बरोबर किंवा चुकिच्या सिद्ध करणे फार कठिण आहे. त्यामुळे त्यावर झालेला रक्तपात काहि बरोबर वाटत नाहि.

मार्मिक गोडसे's picture

6 Mar 2015 - 11:41 am | मार्मिक गोडसे

अत्यंत बीभत्स डॉक्यु. बलात्काराचे ग्राफिक दाखवायची काहीही गरज नव्हती.
आत हात घातला, हाताला काहीतरी लागले, बहुतेक आतडे असावे. आरोपी अगदी थंडपणे सांगतोय. आरोपिविषयी घ्रुणा निर्माण करण्याचा डॉक्यु. हेतु असेल तर पुढे अरोपिचे आई,वडिल व पत्नीचे वक्तव्य दाखवण्याचा हेतू आरोपिला सहनुभूती मिळावी हाच होता.
ही डॉक्यु. म्हणजे पीत पत्रकारितेचा नमुना ठरेल.
बीबीसेने ही डॉक्यु. ८ मार्च ऐवजी ५ मार्चला दाखवण्याची घाई का केली असावी? बहुतेक शिमगा पश्चिमेला पोचला असावा व ही डोक्यु. हा धुळ्वडीचा प्रकार असावा. आता बीबीसीचे नाव ब्रिटिश बक** कॉर्पो. असे ठेवावे लागेल.
अजमल कसाब , अफजल गुरु , राजीव चे मारेकरी , इन जनरल सगळ्याच गुन्हेगारांना स्वतःचे म्हणणे जगापुढे मांडायचा अधिकार असायला हवा
कशासाठी?
भारतिय न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. न्यायालयात आरोपिंना बाजु मांडायची संधी मिळाली होती, व न्यायालयाने योग्य तो निर्णय दिला आहे.
गुन्हेगारांना स्वतःचे म्हणणे जगापुढे असे मांडायला दिले तर पुढे जनताच गुन्हेगाराला आपल्या पद्धतीने न्याय देइल जसे काल नागालन्ड मध्ये एका संशयीत बलात्कारीत आरोपिला जमावाने तुरुंगातून बाहेर खेचुन फाशी दिले. असे चालेल का तुम्हाला?

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2015 - 11:46 am | श्रीगुरुजी

अशा चित्रफीतीत फक्त गुन्हेगाराची मुलाखत दाखविण्याऐवजी त्या दुर्दवी मुलीचे कुटुंबीय, त्यांना कोणत्या भीषण परिस्थितीतून जावे लागले या बद्दलचे प्रश्न, आरोपींनी ज्याला मारहाण करून बसमधून फेकून दिले तो मुलीचा मित्र, दोन्ही बाजूंचे वकील, तपास अधिकारी, मुलीवर उपचार करणारे डॉक्टर या सर्वांचीच मुलाखत दाखवायला हवी. तरच प्रकरणाच्या सर्व बाजू दिसतील. फक्त आरोपीचीच मुलाखत दाखविली तर आपण निर्दोषी होतो असा कांगावा आरोपी करणार, सर्व दोष त्या मुलीवर व इतरांवरच ढकलणार आणि जग जे एकतर्फी दिसतंय तेच खरं मानणार. अशा एकतर्फी मुलाखती दाखवून आरोपीचे व गुन्ह्याचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न कायद्याने बंद केले पाहिजेत.

काळा पहाड's picture

6 Mar 2015 - 11:56 am | काळा पहाड

तुम्ही असं गृहीत धरताय की गुन्हेगाराची मुलाखत दाखवणं (सुद्धा) ठीक आहे ("फक्त गुन्हेगाराची मुलाखत दाखविण्याऐवजी"). गुन्हेगाराला (विशेषतः अशा प्रकारच्या गुन्हेगाराला) कुठलीही मानवी भावना दाखवणं चुकीचं आहे. या माणसाला प्रत्येक दिवशी मृत्यूची भीक मागायला लावे पर्यंत टॉर्चर करणं आणि मृत्यू न देणं हाच याचा उपाय आहे. सॉफ्ट टॉर्चर चे प्रकार कोणतेही पुरावे मागे सोडत नाहीत हे तुम्हाला माहिती असेलच. पुढचे जितके दिवस हा जगेल तो प्रत्येक क्षण शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या यातनामय होणं हीच निर्भयाला श्रद्धांजली असेल.

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2015 - 8:31 pm | श्रीगुरुजी

माझं म्हणणं आहे की एकतर गुन्हेगाराची मुलाखत दाखवूच नये. अगदी दाखवायची असल्यास फक्त गुन्हेगाराची न दाखविता त्या गुन्ह्याचे जे बळी आहेत त्या सर्वांची व गुन्ह्याशी संबंधित सर्वांची मुलाखत दाखवावी, म्हणजे सर्व बाजू दिसतील. फक्त गुन्हेगाराचीच मुलाखत दाखविली तर एकतर्फी चित्र दिसेल.

सेरेपी's picture

6 Mar 2015 - 9:20 pm | सेरेपी

दाखवली आहे.

अनुप ढेरे's picture

6 Mar 2015 - 10:25 pm | अनुप ढेरे

गुरुजी तुम्ही एक संस्था सुरू करा जी याबाबद मार्गदर्शन करेल. गुरुजी सर्टिफाईड कंटेंट असं सर्टिफिकेट घेणं सक्तिचं असावं.

हा प्रतिसाद जास्तच पर्सनल होत नाहीये का?

डांगेंची वैयक्तिक मते खतर्नाक आहेत. फक्त त्यांनी ती "बहुसंख्य" म्हणून दुसर्‍यांवर लादली नसती तर बरं झालं असतं. हे आमचं "वैयक्तिक" मत.
बाकी चालू द्या

अत्रन्गि पाउस's picture

7 Mar 2015 - 11:33 am | अत्रन्गि पाउस

+१

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Mar 2015 - 10:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

श्रीगुरुजी आणि संदिप डांगे सरांना मिपाचे विवादसम्राट म्हणुन एक माईक, हेडफोन, डॉल्बी सिस्टीम रेंटल कुपन्स विभागुन देण्यात येत आहे. आता ते कसं विभागुन घ्यायचं ह्याचा वाद व्यनिवर घालणे. =))

आणि हलके घेणे

(अखिल मिपा गुणवत्ता शिकार समिती व मापकाढे समितीच्या संयुक्त सौजन्याने)

अत्रन्गि पाउस's picture

7 Mar 2015 - 2:56 pm | अत्रन्गि पाउस
तुषार काळभोर's picture

7 Mar 2015 - 4:35 pm | तुषार काळभोर

विकीच्या माहितीनुसार (जी अन्य विश्वासार्ह स्रोतांकडून घेतली गेली आहे) २०१२ मध्ये भारतात दर एक लाख लोकसंख्येमागे २ बलात्कारांच्या घटना "नोंदवल्या" जातात , तर अमेरिकेत २८ आणि युकेत २४.
Adjusted for population growth over time, the annual rape rate in India has increased from 1.9 to 2.0 per 100,000 people over 2008-2012 period. This compares to a reported rape rate of 1.2 per 100,000 in Japan, 3.6 per 100,000 in Morocco, 4.6 rapes per 100,000 in Bahrain, 12.3 per 100,000 in Mexico, 24.1 per 100,000 in United Kingdom, 28.6 per 100,000 in United States, 66.5 per 100,000 in Sweden, and world's highest rate of 114.9 rapes per 100,000 in South Africa.

वरील माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढील संकेतस्थळावरून घेतली आहे:
http://www.unodc.org/unodc/index.html
(United Nations Office On Drugs and Crime (UNODC) )
http://www.unodc.org/unodc/en/data-and-analysis/statistics/data.html

जगभरातील "नोंदवल्या" गेलेल्या बलात्काराच्या घटना:
http://www.unodc.org/documents/data-and-analysis/statistics/crime/CTS201...

या केवळ "नोंदवल्या" गेलेल्या घटना आहेत. वास्तव घटनांचे आकडे जास्त असू शकतील.

अमेरिकेत/युकेत हे आकडे जास्त आहेत(स्वीडनमध्ये तर ६६ घटना प्रति एक लाख लोकसंख्या) , याचा अर्थ ते देश स्त्रियांसाठी असुरक्षित आहेत का? मला वाटते नक्कीच नाहीत. तर तेथे स्त्रियांवरील/त्यांच्या कुटुंबावरील सामाजिक दबाव कमी असल्याने, बलात्काराचे गुन्हे नोंदवले जाण्याचे प्रमाण जास्त आहे. (१००% असेलच असे नाही, पण भारतापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल).
(नोंदवल्या न गेलेल्या घटनांचे डॉक्युमेंटेशन होत नसल्याने, निश्चित डेटा नाहीये.)

जगातील सर्व देशांमध्ये, सर्व आर्थिक्/सामाजिक/कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया बलात्काराच्या बळी ठरतात.
शिवाय गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण सर्वत्र अतिशय कमी आहे.
उदा.
The 2006–07 British Crime Survey reports that 1 in every 200 women suffered from rape in that period. It also showed that only 800 people were convicted of rape crimes that same year, meaning that less than 1 in every 100 occurrences of rape led to a conviction.

याच दुव्यात असेही म्हटले आहे की, कोणत्याही वेळेला २,५०,००० (अडीच लाख) टीनेज (वय १३-१८ वर्षे) मुली शोषणास (suffering from abuse) बळी पडत असतात.(युके)

बलात्कार/लैंगिक शोषण/"अत्यल्प प्रमाणात" आढळणारे कौटुंबिक लैंगिक शोषण इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की कोणीही तिकडे डोळेझाक करूच शकत नाही.

(संदीप डांगेंनी इन्सेस्टविषयी त्यांचे वैयक्तिक मत मांडले, तेव्हा त्यांना "असभ्य", बीभत्स", "विकृत" अशी शेलकी विशेषणे लावण्यात आली. भारत सरकारच्या https://data.gov.in/ या वेबसाईटवर अशी माहिती आहे की २००१-२०१२ या काळात तब्बल ४८८२ व्यक्ति कौटुंबिक (इन्सेस्ट) बलात्काराला बळी पडल्या. म्हणजे 'मनात' इन्सेस्ट इच्छा बाळगणार्‍या व्यक्ती लाखो असतील. १२० कोटीच्या देशात लाखोंची टक्केवारी "अत्यल्प" असली तरी लाखोंची संख्या दुर्लक्ष करण्याजोगी नक्कीच नाही. आणि ही फक्त घरातल्या इन्सेस्ट इच्छुक व्यक्तिंची संख्या आहे. कोणीतरी प्रतिसादकर्त्याने "तुमच्या बायकोवर/मुलीवर बलात्कार झालातर..." असा प्रतिसाद दिलाय. इतकी नीच पातळी??? का सगळे शहामृगासारखे संकटाकडे पाठ फिरवून वाळूत डोके खुपसून राह्ताहेत? अहो, जर ही वास्तविकता स्वीकारलीच नाही, तर आपण या वास्तवाला तोंड कसे देणार आहोत? कि वास्तव नाकारून ते नाहीसे होणार आहे?)

कुणाचा प्रतिसाद आवडला नाही, पटला नाही, त्यात काही चुकीचे वाटले तर, तुमचे बरोबर मुद्दे मांडाना!! कोणत्याही गोष्टीचा २-३-४-१०० बाजूंनी उहापोह होऊ द्या. पण सर्वांना कळकळीची विनंती करतो की, वैयक्तिक चिखलफेक, शेरेबाजी कृपया करू नका. मिपाचा एक दर्जा आहे, तो सांभाळा.

पिंपातला उंदीर's picture

7 Mar 2015 - 4:52 pm | पिंपातला उंदीर

जबर्दस्त

सुधीर's picture

7 Mar 2015 - 10:25 pm | सुधीर

शेवटचा पॅरा खास करून खूप आवडला... त्याचसाठी इतकी वर्ष (वाचन मात्र का होईन) मिपावर आहे... :)

पॉइंट ब्लँक's picture

7 Mar 2015 - 10:59 pm | पॉइंट ब्लँक

झकास.

अवतार's picture

8 Mar 2015 - 11:25 am | अवतार

हा कुत्र्याच्या शेपटा सारखा आहे. आम्ही पुरुष आहोत म्हणून स्त्रियांनी काय करावं, कसं वागावं हे ठरवण्याचा आम्हाला नैसर्गिक हक्क आहे ही भावना अनेक पातळ्यांवर व्यक्त होतांना दिसते.
विवाह, प्रेमसंबंध ह्या विषयांवरून केले जाणारे विनोद
धूम्रपान - मद्यपान करणाऱ्या मुलीकडे रोखलेल्या तिरस्कार-आश्चर्य मिश्रित नजरा
विवाहामध्ये आजही मुलाची बाजू वरचढ समजणे
विवाहानंतर स्त्रियांनी कोणते कपडे घालावे हे ठरवणे
मुलगा जन्मला की पेढे आणि मुलगी झाली की बर्फी वाटणे

ह्या आणि अशा कित्येक कृतींतून स्त्रियांचे दुय्यम स्थान समाज अधोरेखित करत असतो. मी देखील पुरुष असल्याने ह्यातील काही भावना कळत-नकळत माझ्याही शब्दांतून- देहबोलीतून व्यक्त झालेल्या आहेत. हे बदलण्याची सुरुवात स्वत:पासून करायला हवी हे देखील प्रकर्षाने जाणवलेले आहे.

एक समाज म्हणून इतर काही करता येणे शक्य नसेल, इच्छा नसेल तर किमान पंतप्रधान, राष्ट्रपती, सभापती, एवढे शब्द तरी बदलायला हरकत नाही. वूमन्स-डे च्या नुसत्याच शुभेच्छा देण्यापरीस आम्ही खरोखरच बदलायला तयार आहोत हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध होणे अधिक महत्वाचे आहे.

अगम्य's picture

8 Mar 2015 - 2:17 pm | अगम्य

सहमत. फक्त पेढे आणि बर्फी ह्या वेगळ्या मिठाया आहेत, जसे मुलगा आणि मुलगी हे वेगळे आहेत. त्यात उच्च-नीच किंवा दुय्यम असे काही नाही. दोन्ही वाट्ण्यातुन आनंदच दर्शविला जातो. बाकी प्रतिसादाशी सहमत.

अवतार's picture

8 Mar 2015 - 2:44 pm | अवतार

ते तर उघडच आहे. पण ह्याच मुली जेव्हा दहावी, बारावीची परीक्षा उत्तीर्ण होतात तेव्हा मात्र पेढेच वाटले जातात, बर्फी नव्हे. मग जन्माच्या वेळीच हा भेद कशासाठी? पेढा म्हणजे तो आणि बर्फी म्हणजे ती ह्यातून नेमके काय साध्य होते? पुरुषांचे मन जेव्हा स्त्रियांचा मूक आक्रोश समजून घेण्याइतके प्रगल्भ होईल तेव्हा स्त्रीमुक्ती हा शब्द इतिहासजमा होईल. आणि हे केवळ कडक कायदे आणि शिक्षा करून होणार नाही. सामाजिक परिवर्तनाची सुरुवात हि नेहमीच आंतरिक परिवर्तनापासून होत असते.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Mar 2015 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा

@पुरुषांचे मन जेव्हा स्त्रियांचा मूक आक्रोश समजून घेण्याइतके प्रगल्भ होईल तेव्हा स्त्रीमुक्ती हा शब्द इतिहासजमा होईल.>>>> ++++++++११११११११११११११११

संदीप डांगे's picture

9 Mar 2015 - 1:02 am | संदीप डांगे

(वरिल वाक्यात पुरूष दाता आणि स्त्री याचक असा भास होत असल्याने सौम्य निषेध.)

स्त्रीमुक्ती म्हणजे पुरूषांच्या सत्तेमधून मुक्ती असा मर्यादित अर्थ नेहमीच काढला जातो. खरेतर स्त्रियांची स्वतःच्या गुलामगिरिच्या मानसिकतेतून मुक्ती असा अर्थ असायला हवा. समाजात ५०% स्त्रिया आहेत आणि उरलेल्या ५०% इतकेच स्वतंत्र आयुष्य त्या स्वतः ठरवलं तर जगू शकतात हा आत्मविश्वास स्त्रियांना येइल तेव्हा खर्‍या अर्थाने स्त्री-मुक्ती ह्या शब्दाची गरज राहणार नाहे. स्त्रियांना दुय्यम वागणूक देण्याबद्दल जेवढी पुरूषांमधे एकी आहे, तेवढीच एकी स्त्रियांनी दाखवली तर स्त्री-मुक्ती करण्याची जबाबदारी पुरुषांवर टाकायची गरज राहणार नाही.

माझ्या मते स्त्रीयांची मने लहानपणापासून दोरखंडाला बांधलेल्या हत्तीच्या पिल्लासारखी आहेत. मोठा झाल्यावरही आपल्या शक्तीची जाणीव न झाल्याने बोटभर जाडीच्या दोरीनेही तो महाकाय हत्ती एखाद्या खुंट्याला बांधून ठेवता येतो. त्याच्या वजन आणि आकारमानाच्या मानाने टिचभर असलेला माहूत त्याला इथून तिथे सहज नाचवतो.

आपली शक्ती ओळखा. मुक्त आहात, मुक्त राहा. प्रत्येक दिवस महिलादिन म्हणून साजरा करा.

अधिक माहिती आणि प्रोत्साहनासाठी बघा : मिर्च मसाला (१९८५)

mm