मराठी पुस्तकांवर २०-२५ टक्के सवलत

शिवमुद्रा's picture
शिवमुद्रा in जनातलं, मनातलं
1 Mar 2015 - 1:06 am

http://adf.ly/158NYw

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मराठीतील नामवंत प्रकाशकांच्या सहकार्याने 'महाराष्ट्र टाइम्स'ने सादर केलेल्या सवलतीतील पुस्तक खरेदी उपक्रमास वाचनप्रेमींनी चांगला प्रतिसाद दिला असून, ही सवलत आज, शनिवार व उद्या, रविवार असे आणखी दोन दिवस सुरू असेल. या बातमीचे कात्रण आणणाऱ्यास ही सवलत मिळेल.

मॅजेस्टिक, राजहंस, मौज, ज्योत्स्ना, रोहन, मनोविकास, पद्मगंधा, लोकवाङ्‍मयगृह या प्रकाशन संस्थांच्या मराठी पुस्तकांच्या खरेदीवर दादर आणि ठाणे येथील मॅजेस्टिकच्या ग्रंथदालनात २५ टक्के सवलत मिळेल. याच ग्रंथदालनांतील इतर प्रकाशकांच्या पुस्तकांवर २० टक्के सवलत असेल. मुंबई आणि पुण्यातील 'परचुरे प्रकाशन मंदिर'मध्ये परचुरे प्रकाशनाच्याच पुस्तकांवर २५ टक्के सवलत मिळेल. पद्मगंधा प्रकाशन आ​णि लोकवाङ्‍मय गृहाच्या पुस्तकांवर फोर्टमधील पीपल्स बुक हाऊस येथेही २५ टक्के सवलत मिळेल. शब्द द बुक गॅलरीमध्ये 'शब्द पब्लिकेशन'च्या पुस्तकांवर ३० टक्के आणि इतर प्रकाशनांच्या पुस्तकांवर २० टक्के सवलत असेल.

मराठीतील उत्तमोत्तम पुस्तके संग्रही आणण्यासाठी मराठी राजभाषादिनाचा मुहूर्त उत्तमच. त्यामुळेच 'महाराष्ट्र टाइम्स'ने मराठीतील काही नामवंत प्रकाशकांच्या सहकार्याने तयार केलेल्या पुस्तक सवलत योजनेद्वारे तुमचे पुस्तक निवडण्यासाठी, खरेदी करण्यासाठी तुम्ही पुस्तकस्थळांना भेट द्यायलाच हवी.

या ठिकाणी मिळेल सवलत...

>मॅजेस्टिक ग्रंथदालन : ​शिवाजी मंदिर, तळमजला, दादर प​., संपर्क- ९८९२२२०२३९ किंवा ६५६६६७५५

>मॅजेस्टिक बुक डेपो : न्यू गर्ल्स स्कूलसमोर, राम मारुती रोड, ठाणे प., संपर्क - २५३७६८६५, २५४३०६५२.

>पीपल्स बुक हाऊस : मेहर हाऊस, कावसजी पटेल रस्ता, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई. फोन ः २२८७३७६८ (फक्त पद्मगंधा प्रकाशनाच्या पुस्तकांवर सवलत)

>शब्द द बुक गॅलरी : दुकान नंबर ९/१०, कुलप्रेम सोसायटी, वझीरा नाका, एलटीरोड, बोरीवली पश्चिम, मुंबई, फोन : २८३३२६४०.

>परचुरे प्रकाशन मंदिर : २/३०, गोरेगावकर बिल्डिंग, गोरेगावकर लेन, गिरगाव, मुंबई आणि आचार्य अत्रे सभागृह, पहिला मजला, १०६०, शुक्रवार पेठ, पुणे.

\\

शिक्षण

प्रतिक्रिया

शिवमुद्रा's picture

1 Mar 2015 - 1:09 am | शिवमुद्रा
पैसा's picture

1 Mar 2015 - 10:59 am | पैसा

मुंबई आणि पुणेकरांची चंगळ आहे!