सहावा वेतन आयोग लागू; २००६ पासूनचा फरक मिळणार

शुक्राची चान्दनी's picture
शुक्राची चान्दनी in काथ्याकूट
14 Aug 2008 - 4:31 pm
गाभा: 

नवी दिल्ली - सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला असून जानेवारी २००६ पासून या आयोगाच्या शिफारशी लागू होणार आहेत. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरासरी २१ टक्के वेतनवाढ मिळणार असून जानेवारी २००६ पासूनचा वेतनातील फरकही देण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची अंमलबजावणी येत्या सप्टेंबर महिन्यापासून होणार असून वेतनातील फरकाची रक्कम दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. त्यापैकी ४० टक्के रक्कम चालू आर्थिक वर्षात तर उर्वरित ६० टक्के रक्कम २००९-१० या आर्थिक वर्षात देण्यात येईल.

या वेतनवाढीमुळे केंद्रावर वर्षभरासाठी १७ हजार ७९८ कोटींचा बोजा पडणार असून २००६ पासूनच्या वेतनाच्या फरकापोटी २९ हजार ३७३ रुपये अतिरिक्त बोजा पडेल.

सहाव्या आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रियरंजनदास मुन्शी यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

14 Aug 2008 - 4:46 pm | प्रकाश घाटपांडे

केंद्राला भेटला कि राज्याला बी भेटतुय! आमाला बी भेटनार!
सेवानिवृत्तीची तारीख- ३० सप्टेंबर २०२०
स्वेच्छानिवृत्तीची तारीख- ३१ मार्च २००७
पैशे भेटतीन तव्हा खरं म्हनायचं. सरकारनी आतापर्यंत आमच्या तोंडाला लई पान पुसली.
प्रकाश घाटपांडे

शुक्राची चान्दनी's picture

14 Aug 2008 - 4:50 pm | शुक्राची चान्दनी

अगदी ख्ररा आहे तुमचा
पन यावेलि मिलेल असा अन्दाज आहे
:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2008 - 4:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राज्यसरकारही सप्टेंबरांपासून लागू करेल असे वाटत नाही.
ते नेहमीप्रमाणे पैसे कुठून आणायचे म्हणुन रडत राहतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(सहाव्या वेतन आयोगाची अमंलबजावणीच्या नुसत्या बातमीने आनंदीत)

शुक्राची चान्दनी's picture

14 Aug 2008 - 5:06 pm | शुक्राची चान्दनी

नाही हो लगेच नाही मिलनार पैसे
२००८ मधे ४० %
आनि २००९ मधे ६० % रक्कम मिलेल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2008 - 5:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फरक नकोच आत्ता... फक्त नियमित पगार सप्टेंबरापासून सहाव्या वेतन आयोगानुसार दिला तरी खूप आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(आयकर किती भरावा लागेल याच्या हिशोबात गुंतलेला)

visshukaka's picture

14 Aug 2008 - 5:08 pm | visshukaka

शेवटि सरकार ला पण जाग आलि म्हणायचि.

विदुषक's picture

14 Aug 2008 - 5:12 pm | विदुषक

नीवडणुका आल्या रे ..... ;)
मजेदार विदुषक

शुक्राची चान्दनी's picture

14 Aug 2008 - 5:18 pm | शुक्राची चान्दनी

नीवडणुका आल्या रे .....
मजेदार विदुषक

माझ्या आनन्दावर पानी ओतले तुम्ही :(

दिनेश's picture

14 Aug 2008 - 5:38 pm | दिनेश

अभीनन्दन
म्हणजे आता भ्रष्टाचार नाहिसा होणार तर्...पगार वाढला ना!!!
लगे रहो!!!

दिनेश

प्राजु's picture

14 Aug 2008 - 8:26 pm | प्राजु

म्हणजे आता भ्रष्टाचार नाहिसा होणार तर्...पगार वाढला ना!!!

वाट बघा...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

14 Aug 2008 - 8:30 pm | सहज

आता चिरीमीरीत भागणार नाही. टेबलाखालचे रेट पण भाववाढ..

:?

rjbendre's picture

15 Aug 2008 - 1:25 pm | rjbendre

there is no relation between curruption and income. curruption is a tendency. it is fall for easy money. it is part of one's character.

चंबा मुतनाळ's picture

15 Aug 2008 - 7:27 pm | चंबा मुतनाळ

बेंद्रेकाका,
आपले म्हणणे पटले, परंतु आपला प्रतीसाद मराठीमध्ये द्यावा
चंबा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2008 - 5:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्र सरकारची भुमिका सकारात्मक आहे, पण तिजोरीचा विचार करावा लागेल पाहा बातमी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे