घराला,
आईची मुळाक्षरे
बापाच्या शिरोरेखा
आज्जीची जोडाक्षरे
आजोबांचे अनुस्वार!
घराला,
बहिणींची चन्द्रबिंदी
भावड्याचा काना
चुलत्यांचे रफार
सावत्रांचे विसर्ग !
घराला,
मुलाबाळांचे स्वल्पविराम
भाच्यांचे अर्धविराम
नवर्यांचे प्रश्न, अन
बायकांच्या मात्रा!
घराच्या पुस्तकाला आता
आठवणींचे कव्हर!
हार्डबाउंड पुस्तकाचे मग
व्हर्चुअल व्हर्जन!
प्रतिक्रिया
24 Feb 2015 - 10:24 pm | अत्रुप्त आत्मा
चांगला मजकुर आहे...
.............
वास्तुशांतिला द्यायला-बरा......नै???
( :D )