त्या खर्या कविता..म्हणुनी
शब्द कल्पना सांगत नाही.
येतील आज..? पुन्हा? .. का कधिही!(?)
अश्या कुठे त्या.. थांबत नाही.
बोलावुनी वा हाकारुनी त्या
ढुंकुन कधिही पहात नाही.
आणि घेतले टाळे लावुनी
येणे-असता.. रहात नाही.
बासरी ,पुंगी..नाद कसाही
निश्चित त्यांचे स्वरूप नाही.
किंवा स्वये त्या नाद-घेऊनी
येतील..त्याचे अप्रुप नाही.
वार्या समं ते शब्द वाहती
कवेत त्यांना घेता.. नाही.
कुठला परिसर ..माळं कोणता?
पडणे निश्चित..रुजणे नाही!!!
छंद..मुक्त वा बंध...कसेही!
काहि त्यांना सांधत नाही.
आशय जरं का असेल पक्का
कशानीच मगं वांधत नाही.
काव्याचा हा प्रांत असा की
शाश्वत त्याला ऋतूच नाही
ऋतुही शाश्वत होऊ पहाता
मगं काय उरते???...काव्यचं नाही!
हात जोडूनी नम्रत्वाला
झुकुनी देतो एकची ग्वाही.
करावया-जर कविता गेलो..
ती ही नाही..मि ही नाही!!!
===============
अतृप्त...
प्रतिक्रिया
7 Feb 2015 - 6:28 pm | प्रचेतस
सुरेख.
आवडली कविता.
7 Feb 2015 - 6:41 pm | आदूबाळ
ये ब्बात!
7 Feb 2015 - 6:48 pm | जेपी
चांगलय...
8 Feb 2015 - 7:21 am | ऊध्दव गावंडे
बढीया !
8 Feb 2015 - 9:46 am | खटपट्या
चांगलीय कविथा !!
8 Feb 2015 - 10:39 am | वैभव जाधव
आत्माजी मस्त लिहीताय ओ.
छान छान. आवडली एकदम.
ह्ये तर एकदम खटक्यावर बोट.
9 Feb 2015 - 11:03 am | अत्रुप्त आत्मा
@आत्माजी मस्त लिहीताय ओ.>> धन्यवाद! :)
8 Feb 2015 - 9:08 pm | आनन्दिता
खुप सुंदर !!!
8 Feb 2015 - 11:59 pm | गणेशा
अप्रतिम
9 Feb 2015 - 4:06 pm | पैसा
मस्स्स्स्स्स्त!
अवांतरः कधी तरी जिलब्या पण तळा हो! तो पण कवितेचाच प्रकार!
11 Feb 2015 - 10:31 am | अत्रुप्त आत्मा
@ कधी तरी जिलब्या पण तळा हो! तो पण कवितेचाच प्रकार! >>> =)) आजकाल ती लहर कमी झालि आहे! :)
12 Feb 2015 - 1:09 am | अस्वस्थामा
बुवा लग्न करतांव की कांय ? :)))
10 Feb 2015 - 3:47 pm | psajid
आवडली कविता !
11 Feb 2015 - 3:15 pm | खटासि खट
छान आहे.
12 Feb 2015 - 1:07 am | मेघवेडा
करावया-जर कविता गेलो..
ती ही नाही..मि ही नाही!!!
वा! आवडली कविता, बुवा!
13 Feb 2015 - 11:46 am | अत्रुप्त आत्मा
सर्व वाचक,प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद. :)