सध्या सगळीकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगले वातावरण आहे. इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे अन त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणे सुकर आहे. नवीन विचार, नवीन technology, बऱ्याच व्यवसायांमध्ये disruptive model आलेले आहे. मी इथे कॅलिफोर्निया पाहते आहे किती लोकं किती वेगवेगळ्या दिशेने जग नेत आहेत.
लोकं एकमेकांना reference, सल्ला इ. मदत करून प्रचंड प्रमाणात पुढे जात आहेत. यात भारतीय लोक इतर भारतीयांना फारसे मदत करणार्यातले नाहीत हे अगदी लगेच लक्षात आल. अगदी अनोळखी असाल तरी सल्ला विचारला तर इतर लोकं हौसेने पुढे येउन उपयोगी सल्ला देतात, reference वगैरे देतात पण आपले म्हणुन जावं तर भारतीय email ला उत्तर सुद्धा देत नहित. आजच्या घडीला आजूबाजूला पाहूनसुद्धा दुसऱ्याला का पुढे जाऊ द्या हाच विचार कसा मनात येतो? या मानसिकतेच काय कारण असेल? अगदी गुरबक्ष चहालने सुद्धा त्याच्या पुस्तकात हा मुद्दा मांडला आहे हे एक विशेष.
लक्षात घ्या, मी भारतीय म्हणाले फक्त मराठीच नाहि. नैतर उगाच गोंधळ!
प्रतिक्रिया
16 Jan 2015 - 8:26 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही हो. मला आपल्या मिसळपाववरचं किती लोकांनी मोलाची मदत माहितीस्वरुपात केलीये. आदुबाळ, मंद्या, संक्षी, अन्या, विकास, मनिष, पु.पे.न वैनतेय आणि विनायक देशपांदे असे अनेक....!!! (कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमस्व)
विचारलं आणि लोकांना अॅप्रॉच झालो की लोकं मदत करतात.
16 Jan 2015 - 8:35 am | माईसाहेब कुरसूंदीकर
बाई ग शिल्पे, तू कॅलिफोर्नियातल्या लोकांनाच त्यांचा अनुभव विचारून इथे का नाहि मांडत ?तुमची ती सिलिकॉन व्हॅली का काय म्हणतात ती तिकडेच आहे ना? तिकडचे भारतीय तर तंत्रज्ञानात मोठे पराक्रम करत असतात ,निदान येथे येऊन ते मुलाखतीत ते म्हणत असतात.
16 Jan 2015 - 9:23 am | माईसाहेब कुरसूंदीकर
तुमचा तो एच्.वन्.बी.व्हिसा ह्याला कारणीभूत आहे असे ह्यांचे मत.दुसर्या कर्मचार्याला मदत केली तर स्वतःचा जॉब धोक्यात येऊ शकतो.होय ना ?
एकदा का ग्रीन कार्ड मिळाले की बोळा सुटतो असे हे म्हणतात.
16 Jan 2015 - 9:43 am | शिल्पा ब
अय्या! हा कोणाचा आय डी?
16 Jan 2015 - 10:25 am | खटपट्या
तुम्हाला माइसाहेब नाही माहीत?
16 Jan 2015 - 10:40 am | डॉ सुहास म्हात्रे
वरच्या प्रतिसादात "हे" चा उल्लेख आला नव्हता म्हणून चुकल्याचुकल्यासारखं वाटलं होतं. आता तुम्हालाही तसंच वाटलेलं दिसतंय. कारण लगेच प्रति-प्रतिसादात ती चूक दूर केलीत. आता या वयात असं "हे"ना विसरणं बरं दिसतं का तुम्हाला माईसाहेब ? +D
16 Jan 2015 - 2:55 pm | नाखु
तुम्ही पाठवलेली "आंबे हळद" आणि रक्तचंदनाची मुळी पोहोचलेली दिसतेय ;-)
माईंच्या "ह्यां"ना आराम पडला हे वाचून बरे वाटले, परोपकाराबद्दल तुमचे अभिनंदन!! ;D
16 Jan 2015 - 3:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
16 Jan 2015 - 10:30 am | भृशुंडी
भारतीय लोक मदत करत नाहीत असा सिलेक्टीव अनुभव आलेला नाही.
फोरम्स किंवा हापिसातील लिस्टांमध्ये कितीतरी भारतीय एकमेकांना व्यवस्थित सल्ले देताना पाहिले आहेत. सल्ल्यापर्यंत न थांबता प्रत्यक्षात मदत केलेलीही उदाहरणे चिकार आहेत.
मदत न करण्याचे तुम्हाला आलेले अन्भव क्यालिफॉर्नियापुरते मर्यादित असावेत का? (बे एरियात राहाताय असं धरून चालतो. तिथली जीवघेणी स्पर्धा आणि एकूणच तंत्रज्ञानाचा वेग ह्यामुळे कदाचित तसं होतही असावं)
16 Jan 2015 - 10:57 pm | शिल्पा ब
असेलही. पण मी आयटीत नाही अन स्पर्धा करावी असही क्षेत्र नाही.
गंमत म्हणजे भारतीय लोकांकडून माल विकत घेऊन त्यांना बिजनेस द्यावा ह्या उद्देशाने त्यांच्याकडून विकत घेतलं तर त्यातही फसवणूक करायचा प्रयत्न. शेवटी सप्लायर बदलला.
16 Jan 2015 - 11:42 pm | भृशुंडी
हा.. बिझनेस एथिक्स वगैरे मामल्यात भारतीय ढीलढाल करतातच (मेक्सिकन पण करतात!)
पण म्हणून "मदत न करण्याचा भारतीय स्वभाव आहे" असं वाटलं नाही. असो!
16 Jan 2015 - 12:22 pm | क्लिंटन
मिपावरील पुनरागमनाचे स्वागत.
मला वाटते अमेरिकेतले भारतीय अशा प्रकारची मदत करायला तयार नसावेत याचे कारण अॅमवे असू शकेल.कधी वॉलमार्टमध्ये गेले, मॉलमध्ये गेले तर विनाकारण ओळख काढत 'मी तुम्हाला कुठेतरी बघितले आहे' अशा स्वरूपाचे वाक्य बोलत आपल्या जाळ्यात (नेटवर्क या अर्थी) खेचायचा प्रयत्न करणारे भारतीय लोक अमेरिकेत एकदाही भेटले नाहीत असा अनुभव फारच थोड्याच लोकांना आला असेल.एक भारतीय व्यक्ती अशा प्रकारे संपर्क साधत असेल तर त्या व्यक्तीचा हेतू कितीही चांगला असला तरी कशावरून ते अॅमवेसाठी नसेल हा प्रश्न नक्कीच पडत असेल.त्यामुळे भारतीय लोक बर्याच संख्येने आढळतात अशा ठिकाणी बरेच भारतीय 'गैरसमज नको' या कारणासाठी इतर भारतीयांशी बोलत नाहीत.
हे कारण असेल का?
16 Jan 2015 - 10:52 pm | शिल्पा ब
तुम्ही म्हणताय तो अनुभव बरेचदा आला आहे. पण व्यावसायिक ग्रुप, organisation मध्ये वगैरे सुद्धा हाच अनुभव. अर्थात एखादा अपवाद पण अपवादापुरताच. Generalize करण्याइतपत अनुभव असेल तर नक्कीच मानसिकता कारणीभूत असणार असा होरा.
16 Jan 2015 - 12:48 pm | पगला गजोधर
लेखिकेसारखा अनुभव बर्याचशा अंशी माझ्याही वाट्याला आलाय,
हे पटतंय, आणि 'इतर लोकं' म्हणजे भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी, श्रीलंकन सोडून 'इतर लोकं'.
16 Jan 2015 - 5:15 pm | प्रमोद देर्देकर
बरं मग?
16 Jan 2015 - 9:20 pm | रामपुरी
"मी इथे कॅलिफोर्निया पाहते"
हे बे एरियाचं पेव अचानक कसं फुटलं?
अवांतरः "मुक्तपिठ" विभाग सुरू करण्याचं संपादक मंडळानं अजून काही मनावर घेतलेलं दिसत नाही. :)