महालक्ष्मी सरस २०१५.

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
12 Jan 2015 - 9:52 pm

मागचा अनाहीताचा महालक्ष्मी सरस कट्टा मिसला आणि नंतर सविताचा कट्ट्याचा वृतांत वाचल्यापासुन कट्टा मिसल्याची हुरहुर लागली. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता अजयाने महालक्ष्मी सरस ला रविवारी येणार का विचारल्यावर लगेचच होकार देउन टाकला. रात्री आरोहीने सांगितले ती ही येणारे मग तर तिला भेटायची उत्सुकता लागुन राहीली. रविवारी सकाळी लवकर उठुन ८.५० ची लोकल पकडुन ११ वाजेपर्यंत बांद्रा रीक्लेमेशन ला पोहोचले सुद्धा, अजया आणि आरोही या १२.३० पर्यंत येतो असं म्हणाल्या त्यामुळे मी एकटीनेच फीरायला सुरुवात केली.

गेटच्या बाहेर उजव्या बाजुला फुलझाडांची छोटीशी नर्सरी होती तर डाव्या बाजुला लहान मुलांना खेळण्याची सोय केलेली होती. गेटमधुन आत घुसल्या घुसल्या आधी श्री. गणेशाची मुर्ती होती मागे कारंजे उडत होते.
.

आणी समोर मोठ्ठा लांबच्या लांब मांडव उभारला असुन खुप सारे स्टॉल्स दिसत होते. सुरुवातीलाच एका बचत गटाच्या महीला हाताने गोधडी शिवत बसल्या होत्या. त्यांच्या संमतीने त्यांचा फोटो काढला.
.

नंतर चा स्टॉल हाताने शिवलेल्या बॅगांचा होत्या, अतिशय सुंदर अशा कापडी, जुट्च्या पिशव्या टांगलेल्या होत्या.
...

पुढे हाताने कलाकुसर केलेल्या पणत्यांचा स्टॉल होता.
.

विविध प्रकारची लोणची यांच्यासाठी बरेच स्टॉल होते.
.

एका भागात विविध प्रकारची पिठे , कुरडया, शेवया, सांडगे, कडध्याने, पोहे होते.
.

एक स्टॉल तर खास मांसाहार करण्यार्‍ंसाठी स्पेशल होता, सर्व प्रकारचे सुकट इथे मिळत होते.
.

आयुर्वेदीक सुगंधी अगरबत्त्या , अत्तरे , काजळ यासाठी ही बरेच स्टॉल्स होते.
.

राजस्थानी पारंपारीक वस्तुंसाठी एक राजस्थानी स्टॉल होता.
.

कोकण स्पेशल आमसुले, आंबा वडी, चिंचवडी, सरबते, आमरस.
.

मंडपाछ्या बाहेरच्या बाजुलाही काही वस्तु विक्रीसाठी ठेवल्या होत्या
.

तिथेच हा वासुदेवही भेटला.
.....

हाताने केलेल्या अजुन काही कलाकृती
...

वेगवेगळ्या राज्यातील साड्या, ड्रेस मटेरीयल्स
.

बाकीच्या काही वस्तुंचे स्टॉल्स
..........
.

पुर्ण मंडप फिरुन झाला, साधारण १२.१५ झाले , फिरुन फिरुन भुक लागली होती म्हणुन कैरीचे पन्हे घेतले.

पुन्हा एकदा अजयाला फोन केला तर ती जवळ जवळ पोहोचलीच होती. गेटपाशी आले तोवर अजया, आरोही आणि तिचं गोड पिल्लु अद्वेय आत आले. आल्या आल्या आरोहीच्या पिल्लुचे लक्ष लहान मुलांच्या खेळांकडे गेले तसा तो तिथे जायला अधीर झाला. अजया ने कुरडया, लोणची घ्यायला सुरुवात केली. पण आधी जेवुन घ्यायचे ठरले, बाजुलाच खाण्याचे स्टॉल्स लागले होते. पोटपुजा केल्या नंतर आरोही अद्वेय च्या हट्टापायी त्याला खेळायला घेउन गेली तोवर मी आणि अजया पुन्हा फीरु लागलो. अजया ने बरीच खरेदी केली. आरोही गेल्याच रविवारच्या कट्ट्याला खरेदी करुन गेली असल्याने आणि मी माझी फिरण्याची, फोटो काढ्ण्याची आणि या दोघींना भेटण्याची हौस पुर्ण करुन घेतल्याने छोटीमोठी खरेदि केली. फिरत असतानाच तिथे माझ्या साठी खुपच आदरणीय असे आणखी दोन मिपाकर (मोक्षदा आणि नुलकरजी ) भेटले, भेटुन खुपच आनंद झाला, ३ वाजले होते, शेवटी ताजा स्ट्रॉबेरी मिल्क शेक पिउन आम्ही आपापल्या वाटा धरल्या.

मौजमजा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Jan 2015 - 9:57 pm | मुक्त विहारि

खादाडीचे फोटो पण हवे होते....

रेवती's picture

12 Jan 2015 - 9:59 pm | रेवती

छान झालाय वृ.
मला फोटोतील लोखंडी कढया, तवे तसेच दागिन्यांचा स्टॉल आवडलाय.

मोक्षदाताई आणि नुलकर पुन्हा पुन्हा?
मस्त आहेत सगळ्या गोष्टी. कुंदन रांगोळी ना ती?

नुलकर्स फक्त चौथ्यांदा आले होते!!

स्पंदना's picture

13 Jan 2015 - 7:58 am | स्पंदना

ओह! फक्त का? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jan 2015 - 7:32 am | अत्रुप्त आत्मा

हही हही हही .. वासुदेव लै भारी!

सविता००१'s picture

13 Jan 2015 - 9:43 am | सविता००१

सुरेख फोटो. कित्ती काढले आहेस गं :)
परत सरस प्रदर्शन तुझ्या निमित्ताने फिरून आले गं. मस्त

पैसा's picture

13 Jan 2015 - 9:52 am | पैसा

छान लिहिलंय आणि फोटो ही छान! मला पण लोखंडी वस्तू आणि ते दागिने फार आवडलेत. सुकटीचा स्टॉल बघून ड्वाले पाणावले.

स्नेहल महेश's picture

13 Jan 2015 - 11:25 am | स्नेहल महेश

सुरेख फोटो.लोखंडी कढया, तवे तसेच दागिन्यांचा स्टॉल आवडलाय, मातीची भांडी होती का?

वा वा..केवढे मस्त मस्त फोटो..सगळ घ्यवस वाटतंय....

मस्त कविता ,फोटो मस्त आलेत ..

पदम's picture

13 Jan 2015 - 12:06 pm | पदम

साड्या सुन्दर आहेत.

मोक्षदा's picture

13 Jan 2015 - 9:30 pm | मोक्षदा

खादाडी चे फोटो कसे टाकणार
आम्ही खाण्यात व्यस्त होतो ,पुढच्या वर्षी नक्की टाकू

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2015 - 9:57 pm | टवाळ कार्टा

म्हणून ७ जन्माचे भुकेले असल्यासारखे खाउ नये...आता वर्षभर वाट बघणार खाल्लेले पचवायला? :P

कविता१९७८'s picture

14 Jan 2015 - 6:40 am | कविता१९७८

अहो ट.का. तुमच्या सारखे ७ जन्माचे भुकेले नाही हो आम्ही ,जेवणासाठी खुपच गर्दी होती हो त्यामुळे फोटो नाही काढता आले. आता तुम्ही वर्षभर वाट बघा खादाडीचे फोटो पहायला.

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2015 - 10:09 am | टवाळ कार्टा

अहो ट.का. तुमच्या सारखे ७ जन्माचे भुकेले नाही हो आम्ही

हा जावईशोध कुठुन लावला जरा सांगता का?...का नेहमी सारखेच "मनाचे श्लोक"? जौदे...बायकांची सवय असतेच समोरच्याने म्हटलेले वाक्य उचलून तेच विना लॉजिक समोरच्याला ऐकवायचे
त्यामुळे तुम्हाला मोठ्या मनाने जौदे असे सांगतो
:)

कविता१९७८'s picture

14 Jan 2015 - 2:04 pm | कविता१९७८

जावईशोध कशासाठी ?? मागच्यावेळी तुम्हीच तुमच्यासाठी विनोदला निवडलय, लक्षात आहे हो सर्वाना

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2015 - 3:19 pm | टवाळ कार्टा

जावईशोध कशासाठी ?? मागच्यावेळी तुम्हीच तुमच्यासाठी विनोदला निवडलय, लक्षात आहे हो सर्वाना

ह्याला पुरावा दाखवा"च" असे ओपन च्यालेंज...नै जमणार कारण...जौदे...म्हैला मंडळाची सवयच असते असे आडवे तिडवे हवेत बाण मारायची

कविता१९७८'s picture

14 Jan 2015 - 3:45 pm | कविता१९७८

अच्छा ! विनोदला सवय आहे का असे हवेत आडवे तिडवे बाण मारायची?

बहुतेक 7 जन्मावर विश्वास नसवा,त्यामुळे सगळ याच जन्मी खाल्ले असेल. *biggrin* *blum3* *wink*

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jan 2015 - 8:59 am | अत्रुप्त आत्मा

आगगागागागा =)))))

मरतय आता जेपी पण! :-D

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2015 - 10:10 am | टवाळ कार्टा

खिक्क

नाखु's picture

14 Jan 2015 - 12:52 pm | नाखु

काय केलंस हे!!

चिंतातूर कार्यकर्ते.
तमाम ओसाड्वाडी मित्रमंडळ
फुटका पार, चावडी शेजारी.
ता:दुस्तर
जि.अवघड

जेपी यांणा गेल्या जन्मीचा गाढा अणुभव दिसतो आहे '७ जन्मीचे ' खाण्याचा ! *wink*

कविता१९७८'s picture

14 Jan 2015 - 3:46 pm | कविता१९७८

*lol*

अण्णाभावासाठी मागचा जन्म कश्याला आठवायला पायजे ,या जन्मी काय कोण भेटल नाय का आम्हाला. *blum3*

सस्नेह's picture

15 Jan 2015 - 11:11 am | सस्नेह

या जन्मी पण तुम्हाला सात जन्मींचे एकदम खाण्याचा स्वाणुभव आहे म्हणता ? a

आरोही's picture

14 Jan 2015 - 1:03 pm | आरोही

अग मुलींनो यावेळी शतकी धाग्याची सुपारी टका बाबा आणि जे पी काकांना नाय द्यायची असे ठरलेले न ??मग ?? जाऊदे आता आलेच आहेत तर आपलाच फायदा आहे ..चला सुरु व्हा बर आता पटापटा ....जास्त वेळ नका घालवू ........

जेपी's picture

14 Jan 2015 - 1:23 pm | जेपी

कोण नै येणार आता तुमच ते आंतरजालीय हड़ळीकुंकु ..अर्र सॉरी ते हळदीकंकु चालु होइल ना आजपासुन. *blum3*

साभार-श्री सूड

आरोही's picture

14 Jan 2015 - 1:36 pm | आरोही

गल्लत होतेय जेपी काका ,तुम्हालाच सुरु व्हायला सांगितलेय .....चालुद्या तुमचे.. हवेतर अजून एकदोघांना घेऊन या ...आम्ही येतोच तोपर्यंत हळदी कुंकू आटपून ..

झालं? निघा आता.छान होता विनोद.
खविस शिमग्याची तयारी करा.तुमचा तेवढा एकच सण =)) बोंबा मारायची प्रॅक्टिस इथेच सुरु करताय का? आपणहून काड्या करायच्या मागाहुन बोंबा मारायच्या असा काहीतरी विधी असतो म्हणे त्या सणाला तुमच्या =))

आमी नाय पाठिमागे बोंबा मारत...
असो आंतरजालीय शिमग्याच्या तयारीला लागतो आतापासुन. =))
चला रे पोरांनो.
यांना लुटु द्या वाण. *blum3*

सस्नेह's picture

14 Jan 2015 - 4:45 pm | सस्नेह

खरंच गेले वाट्टं सगळे शिमगा करायला !
उगाच सावध केलंस यांना अजया. *wink*

इरसाल's picture

15 Jan 2015 - 2:21 pm | इरसाल

कट्टा. अजुन एक सांगायचे आहे.

डॉक्टर : आपण कोणता साबण वापरता ?
गण्या : बजरंगाचा लिम्बाचा साबण
डॉक्टर : कोणती पेस्ट वापरता ?
गण्या : बजरंगाची आयुर्वेदिक पेस्ट
डॉक्टर : शैम्पू ?
गण्या : बजरंगाचा हर्बल शैम्पू
डॉक्टर : हेयर ओईल ?
गण्या : बजरंगाच आवळ्याच तेल
डॉक्टर : हा बजरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रांड आहे की मग पॉपुलर लोकल ब्रांड आहे ?
गण्या : नाही....तसं नाही...बजरंग माझा रूम मेट आहे...