आल्याचे लोणचे

मनिमौ's picture
मनिमौ in पाककृती
22 Dec 2014 - 2:28 pm

आल्याचे लोणचे
साहित्य
पाव किलो आले
10 मोठी लिंबे
शेंदेलोण , पादेलोण .- चवीपुरते
चवीपुरती साखर
कृती
आल्याची साले काढून ते किसून घ्यावे. नंतर त्यात बाकी सर्व गोष्टी मिसळा. लिंबाचा रस घालून एकत्र करावे. नंतर त्यात अधूनमधून लिंबाचा रस घालता रहावे.
पित्ताचा त्रास असेल तर खूप गुणकारी. उलटी झाली तर चाटवा.
तोंडाला लगेच चव येते.

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

22 Dec 2014 - 2:30 pm | कविता१९७८

मला खुपच आवडतं आल्याचं लोणचं, आमच्या कडे थोड्या वेगळ्या प्रकाराने केलं जातं पण ही रेसिपी लय सोपी वाटते. करुन पहायला हवं

कविता१९७८'s picture

22 Dec 2014 - 2:34 pm | कविता१९७८

मला प्रवासात बस आणि चार चाकी वाहनात बसल्यावर मळमळायला लागतं तेव्हा मी आल्याचे काप करुन त्यावर लिंबु पिळुन, पादेलोण मीठ घालुन बरोबर घेते त्यामूळे खुप बरं वाटतं आणि आताशा अ‍ॅलोपेथीच्या गोळ्या घ्याव्या लागत नाही.

सूड's picture

22 Dec 2014 - 2:44 pm | सूड

फोटो?

निलीमा's picture

22 Dec 2014 - 2:51 pm | निलीमा

खरच हे गुणकारी तर आहेच शिवाय चवही छानच आहे .. परवाच सासूबाई ने ओल्या हळदी चे लोणचे करून पाठवले , तेही आयर्वेदिक असून पचन क्रिया सुधारते तसेच हृदय विकारा पासून दूर ठेवते आणि चवीला ही उत्तमच.

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 2:54 pm | टवाळ कार्टा

हायला नविनच है हे ... कधी खाल्ले नाही अजून

अवांतर - अनाहिता अनाहिता म्हणतात त्या तिथल्या चर्चा अशाच असाव्यात ... "आमच्या किनै सासूबै..." ;)

निलीमा's picture

22 Dec 2014 - 3:42 pm | निलीमा

लोणचे खाऊन बघा..नक्की आवडेल

कविता१९७८'s picture

22 Dec 2014 - 3:04 pm | कविता१९७८

फोटो टाक की

मनिमौ's picture

22 Dec 2014 - 3:07 pm | मनिमौ

फोटो नाहीत. काढले नहीत

कविता१९७८'s picture

22 Dec 2014 - 3:10 pm | कविता१९७८

पण आलं थोडं लालसर - ब्राउनिश दिसतं ना लिंबाचा रस आनि मिठ मुरल्यावर

मनिमौ's picture

22 Dec 2014 - 3:14 pm | मनिमौ

छान गुलाबी लाल्सर दिसत.

त्रिवेणी's picture

22 Dec 2014 - 3:20 pm | त्रिवेणी

मी पण करते हे लोणच.पण थोड्या प्रमाणात.

सविता००१'s picture

22 Dec 2014 - 3:38 pm | सविता००१

मस्त लागतं हे लोणचं.

झकास.वाचुनच चव आली तोंडाला!!

वाह..करून बघेन नक्की..

मस्त...आल्याची चटणी करते आता अस लोणच करून बघते.

उमा @ मिपा's picture

22 Dec 2014 - 5:25 pm | उमा @ मिपा

मौ, आज पाकृ स्पेशल दिवस! मस्त मस्त. गुणी मुलीची गुणकारी पाकृ.
कविता, उपाय चांगला सांगितलास.

मदनबाण's picture

23 Dec 2014 - 4:52 pm | मदनबाण

मौ... हे पाचक तर मी स्वतःच बनवतो. आल्याची सालं मात्र काढत नाही ! काळ मिठ चव आणि गूण वाढवण्यास मदत करतं.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015