मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आल्याचे लोणचे

मनिमौ · · पाककृती
आल्याचे लोणचे साहित्य पाव किलो आले 10 मोठी लिंबे शेंदेलोण , पादेलोण .- चवीपुरते चवीपुरती साखर कृती आल्याची साले काढून ते किसून घ्यावे. नंतर त्यात बाकी सर्व गोष्टी मिसळा. लिंबाचा रस घालून एकत्र करावे. नंतर त्यात अधूनमधून लिंबाचा रस घालता रहावे. पित्ताचा त्रास असेल तर खूप गुणकारी. उलटी झाली तर चाटवा. तोंडाला लगेच चव येते.

वाचने 7799 वाचनखूण प्रतिक्रिया 17

कविता१९७८ Mon, 12/22/2014 - 14:30
मला खुपच आवडतं आल्याचं लोणचं, आमच्या कडे थोड्या वेगळ्या प्रकाराने केलं जातं पण ही रेसिपी लय सोपी वाटते. करुन पहायला हवं

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ Mon, 12/22/2014 - 14:34
मला प्रवासात बस आणि चार चाकी वाहनात बसल्यावर मळमळायला लागतं तेव्हा मी आल्याचे काप करुन त्यावर लिंबु पिळुन, पादेलोण मीठ घालुन बरोबर घेते त्यामूळे खुप बरं वाटतं आणि आताशा अ‍ॅलोपेथीच्या गोळ्या घ्याव्या लागत नाही.

निलीमा Mon, 12/22/2014 - 14:51
खरच हे गुणकारी तर आहेच शिवाय चवही छानच आहे .. परवाच सासूबाई ने ओल्या हळदी चे लोणचे करून पाठवले , तेही आयर्वेदिक असून पचन क्रिया सुधारते तसेच हृदय विकारा पासून दूर ठेवते आणि चवीला ही उत्तमच.

मदनबाण Tue, 12/23/2014 - 16:52
मौ... हे पाचक तर मी स्वतःच बनवतो. आल्याची सालं मात्र काढत नाही ! काळ मिठ चव आणि गूण वाढवण्यास मदत करतं.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015