आता तळीरामाला
मार्ग कोणी दावा...
उघड दार देवा आता
उघड दार देवा.
पिते दारू डोळे मिटुनी
जात बेवड्याची,
मनी त्याच्या भीती का हो
नशा चढण्याची?
सरावल्या पायांनाही
कंप का सुटावा?
उघड दार देवा आता
उघड दार देवा.
रोज रात्री करतो देशी
बारची हा वारी.
घरी मात्र जाताना का
शोधी दिशा चारी?
बेहोश होई रोज करूनी
मदिरेची सेवा.
उघड दार देवा आता
उघड दार देवा.
रस्त्यावरूनी चालताना
मोजतो हा पावले.
झिंग चढल्यावाचून घरी
जाणे नाही भावले.
शेजा-याच्या दारातही अपुला
दरवाजा दिसावा.
उघड दार देवा आता
उघड दार देवा.
प्रतिक्रिया
9 Aug 2008 - 12:55 pm | बेसनलाडू
उघड बार देवा अधिक समर्पक वाटेल विडंबनातील विषयाला धरून!
(बारवीर)बेसनलाडू
9 Aug 2008 - 1:02 pm | अंकुश चव्हाण
अगदी बरोबर...
तुमची सुचना ग्राह्य धरून बदल करत आहे.
धन्यवाद.