बघतो आहे वाट ती आता तरी येईल,
आलीच अगदी वेळेवर तरी पुढे काय होईल...
तिचे ते डोळे अन् ती मोहक अदा,
ते रेशमी केस पाहून झालोय मी फिदा...
तिच जागा आणि वेळ पाळण्याचा विक्रम मी रचला,
"पेहली नझर का प्यार" वर विश्वास माझा बसला...
इतकं सगळं झालं तरी बोलणं काही होत नाही,
समोर जरी आली तरी लक्ष मात्र देत नाही..
सरली अशीच दोन वर्षे आता तरी बोलावं,
थेट समोर जाउन आता प्रपोजच करावं...
मग विचार केला की कसे तिचे मन वळवू,
समोर जाऊन बोलण्यापेक्षा पत्रानेच कळवू...
एक छान पत्रं मी लिहिले अन् हिमतीने नेउन दिले,
न वाचताच तिने ते फाडून फेकूनही दिले...
ती निघून गेली अन् डोळ्यासमोर अंधारी पसरली,
पाहिलेली लाखो स्वप्नं खाणार्धात विखुरली...
प्रेम वगैरे खोटं असतं, प्रयत्न माझा होता खरा..
आता कुणी नको मी आपला एकटाच बरा !!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3606
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fed calls time on $5.7 trillion of emerging market dollar debt Oil's Price Decline Weighs On High Yield Debt U.S. shale junk debt tumbles amid oil crunchछान
च.चा. काव्य झिंदा'बाद!
असंच काहीसं लिहायला आलो होतो.
In reply to च.चा. काव्य झिंदा'बाद! by अत्रुप्त आत्मा
उतारा काढलाय बघा इकडे >> इस
In reply to असंच काहीसं लिहायला आलो होतो. by सूड
छान प्रयत्न.
पत्र तिने न वाचता फोडून टाकून
मस्तच .......