संदीप खरेच्या "कितीक हळवे कितीक सुंदर" ही कविता वाचुन आम्हालाही आमचे सोकॉल्ड हळवे क्षण आठवले...
किती धटिंगण किती भयंकर
-----------------------------------------
किती धटिंगण किती भयंकर
तात तुझे अन बंधु खरोखर
त्याच जागी त्या येऊन गेले
फाडुनि माझे चड्डी धोतर
अवचित असे सामोरे आले
काय करावे मला न कळले
त्यावेळी मी धावा केला
रामा..येशु..अल्ला हो अकबर
मला पकडुनि घेऊनि जाता
अश्या हाणिल्या बुक्क्या लाथा
वाटेवरच्या जनांस तेव्हा
मिळुन गेले हळुच उत्तर
"भेट जरा ना" या चिठ्ठितुन
घडविलेस तु हे रामायण
कुठुनि धाडले तु हे रावण
करुनि गेले माझे लक्तर
बनवुनि गेले माझे सरपण
पाहु जाता मग मी दर्पण
तुला विसरुनि जावे म्हणतो
तु ही सारे विसर विसर
.................बेचवसुमार...
प्रतिक्रिया
8 Aug 2008 - 7:48 pm | अविनाश ओगले
झकास विडंबन!
किती धटिंगण किती भयंकर
तात तुझे अन बंधु खरोखर
त्याच जागी त्या येऊन गेले
फाडुनि माझे चड्डी धोतर
अरेरे!
असो.