(सांगा ढेकुण कुणी हा पाहिला )

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
8 Aug 2008 - 5:03 pm

----------------------
सांगा ढेकुण कुणी हा पाहिला
सांगा ढेकुण कुणी हा पाहिला

झोपुनिया असता खाटवरी हो,
तसे होतो आम्ही गहनविचारी
डंखुनी गेला तो विषधारी
कुठे लपुन बाई हा राहिला
सांगा ढेकुण कुणी हा पाहिला

रात्री जागविती, हे ढेकुणजन हे
सुयोग आम्हालागी तुझा ना साहे
बळेबळे ओढता चादर हो
मालवुनि बघा दिवा खोल्यांचा
डंख पदी झाला मेल्याचा
म्हणे अमल्याजी, देह हा फोडिला
सांगा ढेकुण कुणी हा पाहिला

------------------------------------------------------------------------------------------------------------

मुळ गाणे -

सांगा मुकुंद कुणि हा पाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

रासक्रीडा करिता वनमाळी हो,
सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनि गेला तो गिरिधारी
कुठे गुंतून बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

गोपी आळविती, हे ब्रजभूषणा हे
वियोग आम्हालागी तुझा ना साहे
भावबळे वनिता व्रजाच्या हो
बोलावुनि सुज्ञाप्रती नंदाजीच्या
प्रेमपदी यदुकुळ टिळकाच्या
म्हणे होनाजी, देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

विडंबन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Aug 2008 - 5:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डंखुनी गेला तो विषधारी
=))
लय भारी... तुम्हाला विडंबनाचा ढेकूण डसला म्हणायचा! चालू द्या!

ऋचा's picture

8 Aug 2008 - 5:24 pm | ऋचा

रात्री जागविती, हे ढेकुणजन हे

ऐवजी हे पहा कसं वाट्टय--

रात्री जागविती, ढेकुणजन सारे

बाकी १+
सही

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

केशवसुमार's picture

8 Aug 2008 - 5:57 pm | केशवसुमार

वा अमल्याजीशेठ,
एकदम तुफान विडंबन..
(हसरा) केशवसुमार
स्वत:शी वेड्यासारखी बडबड करायला नको

चतुरंग's picture

8 Aug 2008 - 6:36 pm | चतुरंग

धीरे से जाना खटियन में, खट्मल धीरेसे जाना खटियन में! ;)

चतुरंग

मी पाहिला!

ढमढेर्‍यांच्या ढब्ब्या ढेरीवर ढब्बा ढेकूण ढासळला!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

विजुभाऊ's picture

8 Aug 2008 - 6:56 pm | विजुभाऊ

कृपया चांगल्या गीताम्चे असे विडम्बन करु नका. ही विनन्ती.
अत्र्यानी सुद्धा जी गाणी म्हणुन गाजली होती त्यांचे विडम्बन टाळले होते.
चांगल्या गाण्यांची विटम्बना टाळुयात.
कवितांची विडंबने करा ना?
कुसुमाग्रजाम्च्या "वेडात निघाले वीर दौडत सात "किंवा "कोलम्बसचे गर्व गीत "चे विडम्बन करुन दाखवा
अगदी "अहीनकुल" चे विडम्बन करता आले तरी स्वतःला धन्य समजा.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

बेसनलाडू's picture

8 Aug 2008 - 11:12 pm | बेसनलाडू

अमल्याजीशेठ,
विडंबन आवडले.
(वाचक)बेसनलाडू

मदनबाण's picture

8 Aug 2008 - 11:26 pm | मदनबाण

विडंबन आवडले..

(सध्या तरी मच्छरांनी त्रस्त)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda