पाडव्याच्या शुभेच्छा!

कोलबेर's picture
कोलबेर in जनातलं, मनातलं
11 Nov 2007 - 8:22 am

सर्व मिसळप्रेमी सदस्य आणि वाचकांना पाडव्याच्या अनेक शुभेच्छा! आम्ही नेहमी प्रमाणे श्रीखंडावर ताव मारुन पाडवा साजरा केला आपला मेन्यू पण कळवा :-)

हे ठिकाण

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

11 Nov 2007 - 8:55 am | विसोबा खेचर

अतिशय सुरेख फोटो..साला दिल खुश झाला! :)

तुझ्या प्लेटातल्या पदार्थांमध्ये मला साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं आणि माझी अवस्था
'रूप पाहता लोचनी.. ' अशी झाली बघ! :)

आमच्या घरीही श्रीखंडच केलं होतं पण फोटो काढायला विसरलो! :)

आणि तसंही आमच्याकडे पाडव्याचं महत्व नाही! साला आपण पडलो अविवाहित माणूस,
तेव्हा बायकोला साडीची ओवाळणी वगैरे प्रकार बाद!

हां, आता तशी एक ठेवलेली आहे.... असो पुढचं जाऊ द्या....:))

माझ्याकडूनही पाडव्याच्या सर्व मिसळपावकरांना अनेकानेक शुभेच्छा!

तात्या.

आजानुकर्ण's picture

11 Nov 2007 - 9:01 am | आजानुकर्ण

मस्त फोटो. आम्ही स्टीलच्या ताटातच जेवतो. ;)

हॉस्टेलमध्ये काचेचे/चिनीमातीचे ताट असल्याने त्या आठवणी जाग्या होऊ नयेत यासाठी ही काळजी.

असो.

कोलबेर's picture

11 Nov 2007 - 10:09 am | कोलबेर

चिनी मातीच्या ताटात जेवताना अगदी असंच (हॉटेल्यातल्या सारखं) वाटतं.. पण इथं (अमेरिकेत) स्टीलची ताटंच नाहीत हो.. कुठंतरी भारतीय दुकानात मिळत असावीत पण तितका उत्साह नाही !

आजानुकर्ण's picture

11 Nov 2007 - 11:12 am | आजानुकर्ण

हॉटेल चालेल हो पण हॉस्टेलच्या मेसची आठवण नको. :)

सर्किट's picture

12 Nov 2007 - 11:24 pm | सर्किट (not verified)

क्या बात है !
वा ! वर्षाची सुरुवात व्हावी ती अशी !

ह्यावेळी आमची दिवाळी मुलांवरच केंद्रित होती. मुलांच्या मित्र मैत्रिणींना बोलावून त्यांना रांगोळी, आकाशकंदिल अशा "क्राफ्ट्स" शिकवणे, आणि फुलबाज्या उडवणे ह्यातच दिवाळी संपली !

- सर्किट

बेसनलाडू's picture

12 Nov 2007 - 11:30 pm | बेसनलाडू

त्यांना रांगोळी, आकाशकंदिल अशा "क्राफ्ट्स" शिकवणे, आणि फुलबाज्या उडवणे ह्यातच दिवाळी संपली !
---वाव्वा! रांगोळी आणि आकाशकंदील? ! उत्तम! येथे पालो ऑल्टोजवळ एका मैत्रिणीच्या परसात अनार लावल्याचा फोटो पाहिला आणि डोळ्यांचे पारणे फिटले. मात्र फुलबाज्या, अनार यांवरून कोणी ९११ फिरवला नाही, आणि जीव भांड्यात पडला.
(फुलबाजीप्रेमी)बेसनलाडू
अमेरिकन काँग्रेसने दिवाळीला येथे साजर्‍या होणार्‍या अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण म्हणून मान्यता दिल्याचे नुकतेच वाचनात आले. लक्ष्मीबार, भुईचक्रे, लवंगी-डंबरी उडवायला कायदेशीर परवानगीची आवश्यकता नाही, असे मात्र कुठे वाचनात आले नाही. ज्यावेळी तेही होईल, त्यावेळी आपली खरी दिवाळी ;))
('दिवाळ'खोर)बेसनलाडू

कोलबेर's picture

13 Nov 2007 - 3:12 am | कोलबेर

मागच्या दिवाळीला इथे मेंफिसमध्ये आमच्या एका (अति) हौशी मित्राच्या बंगल्यावर आम्ही पण खूप सारे अनार, भुइचक्र, फुलबाज्या उडवले होते त्याची आठवण आली... आवाज करणारे फटाके मात्र उडवले नाहीत.

सर्किट's picture

13 Nov 2007 - 3:26 am | सर्किट (not verified)

माझ्या माहितीप्रमाणे, आकाशात उडणारे (म्हणजे रॉकेट्स वगैरे) फटाके उडवण्यासाठी आगावू परवानगी घ्यावी लागते. (अपवादः ४ जुलैला बरेचदा लोक घरीच रॉकेट्स उडवतात.)

- सर्किट

कोलबेर's picture

13 Nov 2007 - 3:57 am | कोलबेर

तुमचे घर जर शहराच्या हद्दीत घर येत असेल तर कसलेही (शोभेचे) दारूकाम करायला नगरपालीकेची परवानगी लागते. सदर मित्राने त्याचा खूप पाठपुरावा केल्याने ही माहीती उपलब्ध झाली. शेवटी घराजवळ दोन आगीचे बंब आणून उभे केल्यास (ज्याचा खर्च ताशी सुमारे $५०असतो) परवानगी देऊ, असे संबंधीत अधिकार्‍याने सांगीतले. त्यासाठी देखिल माझ्या मित्राची तयारी होती पण फायर डीपार्टमेंटने कमीतकमी ५ तासांचा चार्ज लावला जाईल (५० गुणीले ५ फारच होऊ लागले) असे सांगीतल्याने ती बोलणी फिसकटली. त्यामुळे शेवटी सगळ्या नियमांन धाब्यावर बसवुन चिक्कार दारू उडवली.

टग्या's picture

13 Nov 2007 - 4:44 am | टग्या (not verified)

> अमेरिकन काँग्रेसने दिवाळीला येथे साजर्‍या होणार्‍या अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण म्हणून
> मान्यता दिल्याचे नुकतेच वाचनात आले. लक्ष्मीबार, भुईचक्रे, लवंगी-डंबरी उडवायला कायदेशीर परवानगीची आवश्यकता नाही, असे
> मात्र कुठे वाचनात आले नाही. ज्यावेळी तेही होईल, त्यावेळी आपली खरी दिवाळी ;))

माझ्या कल्पनेप्रमाणे हा विषय अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीतला नसून राज्यसूचीतला आहे, आणि प्रत्येक राज्याचे याबाबतचे कायदे वेगळे आहे. साउथ कॅरोलायना व (बहुधा) टेनसी राज्यांमध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे फटाक्यांच्या व शोभेच्या दारूच्या* घाऊक व किरकोळ विक्रीस आणि खाजगी वापरास फारसे निर्बंध नसावेत, अस वाटते, कारण तेथे शोभेच्या दारूची मोठमोठाली दुकाने (कधीकधी भर पेट्रोलपंपाशेजारीसुद्धा!) पाहिली आहेत, आणि (निदान साउथ कॅरोलायनात तरी) त्यांच्या मोठमोठ्या जाहिरातीसुद्धा (होर्डिंग्ज़) भर महामार्गावरून ग्राहकांना पुकारत असतात हे पाहिलेले आहे. जॉर्जियात काही वर्षांपूर्वीपर्यंत फटाक्यांच्या आणि शोभेच्या दारूच्या विक्रीस आणि खाजगी वापरास पूर्वपरवानगीशिवाय बंदी होती (स्वातंत्र्यदिनी स्थानिक नगरपालिकांनी केलेले सरकारी दारुकाम जे काही होत असे तेवढेच!), पण आता हे निर्बंध शिथिल झाले आहेत असे वाटते. (नेमके कधीपासून ते आठवत नाही, परंतु हल्ली जॉर्जियात चार जुलै किंवा नाताळच्या सुमारास वगैरे स्थानिक ग्रोसरी स्टोर्स वगैरेंमध्ये दारुकाम विक्रीस उपलब्ध दिसते, तसेच ते वापरण्याससुद्धा पूर्वपरवानगी लागत नसावी. [नाहीतर दारुकाम खपले नसते.] अर्थात यात प्रामुख्याने आतषबाजीच; मोठा आवाज करणारे फटाके फारसे नाहीत. दिवाळीच्या वेळी अजूनही दारुकाम अगदी भारतीय ग्रोसरी स्टोर्समध्येसुद्धा विक्रीस उपलब्ध झालेले पाहिलेले नाही, त्यामुळे ते नाताळ किंवा चार जुलैच्या सुमारास विकत आणून ठेवून दिवाळीपर्यंत साठवावे लागते. वापरास मात्र निर्बंध असल्याचे ऐकिवात नाही, कारण घरांबाहेर दारुकाम केल्याचे सर्रास पाहिले आहे, आणि क्वचित केलेसुद्धा आहे.)

*पिण्याची दारू आणि शोभेची दारू यां दोहोंबाबत प्रत्येक राज्याचे कायदे निराळे आहेत. कॅलिफोर्नियात कोणत्याही प्रकारची पिण्याची दारू (बियर, वाइन किंवा हार्ड लिक़र) ही अगदी नेहमीच्या किराणामालाच्या दुकानांतसुद्धा चोवीस तास विकत मिळू शकत असे, असे आठवते. (गेल्या चौदा वर्षांत कायदा बदलला असल्यास कल्पना नाही, पण तशी शक्यता कमीच वाटते.) इलिनॉयमध्ये थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे, मात्र तेथे मध्यरात्रीपासून ते पहाटे सहापर्यंत कोणत्याही प्रकारच्या पिण्याच्या दारूविक्रीवर बंदी असल्याचे आठवते. जॉर्जियात व दक्षिणेकडील बर्‍याच ('बायबल बेल्ट') राज्यांत रविवारी कोणत्याही प्रकारच्या पिण्याच्या दारूच्या घाऊक व किरकोळ विक्रीस (अर्थात बाटलीरूपी विक्रीस) बंदी आहे, परंतु उपाहारगृहांमध्ये ग्लासांतून / ग्लासाच्या भावाने (अर्थात बाटली उघडून) विकण्यास बंदी नाही. तसेच जॉर्जियातील (व बहुतांश दक्षिणी राज्यांतील) किराणामालाच्या दुकानांत केवळ बियर आणि वाइनच मिळू शकते. हार्ड लिक़रसाठी वेगळी दुकाने आहेत; त्यांना जॉर्जियात 'दारूचे दुकान' असे उघडउघड न म्हणता 'पॅकेज स्टोर' असे (अधिकृतरीत्या!) संबोधले जाते. काही कारणास्तव या बाटल्या विकताना तशाच न विकता ब्राउनपेपरच्या पिशवीमध्ये गुंडाळून (लपवल्यासारख्या!) विकतात. (बहुधा तसा काही कायदा असावा असे वाटते, पण नक्की खात्री नाही.) हद्द म्हणजे, कुकिंग वाइन (जिच्यात अल्कोहोलचे प्रमाण नेहमीच्या वाइनइतकेच असते, परंतु जिच्यात मीठ मिसळून ती स्वयंपाकाचे माध्यम म्हणून वगळता इतर प्रकारे - विशेषतः तशीच पिण्यासाठी - वापरणे अशक्य केले जाते) ही रविवारी विकली जाऊ शकते, परंतु नॉन-अल्कोहोलिक बियर (यात नेहमीच्या बियरमधून काही प्रक्रियेने अल्कोहोल जवळजवळ संपूर्णपणे काढून टाकला जातो, ज्यायोगे ती प्यायल्यास बियरसारखी तर लागते परंतु त्यातून अल्कोहोलचे सेवन मात्र होत नाही) रविवारी विकण्यास बंदी आहे. यामागील लॉजिक काही केल्या कळत नाही.

बेसनलाडू's picture

13 Nov 2007 - 4:49 am | बेसनलाडू

आता आठवले! ही बातमी मिसळपाव वरच विकासरावांनी दिली होती. पुन्हा वाचली. तीत (शीर्षकातही) अमेरिकन काँग्रेस असाच उल्लेख आहे. बाकी एकंदर राज्यसूची, काँग्रेस इ. बाबत माझे ज्ञान भरवसा ठेवण्यालायक नाही(च).
मिसळपाववरील बातमी येथे वाचा.
(दुवादार)बेसनलाडू

टग्या's picture

13 Nov 2007 - 4:56 am | टग्या (not verified)

दिवाळीला येथे साजर्‍या होणार्‍या अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण म्हणून मान्यता देणे ही नि:संशय अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीतली बाब आहे. मात्र शोभेचे दारुकाम करण्यासाठी कायदेशीर परवानगीची आवश्यकता असणे अथवा नसणे ही राज्यसूचीतली बाब असावी.

कोलबेर's picture

13 Nov 2007 - 5:06 am | कोलबेर

आम्ही देखिल बायबल बेल्टमध्येच येत असल्याने पिण्याच्या दारू विषयी अगदी असाच अनुभव आहे. किराणा मालाच्या दुकानात फक्त बियर मिळते पण हार्ड लिकर खाकी कागदी पिशवीतून आणावी लागते. बहुदा ओहायो राज्यात सर्वात पहिल्यांदा किराणा दुकानात हार्ड लिकर पाहिली आणि ह्या प्रकाराचा उलगडा झाला होता. बायबल बेल्ट मध्ये रविवारी दारू फक्त कॅथलीक चर्च मध्ये मिलते :-)