मिपाकरांना दिवाळी " पोस्त " हा प्रकार माहिती असेल. माझ्या बालपणी मला दिवाळी पोस्त हा प्रकार माहिती होता.
त्यावेळी हक्काने पोस्त मागणारी एकच असामी अस्तित्वात होती ती म्हणजे " पोस्टमन " लोक त्याला न मागताही
पोस्त देत असत त्याबद्दल काही वावगे वाटात नसे. हा सगळा देणारा आणि घेणारा यांच्या राजीखुशीचा मामला असे.
या दिवाळीत मला दोन वेगळे अनुभव आले.
सकाळी " Morning Walk " ला गेलो असताना " Gas Cylinder" घरी पोचवणारा माणुस भेटला त्याने मला
थांबवुन " काय साहेब दिवाळी पोस्त " विसरलात काय. म्हणुन विचारणा केली मी त्याला लगेच दिवाळी पोस्त दिली.
घरी आल्यावर मला महिन्याचे वर्तमानपत्राचे बिल मिळाले. ते बिल वाचल्यानंतर चकीत होण्याची माझी पाळी होती.
बिलात पेपरची नावे ही नेहमी असतात व त्यापुढे त्याची महिन्याची रक्कम लिहिलेली असते.यावेळीही तसेच होते.
पण यावेळी एक नवीन सदर वाढलेले होते. त्यात लिहिलेले होते " दिवाळी " आणि त्यापुढे रक्कम लिहिलेली होती
" ५० रुपये " अगदी उघडपणे आणि लेखी स्वरुपात पोस्त मागणारा " प्रामाणिक प्राणी " मला पहिल्यांदाच
भेटला. आपल्याला असे कोणी असामी भेटलेत का?
" त्याच्या बिलाचे मी फोटोही काढुन ठेवलेत " मला " मिपावर " ते फोटो टाकता आले नाहीत.
दिवाळी पोस्त.
गाभा:
प्रतिक्रिया
6 Nov 2014 - 1:56 pm | योगी९००
लेखी स्वरुपात पोस्त मागणारा " प्रामाणिक प्राणी " मला पहिल्यांदाच
भेटला. आपल्याला असे कोणी असामी भेटलेत का?
आम्हीच दुसर्यांकडे मागत असल्याने आम्हाला अजून कोणी असामी भेटलेला नाही...
6 Nov 2014 - 2:23 pm | जेपी
या दिवाळीला पिताश्री कडे पोस्त मागितला व्हता.पोस्त सोबत चार शिव्याचा बोनस मिळाला.
9 Nov 2014 - 10:19 pm | मुक्त विहारि
"बापाकडे पोस्त मागावी" हा विचार पण कधी, आमच्या मनांत आला नाही.
6 Nov 2014 - 2:53 pm | psajid
कुणी मुद्दामहून मागितला नाही मात्र पेपरवाला, दुधवाला पोरगा यांना ती पोस्त देतो
6 Nov 2014 - 6:05 pm | आदूबाळ
घेतल्या लाचेची लेखी पावती देणारा एक नरपुंगव मला मध्यप्रदेशात भेटला होता. पुढच्या वेळेला ही पावती घेऊन आलास तर लाचेत डिस्काऊंट देईन (व्हॅटच्या क्रेडिटप्रमाणे) असंही कबूल केलं होतं.
"दिल्या-घेतल्या नोटांची शपथ तुला आहे" असं गाणंही सुचलं मला.
6 Nov 2014 - 6:29 pm | सुबोध खरे
आदु साहेब
लाचेची पावती देणारे कारखाना तपासनीस इ लोक सर्रास पाहण्यात येतात. पहिल्यांदा मी हा प्रकार माझ्या मित्राच्या कारखान्यात पहिला होता. त्याला काहीतरी परवाना पाहिजे होता त्यासाठी या तपासनीसाने पैसे मागितले त्यावर माझा मित्र म्हणाला साहेब माझा सर्व धंदा चेक द्वारे होतो. त्यावर हा तपासनीस शांत पाने म्हणाला माझ्या बायकोच्या नावाने सल्लागाराची फी म्हणून द्या. आणि त्यातून तुम्हाला काय जी आयकरात वाजवत करायची ती करून मला इतके पैसे मिळतील हे पहा म्हणजे झाले. आणि विश्वास ठेवा हा प्रकार सर्रासपणे चालतो.
पूर्वी दूरध्वनी वाले पोस्टमन हे हक्काने "पोस्त"मागून नेत असत. हा सक्तीची "खुशी"चा मामला असे. ज्यांचे शेअर बाजाराचे डिव्हिडंडचे चेक येत असत अशा लोकांना पोस्टमन अडून सुचवत असत कि साहेब तुमचे सगळे चेक मी एकदम वेळेत पोहोचवितो कि नाही.( यात गर्भित धमकी असे).
आता भ्रमणध्वनी आल्याने एम टी एन एल वाले पोस्त मागायला सुद्धा येत नाहीत आणि डिव्हिडंड थेट बँकेत जमा होत असल्याने पोस्टमन पोस्त साठी विनंती करतात. जग रहाटी अशीच आहे
पूर येतो तेंव्हा मासे मुंग्यांना खातात
आणि दुष्काळ पडतो तेंव्हा मुंग्या माशांना खातात.
6 Nov 2014 - 6:51 pm | आदूबाळ
सर - बायकोच्या नावाने सल्लागाराची फी, मेव्हण्याच्या कंपनीला कसलेकसले प्रोफेशनल फीज, लँडस्केपिंग एक्सपेंसेस वगैरे प्रकार तर आहेतच. हल्ली हे अवघड होत चाललंय, कारण कोण कधी स्टिंग ऑप्रेशन करेल नेम नाही.
अजून एक भन्नाट प्रकार म्हणजे "मी लाच घेत नाही. तुम्हाला काही द्यायचंच असेल तर अबक चॅरिटीला दान द्या." त्या अबक चॅरिटीकडून या गृहस्थांना त्यांचे टक्के मिळतात. दान देणार्याला वजावट अधिक ८०जीची सवलतही मिळते!
मी जे म्हणत होतो ते एका रस्त्याच्या वापरासंबंधी होतं. हा रस्ता प्रायवेट होता, आणि तिथे असलेल्या लोखंडाच्या खाणींमुळे तो रस्ता प्रायवेट ठेवण्यासाठी मालक इच्छुक होता. पण रखवालदार महोदय रस्ता वापरण्यासाठी "चुंगी" घेत आणि त्याची रीतसर हस्तलिखित पावती देत. किती चुंगी द्यायची असं विचारल्यावर "जितने आप चाहो" असं तो विलक्षण नम्रतेने म्हणत असे!
6 Nov 2014 - 7:02 pm | एस
विलक्षण अनुभव आहे!
6 Nov 2014 - 7:24 pm | बॅटमॅन
काय एकेक अण्भव तरी!!!!! अतर्क्यच आहे सगळं. :)
6 Nov 2014 - 8:13 pm | शिद
हे जबराट आहे. सगळीकडेच विन-विन सिच्यूएशन.
6 Nov 2014 - 8:37 pm | आदूबाळ
नाही, विन विन नाही. त्या चॅरिटीला ८५% उत्पन्न "चॅरिटेबल पर्पज" साठी खर्च केलं हे सिद्ध करावं लागतं तरच कलम १२ खाली करसवलती मिळतात. पण या टक्केवारीच्या गळतीत तो चॅरिटेबल ट्रस्ट तरी कुठून हे खर्च आणणार? मग खरंखुरं काम करणार्या कार्यकर्त्यांना निम्माच पगार देऊन पूर्ण रकमेच्या पावत्यांवर सह्या घेणे, खोटे प्रोजेक्ट्स दाखवणे, कमी दर्जाच्या वस्तू वाटणे असले प्रकार घडतात. म्हणजे खराखुरा लूजर वेगळाच असतो. आणि त्याला ते फार झोंबतं. असो.
7 Nov 2014 - 12:40 pm | नाखु
म्हणजे ५ जणात ४च चड्ड्या असल्यासारखे आहे!! जो साखळीत शेवटचा (खालच्य स्तरावर) तो कायम विवस्त्र राहणारच.
बळी तो कान पिळी या न्यायाने.
9 Nov 2014 - 9:51 pm | सुबोध खरे
अशा धर्मादाय संस्था सुद्धा आहेत जेथे आपण देणगी द्या त्याची रीतसर पावती मिळते. त्याच्या ९० ते ९५ टक्के रक्कम रोख परत करतात( त्यांच्या दान पेटीत जमा झालेल्या रकमेतून). म्हणजे आपला १५ टक्के कर वाचतो ( देणगीची ५० % रक्कम उत्पन्नातून वजा केली जाते). म्हणजे खिशातून काहीच जात नाही १० टक्के नफा शिवाय देणगी दिल्याचे पुण्य मिळते.
मेरा भारत महान