दिवाळी पोस्त.
मिपाकरांना दिवाळी " पोस्त " हा प्रकार माहिती असेल. माझ्या बालपणी मला दिवाळी पोस्त हा प्रकार माहिती होता.
त्यावेळी हक्काने पोस्त मागणारी एकच असामी अस्तित्वात होती ती म्हणजे " पोस्टमन " लोक त्याला न मागताही
पोस्त देत असत त्याबद्दल काही वावगे वाटात नसे. हा सगळा देणारा आणि घेणारा यांच्या राजीखुशीचा मामला असे.
या दिवाळीत मला दोन वेगळे अनुभव आले.
सकाळी " Morning Walk " ला गेलो असताना " Gas Cylinder" घरी पोचवणारा माणुस भेटला त्याने मला
थांबवुन " काय साहेब दिवाळी पोस्त " विसरलात काय. म्हणुन विचारणा केली मी त्याला लगेच दिवाळी पोस्त दिली.
घरी आल्यावर मला महिन्याचे वर्तमानपत्राचे बिल मिळाले. ते बिल वाचल्यानंतर चकीत होण्याची माझी पाळी होती.
बिलात पेपरची नावे ही नेहमी असतात व त्यापुढे त्याची महिन्याची रक्कम लिहिलेली असते.यावेळीही तसेच होते.
पण यावेळी एक नवीन सदर वाढलेले होते. त्यात लिहिलेले होते " दिवाळी " आणि त्यापुढे रक्कम लिहिलेली होती
" ५० रुपये " अगदी उघडपणे आणि लेखी स्वरुपात पोस्त मागणारा " प्रामाणिक प्राणी " मला पहिल्यांदाच
भेटला. आपल्याला असे कोणी असामी भेटलेत का?
" त्याच्या बिलाचे मी फोटोही काढुन ठेवलेत " मला " मिपावर " ते फोटो टाकता आले नाहीत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला..
या दिवाळीला पिताश्री कडे
भलतेच धाडशी बाबा तुम्ही....
मुद्दामहून मागितला नाही
घेतल्या लाचेची लेखी पावती
आदु साहेब
सर - बायकोच्या नावाने
हाहाहा
काय एकेक अण्भव तरी!!!!!
अजून एक भन्नाट प्रकार म्हणजे
नाही, विन विन नाही. त्या
ही अशा प्रकारची लाच्-साखळी..
अशा धर्मादाय संस्था सुद्धा