..ढोसुनि गुत्त्यात सार्या ब्रँड माझा वेगळा..ई-डंबन

बेचवसुमार's picture
बेचवसुमार in जे न देखे रवी...
6 Aug 2008 - 7:33 pm

.....स्व.सुरेश भटांची माफी मागुन.....त्यांच्या "रंग माझा वेगळा" ह्या रचनेचे ई-डंबन

ढोसुनि गुत्त्यात सार्या ब्रँड माझा वेगळा
गुंतुनि गुंत्यात सार्या हँड माझा मोकळा

कोण जाणे कोठुनी ह्या बाटल्या येता पुढे
मी असा की होतसे मग ओवळ्याचा सोवळा

राहती माझ्यासवे हे बेवडे भूतांपरी
कोणते हे मद्य ज्याचा लागला आम्हा लळा

कोणत्या काळी कळेना मी उठाया लागतो
लुडकणारा मी कुठेही ठार ऐसा वेंधळा

सांगते 'तात्पर्य' माझे भणंग ही माझी दशा
बेवडा मी फाटका मी अस्थिपंजर सापळा

माणसांच्या मद्य-रात्री झिंगणारा मद्यपी मी
माझियासाठी च माझा 'पेग'ण्याचा सोहळा

...................... बेचवसुमार

विडंबन

प्रतिक्रिया

सुनील's picture

6 Aug 2008 - 7:44 pm | सुनील

मी असा की होतसे मग ओवळ्याचा सोवळा
ओवळ्याचा सोवळा की सोवळ्याचा ओवळा?

सांगते 'तात्पर्य' माझे भणंग ही माझी दशा
माणसांच्या मद्य-रात्री झिंगणारा मद्यपी मी
इथे मिटर किंचित चुकतेय असे वाटते.

बाकी कल्पना आणि रचना झक्कासच!!

(पेगलेला) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

7 Aug 2008 - 1:05 am | विसोबा खेचर

ढोसुनि गुत्त्यात सार्या ब्रँड माझा वेगळा
गुंतुनि गुंत्यात सार्या हँड माझा मोकळा

ब्रँड, हँड चे यमक आवडले. बाकी मूळ कविता इतकी सुरेख आहे की त्याच्या ह्या विडंबनाची कीव वाटली!..

असो,

तात्या.

बेचवसुमार's picture

7 Aug 2008 - 5:09 pm | बेचवसुमार

@सुनील..
तिथे सोवळ्याचा ओवळा असे असायला हवे होते...तुम्ही शुध्दीत आहात.आमची हरपली होती आणि असे काही लिहुन बसलो..

@विसोबा..
फारच परखड प्रतिसाद राव..तोंड लपविणेही कठीण आता..!
पण तुम्ही मांडलेल्या मुद्द्याशी एकदम सहमत.
भटांच्या कविताच आशयदृष्ट्या अतिश्रीमंत आणि व्याकरणदृष्ट्या इतक्या शास्त्रशुध्द असतात कि त्यांना हात लावणार्याची फजितीच होते.

सुनील's picture

7 Aug 2008 - 7:07 pm | सुनील

भटांच्या कविताच आशयदृष्ट्या अतिश्रीमंत आणि व्याकरणदृष्ट्या इतक्या शास्त्रशुध्द असतात कि त्यांना हात लावणार्याची फजितीच होते.

नामंजूर!!

म्हणजे भटांच्या गजला नितांतसुंदरच असतात. वाद त्याबद्दल नाही. परंतु उत्तम कवितांचे विडंबन करूच नये असे नाही. अत्र्यांनी केशवसूत, माधव ज्युलियन यांच्यासारख्या प्रतिभावान कवींच्या कवितांचे विडंबन केले आहे.

थोडक्यात, विडंबन म्हणजे मूळ कलाकाराची किंवा त्याच्या रचनेची थट्टाच असते असे नाही.

तेव्हा बेचवसुमारसाहेब लगे रहो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.